Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
काथ्याकुट
चर्चा
राजकारण
अर्थसंकल्प

प्रतिक्रिया द्या
542105 वाचन

💬 प्रतिसाद (783)
न
नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 16:13 नवीन
मस्त बदनामी आणि फियर मॉंगरिंग करताय. सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेल; तर बिहार व उत्तरप्रदेशातल्या अनाथ बालिकागृहात मुलींवर अत्याचार करणाऱया ब्राह्मण-क्षत्रिय हिंदूंमुळे सगळेच हिंदू वाईट ठरतील ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Sat, 02/16/2019 - 01:19 नवीन
तुम्ही प्रकरण काय आहे हे वाचलेलं दिसत नाहीये. या लोकांनी त्या संपूर्ण काउंटीमधील एकही वय १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री सोडली नाही. लहान लहान मुलींना नादी लावून त्यांच्यावर वर्षानुवर्षे हजारो लोकांनी अत्याचार केले. त्या मुलींना ड्रग्सचे व्यसन लावून दिले. मी जे पुस्तक सांगितले आहे त्या मुलीने सगळं सविस्तर कथन केलंय. मला सांगतानाही कसं तरी होतंय.... १५ वर्षाची असताना तिच्या खोलीबाहेर लाईन लावून लोक उभे होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका दिवसात २५-३० लोकांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. अनाथाश्रमात असले प्रकार होतात हे मान्य आहेच पण तो त्या मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रकार जास्त आहे. हे घृणास्पद तर आहेच, पण वरील प्रकार म्हणजे केवळ "गोऱ्या" मुलींना लक्ष्य करणे हे कुठल्या प्रकारात मोडते? त्यापुढे जाऊन आपल्या इथे अनाथाश्रमात जे प्रकार होतात त्या अपराध्यांना शिक्षा तरी होते. रोशडेल प्रकरणात आधी तर पोलिसांनी दुर्लक्षच केले होते नंतर दबाव आल्यावर केस लढण्यासाठी म्हणून १ मिलियन पाउंड दिले? बोको हराम ने केलेले अत्याचार तुम्ही विसरलात काय? स्वतःच्या बायकापोरींना अगदी नखशिखांत काळ्या कपड्यात ठेवायचे. इतर धर्माच्या कोणी त्यांच्याकडे बघितलं तरी कत्तल करतात. मग दुसऱ्या धर्माच्या मुलींची तेवढीच इज्जत का करत नाहीत? भारतात फक्त हिंदू मुलींना लक्ष्य करण्यासाठी ग्रूमिंग कोण करत आहे हे जरा डोळे, कान, बुद्धी उघडी ठेवलीत तर कळेल. सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेल मी सरसकट सगळे मुसलमान असे आहेत असे कुठे म्हणले? पण हे प्रकार करणारे सर्व मुसलमानच होते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला फरक समजला तर ठीक नाही तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 02/16/2019 - 16:20 नवीन
फारच गँभीर प्रकरण दिसते आहे, तुम्ही प्रकरण काय आहे हे वाचलेलं दिसत नाहीये. या लोकांनी त्या संपूर्ण काउंटीमधील एकही वय १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री सोडली नाही. काही घरात दोन पुरुष असतात , बाप व मुलगा , त्यांना घरातील स्त्री वाम मार्गावर आहे, हे समजले नाही ? काही घरात दोन स्त्रिया असतात , आई व मुलगी , तिथे एका स्त्रीला , आपल्यानन्तर दुसरीही शिकार होणार , हे थांबवता आले नाही ? भारतातही लव जिहादच्या तक्रारी असतात, मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ? आधुनिक नरकासुरच हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Sat, 02/16/2019 - 19:31 नवीन
सुरुवात अगदी निरुपद्रवी वाटेल अश्या पद्धतीने होते. पौगंडावस्थेतल्या मुलींना फूस लावणे तसे सोपे असते. एकदा मुलगी जाळ्यात सापडली की मग धाक दाखवून, ब्लॅकमेल करून मुलीला वाटेल तसे वागवता येते. अश्या परिस्थितीत फसलेल्या मुली एकतर लाजेखातर वा भीतीमुळे आईवडिलांना लवकर सांगत नाहीत. जेव्हा सांगतात तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असू शकते. ब्लॅकमेल काय फक्त मुलींनाच करतात असं थोडीच आहे, आईवडिलांना पण करत असतीलच. ते पुस्तक लिहिलेल्या मुलीची परिस्थिती अशीच होती. आईवडील दोघेही कामानिमित्त बाहेर राहत असल्याने शाळेतून आल्यावर काहीतरी करावे म्हणून पेपर मध्ये आलेल्या एका जाहिरातीला उत्तर दिले आणि तिच्या आयुष्याची वाट लागली. नुसते बलात्कार, ड्रग्सच नव्हे तर या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी तिला तब्बल २० पेक्षा जास्त वर्षे लागली. मधल्या काळात आईवडिलांना कळले त्यांनी पोलीस कम्प्लेंट केली पण पोलिसांनी त्या मुलीलाच वेश्या ठरवले. या ग्रूमिंग गॅंगला हे समजल्यावर त्यांनी ब्लॅकमेल पासून सगळी दबावतंत्र वापरली. हे लोक एवढे धीट झाले की ते मनाला येईल तेव्हा त्या मुलीच्या घरी येऊ लागले. नाईलाजाने त्या मुलीच्या भावंडांवर परिणाम होऊ नये आईवडिलांनी तिला घरापासून लांब एक रूम घेऊन दिली. इतकी दुर्दशा होण्याचे कारण म्हणजे पोलीस किंवा इतर सरकारी आस्थापने त्यांना मदत करत नव्हती. कारण तिथे सगळीकडे या अपराध्यांचेच धर्मबंधू बसले होते. मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ? भारतात अगदी शिकलेल्या मुली, नट्या याच्या बळी आहेत. तसेच ग्रूमिंग गँग्स भारतातही जोरात आहेत. या मध्ये जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलांना इंग्लिश नीट बोलायला शिकवले जाते, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दिले जाते, चांगले कपडे, गाड्या, महागडे मोबाईल्स वगैरे पुरवले जातात. एरियातल्या हिंदू मुलींची लिस्ट त्यांच्या स्वभाव, आवडीनिवडी ई सकट तयार असते. कोणत्या मुलीला कोणी टारगेट करायचे हे पण ठरवले जाते. मग या मुलांना हिंदू वाटेल असे नाव दिले जाते, त्या नावाने त्यांची सोशल मेडिया अकाउंट्स उघडली जातात. एकदा मुलीने मैत्री केली की मग सहज म्हणून एकत्र फोटो काढले जातात. थोडेफार फोटोशॉप करून मग त्याचा वापर ब्लॅकमेल साठी करता येतो. सेक्युलॅरिझम हा सगळ्यात मोठा दोषी आहे. काही वेळा जरी मुलगा मुस्लिम आहे हे समजले तरी आम्ही धर्म, जातपात मानत नाही हे दाखवण्यासाठी मुली नातं पुढे नेतात. ती मुले सुद्धा आम्ही किती पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी मुलीने धर्म बदलायची गरज नाही वगैरे सांगतात. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की मग त्यांचे खरे स्वरूप दाखवतात. टीप: १००% मुसलमान असे आहेत किंवा हे असे करतात असे मला म्हणायचे नाहीये. पण हे असले प्रकार करणारे १००% लोक मुसलमान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
न
नगरीनिरंजन Sat, 02/16/2019 - 22:34 नवीन
शिवाय मुसलमानांना शिव्या देताना आपला हिंदू कर्मठ इतिहास सोयीस्करपणे विसरला जातो. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. आताही भारताची घटना जाळण्याची हिंमत केली जाते. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 02:16 नवीन
तुम्ही कशाची कशाशी तुलना करताय हे पण तुम्हाला कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या इथे शतकभरापूर्वी गावांमध्ये जातिभेदांमुळे होत असलेल्या अत्याचारांची तुलना आत्ता एकविसाव्या शतकात इंग्लंडसाख्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांशी करताय. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात. इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ट
ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 02:17 नवीन
तुम्ही कशाची कशाशी तुलना करताय हे पण तुम्हाला कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या इथे शतकभरापूर्वी गावांमध्ये जातिभेदांमुळे होत असलेल्या अत्याचारांची तुलना आत्ता एकविसाव्या शतकात इंग्लंडसाख्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांशी करताय. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात. इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 03:26 नवीन
परत तेच. हिंदू, ख्रिश्चॅनिटी व इतर धर्मांतही इतका धर्मांधळेपणा होताच; पण कालांतराने त्यात प्रगती झाली. तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल. लगेच हे लोक हे लोक म्हणून स्टिरियोटाईप करायची गरज नाही इतकाच मुद्दा आहे. इंग्लंडचं मला माहित नाही; पण भारतात इंग्लंडपेक्षा जास्त संख्येने मुसलमान अनेक शतकांपासून आहेत व स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 19:49 नवीन
तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल. भारतातील कुठल्या शाळेत/ कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही? पण हे लोक मुलांना मदरश्यात पाठवतात. वर मदरश्यांमध्ये गणित आणि शास्त्र शिकवायच्या प्रस्तावाला मुसलमानच विरोध करत आहेत. मदरश्यांमध्ये सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून फडणवीस सरकारने प्रयत्न केले तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून काय सांगितले बघा. "It is ill-designed and ill-timed, I don't know why they are doing it," said Kamal Farooqui of the All India Muslim Personal Law Board. अजूनही जर मुलांना फक्त एकच धर्म खरा आहे आणि इतर धर्म मानणारे लोक मारून टाकले पाहिजे असे शिकवले जात असेल तर या लोकांसमोर काय हात जोडून उभे राहणार? शांततेसाठी किती चर्चेच्या फेऱ्या झाल्या, किती प्रयत्न झाले? पण काय उपयोग झाला? जर तुम्ही सगळे मुसलमान आतंकवादी नाही असं म्हणताय तर आतंकवाद्यांना विरोध किती "चांगले" मुसलमान करतात? जे मुसलमान खरंच इतर धर्मांच्या लोकांना आदराने वागवतात त्यांना किती हिंदू त्रास देतात? स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही. म्हणजेच हे सिद्ध झालंय की हिंदुबहुल असलेल्या भारताने मुसलमानांना पण सामान संधी देऊ केल्या होत्या/ आहेत. पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी जाताजाता काय म्हणले हे आठवत असेलच. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे भारताचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. यांना किंवा हमीद अन्सारींना ही पदे देऊ नयेत म्हणून कुठल्या "कट्टर" हिंदूने काही केले का? कलाम साहेब राष्ट्रपती असताना पण जे अतिरेकी हल्ले झाले त्याबद्दल कोणी कलाम साहेबांचा धर्म काढून दूषणे दिली का? मुद्दा हा आहे की सामान्य मुसलमान जो पर्यंत स्वतःला या अतिरेक्यांपासून वेगळं का करत नाही? जर १००% अतिरेकी मुसलमान आहेत तर कुठला मुसलमान अतिरेकी आहे का नाही हे कसे कळणार? अगदी शिकलेले, सुस्थापित, चांगली सांपत्तिक स्थिती असणारे, मोठ्या शहरांमध्ये राहणारे मुसलमान जर कुठले तरी पुस्तक वाचून व व्हिडिओ बघून अतिरेकी बनत असतील तर मग फरक करणार कसा? जोपर्यंत चांगला मुसलमान योग्य बाजू घेत नाही तोपर्यंत ओल्याबरोबर सुके ही जळणार. माझ्या शेजारी बसून माझ्याबरोबर काम करणारी व्यक्ती जर अचानक लांडी पॅन्ट, स्कल कॅप घालू लागला, दिवसातून ५ वेळा अगदी मीटिंग अर्धवट सोडून नमाजाला जायला लागला, इस्लामच कसा चांगला यावर बोलू लागला तर मनात नक्कीच कुठेतरी संशयाची पाल चुकचुकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
त
तेजस आठवले Tue, 02/19/2019 - 17:57 नवीन
नगरीनिरंजन साहेब, आपण मिपाचे जुने सदस्य आहात. धर्म आणि जात ह्यावर भरपूर चर्चा अनेक धाग्यांवर झालेली आहे. सध्याची चर्चा ही आत्ताच्या काळात घडणाऱ्या घटनांवर आहे, त्यामुळे जुने आणि ह्या विषयाशी संबंधित नसलेले विचार कृपया मांडले नाहीत तर ते योग्य राहील. हिंदू धर्म कर्मठ होता आणि थोडाफार अजूनही आहे, पण हा कर्मठपणा सक्तीचा नाही. कितीतरी मुसलमान इस्लामच्या कर्मठपणाला कंटाळलेले असू शकतील, पण हे बोलून दाखवण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे का आणि ते स्वातंत्र्य त्यांनी उपभोगले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपणाला माहित असेल अशी खात्री आहे.
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.
हे अगदी खरे आहे. पण जेव्हा हे चुकीचे आहे हे कळले तेव्हा कायदा करून समाजातल्या सर्व लोकांना संधी मिळतील हे पाहिले गेले,आणि नावापुरते का होईना तो कायदा पाळला जातो.(खऱ्या शोषितांना,वंचितांना डावलून बाकीचेच लोक आरक्षणाचा उपभोग घेतात हे त्यातले कटू सत्य आहे. जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याच्या बातम्या अनेकदा वृत्तपत्रात येत असतात.). समाजातला मोठा वर्ग म्हणजे बहुजन समाज तुम्ही म्हणताय त्याला आता शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत.काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर अन्याय झाला हे खरे. पण सवर्ण म्हणजे नक्की कोण?कुठल्याही एका जातीला इथे जबाबदार ठरवता येत नाही.समाजातल्या सगळ्या अन्यायाला ब्राह्मण जबाबदार आहेत हा प्रोपोगांडा ब्रिगेडने पसरवला आहे.शिक्षण हे आजच्या काळातले नसून त्या काळातले विचारात घ्या. ब्राह्मण सोडून इतरांना अध्ययनाचा अधिकार नव्हता. पण तेव्हा कारकुनी स्वरूपाच्या नोकऱ्या किती होत्या? लोहार लोहारकाम, चांभार चपला-चामड्याच्या वस्तू, न्हावी केस कापणे,शिंपी वस्त्रे विणणे, कुंभार मातीची भांडी घडवणे असे वंशंपरंपरागत व्यवसाय करत होतेच की.बलुतेदारी हीच होती ना.गावात प्रत्येक जातीतल्या, व्यवसायातल्या लोकांना एकमेकांची गरज तेव्हाही होती आणि आत्ताही काही प्रमाणात आहे.गावाचे पाटील, चौगुला, देशमुख ह्यातले किती ब्राह्मण होते?शेतीची कामे करायला कुळे असत, ती काय फक्त ब्राह्मणांकडेच का?खालची जात आपण म्हणताय पण पूर्वीच्या काळी कोठली जात कोणाला कसे वागवत असे ह्याबद्दल अजून माहिती मिळवा.रोटी बेटी व्यवहार कुठकुठल्या जातींमध्ये होत? शिंपी जात वस्त्रे विणत असे. आता जर खालच्या जातींना वस्त्रे नाकारली होती मग ती कोणी? ब्राह्मणांनी का मराठ्यांनी का शिंप्यांनी ,कोणी? प्रत्येक जात त्यांचे वंशपरंपरेने आलेले काम करत होती.न्हाव्याच्या मुलाला लोहारकाम किंवा सुताराला चपला बनवायला कुठले लिखित कायदे अडवत होते. मुस्लिम ब्रदरहूड ह्या संज्ञेअंतर्गत सगळे मुस्लिम समान आहेत आणि इस्लाम मध्ये भेदाभेद नाहीत असे म्हटले जाते. खरेच तसे आहे का?उदाहरणार्थ मुस्लिमांमधील लेबबाई ही जात मागास आहे आणि तिला घटनात्मकदृष्ट्या आरक्षण आहे.ऐकीव अनुभवानुसार देशोदेशीच्या मुसलमानांमध्ये फरक केला जातो. अरब हे स्वतःला मूळ मुसलमान मानतात तर पठाण आपण विशुद्ध मुसलमान असल्याचे म्हणतात. भेदाभेद तिकडेही आहेच.शिया काय सुन्नी काय अहमदिया, बोहरा काय भेद आहेतच की. आपण कृपया माझ्या प्रतिसादातील शिक्षण आणि त्या अनुषंगाने लिहिलेला भाग नजरेखालून घालावा हि विनंती.. http://www.misalpav.com/comment/977484#comment-977484
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sat, 02/16/2019 - 22:24 नवीन
धर्मांध लोक अतिशय क्रूर आणि हलकट असतात आणि मुसलमानांमध्ये ते प्रमाण जास्त आहे हे मान्य आहे. युरोपमध्ये रिफ्युजी म्हणून गेलेले लोक मुसलमानबहुल देशातले असतात आणि तिथे त्यांचे पूर्ण ब्रेनवॉशिंग झालेले असते. बोको हरामसुद्धा कट्टर धर्मांध आहे. परंतू त्या लोकांना आणि भारतातल्या मुसलमानांना एकजिनसी मानून तिकजच्या लोकांच्या कृत्याबद्दल हिंदूबहुल देशात अवाजवी भीती पसरवून द्वेषाचे वातावरण निर्माण करून काहीही होणार नाहीय. राजकारणी लोक सत्तेसाठी करतात. सामान्य माणसाने करायचे काय कारण? उलट भारतातले मुस्लिम बरेच गरीब आणि निरक्षर आहेत शिक्षण आणि रोजगारीतूनच लोकसंख्येवर नियंत्रण आणले जाऊ शकते. असा द्वेष पसरवून आणि जिनोसाईड करुन पूर्ण देशाचे नुकसान होते. अडाणी व स्वार्थांध नेत्यांना हे समजून घ्यायची गरज वाटत नाही; पण शिकलेल्या जनतेला तरी कळायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रम्प गुरुवार, 02/14/2019 - 05:28 नवीन
एकंदर सगळाच प्रकार भयानक आहे !! आपण पाहुने आहोत हे माहित असताना देखील पाकिस्तानी मुस्लिम ब्रिटन मधील महिला / मुलींना वेशाव्यववसाया मध्ये ढकलन्याचे धाडस कसे क़ाय करु शकतात ? इंग्लैंड मध्ये ' त्या' धर्मियांची वाढती संख्या पाहता फ़्रांस प्रमाणे इंग्लैड मध्ये ही दहशत वादी हल्ल्यांचे प्रमाण वाढू शकते . माझ्या माहिती प्रमाणे इंग्लैंड मध्ये त्यांच्या वस्तीवर आणि धार्मिक स्थळावर सतत 24 तास नजर ठेवली जाते . भारतातही लव्ह जिहाद अस्तित्वात नाही असे म्हणणारे तथाकथित , ढोंगी , पुरोगामी शांततप्रिय लोक मिपावर सुद्धा आहे बर का !!! आणि हेच ढोंगी पुरोगामी लोक विषयानुसार सतत मिपावरिल इतर लोकांना खिजवत असतात . याचा अर्थ एकच आहे की ते स्वतः ' जगभरातील बदनाम शांततप्रिय धर्मीय आहेत ' किंवा त्यांचे गुलाम आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डँबिस००७ गुरुवार, 02/14/2019 - 10:00 नवीन
ईंग्लडची राज्यव्यवस्था पुर्णपणे कोलमडायच्या स्थितीत आलेली आहे. एकेकाळी जगावर राज्य करणार्या ह्या देशावर आज ३०% पाकिस्तानातले मुस्लिम लोक निवडुन गेलेले आहेत व आता राज्य करत आहेत. थोड्याच दिवसात तिथे शरीया लागु केला तर आश्चर्य वाटु नये. लॉ ऑफ कर्मा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/14/2019 - 09:07 नवीन
राफेल प्रकरण काही शांत होत नाही. कॅगचा रिपोर्ट तर आला पण त्यात आकडेवारी नाही. ह्या आधी जेव्हा नेव्ही/वायुदलकडून अशी मोठी खरेदी होत होती तेव्हा कॅगने रेपोर्ट मध्ये आकडेवारी दिली होती. ! https://www.youtube.com/watch?v=8RABu0FH23I&t=306s मोदी फ्रांसला जातात त्याआधी अनिल अंबानीही पॅरिसला पोचतो व काही बोलणी करतो.. योगायोग मानायचा?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 02/14/2019 - 09:55 नवीन
माईसाहेब, तुम्ही असे प्रश्न विचारला तर आम्ही तसे प्रश्न विचारु ! जसे की डोकलाम मध्ये न भारत विरुद्ध चीन लष्कर समोरासमोर असताना , राहुल गांधी व टिम चीन राजदुताला गुपचुप भेटायला जाते ! या भेटीच प्रयोजन विचारल तर भेटलेच नाही म्हणुन खोटच सांगतो ! पुरावे दाखवल्यावर भेट झाली अस पण भेटीच्या वेळेला काय चर्चील गे ल ते आज पर्यंत सांगीतल नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/14/2019 - 09:26 नवीन




  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 02/14/2019 - 15:12 नवीन
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ३० जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट केला. यात सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. -- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/terrorists-have-attacked-a-crpf-convoy-in-jammu-and-kashmirs-pulwama/articleshow/67992498.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/14/2019 - 16:56 नवीन
आजूनेक २६/११ झालं तर बलुचिस्तान वेगळा होईल अशा अर्थाचं वक्तव्यं अजित दोभाल यांनी केल्याचं ऐकून होतो. म्हणून जालावर शोध घेतला. तर ते सापडलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=150 पण इथे तर ते जरतरच्या भाषेत बोलतांना दिसतात. जवानांचं बलिदान व्यर्थ न जावो, इतकंच! :-( -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/15/2019 - 09:17 नवीन
डोवालांचा मुलगा ब्रिटिश नागरिक आहे म्हणे , तुम्हाला भेटतो का कधी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 18:41 नवीन
आणि त्याचा बी़झिनेस पार्टनर पाकिस्तानी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प गुरुवार, 02/14/2019 - 17:59 नवीन
अवघड आहे !! खूपच वाइट घटना घडली आहे , अतेरिकी च्या भेकड हल्ल्यात मरण यावे हे सैनिकांसाठी दुर्दैवी असते . सुरजेवाला ने यात सुद्धा राजकारण सुरु केले आहे . " या दुर्दैवी क्षणी काँग्रेस पक्ष सैनिकां बरोबर , भाजप च्या पाठी उभा आहे असे " जर म्हणाले असते तर काँग्रेस ची उंची नक्कीच वाढली असती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ब
बाप्पू गुरुवार, 02/14/2019 - 18:09 नवीन
खूप दुःखद घटना. सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली. हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद नावाच्या शांतता प्रेमी लोकांच्या संघटनेने घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ड
डँबिस००७ Fri, 02/15/2019 - 07:29 नवीन
खूप दुःखद घटना. सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली Terrorism has no religion हे परत एकदा सिद्ध झाले !! कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने दिलेली प्रतिक्रिया त्यांची सडलेली मानसिकता दाखवते !! पाकिस्तान टिव्ही वर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी अश्या घटनेची पुनरावृृृत्ती व्हावी अशी कामना करताना आढळले !!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/15/2019 - 11:28 नवीन
Terrorism has no religion हे परत एकदा सिद्ध झाले !! हे वाक्य जोपर्यंत भुतलावर आहे आणि यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत तोवर असेच हल्ले होत राहणार. बाकी चालुद्या... !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जेसीना Fri, 02/15/2019 - 11:57 नवीन
एक काम करायला पाहिजे ... जेव्हडे आतंकवादी मरतात ना , मेलेल्यास डुकराबरोबर गाडायला पाहिजे ... मग समजेल Terrorism has no religion हे किती खरा ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
स
सुबोध खरे Fri, 02/15/2019 - 15:02 नवीन
नाही त्यांना डुकराच्या चरबीवर जाळायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेसीना
ड
डँबिस००७ Fri, 02/15/2019 - 12:37 नवीन
पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे ! पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 02/15/2019 - 12:37 नवीन
पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे ! पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 02/15/2019 - 13:11 नवीन
या सैनिकां ऐवजी 40 दगड फेकणारे मारले गेले असते तर अवार्ड वापसी , वामपंथी , पुरोगामी , मानवाधिकार , नासिररूद्दीन , आमिर खान असेच गप्प बसले असते का ? ट्विटर वर मृत्यु पावलेल्या सैनिकांची लिस्ट पाहुन पाकिस्तानी मुस्लिम नां उकळ्या फुटल्या आहेत , कारण त्यात एक ही मुस्लिम नाहीये !!!!!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/15/2019 - 14:03 नवीन
की खोटे बोल , रेटू(कू)न बोल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Fri, 02/15/2019 - 17:54 नवीन
मृत्यु पावलेल्या सैनिकां बद्दल सांत्वनापर दोन शब्द लिहले असते तर तुझी बोटे झिजली असती का रे ? !!! मी पाकिस्तानी नां आनंद झाला असे म्हणालो तर त्या डूक्कर पाकिस्तान बद्दल तू का प्रेम व्यक्त करतोस ? त्यांच्याशी तुझे काही नाते संबध आहेत का ? काल तो सुरजेवाला पत्रकार परिषदेत दुःख व्यक्त करायचे सोडून भाजप वर हल्ला करत होता त्या सुरजेवाला च्या गैंग मध्ये आहेस का तू ? त्याची आणि तुझी वैचारिक पातळी सारखी च वाटतेय रे !!!!! कालच्या हल्ल्याने झालेला आनंद तू लपवू न शकल्या मुळे मिपावरिल एका देशद्रोही ची खात्री पटली !!! सर्व जातिधर्मातील नागरिक भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ एकत्र आलेले असतना आज अलीगढ़ यूनिवर्सिटी मधील एका देशद्रोही ने अज़हर मसूद चे अभिनंदन केले . त्याच प्रमाणे तू फक्त मिपावर अजहर मसूद चे अभिनंदन करून दाखव !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
विशुमित Fri, 02/15/2019 - 18:24 नवीन
तात्या शांत व्हा! शांत व्हा! भावनांना आवर घाला. सगळेच जवानांच्या परिवाराच्या दुखामधे सामील आहेत. देशभक्ती हा फक्त भाजपचाच ट्रेड मार्क नाही आहे. === अफवा अणि जातीय तेढ निर्माण होईन असे काही करायच टाळा. स्वत बरोबर संपादक मंडळी अणि मिपाला देखील गोत्यात आणाल. पोलीस आंतरिक सलोखा राखावा/ रहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. कृपया त्यांना सहकार्य करा. आवरा स्वतला. डोळे पुसा. रडायचं नाही आता आपल्याला लढायच आहे. === संपादक मंडळ आम्ही तर करत आहोतच कृपया तुम्ही देखील ट्रंप यांचे सांत्वन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Fri, 02/15/2019 - 18:43 नवीन
कशाला उगिचच संपादकनां तरास देताय !! त्ये कुठल्या बी इशयावर तिर्कच बॉलतय , म्हणून जरा डॉस्क तापल व्हत . त्ये तेवढ पुलिसांच बघा बरका , रागाच्या भरात बोलून ग्येलो म्या बी पण आता जरा कन्ट्रोल करिन . आम्ही क़ाय तुमच्या शब्दाबाहेर न्हाय , न्हाय तर काय व्हायच की तुमचे आयटी सेल वाले लागायचे माग !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/17/2019 - 03:18 नवीन
https://m.hindustantimes.com/india/pak-is-our-brother-government-must-work-to-improve-ties-rss/story-2alDDREVrfXyBj0ID2UDIN.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/17/2019 - 03:42 नवीन
त्या अझर मसूदला बाजपेयीं , अडवाणी अन डोवालने सोडले ना ? आणि अभिनन्दन मला करायला सांगतोस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 02/17/2019 - 06:00 नवीन
त्या गतकाळातील अजहर ला सोडलेल्या घटने बद्दल आज पर्यंत काँग्रेस ने वाजपेयीनां दोषी धरलेले नाही !!! मग तू का तुझी अक्कल पाजळत आहेस ? पुलवामा च्या घटने चे गांभीर्य जांणवण्या इतपत सुद्धा संवेदनशीलता नाही का तुझ्याकडे ? पुलवामा च्या दुर्दैवी घटनेत सवेंदनशीलता न दाखवणारेच आत गेले आहेत आणि या दुर्दैवी घटने च्या वेळी सुद्धा तुझे विखारी विचार मांडत आहे म्हणून ' अजहर चे समर्थन करून दाखव ' बोललो होतो . पुलवामा घटनेवरुन खालच्या पातळीवर येवून विचार व्यक्त करणाऱ्या तुझ्या सारख्या उलटया कलिजा चा निषेध करण्याचे सोडून '' मिपा संपादका नां त्रास होईल ना !!! संपादक तुम्हीच यांना समजवा " असे बोलणारे महाभाग इथे आहेत याचे आश्चर्य वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
विशुमित Sun, 02/17/2019 - 06:20 नवीन
अहो मोदी, संरक्षण मंत्री ( कोण आहेत आता??), दोवल, रॉ अणि संबंधित सरकारी एजेन्सीज़ची बेजबाबदारी कशी झाकता येईल फक्त यासाठीच तुमचा आटापिटा चालू आहे, हे आता लपता लपवू शकत नाही आहात. घटना कशी रोखू शकली गेली असती याबाबत चर्चा अपेक्षित होती. === बाकी संपादक मंडळाने योग्य वेळी तुमचे कान टोचले आहेत. पण आपण थोडीच सुधारणार आहात. असो...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 02/17/2019 - 07:17 नवीन
ठिक आहे !! बर झाले विषय तुम्हीच काढला आहे !!! तर कसाब टीम ने मुंबई त केलेल्या हल्ल्यात सामान्य माणूस देशोधड़ीला लागला असताना बाईट देण्या साठी सतत कपड़े बदलण्याचे गांभीर्य पाळणारे गृहमंत्री आणि ' ऐसी छोटी ! छोटी ! बातें होती रहती है ' वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री च्या कार्यकर्त्या ने जबाबदारी निश्चिती ची अटापीटा बेजबाबदार काळ्यामावु च्या बरोबर करावा ? हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार. ' पुढील हल्ले कसे रोखता येतील ' या विषयावर तुम्ही तुमचे अगाध विचार तुमच्या नेत्यांसामोर का नाही मांडले ? काँग्रेस च्या काळात इतके दहशतवादी हल्ले झाले नसते ! ======================= बाकी संपादकानीं तुमचे कान कित्तेक वेळा कातरले पण तुमच्या वागण्यात सुधारना झालेली नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 02/17/2019 - 08:38 नवीन
1.ठिक आहे !! ==)) धन्यवाद कोणासाठी एवढा आटापिटा चालू आहे मान्य तरी केले. 2. ऐसी छोटी ! छोटी ! बातें होती रहती है ' वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री च्या कार्यकर्त्या ने ==)) हिंदीभाषा बोलण्याची सवय नसल्या कारणाने ती 'Slip of the tongue ' होती, हे कोणीही सुज्ञ माणूस सांगू शकेल. कार्यकर्ता?? आम्ही भक्त ही नाही अन् कार्यकर्ते ही नाही आहोत. आमचा प्रपंच चांगला चालू आहे. 3. हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार. ==)) वाक्य रचनेचे प्रयोजन नाही समजले. 4. पुढील हल्ले कसे रोखता येतील ' या विषयावर तुम्ही तुमचे अगाध विचार तुमच्या नेत्यांसामोर का नाही मांडले ? ==)) हे काम माझे नाही ना. ज्यांचे आहे ते राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सर्वपक्षीय बैठक सोडून उद्घाटनं करायला झोला घेऊन फिरत आहेत. 5. बाकी संपादकानीं तुमचे कान कित्तेक वेळा कातरले पण तुमच्या वागण्यात सुधारना झालेली नाही ==)) त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. सुधारणा ही continuous process आहे. असो...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 06:42 नवीन
मोगा खान अर्धवट माहिती प्रसारित करून दिशाभूल करणे हि सवय सोडून द्या आता १८७ लोकांच्या (१७३ प्रवासी अधिक १५ विमान कर्मचारी-- त्यापैकी एका प्रवाश्याला त्यांनी विमानातच ठार मारले तो सोडून) जीवाचा प्रश्न होता. त्या प्रवाश्यात जर "आपले नातेवाईक" असते तर जर मसूदला सोडूच नका असे आपण म्हणाला असता का? अपहरणात सामील असलेले १० पैकी ७ लोक पळून गेले परंतु तीन लोकांना पकडून जन्मठेप दिलेली आहे हे आपल्यास माहिती आहे का? जिथे तिथे पच पच करण्याची सवय सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
अ
अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 08:49 नवीन
मोसाद सारखे ओप्रेशन करायला काय हरकत होती? आपल्या जवानांवर विश्वास नव्हता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 15:36 नवीन
मोसाद सारखे ओप्रेशन करायला काय हरकत होती? आपल्या जवानांवर विश्वास नव्हता? आपली बालबुद्धी आहे कि आपल्याला खरंच हे सोपं आहे असं वाटतंय? एकदा श्री बोका ए आझम यांची मोसाद हि मालिका वाचून घ्या. https://www.history.com/this-day-in-history/hostage-rescue-mission-ends-in-disaster https://en.wikipedia.org/wiki/2011_Afghanistan_Boeing_Chinook_shootdown इस्रायली राजकारणी आणि भारतीय राजकारणी यात किती फरक आहे ते एकदा वाचून पहा. https://www.dailyo.in/politics/morarji-desai-kargil-war-pervez-musharraf-pakistan-raw-kahuta-nuclear-warfare/story/1/3802.html https://www.indiatvnews.com/news/india/know-how-morarji-desai-botched-up-raw-s-most-daring-plan-operat-31481.html/page/6
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
अ
अर्वाच्य गुरुवार, 02/21/2019 - 10:38 नवीन
कंदाहारच्या वेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान वाजपेयीच होते ना? कबूल करा त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांच्यात कुवत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
स
सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 15:09 नवीन
तुमची आमची काय लायकी आहे त्यांची कुवत काढायची? पोखरण २ चा निर्णय त्यांचाच होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
आ
आजानुकर्ण Fri, 02/15/2019 - 15:45 नवीन
अरे हलकट माणसा, इथे यादी बघ. https://www.indiatoday.in/india/story/pulwama-terror-attack-complete-list-martyred-crpf-jawans-1456836-2019-02-15 नाहीतर तिकडे काश्मीरमध्ये जा आणि सैनिकांच्या चड्ड्या काढून तपास. पण तुझी गटारगंगा किमान आज बंद ठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
श
शब्दबम्बाळ Fri, 02/15/2019 - 16:43 नवीन
अरे सुशिक्षित अडाण्या, तुझ्यासारख्या ट्रोल्सनी मिपाची पार पातळी खाली आणून ठेवलीये. आता असल्या धाग्यावर यावंसं पण वाटत नाही. किती नीचपणा कराल, बॉलीवूड मधल्या बहुतेक जणांनी निषेध केला आहे हल्ल्याचा... याविषयावर तरी घाण करू नका! असले लोक तिकडे फेबुवर "प्रियांका गांधी शहिदांच्या मृत्युवरती हसली" अश्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. किती खाली जाल अजून? भडकून प्रतिक्रिया देऊन काही उपयोग होणार नाहीये. एक व्हिडीओ देत आहे सगळे मुद्दे पटतील/नाही पटतील पण निदान विचार तरी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
C
Chandu Fri, 02/15/2019 - 14:26 नवीन
भारतिय सैन्यात सैनिकाना धर्म नसतो.हुतात्मा झालेल्या सैनिकांचा धर्म काढून कृपया चर्चा भलतीकडे वळवू नका.ही कळकळीची विनन्ती.
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Fri, 02/15/2019 - 18:49 नवीन
महत्वाची सूचना :

आपला देश सद्या एका कठीण भावनिक पर्वातून जात आहे. सर्वच भारतियांचा भावनावेग अनावर झालेला आहे. या परिक्षेच्या घडीला, सर्व मिपाकरानी, आपापल्या मत-मतांतरांना बाजूला ठेवून, भारताच्या शत्रूविरुद्धची आपली एकजूट डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या लिखाणावर ताबा ठेवणेच योग्य होईल. आपल्या मत-मतांतरांवर आधारीत वादविवाद करण्याचा आपला लोकशाही हक्क गाजविण्यासाठी हा काळ योग्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.

अन्यथा, भारताच्या शत्रूंचा, भारतियांमध्ये फूट पाडण्याचा उद्येश, यशस्वी करण्यात हातभार लावल्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 02/16/2019 - 03:24 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ
न
नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 18:53 नवीन
राजकारण म्हणून नाही; पण बीजेपी समर्थकांची पातळी सगळ्यांनी पाहिली आहेच. शिवाय मुंबईत सनातनच्या कार्यकर्त्यांकडे व भाजपच्या नगरसेवकाकडे शस्त्रे सापडली आहेत. कृपया सर्वांनी काळजी घ्या. (संपादित) निवडणुका संपेपर्यंत कोणत्याही द्वेषजनक बातमीवर विश्वास ठेवू नये हे आपापल्या सामाजिक वर्तुळात जास्तीत जास्त लोकांना सांगायला हवे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा