चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
💬 प्रतिसाद
(783)
ट
ट्रम्प
Mon, 02/11/2019 - 14:33
नवीन
खान्ग्रेस चा इतिहास पाहता रागा ने कितीही ' चौकिदार चोर है ' ची आरडा ओरड करू द्या मतदार रागावर विश्वासः ठेवणार नाही , तसेच काळा पैस्या बाबत मोदींनीं ईमानदारी ने प्रयत्न केले आहेत हे ही मतदारा जाणून आहे .
फक्त कळी चा मुद्दा रोजगार क्षमता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार थोडेसे अडखळले आहे आणि त्या वर्गा ला अपेक्षित परिणाम दिसलेले नाहीत . वाढलेली बेरोजगारी आणि शेतकाऱ्याच्या समस्या पाच वर्षात सुटन्या सारख्या नव्हत्या पण तो वर्ग सद्य परिस्थितीत क़ाय निर्णय घेतो त्यावर पुढील सरकार कोणाचे असेल हे ठरू शकते .
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 02/11/2019 - 15:29
नवीन
"' चौकिदार चोर है ' ची आरडा ओरड करू द्या मतदार रागावर विश्वासः ठेवणार नाही"
योग्य बोललास रे ट्रम्पा. ५८,००० कोटीपैकी अंबानीला २९,००० कोटी दिले ह्यावर लहान मुलगाही विश्वास ठेवणार नाही. राफेल कंत्राट करताना सरकारने उत्साहाच्या भरात काही निर्णय घेतले ज्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली.
अशा प्रकारच्या कंत्राटात सहसा उद्योगपती सरकारी अधिकार्यांना/सत्ताधार्यांना पैसे देतात. पण येथे काँग्रेसवाले उलटे घडल्याचे सांगतात म्हणजे सरकारने अंबानीला पैसे दिले.. कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानीच्या कंपनीला कोणत्याही पक्षाचे सरकार पैसे देइल हे संभवत नाही असे ह्यांचे मत.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 02/11/2019 - 15:35
नवीन
मोदींनीं ईमानदारी ने प्रयत्न केले आहेत हे ही मतदार जाणून आहे .
मतदाराने निवडणुकीला उभारलेल्या उमेदवाराच्या खोट्या आश्वासनाला भुलुन परत महाठगबंधन किंवा स्कॅमग्रेसला आपल अमुल्य मत देउ नये म्हणुन मतदाराला वेळोवेळी ब्रेनवॉश करणे,
कॉंग्रेस व महागठबंधनची वास्तविकता समजावणे असे कार्य करावे लागेल ! NDA ला अशी मदत करण हे आपल कर्तव्य आहे ! ह्या कामी सर्वांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे !
गेल्या ६५ वर्षांत देशाची अपरीमित हानी ह्या भ्रष्ट कॉंग्रेसी व डाव्या पक्षांने केलेली आहे ! चुकीचे कायदे चुकिचे निर्णय व चुकिच्या पॉलिसीज !! सेक्युलर म्हणत फक्त मुस्लिम समाजाला झुकत माप देण पण प्रत्यक्षात मुस्लिम समाजाला सुद्धा विकासाचे दरवाजे खुले न करण !
ह्या सर्वांतुन विकास करणारा खरा सेक्युलर देश निर्माण करण हे चॅलेंज श्री मोदीजीनी स्विकारलेल आहे ! मतदाराच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची विकासाची गती थांबायला नकोय !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 02/11/2019 - 18:56
नवीन
की सर्वात जास्त काळा पैसा बाहेर काढणारा नोटांबनदी काळात गुजरातचाच मनुष्य निघाला !
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 02/11/2019 - 19:23
नवीन
म्हणुन तो माणुस वाचला !! नाहीतर तुमचा राष्ट्रीय जावई आता कोर्टाचे आणि उरलेल्या वेळात ED च्या office च्या चकरा मारतोय !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 02/11/2019 - 19:31
नवीन
तुमचे राजमाता व युवराज बेलवर बाहेर आहेत !! चक्क आयकर चुकवल्या बद्दल !!
श्री मोदीजींनी तरी किती संधी द्यावी ?
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/12/2019 - 01:30
नवीन
https://www.businesstoday.in/current/economy-politics/national-herald-row-income-tax-department-withdraws-circular-which-diluted-case-against-sonia-rahul/story/307158.html
The Income Tax Department has hurriedly withdrawn a recently issued circular that unwittingly gave the Congress Party 'relief' in the National Herald case in which both Sonia Gandhi and Rahul Gandhi are accused.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 02/12/2019 - 17:32
नवीन
National Herald row: I-T Dept withdraws circular which diluted case against Sonia, Rahul
दिनांक ५ जानेवारी २०१९
I-T dept slaps Rs 100 crore tax notice on Rahul, Sonia over AJL income दिनांक ९ जानेवारी २०१९
NEW DELHI: Congress leaders Sonia Gandhi and Rahul Gandhi had “escaped” incomes — over what was declared and assessed — in 2011-12 of Rs 155.41 crore and Rs 154.96 crore respectively, according to an income tax order passed after reassessing their incomes relating to Associated Journals Ltd.
Rahul Gandhi had filed a return of income declaring Rs. 68.12 lakh for the assessment year. Also as per the reassessment order, income of Congress leader Oscar Fernandes has been found to be Rs 48.93 crore, according to sources in I-T department.
५ जानेवारीला सुटके चा निश्वास टाकलेला ९ जानेवारीला श्वासच अटकला !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 02/12/2019 - 17:34
नवीन
ये तो शुरुआत है !! अभी तो जमाई राजा का कच्चा चीठ्ठा खोलना बाकी है !!
सलमान सुटला तरी चालेल पण देश द्रोही गांधी परिवारातले लोक सुटता कामा नये !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/13/2019 - 03:26
नवीन
असू द्या हो , tax मध्ये व्यक्ती व सरकार ह्यांच्या दोन बाजू असू शकतात , अशा शेकड्याने केसेस असतात,
जर व्यक्तीचे justification कोर्टात टिकले तर तो कर त्याच्या खिशात राहील , नैतर तो कर सरकारजमा होईल,
दोन्ही गोष्टी , शेकडो कोटी गांधींकडे रहाणे , किंवा देशाला मिलणे , आम्हाला तितकेच सन्माननीय आहे,
तुमचे झोला महाराज किती कर भरतात ?
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Wed, 02/13/2019 - 05:12
नवीन
बा मोगा,
गुलामाला पण लाज आनणारी तुझी निष्ठा बघून डोळे धन्यले.
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/13/2019 - 15:20
नवीन
तुमचे झोला महाराज किती कर भरतात ?
- Log in or register to post comments
श
शलभ
Wed, 02/13/2019 - 16:12
नवीन
मोदींचा TDS कापून जात असेल पंतप्रधान म्हणून मिळणाऱ्या पगारातून. काहीतरी लॉजिकल बोलत जा. फक्त रिप्लाय करायचा म्हणून काहीपण बोलत जाऊ नका.
- Log in or register to post comments
ज
जानु
Mon, 02/11/2019 - 15:03
नवीन
काश्मिरी फुटीर वाद्यांनी आज अफजलगुरू चे प्रेत मागितले आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Tue, 02/12/2019 - 06:13
नवीन
आणि त्याच्या विरोधात एकाही पुरोगामी पक्षाने किंवा पुरोगाम्या ने विरोध केला नाही - याला म्हणतात ढोंगी पुरोगम्याचीं एकजूट !!!!
हेच पूरोगामे गांधी हत्तेला 40 वर्ष होवून गेली तरी गोडसे आणि त्यांचे समर्थकाना बडवन्या साठी आख्या देशात तमाशा करतात .
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Tue, 02/12/2019 - 15:49
नवीन
पुरोगामी आणि फेक्युलर ची व्याख्याच ती आहे.. त्यांच्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या. आणि इथे जरा काही झाले तर आभाळ फाटल्याचा आव आणायचा आणि गावभर बोंब मारत सुटायचे..
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 02/11/2019 - 20:04
नवीन
From the book "Advice & Dessent Athor: RBI Governor Y.V. Reddy
In the Shashan period of Congress, we had to pledge 47 tons of gold for just Rs 1000 crores.
This was the situation of the Indian economy.
I remember the Indian economy had to see the day in the early nineties when a country like India had to deposit its gold in the World Bank.
In the rule of Rajiv Gandhi, the country's safe was empty & then the assassination of Prime Minister Rajiv Gandhi was done by the LTTE terrorists.
Chandrasekhar then became the new new Prime Minister ...The Tijori was empty. They got nervous What to do.?
Reddy writes that there was a frustrating atmosphere in the entire country. The Rajiv regime had not given any employment.
To enter a business one had to get NOC from fifty places.
Unemployment and frustration all around the time of the license permit set by the Congress .....
From eighties to the nineties, *the Congress had put an end to the economy...* at that time the case of brokerage in Bofors guns came out .....
In the book, Reddy writes that *the immense loot of the Gandhi family has brought the economy of the country to the abyss.*
In his book, Reddy writes that in those days India's foreign exchange reserves were so low that the Reserve Bank of India decided to mortgage its gold in the World Bank...
Then by the order of Prime Minister Chandrashekhar, India pledged 47 tonnes of Gold to Bank of England...
At that time an interesting incident and an embarrassment to the Indian public was reported...RBI had to pledge 47 tons of gold in the Bank of England. This was the time when mobile was not there and the land line used to be in limited numbers.
It was such a bad situation for the Reserve Bank, New Delhi that 47 tonnes of gold from the building was to be delivered by a van at the New Delhi Air Port.
With 47 tonnes of gold, a very old RBI van was sent with two security guards. On the way to airport its tyre burst.
As the tyre burst, those 4-5 security guards surrounded the van filled with 47 tons of gold.!!
After such efforts, 47 tons of gold reached England, and Britain gave loans to India Rs 1000 crores.
I am extremely shocked and angry when people who mortgaged the country for just Rs 1000 crore say that Modi ruined India's economy.
*In the 70-year history of Hindustan, there are only 3 years in which Hindustan did not take loans of one rupee from World Bank.*
*and they are...*
*2015-16, 2016-17, 2017-18*
*And yes these three years came in the government of Chaaiwala.*
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 02/11/2019 - 20:22
नवीन
नोटबंदीच्या नंतर देशात अचानक ईतके ईकॉनॉमिस्ट जन्मले होते. त्यातल्या एकालाही तेंव्हा माहिती नव्हत की
गांधी फॅमिलीच्या राजवटी नंतर देशाच्य आर्थिक दुर्दशेमुळे केवळ १००० कोटी रु साठी ४८ टन सोन विकल होत !!
आता तरी डोळे उघडा !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/12/2019 - 01:35
नवीन
नन्तर त्याच मनमोहन सरकारने त्याच्या तिप्पट सोने विकतही घेतले,
https://en.m.wikipedia.org/wiki/1991_Indian_economic_crisis
तुमच्या विकासच्या मुंजीची तारीख ठरली का ? ती मिळत नसली की गांधी नेहरूंचे सुंता जानवे ह्याच्या फुसक्या सुटतात.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 02/12/2019 - 06:24
नवीन
गांधी नेहरूंचे सुंता जानवे ह्याच्या फुसक्या सुटतात.
नेहरु गांधीच माहीत नाही पण तुमच्या नेहमीच सुटतात !!
म्हणे मनमोहन सरकारने तिप्पट सोन विकत घेतल !!
पुरावा काय दिला ? विकीच पेज जे सांगतय की भारताने कस सोन विकुन अर्थव्यवस्था वाचवायचा प्रयत्न केला !!
सोन विकत घ्यायला ते काय गरीब शेतकर्याची शेत जमिन आहे कि कोणीही जावई येतो आणि खरेदी करतो ?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 02/12/2019 - 08:56
नवीन
काळीमाऊ बरोबर बोलतीय.
२००९ साली आपण २०० टन सोन विकत घेतल. तेव्हा डाॅलर सर्वात स्वस्त झाला होता. ₹४०च्या खाली भाव गेला होता. त्यानंतर अंदाजे १० वर्षांनी म्हणजे मागच्या वर्षी ८.५ टन सोन घेतल.
पण त्याच बरोबर हेही लक्षात ठेवल पाहिजे की चलनफुगवटा व त्याचे दुष्परीणाम टाळण्यासाठी मनमोहन सरकारने इराण कडून घेतलेले ३ लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने डाॅलरमधे फेडले आहे.
असो.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 02/12/2019 - 08:59
नवीन
काळी माऊ, तिप्पट नव्हे पाचपट.
माझ्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट असल्याने मी तो अभिमान कोणाला कमी करू देणार नाही.
हा विनोद होता बरका.
:)
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 02/12/2019 - 09:01
नवीन
खर म्हणजे चौपटीपेक्षा जास्त.
पण मी पाचपटच म्हणणार.
:)
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 02/15/2019 - 07:17
नवीन
तीन लाख कोटींचे नव्हे ४२००० कोटींची फेड केली आहे. हे कर्ज नसून सॅंक्शन्समुळे राहिलेली बाकी होती व त्यासाठी तरतूद आधीच केलेली होती. ऑईल बॉंड्सचेसुद्धा फक्त ३५०० कोटी द्यावे लागले आहेत सरकारला.
https://thelogicalindian.com/fact-check/fact-check-are-unpaid-dues-to-iran-upa-era-subsidies-and-npas-responsible-for-the-petroldiesel-price-rise2/
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 02/15/2019 - 07:20
नवीन
तीन लाख कोटींचे नव्हे ४३००० कोटींची फेड केली आहे (६.४ बिलियन डॉलर्स). हे कर्ज नसून सॅंक्शन्समुळे राहिलेली बाकी होती व त्यासाठी तरतूद आधीच केलेली होती. ऑईल बॉंड्सचेसुद्धा फक्त ३५०० कोटी द्यावे लागले आहेत सरकारला.
https://thelogicalindian.com/fact-check/fact-check-are-unpaid-dues-to-iran-upa-era-subsidies-and-npas-responsible-for-the-petroldiesel-price-rise2/
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/15/2019 - 09:21
नवीन
हे प्रकरण इतके जुने झाले आहे तरी देखील रेटून न्यायच चालले आहे.
तेच तेच समजून सांगायचा कंटाळा येतो
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 02/15/2019 - 10:12
नवीन
आपण दिलेली लिंक वाचली. आणखीही थोडे वाचन केले. तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. ३ लाख कोटी चुकीची रक्कम आहे.
धन्यवाद.
_/\_
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 02/12/2019 - 09:01
नवीन
गांधी परिवाराने, पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लावली मग नरसिंव्हा राव यांनी प्रयत्न करुन अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली तर त्यांच्या नंतर ह्याच्या जागतीक स्तरावर फेमस असलेल्या अर्थतज्ञाने तिप्पट सोन विकत घेतल !! दहा वर्षांपासुन वायुदल चांगल्या विमांनांसाठी वाट बघत होत त्यांना सागीतल विमान घ्यायला पैसे नाहीत ! सैनिकांसाठी बुलेट प्रुफ जॅकेट साठी ह्यांच्याकडे पैसे नव्हते कारण सोन घ्यायला पैसे वापरले !!
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/12/2019 - 16:23
नवीन
अनिल अंबानी ह्यांची कोर्टात बाजू कपिल सिब्बल मांडणार!
https://www.news18.com/news/india/anil-ambani-to-appear-in-supreme-court-in-contempt-case-over-ericsson-dues-live-updates-2033403.html
राजकीय नेते दिवसा त्यांच्या कार्यकर्त्यांना दाणे टाकून झुंजवतात व रात्री एकत्र प्यायला बसतात ह्या ह्यांच्या मतावर शिक्कामोर्तब झाले.
- Log in or register to post comments
आ
आकाश कंदील
Wed, 02/13/2019 - 05:18
नवीन
जो है भ्रष्ट, उसेही मोदीसे कष्ट
विषय संपला :) :)
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Wed, 02/13/2019 - 09:35
नवीन
आता CAG ने ही सांगितले राफेल सौद्यात भारताचा फायदाच झाला आहे.
स्रोत: NDTV Twitter handle.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Wed, 02/13/2019 - 10:30
नवीन
तरी सुद्धा आदरणीय रागा जी गप्प बसणाऱ् नाहीत .
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Wed, 02/13/2019 - 13:00
नवीन
प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी सांगितले तरी त्यांना पटणार नाही.
अग्नीपरीक्षेने पावित्र्य सिद्ध झालेल्या सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणारा यांचा स्वभाव, हे कसले गप्प बसतायत?
३:३० वाजता पत्रकार परिषद घेणार होते, काय झाले कोणास ठाऊक!
- Log in or register to post comments
झ
झेन
Wed, 02/13/2019 - 11:24
नवीन
हो पण जेपिसी च्या चौकशी ला का टाळतात होवू दे ना दूध का दुध ....
त्यानंतर ठेबेवाडी बुद्रुक च्या कमिटीची चौकशी झाली पाहिजे
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/13/2019 - 12:26
नवीन
झेन्या, अरे जे.पी.सीत राजकारणीच असणार आहेत ना? मग त्यांचे मत माहित आहेच.. खरगे/पवार/सिब्बल भविष्यात "राफेलमध्ये घोटाळा झाला नाही. आम्ही आरोप करत होतो हेच चुकले" असे म्हणतील?
- Log in or register to post comments
झ
झेन
गुरुवार, 02/14/2019 - 05:07
नवीन
माई त्यासाठीचतर ढेबेवाडी बुद्रूकच्या कमिटीची पण चौकशी बसवली पाहिजे
- Log in or register to post comments
झ
झेन
गुरुवार, 02/14/2019 - 05:15
नवीन
माईंना मॅगसेसे द्यावे म्हणजे पूढे लोकपाल बनवले की सगळे प्रश्न सुटतीलच एवढे बोलून खाली बसतो
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 02/13/2019 - 12:29
नवीन
भारतविरोधी घोषणाबाजी दिल्याच्या आरोपाखाली अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एएमयूमध्ये तणावाचे वातावरण असल्याने इथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. एएमयूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त ......
एएमयूच्या १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 02/13/2019 - 12:44
नवीन
अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू)
विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले जाणार आहे. या ५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यासाठी एएमयू प्रशासनाला पत्रही लिहिण्यात आले आहे.
ह्या विद्यार्थ्यांना नुसतच विद्यापीठातून काढून टाकण्याने काही होणार नाही ! त्याम्ना माफी मागीतल्या शिवाय कुठेही अॅडमिशन किंवा नोकरी मिळु नये.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 02/13/2019 - 13:15
नवीन
त्याम्ना माफी मागीतल्या शिवाय कुठेही अॅडमिशन किंवा नोकरी मिळु नये.
मला दरवेळेस हे समजत नाही की कोणी खोटे आरोप केले की त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करतात त्याने माफी मागितली की सोडतात, मग ते बेणं परत नंतर उठुन आरोप करायला मोकळं ह्यांचा प्रकरण तडीस न्यायला काय हरकत असावी म्हण्जे हे आणी ह्यांची फॉलोअर जनता १० वेळा विचार करेल असलं काही करायला.
जसं की..
१. खोटे आरोप लावले आणी ते खोटे होते सिद्ध झाले कि अब्रुनुकसानीचा दावा करुन पैसे वसुल करुनच सोडायचे. माफी घ्यायचीच नाही.
२. हे वरचे देशद्रोहाचे आरोप सिद्ध झाले की आजीवन शिक्षण, नोकरी साठी बंदी आणी पुढील आयुष्यात सरकारी योजनांतुन कवडीचाही लाभ मिळणार नाही.
३. लाच घेतली की सगळी संपत्ती जप्त करुन त्याला आजन्म कारावास,
४. भ्रष्टाचार झाला की सगळी संपत्ती जप्त करुन त्याला आजन्म कारावास आणी असे बरेच
थोडा तरी लगाम लागेल असल्या हलकट, पाचकळ, फाजील, मेल्या, वसाड्या, शिपुरड्यांना.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 02/13/2019 - 14:17
नवीन
ईरसाल
पुर्णपणे सहमत !!
म्हणुनच मॅग्नेटीक रीडर असलेली पावरफुल आयडी कार्डची गरज असते , टेक्नॉलॉजी कोणती ही का असेना, अश्या आयडी कार्ड
मध्ये प्रत्येक गोष्ट नोंदली जावी व प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची सक्ती असावी.
विदेशात अश्या प्रकारचे कार्ड वापरले जाते. पासपोर्ट नसताना ह्या कार्ड वर तुम्हाला देशा बाहेर जाता येते पण जर तुमच्या नावाने कोण ता ही गुन्हा दाखल झालेला असेल तर देशा बाहेर जाणे शक्य होत नाही.
आपल्या देशात एका पावरफुल आयडी कार्डची पुर्ण पणे वाट लावली आहे.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 02/13/2019 - 13:05
नवीन
काय उगाच त्या विद्यार्जन करणार्या अभ्यासु विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत.
आपण नाही का कधी कधी आपल्या आईवडिलांना त्रागा करुन असहकार पुकारतो (थोडक्यात काय तर त्यांच्याविरोधात मानसिक घोषणा (मनातल्या मनात) देतो) तसचं काही असावं निष्पाप लेकरांच.
डायरेक्ट देशद्रोह......ह्यो अन्याव हाय जज्साब ह्यो अन्याव हाय,,,,,,, महेश ठाकुर खुनी नाय जज्साब, माजा करियर खराब करु नका जज्साब......
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 02/13/2019 - 14:09
नवीन
आपण नाही का कधी कधी आपल्या आईवडिलांना त्रागा करुन असहकार पुकारतो (थोडक्यात काय तर त्यांच्याविरोधात मानसिक घोषणा (मनातल्या मनात) देतो) तसचं काही असावं निष्पाप लेकरांच.
आपल्या आईवडीलां विरुद्द असहकार पुकारतो , त्यांच्याविरोधात मानसिक घोषणाही देतो पण देशाचे तुकडे म्हणजे मरणाची ईच्छा
व्यक्त करणे !!
सभ्य मुल अस काही करत नाहीत !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 02/13/2019 - 12:39
नवीन
राज्यसभेत बोलताना, स पा चे मुख्य मुलायमसींग यादव यांनी संसदेत मा श्री मोदीजींच परत भारताचे पंत प्रधान व्हावेत अशी शुभेच्छा व्यक्त केली .
मुलायमसींग यादव याम्च्या ह्या वक्तव्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 02/14/2019 - 10:58
नवीन
चित्र- 1
मुलायम यादवाच्या त्या वक्तव्या नंतर अपेक्षे प्रमाणे आझम खान ला दुःख झाले " हे त्यांचे वाक्य नाही , त्यांच्या तोंडी कोणीतरी टाकले असेल "
राबड़ी देवी - " मुलायम सिंग आता म्हातारे झाले आहेत , त्यांच्या लक्षात राहत नाही ते क़ाय बोलतात "
सु ताई - " 2014 मध्ये सुद्धा ममो ला मु सिंग ने असेच म्हणाले होते पण परिणाम उलटा झाला व मोदी निवडून आले " थोडक्यात ताईनां पुण्याचा गुण नाही पण पुण्याचा वाण मात्र लवकर लागला .
मुलायमसिंह च्या वक्तव्या मुळे मोदिनां फायदा न होवू देण्यासाठी विरोधी पक्षा मध्ये शर्यत लवकर लागली .
चित्र -2
आंध्रप्रदेश ला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे सतत कोलांटउडया मारणाऱ्या नायडू नीं दिल्ली मध्ये 1 दिवसाचे उपोषण केले . त्या उपोषणा मध्ये सुद्धा बरेचसे विरोधक एकी दाखवन्या साठी एकत्र आले होते .
पण दोन दिवसांत विरोधकांची दुफळी लोकसभेच्या शेवटच्या दिवशी दिसून आली , चिट फंड गैर व्यवहार वरुन काँग्रेस व डाव्यानी तृण मूल च्या खासदारानां ' चोर मचाये शोर ' टोमणे मारून हैराण केले . त्यानंतर लोकसभेच्या बाहेर गांधी पूतळ्या जवळ ममता आणि गांधी म्याडम समोरासमोर आल्या असता ममता ने मैड़म ला " तुमचे खासदार तुमच्या देखत आमच्या पक्षावर टिका करत होते आणि तुम्ही त्यांना रोखले नाही " अशी रागाने तक्रार केली . मैड़म ने ममताच्या खांद्यावर हात ठेवून " दो वुई एक्युज ईच आदर , वी स्टील आर टुगेदर " असे सांगण्याचा प्रयत्न केला असता ममता ने हात झिड़कारुन तरा तरा निघून गेल्या .
हे इतर कुठे नाही तर साहेबाच्या आजच्या सकाळ मध्ये आले आहे .
प्रश्न असा उपस्थित होतो की 2019 मध्ये भाजप सरकार नाही बनवू शकली तर कायम एकमेकांच्या विरोधात असलेले विरोधक 2019 मध्ये स्थिर सरकार देवू शकतील का ? हे
असले प्रश्न सामान्य मतदारानां पडत नाही का ?
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/13/2019 - 16:05
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ncp-mp-surpiya-sule-speaks-on-mulayam-sing-yadav-statement-on-pm-narendra-modi-1840141/
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपले मत नोंदवले असून २०१४ मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मुलायम सिंह यांचे विधान मी ऐकले. ते २०१४ मध्येही असेच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. मुलायम सिंह यांनी २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचे सरकार पडले होते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/13/2019 - 16:14
नवीन
ही अंधश्रद्धा आहे.
===
यादव यांनी असे म्हणताच साहेबांनी हसून हात जोडले वाटते.
कदाचित मनात म्हणाले असतील "पगले रूलाएगा क्या?"
आपल्या मायमराठीत " काय राव चेष्टा करताय!"
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
गुरुवार, 02/14/2019 - 03:00
नवीन
रोशडेल ग्रूमिंग केस कदाचित तुम्हाला माहित असेल. नसेल तर थोडक्यात सांगतो...
इंग्लंडमधील रोशडेल प्रांतात एक मोठे रॅकेट उघडकीला आलं ज्यात काही पाकिस्तानी लोक शाळेतल्या मुलींना फूस लावून जाळ्यात ओढायचे आणि मग त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून वापरायचे. असं म्हणतात कि त्या प्रांतातल्या वय वर्षे १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री यातून वाचली नाही. बऱ्याच मुलिंना ड्रग्सचे व्यसन लावून दिले होते. हा प्रकार बरीच वर्षे चालू होता आणि स्थानिक पोलिसांनी पण फारसे लक्ष दिले नाही. अधिक माहिती इथे वाचा. अशीच अजून एक केस रोथेरहॅम मध्ये पण झाली होती, ज्यात १५०० मुली तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आल्या होत्या. हे सर्व करणारे मुस्लिम लोक होते पण बऱ्याच वृत्तपत्रात "साऊथ एशियन" असा मोघम उल्लेख झाला. ही डॉक्युमेंटरी बघा. या केस मध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले कारण महत्वाच्या सरकारी स्थानांवर शांतताप्रिय धर्माचे लोक होते.
तर या केसमध्ये जे लोक पकडले होते त्यांना इंग्लंडमधून हाकलून लावण्याचे प्रयत्न चालले होते. त्याला "तोंड देता यावे" म्हणून या अपराध्यांना १ मिलिअन पौंडाची लीगल मदत मिळाली.
दुसरीकडे स्त्री पोलिसांना बुरखा घालायची परवानगी देण्याचा विचार आहे असे ब्रिटिश पोलीस खात्याने सांगितले आहे. तश्या जुन्याच बातम्या आहेत, पण अश्या बातम्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही.
युरोपचे, विशेषतः इंग्लंडचे भवितव्य फारसे चांगले वाटत नाही कारण फुकाच्या सेक्युलॅरिझम दाखवण्याच्या नादात आता तिथली शांतताप्रिय धर्मीयांची लोकसंख्या स्थानिकांच्या तुलनेत बरीच वाढलीये. पुढच्या १०-१२ वर्षात ब्रिटन ऑफिशियली शांतताप्रिय धर्माच्या अधिपत्याखाली येईल. इतर देशांना हे जितक्या लवकर समजेल तेवढे चांगले अथवा....
आपल्या सर्वांना एक ठाम बाजू घ्यायची वेळ आली आहे, किंबहुना उशीर झाला नसावा अशी आशा करतो. पण बहुतेक पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय धर्मियांची संख्या जाणवण्याइतकी इतकी वाढली आहे. भारतात तर वाढलेली आहेच आणि सेक्युलॅरिझमच्या नावाखाली "हिंदू" असलेले लोक पण त्यांना पाठिंबा देतात हे भयावह आहे. भारतातही लव्ह जिहाद अस्तित्वात नाही असे म्हणणारे लोक परीराज्यात आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
गुरुवार, 02/14/2019 - 03:16
नवीन
रोशडेल कांडांतील एका पीडितेने Please, Let me go नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यातील एक वाक्य तर खरंच भीतीदायक आहे - She said: 'These men find it OK to rape non-Muslim girls.
या मुलीचे आईवडील दोघेही नोकरी करायचे. साधारण १४ वर्षाची असताना सहज काहीतरी वेगळे करायचे म्हणून तिने वर्तमानपत्रातल्या "मॉडेल्स पाहिजेत" अश्या जाहिरातीला उत्तर म्हणून दिलेल्या नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने तिला आश्वस्त करत तिच्या घरी येऊन फोटो काढू असे सांगितले. जगाची माहिती नसलेल्या १४ वर्षाच्या मुलीने तयारी दाखवल्यावर दुसऱ्याच दिवशी एक माणूस घरी आला. बोलता बोलता त्याने मॉडेलिंग ला कपडे काढून पण फोटो काढावे लागतात असे तिला पटवले आणि तसे फोटो पण काढले. दुसऱ्या दिवशीपासून ब्लॅकमेल चालू झाले. आईवडिलांना कळू नये म्हणून ती बिचारी हे लोक सांगतील तसे करत गेली आणि त्यांची शिकार बनली. तिच्या कथनाप्रमाणे सुरुवातील एक दोन लोक यायचे नंतर तर लोक लाईन लावून खोलीबाहेर उभे असायचे. अश्या हजारो लोकांनी तिच्यावर अत्याचार केले. आईवडिलांना जेव्हा समजले तेव्हा पोलीस कम्प्लेंट केली पण पोलिसांनी ती वेश्या आहे म्हणून तिच्यावरच आरोप ठेवला. नाईलाजाने आईवडिलांनी पण लहान भावंडांवर परिणाम होऊ नये म्हणून तिला दूर केले. अमली पदार्थ आणि असंख्य अबॉर्शन्स यातून सावरून पुढे कशीबशी ती ऑस्ट्रेलियाला तिच्या चुलत बहिणीकडे पळून गेली आणि मग तिने धैर्य दाखवून हा प्रकार उघडकीस आणला.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 02/14/2019 - 09:51
नवीन
बाप रे किती भयानक !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- ›
- »