Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
काथ्याकुट
चर्चा
राजकारण
अर्थसंकल्प

प्रतिक्रिया द्या
542105 वाचन

💬 प्रतिसाद (783)
ड
डँबिस००७ Sun, 02/03/2019 - 14:55 नवीन
नरेंद्र मोदी व अजित डोभाल यांच्या जोडीने दुबईत जे गुप्त ऑपरेशन केले ते वाचून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यांवर सतत ऊर बडवून घेणाऱ्या विरोधकांना नरेंद्र मोदींची ताकद तेव्हा नक्कीच समजली असेल जेव्हा मोदींनी एक गुप्त ऑपरेशन राबवून दुबईमधून ऑगस्टावेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी राजीव सक्सेना व दीपक तलवार यांना अक्षरशः उचलले. 30 जानेवारी 2019 ला दुबईच्या सुरक्षा यंत्रणेने यांना त्यांच्या घरांतून उचलले आणि भारताच्या ताब्यात दिले. सध्या हे इडीच्या ताब्यात आहेत. ज्या पद्धतीने भारताने या दोन दलालांना दुबईमधून उचलले त्याला इस्त्रायलच्या गुप्त ऑपरेशन्ससारखे पाहिले जात आहे. अशी ऑपरेशन्स आजपर्यंत इस्रायलच करत आलेला आहे. भारताने कशा पद्धतीने हे गुप्त ऑपरेशन यशस्वी केले ते वाचाल तर तुम्हीही थक्क व्हाल! वाचा कशा पद्धतीने भारताने ऑपरेशन केले --: ईडीने वारंवार विनंती करूनही राजीव सक्सेना हा चौकशीला साथ देत नव्हता. कायदेशीर मार्गाने वारंवार विचारणा करूनही त्याच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मोदींनी राजनैतिक संबंधांचा वापर करून दुबईवर दबाव आणला की कुठल्याही पद्धतीने आम्हाला राजीव सक्सेना हा हवाच आहे. तर दुसरीकडे राजीव सक्सेनाला असे वाटत होते की आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाची प्रक्रिया तर खूप वेळखाऊ आहे, आपण न्यायालयात जाऊ व या प्रक्रियेला भरपूर वेळ लावू. तोपर्यंत कदाचित 2019 ला भारतात सत्ताबदल होऊन काँग्रेसचे सरकार येईल व त्यानंतर त्याला कोणीही हात लावू शकणार नाही. पण नंतर पंतप्रधान मोदींच्या दबावामुळे दुबईमध्ये जे काही झालं त्याने देशातल्या लुटारूंची झोप उडेल. कोणतीही, अक्षरशः कोणतीही आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता दुबईच्या सुरक्षायंत्रणांनी राजीव सक्सेनाला त्याच्या राहत्या घरातून उचललेले व गाडीत टाकले. राजीव सक्सेना आपल्या वकीलांबरोबर बोलण्याची विनंती वारंवार दुबईच्या यंत्रणेला करत होता. पण दुबईच्या अधिकाऱ्यांनी त्याची एकही गोष्ट मान्य केली नाही. त्यानंतर राजीवने आपल्या कुटुंबीयांसोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली व कमीतकमी औषधे तरी घेऊ देण्याची विनंती केली. पण दुबईच्या अधिकाऱ्यांनी त्याचं काहीही ऐकून न घेता त्याला सरळ एका प्रायव्हेट एअरपोर्टवर ते घेऊन गेले आणि एका प्रायव्हेट जेटमध्ये चढवले. जेटमध्ये भारताच्या अधिकाऱ्यांना बघताच राजीव सक्‍सेना अक्षरशः अवाक् झाला! दरम्यान राजीवच्या वकिलांना ही गोष्ट समजली व त्यांनी दुबईच्या यंत्रणेला विनंती केली की कमीत कमी एकदा तरी राजीवबरोबर बोलू दे. पण दुबईच्या यंत्रणांनी त्यांचही ऐकून न घेता त्यांना सांगितलं की तो आता भारताच्या ताब्यात आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल ते भारताबरोबर बोला. राजीवला आम्ही विमानात बसवले आहे व विमानाच्या उड्डाणाला आम्ही आता थांबू शकत नाही! असं म्हटलं जातंय की कायदेशीर प्रक्रियेचे काहीही पालन न करता दुबईच्या यंत्रणांनी अवैधरित्या राजीवला उचलले व प्लेनमध्ये कोंबून भारताला पाठवले. एकाही आंतरराष्ट्रीय नियमाचे पालन केले गेले नाही. एका बाजूला राजीव सक्सेनाबरोबर हे चाललं होतं तर दुसऱ्या बाजूला ऑगस्टावेस्टलँड मधील आणखी एक आरोपी दीपक तलवार यालासुद्धा याच पद्धतीने दुबईच्या यंत्रणांनी उचललं. त्याचं काहीही ऐकून न घेता त्यालाही याच विमानात कोंबलं. जराही वेळ न दवडता भारतीय अधिकाऱ्यांनी दुबईतून ताबडतोब विमानोड्डाण केले व या दोघांनाही भारतात आणले. विमानतळावर उतरताच इडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा ताबा घेतला. मोदींच्या ताकतीची जाणीव कदाचित पहिल्यांदाच काँग्रेसला झाली असेल. काँग्रेस आता समजून चुकलेली आहे की जगभरात मोदींची ताकद कशा पद्धतीने वाढलेली आहे!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sun, 02/03/2019 - 15:42 नवीन
अगदी ग्रेट वर्क डन..!! हायला ती दुबईची यंत्रणा मोदींनी छू केले की आरोपींना लगेच उचलून आणतीय आणि आपली देशभक्त यंत्रणा मल्या निरव चौक्सीला शेपटी हालवत देशाबाहेर घालवायला जातय... सरळ केल पाहिजेत एका एकाला!! === मागे कांग्रेसवाले ( बहुदा कारवान वाले) उगाचच आपल्या देशभक्त दोवळ साहेबांच्या मुलांवर बेछूट आरोप करत सुटले होते. पुढे काय झालं कोणाला काही माहिती आहे का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/03/2019 - 17:38 नवीन
त्यांचा मुलगा ब्रिटिश नागरिक आहे , असे ऐकले होते, खरे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/04/2019 - 10:24 नवीन
https://www.linkedin.com/in/vivekdoval/?originalSubdomain=sg मोठा माणूस आहे. लंडनला शिकायला होता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
C
Chandu Sun, 02/03/2019 - 19:15 नवीन
या सर्वा माहीतिचा स्त्रोत विश्वसनीय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विशुमित Sun, 02/03/2019 - 20:00 नवीन
आमच्या सारखच त्यांचा पण एखादा IT सेलवाला ओळखीचा असेल. आजकाल खासदार आमदारांपेक्षा जास्त, IT सेल वाल्यांना आतली माहिती असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Chandu
L
lakhu risbud Sat, 02/16/2019 - 18:16 नवीन
आणि हे "चहा पेक्षा किटली गरम" छापाचे IT cell वाले पण आंतरजालावर किलोच्या भावाने सापडतात. मिपा वरच्या एक बुद्धिमान सहकाऱ्याने हा शोध लावला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अर्धवटराव Sun, 02/03/2019 - 21:14 नवीन
या बदल्यात भारताने काय दिले दुबईला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जेपी Mon, 02/04/2019 - 19:11 नवीन
काजु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 02/08/2019 - 04:22 नवीन
ती भारतात पळून आली होती अन कुणा परदेशी नागरिकांच्या मदतीने फ्रान्स की इंग्लंडला पळणार होती, पण डाव फसला बिचारीचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
C
Chandu Sun, 02/03/2019 - 19:12 नवीन
पुतना,शूर्पनखा,या हिन्दु देवता नव्हे.राम,शंकर,दुर्गा या हिंदूंच्या पूजनीय देवता आहेत.राहुल आणी प्रियंका या ख्रिस्च न व्यक्तीआहेत.त्याना या देवतांच्या रूपात दाखवल्यने हिन्दुंची धर्म भावनादुखावने स्वाभाविक आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/04/2019 - 03:50 नवीन
भारतीय मुस्लिम ख्रिश्चनमध्ये हिंदुत्व नसते ? साक्षात सावरकरांच्या विचारांचा अपमान ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Chandu
भ
भंकस बाबा Mon, 02/04/2019 - 05:44 नवीन
हया लोंकाची राजकारणात यायची? बाकी पाकिस्तानीना बाहेरुन एजेंट वेगेरे पाठवायाची काही गरज नाही , फक्त असहिष्णुता म्हणून गळा काढला की ढिगभर कुत्री मांजरी इथे गळा काढतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/04/2019 - 12:22 नवीन
मेरी जान को खतरा है , असे साक्षात मोदीही बोललेत. आणि त्या काँग्रेसवाल्यांची लायकी आहे , म्हणून तर ते निवडून येतात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Mon, 02/04/2019 - 14:52 नवीन
मेरा बाप मर गया , मेरी सास मर गयी असे बोलून तर कॉंग्रेसी मत मागत आले आहेत, फक्त त्या मरणाला बलिदानाचे नाव दिले की लोकांना इमोशनल ब्लैकमेल करता येते. मान्य मोदिनी स्वप्न दाखवली पण ती पूर्ण करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न तर केला , आणि आमचे राजकुमार बटाट्याचे सोने करण्याचे पांचट प्रयोग करतात . निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्या, अजुन हे जाहिरनाम्याची कलमे शोधण्याऐवजी कोणी युती करता का युती खेळत बसले आहेत. आणि साहेब तुमचा कोंग्रेसला पाठिंबा म्हणजे तुकडे गैंगला समर्थन असेलच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/04/2019 - 15:31 नवीन
काँग्रेसला मत द्यायला बंदी आहे का ? देणारच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/04/2019 - 16:58 नवीन
आणि बलिदानाची दांडगी यादी काँग्रेसकडे आहे , म्हणून ते त्याच्या जीवावर मत मागतात , भाजपाकडे आहे तरी काय ? ना नाव , ना बलिदान , गोडसेचे पुस्तक अन बाजपेयींच्या कविता , तुम्ही हे दाखवून मत मागा , कोण अडवले आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Mon, 02/04/2019 - 19:33 नवीन
बलिदान ? अय्या, कोणी केल म्हणे बलिदान ? गांधी परिवाराने ? काय सांगताय ? फार तर गांधी परिवारातल्या लोकांच्या हत्या झाल्या होत्या अस म्हणता येईल ! हत्या करायला भाग पडेल ईतक कोणाला दुखवावच का अस मी म्हणेन प्रियांका म्हणे हुकुमाचा एक्का आहे मग आता पर्यंत पप्पु जोकर घेउन कॉंग्रेस का खेळत होते याच उत्तर द्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/05/2019 - 05:34 नवीन
बलिदानाची यादी काँग्रेसकडे आहे, असे लिहिले होते, आणि चार एकके असतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
भ
भंकस बाबा Tue, 02/05/2019 - 14:52 नवीन
एक्के हरवले बहुतेक ! यांचे पांचट कुमार रामभक्त आणि शिवभक्त म्हनवुन घेतात, आणि त्याच पक्षाचे वकील राममन्दिराच्या विरुद्ध केस पण लढवतात, पांचट कुमाराची अजुन एक कामगिरी समोर आली आहे, नितिन गड़करीना उकसवण्याची ! मानले पाहिजे बाबा या कोंग्रेसच्या समर्थकाना! ऐसे म्हणतात की जहाज बुडायला आले की उंदीर सर्वात आधी पळतात, इथे मात्र उंदीर बुडलेल्या जहाजाच्या डोलकाठीवर बसून झोके मिळण्याचा आनंद दाखवतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Tue, 02/05/2019 - 15:28 नवीन
सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Tue, 02/05/2019 - 15:29 नवीन
सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Tue, 02/05/2019 - 15:29 नवीन
सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 15:59 नवीन
अय्या , यादी करायला काय लग्नातल्या गोष्टी आहेत ? ,बाकी बलिदान कोणीही करा काँ ग्रेस टाळु वरच लोणी खायला पुढे !! म्हणे ह्यांच्या कडे बलि दान केलेल्या लोकांची यादी आहे. फक्त बलिदान केलेल्यांच्या नावाने सत्ता उपभोगली पण बलिदान केलेल्या स्वातंत्र्य वीरांच्या कुटूंबीयांकडे बघायला सुद्धा ह्या काँग्रेसीना वेळ अधी मिळाला नाही !! पत्याच्या कॅट मध्ये ४ एक्के असतील पण तुमच्या लाडक्या भ्रष्ट काँग्रेस मध्ये मात्र एक जोकर दोन राण्याच आहेत !! बाकीचे सगळे गुलाम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Mon, 02/04/2019 - 18:24 नवीन
गांधी च्या वंशजानी पूर्वजांच्या नावावर भीक मागून ! मागून ! 55 वर्ष सत्ता अक्षरशः भोगली , हजारो कोटिची माया ओरबडुन खाल्ली . गरीब हा गरीबच राहिला , काँग्रेस जिंदाबाद चे नारे देवून ! देवून ! लाचारिचे जीवन जगत राहिला . गरीबी हटाव च्या अपयश बद्दल जाब न विचारता आरक्षण वर डोलत राहिला . भाजप हा उच्चवर्णियांचा पक्ष म्हणून सतत शिव्या दिल्या पण उत्तर प्रदेश , हरियाणा ,मध्यप्रदेश , राजस्थान मधील काँग्रेस चे आतापर्यंतचे मुख्यमंत्री हे उच्चवर्णीयच होते या कड़े मात्र दुर्लक्ष करत राहिला !!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ट
ट्रेड मार्क Mon, 02/04/2019 - 00:12 नवीन
ममताबानोच्या राज्यात कलकत्ता पोलिसांनी सिबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक केली. यावर दीदी धरण्यावर बसणार असून मोदींच्या इशाऱ्यावर डोवाल यांनी हे कारस्थान रचले असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर अनैतिकरीत्या जबरदस्तीने सत्ता हस्तगत करण्याचा मोदींचा डाव आहे असाही त्यांनी आरोप केलाय.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 02/04/2019 - 09:17 नवीन
म्हणे प बंगाल मध्ये येण्यास इतर भारतीय लोकांना पासपोर्ट सक्तिचा सर्किट दीदी करणार आहे अस कळलय , आणि या बाबी ला हुशार राजपुत्र नीं समर्थन दिले आहे !!!!!! सगळे चोर कोलकत्ता च्या केस मुळे गर्विष्ठ दीदी च्या पाठीशी उभे राहिले आहेत !!! मुख्यमंत्री सरकार हाकायचो सोडून स्वतः आंदोलन करण्याची चूकीची पद्धत पूर्वी भगोड्या केजरी आणि आता दीदी ने केली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अनन्त अवधुत Mon, 02/04/2019 - 15:39 नवीन
काही दुवा? पासपोर्ट देशाचा असतो. बाईंना बंगाल वेगळा देश करायचा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 02/04/2019 - 17:54 नवीन
भाजप नेत्यांचे हेलीकॉप्टर उतरु न देणे , सी बी आय ला प्रवेशबंदी या तिच्या चक्रम वागणुकी साठी उपरोधिक वक्तव्य होते हो ते !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
ड
डँबिस००७ Mon, 02/04/2019 - 16:33 नवीन
वेस्ट बंगाल मधल्या गौड बंगाल !! ममता बॅनर्जीनी सी बी आय च्या लोकांनाच लोकल पोलिसा कडुन अटक करवली आहे. केजरीवाल नंतर धरणे देण्यासाठी बसणारी दुसरी मुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्या बरोबर धरण द्यायला एखादा पोलिस कमिशनर पहिल्यादाच बसलेला असेल.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/04/2019 - 17:03 नवीन
इंडियन आर्मिने कारगिल विजयबाबत 2019 चे कॅलेंडर काढले आहे, आरमी , भाजपा व बाजपेयीं ह्यांचे अभिनन्दन. चावडीवर कॅलेंडर पीडीएफ दिले आहे , लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/04/2019 - 17:26 नवीन
कुठे आहे पीडीएफ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/04/2019 - 17:21 नवीन
भारती घोष नामक एक आयपीएस अधिकारी होत्या. त्यांच्यावर CID ने रेड टाकली होती.तेंव्हा घरात अडीच कोटी रुपये सापडले होते. आज त्याच भारती घोष यांनी भाजपा जॉईन केली. भाजपाने भ्रष्टाचार संपवायची एक नवीन परिभाषा विकसित केलीय,कितीही भ्रष्ट असू देत,तो भाजपात आला की झाला तो पवित्र..!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/04/2019 - 18:16 नवीन
UK home secretary approves Vijay Mallya's extradition to India ब्रिटिश सरकारच्या या अनुमतिमुळे, विजय मल्ल्याच्या एक्ट्रॅडिशनच्या मार्गातील, एक फार मोठी पायरी पार झालेली आहे. मात्र, या अगोदरच्या न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निकालामुळे, मल्ल्याची बाजू पुढच्या न्यायालयात टिकेल असे दिसत नाही. तरीही, येत्या १४ दिवसांत युके हाय कोर्टात अपिल करून मल्ल्या त्याचे एक्ट्रॅडिशन अजून काही दिवस पुढे ढकलू शकतो. अर्थातच, पाश्चिमात्य लोकशाहीमधून यापेक्षा वेगळी अथवा जास्त वेगाने कारवाई होणे शक्य नाही, हे पण तितकेच खरे. या पार्श्वभूमीवर, नुकतेच,... कोर्टाची कारवाई टाळून, युएईमधून, अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील दलाल, राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना, तडक खाजगी विमानात टाकून आणले गेले... या कारवाईचे वेगळेपण स्पष्ट व्हावे. अशी कारवाई यापूर्वी केवळ अमेरिका (व गुप्तपणे बहुदा इझ्रेल) यांच्या तर्फेच केली गेली आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 02/05/2019 - 03:03 नवीन
अरुण शौरी , जेठमलानी , शत्रुघ्न सिन्हा , यशवंत सिन्हा या भाजप मधील नेत्यांनी मोदिवर हल्ले करण्यात काहीही बाकी ठेवले नव्हते आता त्यात भर गडकरीचीं पडली आहे . फरक इतकाच आहे की गडकरी नाव न घेता टोमणे मारत असतात , आणि हे निवडणूक जवळ आलेली असताना खचितच चांगले नाही . राजकीय महत्वकांक्षे साठी ' एकी हेच बळ 'असले सुविचार थोर माणसे खुंटी ला अडकवून ठेवतात आणि त्यांच्या असल्या वागण्याने कार्यकर्ते / मतदार संभ्रमित होतात .
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 02/05/2019 - 11:14 नवीन
हल्ली मिडियावाले टीआरपीसाठी मूळ वाक्याची फार मोडतोड करायला लागले आहेत. गडकर्‍यांच्या टोमण्यांची युट्युब लिंक मिळेल का? संपूर्ण ऐकून मग मत ठरवीन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 11:37 नवीन
खर आहे श्याम , कसही करुन भाजप व मित्र पक्षात सुरुंग लावाला याच प्रयत्नात विरोधी पक्ष व मिडीया आहे !! ईतकी बायस्ड मिडीया या पुर्वी कधीही पाहिली नसेल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
च
चौथा कोनाडा Tue, 02/05/2019 - 12:07 नवीन
रागानं शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात आधी ममता आणि टोळी या विरोधात भुमिका घेतली होती, आता सीबीआय प्रकरणानंतर या बरोअबर उलटी ! मिडियात याची चीरफाड होत आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 12:53 नवीन
शारदा, नारदा चीट फंड स्कॅम हा २०१३ च्या अगोदरचा आहे, २०१३ ला त्रृणमुल काँग्रेस वे स्ट बंगाल मध्ये सत्त्येत आलेली. त्या नंतर शारदा, नारदा चीट फंड स्कॅम वर एस आय टी बनवली ! ह्या एस आय टी च्या चौकशीने संतुष्ट न झाल्याने २०१४ साली काँग्रेस व डाव्या पक्षांनी सु कोर्टात ह्या चौकशी विरुद्द याचिका दाखल केली व सीबीआय च्या चौकशीची मागणी केली. २०१४ मध्ये सु कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ह्या आदेशात शारदा, नारदा चीट फंड स्कॅम बरोबरच कोण कोण बडे लोक ह्यात शामिल आहेत, त्या पैश्याचा ट्रेल घोटा ळ्याची व्याप्ती वैगेरे सगळ खणुन काढायचे स्पष्ट आदेश दिले. २०१४ च्या सु कोर्टाच्या आदेशानुसार, सीबीआयने आपला तपास सुरु केला व त्याच बरोबर पश्चिम बंगाल पोलिसांनी बनवलेल्या एस आय टी लाच चौकशी साठी बोलावले . ह्या एस आय टी ने सीबीआय समोर यायच आता पर्यंत टाळलेल !! आता सीबीआय अटकच करणार मग एस आय टी ची कसुन तपासणी होणार व ह्या घोटाळ्यात अडकलेल्या त्रृणमुल काँग्रेस च्या बड्या धेडांचे नाव उघड होईल ह्या भीतीने ममता बॅनर्जी डायरेक्ट धरण्यावरच बसली. णमुल काँग्रेस च्या बड्या नेत्यांना आता पर्यंत ह्या केस मध्ये जेल झालेली आहे. पण त्यावेळेला सुद्धा गप्प बसणार्या ममता बॅनर्जीच्या आता धरण्यावर बसल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. २०१४ साली काँग्रेस व डाव्या पक्षांनी सु कोर्टात ह्या चौकशी विरुद्द याचिका दाखल केली व सीबीआय च्या चौकशीची मागणी केली तेच आता ममता बॅनर्जीच्या बाजुने केंद्र सरकार विरुद्ध बोलत आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Tue, 02/05/2019 - 17:52 नवीन
बरोबर ! आता धरणे संपवून ममता दिदी मी जिंकल्या असं म्हणतायत. मिडियावाले यावर काथ्याकूट करताहेत. सध्या तरी पारडं केंद्र सरकार कडं झुकल्या सारखं वाटतंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/05/2019 - 16:57 नवीन
मोदींनी 120 देशांच्या लोकांकडून वैष्णव जन तो म्हणवून घेतले म्हणे, ह्यांचे ते माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते , ते विसरले ? गांधींचे गाणे ? https://youtu.be/Uz5LKjx5oYY मोदींचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 02/05/2019 - 17:56 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 18:42 नवीन
मोदींनी " वैष्णव जन तो" 120 देशांच्या लोकांकडून म्हणवून घेतले !! तुमच्या लाडक्या भ्रष्ट काँग्रेसवाल्यांनी "राम नाम जपना पराया माल अपना " हे भजन किमान ५ देशाच्या लोकांकडुन तरी म्हणवुन घ्यावे !! रेफ : https://www.youtube.com/watch?v=3_tw9hIrwSQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
विशुमित Tue, 02/05/2019 - 20:43 नवीन
अगदी बरोबर आहे. ===2019 ला आपलं सरकार आले की माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते, याचे विडियो गाणं पुढच्या वर्षी आपल्या बाबुल आणि अभिजित कडून फुकट गाऊन घेऊ. हाय काय आणि नाय काय ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
M
mayu4u गुरुवार, 02/07/2019 - 07:45 नवीन
संघाचा विरोध करायचा म्हणून भारतमातेच्या वंदन गीताची थट्टा? उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/06/2019 - 04:37 नवीन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे. गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. याच दिवशी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. हा सगळा प्रकार इतका विकृतपणे करण्यात आला होता की, पूजा पांडेने गोळी मारताच गांधींच्या पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता. अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. मात्र, यंदा त्यांनी आपल्या विकृत वागण्याचा कळस केला. हिंदू महासभेच्या या कृत्याचा देशात सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. तसेच पूजा पांडेवर कठोर करवाईची मागणी होत होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवालही अनेकांनी विचारला होता. https://www.loksatta.com/desh-videsh-news/aligarh-police-has-arrested-hindu-mahasabhas-pooja-pandey-for-recreating-mahatma-gandhis-assassination-1836139/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 02/06/2019 - 06:25 नवीन
भारतात Intolerance वाढला आह अस जे लोक म्हणत होते त्याची आता प्रचीती येत आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Wed, 02/06/2019 - 12:39 नवीन
अहो इथ निरपराध माणसांना गोळ्या घालणाऱ्या , बॉम्बस्फोट मध्ये उडावणाऱ्या अतेरिक्याची फाशी टाळन्या साठी ढोंगी निर्लज्ज काँग्रेस ची जमात एकत्र येते . त्यां जमाती बरोबर तथाकथित बुद्धिवादी रात्रीचे कोर्ट ऊघडायला लाऊन त्या अतेरिक्या ला वाचवन्याचा प्रयत्न करणारे ज्यास्त दोषी का पुतळ्या ला खोट्या गोळ्या मारणारे दोषी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
अ
अर्धवटराव Wed, 02/06/2019 - 16:48 नवीन
केवळ कठोर निषेध किंवा न्यायालयीन कारवाई पुरेशी नाहि. या लोकांना समाजाने वाळित टाकायला हवे. सामाजीक दृष्ट्या दाभोलकर मर्डरच्या पातळीचं हे कृत्य आहे (दोन्ही कृत्य अगदी कुठल्याही राजकीय चालबाजीने प्रेरीत असले तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Wed, 02/06/2019 - 06:35 नवीन
पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे पोलिसांनी ह्या दोघांना कोणत्या गुन्ह्या खाली अटक केली ? गांधीजींची हत्या केली म्हणुन ?? एका आरोपीला अगोदरच फाशी दिलेली आहे ना ह्या गुन्ह्या खाली ? आणी ती शिक्षा चुकीची होती अस कॉंग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने कधीही बोललेल स्मरणात नाही !! तो हक्क फक्त मुसलमान लोकांनाच असतो, कदाचीत !!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा