Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
काथ्याकुट
चर्चा
राजकारण
अर्थसंकल्प

प्रतिक्रिया द्या
542105 वाचन

💬 प्रतिसाद (783)
म
महेश हतोळकर Wed, 02/20/2019 - 10:46 नवीन
सुरुवातीलाच पंप्र "these plans" असं स्पष्ट म्हणाले नाही यातच सगळं आलं. खडा मारुन पाहिला, अंगलट येतय असं दिसल्या बरोबर स्पष्टीकरण पुढे केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
अ
अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 11:17 नवीन
ह्याला म्हणतात काही ही सत्य असले तरी हवा तोच अर्थ काढणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 15:48 नवीन
The Prime Minister's Office has issued another clarification on Dr Manmohan Singh's statement. The Prime Minister on Saturday had said that minorities, especially Muslims, should have first right to resources for development.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
M
mayu4u गुरुवार, 02/21/2019 - 13:09 नवीन
अर्वाच्य बडबड (काय पण शोभेलसा आयडी आहे!) बंद होईल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mayu4u गुरुवार, 02/21/2019 - 13:08 नवीन
किमान टाइम्स ला त्यांची बातमी मागे घ्यायला का लावली नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
ड
डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 14:18 नवीन
"We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably the fruits of development. These must have the first claim on resources" WHICH MEANS "We will have to devise innovative plans to ensure that the Muslim minority gets the first claim on National resources which belong to all"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
ट
ट्रेड मार्क Wed, 02/20/2019 - 16:35 नवीन
तुम्हीच जो व्हिडिओ शेअर केला तो बघितला नाही का? त्यात डॉ. साहेबांनी स्पष्ट म्हणलंय "They must have the first claim on resources". हे These तुम्ही तुमच्या मनाचं टाकताय कारण सारवासारव करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेस वापरायला मनुष्य लागतो प्लॅन काही आपले आपले रिसोर्सेस वापरणार नाहीये. म्हणजेच तुम्ही म्हणता तसं These plans असं म्हणले असते तरी अर्थ असा निघतो की प्लॅन पण असे बनवायचे की त्यातून मुसलमानांना हे रिसोर्सेस पहिले वापरायला मिळतील, कारण त्यांचा या रिसोर्सेसवर पहिला अधिकार आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? किंवा जे करत आहेत त्यांच्या प्रगतीला कोणी अडथळा आणत आहे का? मुस्लिम मुलांना शाळेत घेणार नाही असे कुठली शाळा म्हणते का? पण त्या लोकांनाच मुलांना मदरशात पाठवायचं असतं त्याला कोण काय करणार? मदरसे आधुनिक करायचा तथाकथित "हिंदू" सरकारच्या प्लॅनला कोणी विरोध केलाय ते बघा. हिंदूंनी कधी मुसलमानांना प्रगती करण्यास विरोध केला आहे ते पुराव्यासहित सांगा. ज्या मुस्लिमांना प्रगती करायची होती ती त्यांनी केलीच आहे, त्यांना कोणी अगदी उच्च शिक्षण घ्यायला किंवा नोकरी करायलाही बंदी केलेली नाहीये किंवा अडथळेही आणला नाहीये. असे असताना का देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप द्यायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
अ
अर्वाच्य गुरुवार, 02/21/2019 - 10:42 नवीन
तुम्ही भारतात राहत नाही. भारतात परत यायचा काही तुमचा प्लान नाही. मग आमच्या देशात आम्ही काय करतो यावर बोलण्यचा तुम्हाला काय अधिकार मिळतो? भारतात राहत असाल तर बोला नाही तर आपली इथली टकळी बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 13:59 नवीन
मी कुठे राहतो, माझा कुठे जायचा/ यायचा प्लॅन आहे नाही याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मी पण भारतीय नागरिकच आहे त्यामुळे घटनेने मला अधिकार दिलेला आहे त्याचा मी वापर करणारच. मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसेल तर असे प्रतिसाद येतात. एकतर मुद्देसूद प्रतिवाद करा नाहीतर आपले अर्वाच्य तोंड बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/21/2019 - 13:34 नवीन
पुन्हा एकदा तुमचा हास्यास्पद प्रतिसाद. हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता? एका ठिकाणी अरब देश अतिरेक्यांचा तोंडदेखला निषेध करतायत- तुमच्या मते प्रत्यक्ष काही करत नाहीत - याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. इथे मात्र तोंडदेखलं बोललेलं तुम्ही पुरावा म्हणून सांगताय. थोडं तरी तार्किकदृष्ट्या सुसंगत बोला. मुसलमानांची प्रगती का होत नाहिये याची बहुतेक कारणं सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये आधीच आली आहेत, आता तुम्हाला ते शिकवत बसायचं का, की समजून घ्यायचं नाही हा तुम्ही दृढनिश्चय केला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 14:13 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे, ममो असं म्हणले होते याचा काही पुरावा आहे का याची विचारणा झाली होती, त्यासाठी हा व्हिडिओ देण्यात आला. दुसरी गोष्ट, जर अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करणाऱ्या सरकारनेच मुसलमानांसाठी काही केले नाही हे तुम्ही चक्क मान्य केलंत. ममो सिंग तोंडदेखलं बोलले असे तुम्हीच म्हणताय. यालाच सेल्फ गोल म्हणतात. १५ लाखाची गोष्ट करताय तर पहिले आव्हान म्हणजे मोदी असे म्हणले याचा एक अधिकृत व्हिडीओ द्या. तसेच २००६ साली ममो सिंग कुठल्या निवडणुकीचा प्रचार करत होते? देशाचा पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीने असेच एक वाक्य कोणाला तरी झुकते माप देण्यासाठी का बोलावे याचे काही स्पष्टीकरण तुमच्याकडे आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये पण खालील गोष्टी सांगितल्या आहेत. The Sachar Committee has compiled data from a number of sources. The report frames these issues as related to identity, security and equity. Barring some generic observations about the causes for the ‘development deficit’ among Muslims, there is no explicit or detailed discussion of the causes of such conditions. तसेच यातून बाहेर पाडण्यासाठी रेकमेंडेशन केलं की त्यांना सामान संधी असल्या पाहिजेत. कुठलाही रिपोर्ट असे म्हणलं नाहीये की मुसलमानांना झुकते माप द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/21/2019 - 20:41 नवीन
पुन्हा एकदा प्रयत्न करा. एक वाक्य म्हणजे संपूर्ण सच्चर आयोग रिपोर्ट नाही. तुम्हाला समजायला वेळ लागत असेल तर दोन वेळा प्रयत्न करा. प्रतिसाद द्यायची काहीही घाई करू नका . मी इथेच आहे. शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल. मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले. प्रतिसाद देताना किमान एकदा तरी वाचून पाहा. एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा. सुरुवातीला त्रास होईल पण जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 02/22/2019 - 14:57 नवीन
एक तर अर्वाच्य (हा आयडी आहे) यांनी या प्रतिसादात असे ममो म्हणाले याचा पुरावा द्या असे विचारल्यामुळे तो दिला. आणि त्यावर तुम्ही म्हणताय "हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता?" तुम्ही तर या प्रतिसादात फक्त सच्चर समितीचा उल्लेख केला आहे. मी निदान एक वाक्य तरी दिलं. एवढी तुम्हाला सच्चर समितीच्या रिपोर्ट समग्र माहित आहे तर एक लेख लिहा ना काय रिपोर्ट काय सांगतो आणि आत्ताच्या सरकारांनी काय काय केले आणि काय नाही केले. शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल. हाहा, एकही प्रतिसाद धड देता येत नाही पण तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाखाणण्यासारखा आहे. थोडी प्रयत्नांची दिशा बदललीत आणि झापडं काढलीत तर हळू हळू जमू शकेल. मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले. नाही हो, जुमला म्हणलं म्हणून नाही तर १५ लाख म्हणलं म्हणून आठवले. सगळे विरोधक वाडगा घेऊन कधीच आस लावून बसलेत. एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा. कोण कोणास म्हणाले! स्वतःचे प्रतिसाद लिहिताना थोडा विचार करत जा, आधीच्या प्रतिसादाचा रेफरन्स घ्या, संशोधन करत जा आणि नंतर १० वेळा वाचत जा. नाहीच जमलं तर बुद्धिवर्धक औषधे घेऊन बघा. एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे की माझ्या प्रतिसादांवर आक्षेप तुम्ही घेताय, त्यातही एक पण गोष्ट सुसंगत सोडा पण धडपणे मांडताही आली नाहीये. बाकी तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजत असाल तर मी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या - १. मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? २. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप का द्यायचे? याचे स्पष्टीकरण ३. १५ लाखांचा प्रत्येकाला देऊ असा चुनावी जुमला कोणी कधी केला त्याचा अधिकृत पुरावा द्या. ४. मुस्लिम लोकांच्या प्रगती साठी मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसने आत्तापर्यन्त काय काय प्रयत्न केले? ५. सचर समितीच्या रिपोर्टबद्दल तुमचे आकलन काय आहे? ६. सरकारने मुस्लिम लोकांच्या प्रगतीसाठी काय पावले उचलायला पाहिजेत? तुमच्या सोयीसाठी सगळे प्रश्न एकत्र विचारलेत. आता दाखवा तुम्ही किती सुसंगत आणि मुद्देसूद उत्तरे देताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
ट्रम्प गुरुवार, 02/21/2019 - 13:51 नवीन
ट्रेड मार्क , पुन्हा एकदा सडेतोड़ प्रतिसाद !!! परदेशी राहून भारतातील धर्मादं , पुरोगामी लोकांची तोंड तुम्ही ज्या वैचारिक पद्धतीने , संयम राखून , बंद करता ते सुद्धा एकाच आय डी ने ते वाखाणण्याजोगे आहे . लगे रहो !!!!! हम तुम्हारे साथ है !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 14:17 नवीन
आपण प्रयत्न करत राहायचं तरी या लोकांच्या विचारात फार फरक पडेल असं वाटत नाही. काही लोकांची बुद्धी तर फारच कलुषित झाली आहे. तर काहींना मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसल्याने त्रास होतोय तर काहींना आव्हान दिल्याने होतोय. मजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/21/2019 - 17:04 नवीन
सहमत! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Wed, 02/20/2019 - 11:02 नवीन
अक्षय कुमार - 5 करोड़ सलमान खान - 22 लाख अमिताभ बच्चन - 2 करोड़ दिलजीत दोसांज - 3 लाख सिंगर बादशाह -3 लाख उरी टीम - 1 करोड़ टोटल धमाल टीम - 50 लाख . पुलवामा घटनेत मरण पावलेल्या जवानां साठी बॉलीवुड मधील या सेलेब्रिटीज़ ने मदत जाहिर केली आहे असहिष्णुता वरुन बोम्ब मारणारे आणि पाकिस्तानातील पुरग्रस्त जनते च्या मदतीला धावणाऱ्या शाहरुख आणि आमिरखान ने अजुन मात्र जवानां साठी पुढाकार घेतलेला नाही . मदत किती करावी की करु नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये कोणीजबरदस्ती। करु शकत नाही . पण दोन्ही देशातील जनतेत असा भेदभाव केल्या मुळेच खान गैंग सोशल मीडिया वर टार्गेट होते .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 02/22/2019 - 07:33 नवीन
परदेशी राहून काही आय डी भारतातील धर्मादं , पुरोगामी लोकांची तोंड ज्या वैचारिक पद्धतीने , संयम राखून , बंद करत आहेत ते सुद्धा एकाच आय डी ने. असे हे वाखाणण्याजोगे काम करत असताना तुम्ही मात्र फेक बातम्या देऊन त्यावर सगळा पोतेरा फिरवत आहात. https://m.timesofindia.com/news/fake-alert-no-shah-rukh-khan-did-not-donate-rs-45-crore-to-pakistan/amp_articleshow/68062223.cms === कसा का असेना पण शाहरूख आपल्याला जाम आवडतो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sat, 02/23/2019 - 12:39 नवीन
प्रतिसाद देण्या अगोदर वाचत जा म्हणजे नंतर खजील होण्याची वेळ येणाऱ् नाही , असो !!! तर आता नीट समजून घ्या , कारण तुमच्या तालुक्यातील तुमचे चाळीस पन्नास मित्र सैन्यात आहेत असे तुम्ही एकदा सांगितले होते , त्यामुळे लोकांनी वेलफेयर सोसायटी ला केलेल्या मदतीचे महत्व तुम्हाला समजवण्याची वेळ येते यात आश्चर्य आहे . शिवाय हा विषय पक्षीय राजकारणाच्या पलीकडे आहे एवढी तरी समज तुम्हाला असेलच . हां !!! तर ज्या सैनिकांनीं देशासाठी वीरमरण स्वीकारले त्यांना सरकारी नियमानुसार मदत मिळतेच पण काही सेलिब्रिटीनी आपण या देशाचे काही देणे लागतो या भावनेतून वेल्फेयर सोसायटी ला आर्थिक मदत केली तर कोणी त्या सैनिकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली . सैनिकांच्या वेल्फेयर सोसायटी ला मदत करणाऱ्यामध्ये खान गैंग कधीच नसते अस का ? ते या देशाचे नागरिक नाहीत ? का त्यांचा बाप आय एस आय एजंट ( दावूद ) नाराज होईल म्हणून ? हि खान पिलावळ बाकीच्या सोशल एक्टिविटी करत असते यात शंका नाही पण नेमके इथेच पाणी का मूरत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 12:44 नवीन
LKG तून UKG मधे कधी येणार आहात आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sat, 02/23/2019 - 12:57 नवीन
वैयक्तिक मानहानी , आय टी चा ढोस , उद्धट भाषेतील प्रतिसाद यावरुन तुमची शैक्षणिक पात्रता समजली !!!! असो !!! तेवढ जरा वेळात वेळ काढून वेल्फेयर सोसायटी च्या मदती बाबत तुमचे आणि बम्बळ चे विचार एकदम दक्षिण ध्रुवीय का होते तेव्हढ सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 19:26 नवीन
पहिल्या फ़ेक बातम्या चिटकवने जरा बंद करा. मग लोकांची शैक्षणिक पात्रता शोधत बसा. बाकी तुमचा प्रतिसाद एकदम हास्यास्पद असल्या कारणाने तो मी फाट्यावर मारला होता. Chillax...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 02/24/2019 - 03:10 नवीन
असू द्या !!! काही हरकत नाही , फक्त तेवढे आर्मी बद्दल चे ढोंगीप्रेम बंद करा किंवा खुल्लमखुल्ला पाकिस्तान च समर्थन करा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 02/24/2019 - 04:58 नवीन
का उगाच हसं करून घेताय स्वतःचं?? फेक बातम्या टाकताय आणि म्हणताय काही हरकत नाही!! अजब आहे! === बाकी कोणाच्या सर्टिफिकेटसची आम्हाला गरज नाही. बाजारबुनग्याची तर नाहीच नाहीच...!! पुढे तुम्ही ठरवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 02/24/2019 - 09:29 नवीन
आयला !!! डायरेक्ट बाजारबुणगे ? दिसतेय ! दिसतेय !!! तुमच्या प्रत्येक प्रतिसाद मध्ये तीच छाप दिसतेय = ) बघा ! याला म्हणतात कंट्रोल करणे !! संयम ठेवणे !! नेमकी हीच गोष्ट तुम्ही साहेबांकडून शिकले नाही , शेम्बड्या पोरांची काम नाहीत राजकारणाच्या गप्पा मारायला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 02/24/2019 - 12:22 नवीन
फेकर लोकानी दुसर्याना शहाणपणा शिकवू नये. आधी पहिले नाक पुसा बघू , मग राजकारणावर गप्पा मारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
श
शब्दबम्बाळ Fri, 02/22/2019 - 10:50 नवीन
नुसती जळजळ! तेवढंच करा... ते करोडोमध्ये कमावतात आणि करोडोमध्ये टॅक्स आपल्याच देशाला देतात, पलीकडच्या नाही! वरच्या प्रतिसादात तुमचे खोटे उघडे पडलेच आहे असेही. २०११ ला शाहरुख खानला युनेस्को पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक कार्यासाठी. "गौरतलब है कि 20वें यूनेस्को अवॉर्ड्स में शाहरुख खान को उनके चैरिटी वर्क के लिए सम्मानित किया गया है। खास बात यह है कि इस अवॉर्ड को पाने वाले शाहरुख पहले भारतीय हैं। " https://navbharattimes.indiatimes.com/movie-masti/news-from-bollywood/-/championstrophy_articleshow/10814659.cms 1. Recently, Shah Rukh Khan’s Meer Foundation donated Rs. 12 lakhs to Government of Kerala's Chief Minister Distress Relief Fund in order to help the Kerala Flood victims. 2. In 2015, he reportedly donated a sum of Rs. 1 crore for the Chennai flood victims. 3. He also donated a sum of 25 lakhs to PM Manmohan Singh for Tsunami Relief camp. He was one of the celebrities who performed at Help Telethon Concert to raise money for tsunami victims. 4. Shah Rukh Khan’s team Kolkata Knight Riders (KKR) won the Indian Premium League (IPL) season 7. The King Khan donated the entire money (Rs. 15 crores) to cancer patients in Mumbai and Kolkata. अजून अनेक आहेत पण तुमच्यासारख्यासाठी एवढी पुरेशी आहेत. पूर्ण बातमी: https://www.indiatimes.com/entertainment/11-inspiring-acts-of-generosity-by-srk-which-prove-he-s-a-true-hero-in-every-sense-of-the-word-351619.html आणि महाराष्ट्रात राहून आमिर खान काय समाजकार्य करतो हे सांगावं लागत असेल तर धन्य आहात! त्यांनी मदत केली जरी असली तरी आपल्याला कळेलच असे काही आहे का? तरी बरं स्वतःच म्हणताय कि मदत करणे ज्याची त्याची इच्छा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
विशुमित Fri, 02/22/2019 - 11:41 नवीन
हे मी सगळं लिहणारच होतो. पण या वृत्तीना थोड्या गुदगुल्या केल्या तरी पुरेशा असतात. === शाहरुखच महिलांप्रती आदर कसा असावा, हे खरेच आत्मसात करण्यासारखी गोष्ट आहे. शारूखला ओळखणाऱ्या भारतातील बहुतांशी महिला माझ्या म्हणण्याला दुजोरा देऊ शकतील. कदाचित अतिशयोक्ती वाटत असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
व
विशुमित Fri, 02/22/2019 - 13:14 नवीन
इकडे समर्थक (? सोर्री बाबा, लोकांना लगेच राग येतो आणि आम्हाला गुलाम ठरवून मोकळे होतात) शांतीप्रिय लोकांना झोडतात आणि त्यांचे "हे" राजपुत्राला मिठ्या काय मारतात, मागे थेट बिर्याणी खायलाच गेले शत्रुदेशात. लोक विसरणार नाहीत या गोष्टींना.! ते बिर्याणी खाऊन आले तेव्हा खूप गाजावाजा झाला होता कि पाकिस्तानचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार म्हणून.! एक कडक अग्रलेख- https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-saudi-arabia-prince-mohammed-bin-salman-visit-in-india-1845666/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प Sat, 02/23/2019 - 06:38 नवीन
कावळया च्या शापाने गाय मरते का ? त्याच प्रमाणे न खपणारे आणि एकांगी लिहाणाऱ्या पेपर चे लेख सामान्य मतदार वाचत नाहीच , त्यामुळे त्यांच्या पक्षपाती लेखामुळे भाजप ला काडिचा ही फरक पडणार नाही . मोदींची शरीफ भेट किंवा वाजपेयी नीं मसूद ला सोडण्या पाठिमागचे उद्देश आजच्या जनतेला चांगलेच समजतात त्यामुळे लोकसत्ता सारख्या प्लॉप पेपर ने बाहुल्या उगळत बसल्या दिवसेंदिवस लोकसत्ता चा खप कमी होणार हे निश्चित . TIO सुद्धा बऱ्यापैकी भाजप विरोध आवळत असतो , पण तरीसुद्धा गेल्या आठवड्यात त्यांनी '2019 मधील वाचकांचा कौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे ' छापले होते . त्यामुळे लोकसत्ता ची तुम्ही टाकलेली लिंक सरळ कचऱ्यात गेली आहे . जनमत काँग्रेस च्या विरोधात असल्या मुळे लोकसत्ता वाल्यानी तर वाचकांच्या प्रतिक्रिया छापने बंद केले आहे . फक्त मिपावर पिंका मारत बसण्या ऐवजी ट्विटर , ब्लॉग्स , ऑनलाइन न्यूज़पेपर वरील प्रतिक्रिया डोळे उघडून वाचा . तरी पण जनमत नाही समजले तर बिनधास्त पूर्वी सारखे अडाण्या चे सोंग घेवून फिरा आमची काही हरकत नाही !!!!!!! पाच वर्षा पूर्वी सगळी मीडिया मोदी विरोधात होती , पण तरी सुद्धा जनतेने काँग्रेस च्या विरोधात जावून भाजपला मताधिक्याने निवडून आणले होते . आता सुद्धा तीच परिस्थिति आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डँबिस००७ Sat, 02/23/2019 - 14:38 नवीन
आयला पाकिस्तानी लोक सुद्धा आता मोदी साठी काम करायला लागलेत !! पाकिस्तानी टिव्हि वरुन साभार .... पुलवामाच्या अगोदर श्री मोदीजींची रेटींग ३५-४०% होती , पुलवामानंतर ती वाढुन आता ९३% झालेली आहे !! मोदींजींना पंप्र पदावरुन काढुन त्या जागी ईतर कोणालाही बॉॉसवाव म्हणजे भारताच्या तुफान प्रगतीला खीळ बसेल असा कयास करुन पाकिस्तानी बसले होते पण झाल ह्याच्या विरुद्ध !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 19:59 नवीन
त्याच प्रमाणे न खपणारे आणि एकांगी लिहाणाऱ्या पेपर चे लेख सामान्य मतदार वाचत नाहीच === मग सनातन प्रभात, संध्यानंद वगैरे पेपर , की आयटी सेल फेक whatsup मेसेजस?? ह्या भ्रमात राहू नका की लोक वाचत नाहीत. आजकाल समान्य लोक राजकारणा व्यतरिक्त काहीच वाचत नाहीत. --- लोकसत्ता सारख्या प्लॉप पेपर ने बाहुल्या उगळत बसल्या दिवसेंदिवस लोकसत्ता चा खप कमी होणार हे निश्चित . TIO सुद्धा बऱ्यापैकी भाजप विरोध आवळत असतो , पण तरीसुद्धा गेल्या आठवड्यात त्यांनी '2019 मधील वाचकांचा कौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे ' छापले होते . त्यामुळे लोकसत्ता ची तुम्ही टाकलेली लिंक सरळ कचऱ्यात गेली आहे . ==)) जे जे वाह "गोदीजी वाह्ह" ते ते सर्व पौष्टिक.! === बाकी आमचे 2014 पुर्वी पण डोळे उघडेच होते अणि पुढे ही असणार. असो.. तुमच चालू ध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ग
गब्रिएल Sat, 02/23/2019 - 08:27 नवीन
लोकं आसं म्हंत्यात बर्का https://www.youtube.com/watch?v=FCZGIxRSTUo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गब्रिएल Sat, 02/23/2019 - 08:27 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ट
ट्रम्प Sat, 02/23/2019 - 12:07 नवीन
मला खात्री आहे राकॉ चे मिपावरील प्रवक्ते मढ़ा मधील नागरिकांनी पवार साहेबां चा एकेरित उल्लेख करून दिलेल्या प्रतिक्रिया वर एक शब्द ही बोलणार नाहीत . इथे आम्हाला मोदींच्या 5 वर्षाचा हिशोब घ्यायचाय, क़ाय तर म्हणे " माढा चा बारामती करु म्हणणारे निवडून गेल्या नंतर 2009 पासून एकदा ही फिरकले नाहीत ".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 12:48 नवीन
व्याख्या सांगणार होतात. काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 12:55 नवीन
चंगलाय की !कामे नसतील झाली,फिरकले नसतील तर लोकानी बोललेच पाहिजे. जाब विचारलाच पाहिजे. नुसता (अंध) भक्ती काय कामाची?? === बाकी गोरे हा तड़ीपार आहे. त्याच एवढं मनावर कसे घेतले तुम्ही?? का सगळी तड़ीपार गँगच आवडती??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ट
ट्रम्प Sat, 02/23/2019 - 13:01 नवीन
मला माहित नाही , हा कोण गोरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रम्प Sat, 02/23/2019 - 17:19 नवीन
मला वाटल तुम्ही गाब्रिएलनीं पोस्ट केलेल्या वीडियो मधील माढा मधील नागरिकांच्या तुमच्या साहेबांच्या विरोधातील जळजळीत प्रतिक्रिया बद्दल बोलताय , पण हा गोरे तर माण खटाव चा युवा अध्यक्ष निघाला. आणि त्याने व समर्थकानी साक्षात साहेबांच्या पुढे धिंगाणा घालून साहेबांचे भाषण बंद पाडले . अवघड आहे हो तुमच्या साहेबांचे !!! कार्यकर्ते ऐकत नाही , मान देत नाही !!!! त्यामुळे तुम्ही आमच्या साहेबांचे सोडा आणि तुमच्या साहेबांची काळजी करा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 19:37 नवीन
"आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत," असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. आज कार्यकर्त्यांसोबत शेखर गोरे कार्यक्रमास्थळी आले होते. शरद पवारांच्या भाषणापूर्वी आमच्यापैकी एका कार्याकर्त्यांला भाषणाची संधी द्यावी असं आम्ही स्टेजवरील नेते मंडळींना लिहून दिलं होतं. आम्हाला आमच्यावर झालेला अन्याय पवार साहेंबांसमोर मांडायचा होता. परंतू आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून मला उभ केलं होतं. मात्र निवडणूकीत राष्ट्रवादीकडे 127 मतं जास्ता असताना जर माझा पराभव होतो. हा माझ्यावर होणारा अन्याय आहे. साहेबांना निवडणूकीत पूर्ण पाठिंबा आहे. पण जर मला माण तालुक्यातं नेतृत्व दिलं असताना मला व्यासपीठावर बोलू दिलं जातं नाही हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. मी माझं नेतृत्व वेळावेळी सिद्ध केलं असतानाही मला साहेबांना भेटू दिलं गेलं नाही. म्हणूनच मला माझ्यावरील अन्याय पवार साहेबांसमोर मांडायच्या होत्या. === यातून काही डोक्यात घुस्तय का ते बघा. नाहीतर एखदा फॉर्मेट मारून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 02/24/2019 - 03:12 नवीन
हि अन्याय मांडण्याची छान पद्धत आहे !!! पक्षाची बाजू मांडण्या चा साहेबाप्रमाणेच केविलवाणा प्रयत्न करताय !! त्याच प्रमाणे पक्षावरिल साहेबांची पकड़ दिवसेंदिवस कमी होत चालाल्याचे ते द्योतक आहे . आता हे तुम्हाला मान्य होण शक्यच नाही कारण तुमच्या डोक्यात विचारांचा गुंता झाला आहे , आणि अशा अवस्थेतील माणूस आजुबाजुच्यानां धोकादायक ठरू शकतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 02/24/2019 - 05:11 नवीन
आमचा धागा एकदम सरळ आहे. कुठला ही गुंता नाही. तरी देखील तुम्हाला धोकादायक वाटत असेल तर मग सावधच रहा. हा का ना का!! === घाबरु नका, तुम्हाला फक्त मिपावरच जोडे बसवणार आहोत. === Gentle reminder -व्याख्या सांगणार होतात. ती एकदा फिक्स झाली की आशा प्रकारच्या प्रतिसादांचा योग्य समाचार घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 02/24/2019 - 09:18 नवीन
" घाबरु नका, तुम्हाला फक्त मिपावरच जोडे बसवणार आहोत. " हे वाचून जाम टरकलो होतो , पण तुम्ही फक्त मिपावर जोड़े बसवन्यात पटाईत आहात हे वाचून जरा हायसे वाटले . कस आहे की कौटुम्बिक पार्श्वभूमी पण तुमच्या सारखी राजकीय पार्श्वभूमी नसलेला गरीब भोळा आहे मी !!!!!!! हळूहळू संयम सुटायला लागला बरका !! संभाळा , काळजी घ्या , निवडणूक जवळ आली आहे अजुन आपल्याला खुप कामे करायची आहेत . मी कस्पटा समान आहे हो ! मला घाबरीवीण्यात कशाला तुमची शक्ति वाया घालवता = ) ' जोडे मारीन , डोक फॉर्मेट करून घ्या ' हे दम देण्याचे नवीन प्रकार खतरनाक होते बर का !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 02/24/2019 - 13:46 नवीन
जा तुला अभय, 100 प्रतिसाद माफ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Sat, 02/23/2019 - 15:44 नवीन
देउन, देउन काय दिला ? तर लोकसत्त्येतला अग्रलेख !!! श्रीमोदीजींच्या अथक प्रयत्नामुळे भारत पुर्वी सारखा फक्त सौदी अरेबियावर अवलंबुन नाहीय ! भारताला लागणार्या एकुण खनिज तेलातील फक्त १६-२०% क्रुड तेल हे सौदी मधुन येत ! अमेरिकेकडुन खनिज तेल विकत घेणारा भारत हा पहिला देश आहे ! त्याच बरोबर अमेरिकेच्या नाकावर टिच्चुन ईराण कडुनही तेल भारत विकत घेत आहे ! सौदीची आराम्को कंपनी भारतात ४४ बिलीयन डॉ चा निवेश करुन जगातली सर्वात मोठी रिफायनेरी उभारणार आहे !! ह्या प्रकल्पासाठी भुमि अधिग्रहण करण्यात आलेल आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/23/2019 - 19:46 नवीन
अवलंबून नाही तर मिठ्या का मारत होते? === बाकी माझा विषय हा होता की declared भक्तांना मुसलमानांचे वावडे आहे , पण त्यांचे साहेब करकचून मिठ्या काय मारत आहेत, बिरयानी काय झोडत आहेत. === माझ्या मते पुरोगाम्याना इकडून तिकडे उड्या मारायला भरपूर मुभा आहे पण प्रतिगाम्यांच लय अवघड जागेचं दुखणं आहे. असो. आपले श्री श्री श्री उत्तम काम करत आहेत. 007 आप आगे बढो हम तुम्हारे साथ है!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 06:01 नवीन
अवलंबून नाही तर मिठ्या का मारत होते? फायदा असे पर्यंत जी हुजुरी करायची फायदा संपला की लगेच डंप करायच ही कॉंग्रेसची नीती आहे !! ईजराईलला सोडुन पॅलेस्टाईन सारख्या अतिरेकी संघटनेला ईतकी वर्षे कॉंग्रेस गोंजारत होती पण ईजराईल सारखा खरा मित्र वाजपेयीनी मिळवुन दिला !! आज श्री मोदीजींमुळे ईजराईल व पॅलेस्टाईन दोघेही भारताचे मित्र आहेत तर अफघाणिस्तानचे प्रेसिडेंट श्री मोदीजींच्या स्वागताच्या ट्विट मध्ये म्हणतात "Welcome Home Mr Modi " आज पुलवामा घटनेनंतर अफघाणी लोक भारताच्या दुःखात मनापासुन सहभाग व्यक्त करत आहेत ! सौदी प्रिंस पाकीस्तानात गेलेले असताना १० बिलीयन डॉ चे MOU साईन केले त्यावेळेला पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सौदी मंत्र्यांना विचारल की हा पैसा कधी मिळेल !! त्यावर सौदी मंत्र्यांनी सांगीतल की आत फक्त MOU झालाय अजुन फिजीबिलीटी स्टडी सारखे सोपस्कार व्हायचे आहेत ! हे सर्व सुरळीत झाल्यास दोन वर्षांनी सौदी Invest करेल !! श्री मोदीजींमुळे पाकीस्तान हातात भिकेचा वाडगा घेउन दारोदारी फिरण्यास मजबुर झालेला आहे ! पाकिस्तानला आज कोणीही पैश्याची मदत करत नाही !! अमेरिकेसाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानशी अमेरिकेबरोबर युद्ध केल.पाकिस्तानच्या मते त्यांचा हक्कचा पैसा अमेरिकेने नाकारलेला आहे !!अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला पैसे द्यायला नकार दिलेला आहे. अमेरिकेच्या पैश्यावर पाकिस्तानत अतिरेकी पोसला गेलेला आहे. आज पाकिस्तानला जगात फक्त श्री मोदीजींनी खडसावलेल आहे !! एकीकडे सौदी पाकिस्तानात १० बिलियन डॉ चा MOU करते तर दुसरीकडे 44 बिलीयन डॉ खर्च करुन सौदी भारतात जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारत आहे !! त्या साठी क्रुड तेल सौदीच देणार आहे ! ईतकी मोठी रिफायनरी स्वतः सौदी मध्ये पण नाही !! श्रीमोदीजी जे देशासाठी करत आहेत त्यामध्ये आम्ही खुष आहोत !! तुम्हाला बिर्यानी खाण्यात प्रॉब्लेम असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
भ
भंकस बाबा Mon, 02/25/2019 - 05:15 नवीन
जगाच्या राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतात, सौदी असो, अमीरात असो वा ईरान असो वा ओमेन असो या सर्वाना आपले खनिज तेल विकण्याची गरज आहे. यांची अर्थव्यवस्था यावरच अवलंबून आहे. येणारा काळ हळूहळू खनिज तेलाची गरज कमी करणारा आहे. इथे एक चूक ह्या तेलउत्पादक देशाना त्यांच्या ग्राहकापासुन दूर घेऊन जाईल. चीन व भारत हे जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारे देश आहेत. याच कारणामुळे सौदीसारखा इस्लामी प्रसार करणारा देश चीनसारख्या देशाबरोबर व्यापारिक संबध चांगले ठेउ इच्छितो, जो चीन उघर मुसलमानाना ठेचत आहे. उलट परिस्थिति आपल्याकडे पण आहे. पेट्रोलचे भाव वाढले की आंतरराष्ट्रीय समस्या वेगेरे बाजूला ठेऊन सरकारला शिव्या दिल्या जातात. अशा वेळी आपण जर दुरचा विचार करून या संधिचा फायदा उठवला तर गैर क़ाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/22/2019 - 18:53 नवीन
अनुपम खेरने किती दिले ? मनमोहनच्या सिनेमातून पैसे मिळाले ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
इ
इरसाल गुरुवार, 02/28/2019 - 12:29 नवीन
ते मनमोहन आणी अनुपम ना जावुन विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
  • «
  • ‹
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा