Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
काथ्याकुट
चर्चा
राजकारण
अर्थसंकल्प

प्रतिक्रिया द्या
542105 वाचन

💬 प्रतिसाद (783)
ड
डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 17:01 नवीन
तुमचा लाल किल्ला आमच्या भारतातच बांधलाना ? हवा असेल तर घेउन जा परत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/24/2019 - 18:29 नवीन
असे कसे , लाल किल्ला तुमचाही आहेच की , बांधणारे राजपुतांचे जावई ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/24/2019 - 15:45 नवीन
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. त्यामध्ये आरपीआयला स्थान देण्यात आले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपा युतीला दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेने दक्षिण तर भाजपने ईशान्य मुंबई जागेचा त्याग करावा, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी बोलताना केली. आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपची युती झाली आहे. ती समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. पण आगामी निवडणुकीत आरपीआयला सोडून जागा जिंकणे अशक्य आहे. कारण आजअखेर आरपीआयच्या मदतीमुळे सेना भाजपाच्या जागा निवडून आल्या आहेत, हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे. तसेच आमच्या विषयी कट करास्थान चालू आहे, असंही आठवले म्हणाले.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 02/24/2019 - 15:54 नवीन
आमच्याविषयी चालुय कटकारस्थान आमच्याविषयी चालुय कट कारस्थान... . एकही जागा मिळाली नाही तर बंद पाडू पाकिस्तान . जागा नाही दिली तर कळू वेगळा विचार जागा नाही दिली तर कळू वेगळा विचार. . कारण माझ्या मागे आहेत कार्यकर्ते फक्त चार.. . मा. रामदास आठवलेंना लढवायला जागा मिळालीच पाहिजे. शिवराय भीमराय शिवाय उपाय नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
विशुमित Sun, 02/24/2019 - 17:38 नवीन
खंडेराया झाली माझी दैना, तिच्या वाचुन जीव माझा रहिणा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 17:10 नवीन
रामदास आठवले ह्यांच्या पक्षाबद्दल काळजी करण सोडा आणी उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जुनी म्हणुन भ्रम असलेल्या भ्रष्ट कॉंग्रेसला एकही सिट महागठबंधनने सोडलेली नाही ते बघा !! हळुहळु मोघलासारखीच नामशेष होउन जाईल कॉंग्रेस !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/24/2019 - 18:20 नवीन
मोघल की पेशवे ? मोगलाई 1857 ला सम्प्ली आणि पेशवाई 1818 ला ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Sun, 02/24/2019 - 18:48 नवीन
मोघलाई संपल्याच दुःख तुम्ही उराशी बाळगुन आहात ना म्हणुन मोघलाई ! शेवटी कॉंग्रेसची जुलमी राजवटीच तुलना ही मोघलाई सारख्या धर्मद्वेष्ट्या जुलमी राजवटी बरोबरच करता येईल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रेड मार्क Sun, 02/24/2019 - 19:28 नवीन
कोलकातामधील गौरव दत्त या निवृत्त IPS अधिकाऱ्याने मनगटाची नास कापून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये सरळसरळ ममता बॅनर्जी यांचे नाव लिहून म्हणले आहे की त्यांच्या मृत्यूला ममता बॅनर्जीना जबाबदार धरले जावे. ममतांनी गौरव दत्त यांना १० वर्ष त्रास दिला, २ खोट्या केस मध्ये गुंतवले आणि नंतर ७२ लाखांचे निवृत्तीवेतन अडकवून ठेवले. यावर कुठल्या पुरोगाम्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये, ना कोणी प्लॅकार्ड घेऊन व्हिडीओ व्हायरल केला ना ध्रुव राठी, विनोद दुआ, सागरिका, राजदीप वगैरे पत्रकारांनी कुठला निषेध केला. फेब्रुवारी १९ ला आत्महत्या केली त्याची बातमी इंडिया टुडे मध्ये फेब्रुवारी २३ ला आली. तर टाइम्स ऑफ इंडियाने २० ला "IPS Officer passess away" अशी बातमी दिली. हेच रोहित वेमुलाची आत्महत्या आठवत असेल तर त्याने चिठ्ठीत "माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये" असं लिहूनही स्मृती इराणी आणि मोदींनी प्रत्यक्ष स्वतः रोहित वेमुलाला फाशी घ्यायला लावली असा आरडाओरडा किती महिने चालला.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/25/2019 - 02:02 नवीन
दुःखद घटना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डँबिस००७ Mon, 02/25/2019 - 14:58 नवीन
Modi inagurated National War Memorial !! कित्येक दशकांची नॅशनल वॉर मेमोरियलची मागणी अखेर पुर्ण !! गेल्या ६५ वर्षांत नेहरु गांधी चे मेमोरिअल देशात सर्वत्र बनवले गेले ! विमानतळापासुन वाचनालया पर्यंत सर्व वास्तुना नाव फक्त गांधी परिवारातल्या सदस्यांच किंवा नेहरुच दिल गेल !! श्री मोदीजींच्या अटल निश्चया मुळे जागतीक स्तरावरच अत्याधुनिक नॅशनल वॉर मेमोरिअल आज दिल्लीत साकार झाल!! PM inaugurates National War Memorial, slams previous govts for putting family first
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 02/25/2019 - 15:26 नवीन
गांधी परिवार होता म्हणून भारताचा विकास झाला , नाहीतर बसले असते अजुन जंगलातील कंदमुळे खात !!! त्यामुळे त्यांचा इतके वर्षे देशाची निरपेक्ष सेवा केल्यावर त्यांचा हक्कच बनतो !!! या देशसेवी , देशप्रेमी कुटुंबावर भ्रष्टाचार चे आरोप करून भाजप सत्तेवर आली पण आता पर्यंन्त एक तरी गुन्हा सिद्ध झाला आहे का ? मग कशाला उगीचच बदनामी केली त्यांची ? इथ महाराष्ट्रात पण तसेच सारख त्या दादा ला ढोस !!! काढू का फाइल ? काढू का फाइल ? अस करीत करित 5 वर्ष बिचाऱ्या दादाला तालुक्यात जेरबंद करून टाकल ! आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येक शासकिय वस्तु , पुल , विमानतळ , अवार्ड्स ला महान परिवारचे नाव नाही द्यायचे मग क़ाय अंबेडकर , बोस , पटेल , पवार , आठवले , राणे यांची नावे द्यायची ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 02/25/2019 - 15:27 नवीन
उलटी गिनती अपराध क्रमांक 99 = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
M
mayu4u Tue, 02/26/2019 - 05:44 नवीन
भारताचा पाकवर एअर स्ट्राइक, 'जैश'च्या तळावर फेकला हजार किलोचा बॉम्ब. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pakistan-claims-indian-aircraft-crossed-over-into-pok-dropped-payload-1847763/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 06:09 नवीन
हल्ल्यासाठी बारा विमाने गेली होती यातील चार विमाने जर प्रतिहल्ल्यापासून संरक्षण (escort/CLOSE SUPPORT) म्हणून गेलीअसे गृहीत धरले तर उरलेली ८ विमाने बॉम्ब घेऊन गेली असावी. या विमानांची एकंदर १०,००० किलो अतिरिक्त वजनाची शस्त्रे/ अस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता आहे. म्हणजे प्रत्येक विमानाने साधारण १००० किलो (खरं तर २००० पौंडाचा) एक बॉम्ब नव्हे तर कमीत कमी ७-८ बॉम्ब तरी टाकले असतील म्हणजे हे साधारण ५०-६० बॉम्ब तरी टाकले गेले असतील ( हा माझा अंदाज आहे) हा PGM २००० (PRECISION GUIDED MUNITION) म्हणजे अचूक मारा करणारा लेसर गाईडेड बॉम्ब आहे. अधिक माहितीसाठी https://defence.pk/pdf/threads/laser-guided-bombs.107870/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
स
सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 06:12 नवीन
india-to-produce-precision-guided-munitions-domestically https://www.defensenews.com/global/asia-pacific/2016/04/25/india-to-produce-precision-guided-munitions-domestically/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 06:20 नवीन
https://www.youtube.com/watch?v=z6u-4cL1Czs लेसर बॉम्बची अचूकता दाखवणारा व्हीडीओ आहे. यात मिराज २००० आणि सुखोई ३० दोन्ही विमाने मारा करताना दाखवली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 06:25 नवीन
चकोठी मुझफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहेत पण बालाकोट हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये नसून पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आहे. म्हणजे घरात घुसून मारल्याचा दावा खरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. Tue, 02/26/2019 - 07:02 नवीन
च्यायला ह्या पाकिस्तान मिडीयाच्या दलिंदरीचा नमुना. काय सांगायचं तेही सांगता येत नाही. अशीच कंडीशन करुन ठेवली पाहिजे त्या इम्रान आणि त्याच्या मिडीयाची. जन्मदरिद्री, कर्मदरिद्री, अष्टदरिद्री पाकिस्तानला असंच तोंड दाबून पिसाळल्या कुत्र्यागत हाणलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/26/2019 - 07:27 नवीन
अरे! आज इथे नेहमीच्या मापात पोस्टी नाहीत?
  • Log in or register to post comments
य
यश राज Tue, 02/26/2019 - 07:41 नवीन
हेच म्हणायचे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शाम भागवत Tue, 02/26/2019 - 07:44 नवीन
आज नेहमीच्या पोस्टींना सुट्टी. आज सगळ्यांनाच सैन्यदलाचा अभिमान वाटत असणार. मिपाकरांच्या भारतावरच्या प्रेमाची मला बिलकूल शंका नाही. फक्त कोणत्या मार्गाने भारताचे भले करावे याबाबत मतभिन्नता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
माहितगार Tue, 02/26/2019 - 07:45 नवीन
बर्‍याच जणांना बातमी कळण्यास वेळ लागला असणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
M
mayu4u Tue, 02/26/2019 - 07:49 नवीन
विरोधकांची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विशुमित Tue, 02/26/2019 - 08:26 नवीन
सैन्याच्या पराक्रमाचा राजकीय फायदा घेवून द्यायचा नाही, असा त्यांचा होरा असावा. पण इथे विरोधक म्हणजे नक्की कोण, हे क्लियर नाही झाले माझे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
भ
भंकस बाबा Tue, 02/26/2019 - 16:41 नवीन
तुम्हाला इकडचे तंगड़ी ओढणारे माहित नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Tue, 02/26/2019 - 16:45 नवीन
साध्या-सोप्या गोष्टी पण काही जणांना नाही कळत. काँग्रेस चं अध्यक्षपद मिळू शकेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
य
यश राज Tue, 02/26/2019 - 07:39 नवीन
भारत सरकार, भारतीय वायुसेना व तमाम भारतीय जनतेचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 02/26/2019 - 08:21 नवीन
गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सरकारकडून मागणार्‍या सर्व विरोधकांनी, आज सरकारचे अभिनंदन न करता फक्त वायुसेनेच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. --
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/26/2019 - 08:31 नवीन
भावकी उण्याची वाटेकरी, अन् दुसरं काय !! असेच असते. जाऊ ध्या, आपण सगळ्यांनी सगळ्यांच अभिनंदन करू. काय म्हणताय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ट
ट्रम्प Tue, 02/26/2019 - 11:30 नवीन
चालतय की !!! भाजप च्या टांगा ओढ़त बसण्याची ही वेळ नाही आणि वायुसेना चे अभिनंदन करण्या इतपत शाहणपण युवराज मध्ये आलय हे कमी नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ट
ट्रेड मार्क Tue, 02/26/2019 - 22:32 नवीन
युवराज आणि इतर सगळेच विरोधक अजून धक्क्यातून सावरायचे आहेत. एकदा सावरले की मग विरोधकांच्या खऱ्या प्रतिक्रिया येऊ लागतील, उदा. - - पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे हा हल्ला अयशस्वी झाला आहे. - किती अतिरेकी मेले याचा काहीच पुरावा नाही. एकदा ० पासून ते ३०० पर्यंत काहीही सांगितला जातोय, यावर कसा विश्वास ठेवायचा? - यात मोदींनी काहीच केलं नाही. - हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला. - मोदी या हल्ल्याचा राजनैतिक फायद्यासाठी वापर करणार/ करत आहेत. - आमच्या काळातही आम्ही असे अनेक हल्ले घडवून आणले, पण आम्ही जाहिरात नाही केली. यातले काही हल्ले एवढे गुपचूप केले की सैन्याला सुद्धा कळले नाहीत. - LoC असे उल्लंघन करणे हे एखाद्या देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे, इम्रान खानने बोलून प्रश्न सोडवू अशी साद घालूनही लगेच हा हल्ला करण्याचे कारण काय? - हल्ला झाला तेव्हा मोदी आपल्या XX लाखांच्या किंग साईझ बेड वर एसी चे तापमान १८ करून काश्मिरी रजई घेऊन घोरत होते. - १३ दिवस थांबण्याचं काय कारण होतं? या दिवसात सगळ्या विरोधकांनी आणि जनतेने दबाव आणला म्हणून मोदींना काहीतरी कारवाई करायला लागली. पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे मुद्दामून फार नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. - हल्ला करणे ठीक आहे पण त्यानंतर होत असलेला जास्तीचा राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. यातून अल्पसंख्याकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि तो त्यांना अतिरेकी बनण्यास प्रवृत्त करू शकतो. - आणि शेवटची पण खतरनाक: निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून मोदी, शहा, डोवाल, आरएसएस यांनी मुद्दामून पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आता जंगलात बॉम्ब टाकून अतिरेकी तळ उध्वस्त केले म्हणून खोटा प्रचार करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
त
तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 10:47 नवीन
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन. भारताचे नेतृत्व आणि मागच्या नेतृत्वाने करून ठेवलेल्या चांगल्या गोष्टींसाठी अभिनंदन !
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 02/26/2019 - 13:08 नवीन
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन. भारताचे नेतृत्त्वाचे अभिनंदन ! उरीच्या , पुलवामाच्या वेळेला काही लोकांनी डायरेक्ट अजित डोव्हाल, पंत प्रधान यांच्या बद्दलच प्रश्न प्रस्थापित केलेले की ते असताना असे हल्ले कसे काय होतात ? त्या सर्वांना आता उत्तर मिळाले असेल !! पलिकडे मायबोलीवर सदा न कदा भाजपा, आर एस एस, मोदी विरुद्द दर दिवशी पान अन पान लिहीणारे हात आज फ्रोजन झालेले आहेत. अड्यावर आज आता पर्यंत एक ओळ सुद्धा उमटलेली नाही ! ;-)
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 13:24 नवीन
थोडा धीर धरा. मायबोली काय किंवा मिपा काय, सगळीकडे आडवी जाणारी काळी मांजरे आहेतच.चार आठ दिवस जाऊ द्या, मग कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे Tue, 02/26/2019 - 14:27 नवीन
पडद्यामागचे कलाकार -- आज भारतीय वायू सेनेच्या वैमानिकांच्या कौतुक होत असताना वैमानिकांच्या नेतृत्वाबद्दल कोणतीही शंका न बाळगता त्यांच्या बरोबर त्यांचे हात बळकट करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांबद्दल पण आपण कृतज्ञ राहीले पाहिजे. १) गुप्तचर यंत्रणा-- पुलवामाचा हल्ला झालाच कसा? गुप्तचर यंत्रणा काय झोपल्या होत्या? हे उच्चरवाने विचारणाऱ्या आरामखुर्चीत विचारवंतांनि हे समजून घेतले पाहिजे कि आज झालेल्या हल्ल्यातील( तसेच उडी जवळ झालेल्या हल्ल्यातील) दहशतवाद्यांच्या तळाची अचूक माहिती हि लष्कराला पुरवण्याचे काम याच यंत्रणेने केलेले आहे. या माहितीवरच या हल्ल्याची तयारी आणि प्रत्यक्ष कार्यवाही करता आली. २) आकाशातील तिसरा नेत्र पुरवण्याचे काम करणारे इसरो चे आणि इतर अनेक सरकारी यंत्रणांचे शास्त्रज्ञ. यांनी निर्मिती केलेल्या उपग्रहातून मिळणाऱ्या माहिती नुसार आणि त्यांनी पुरवलेल्या संदेश वहनप्रणालीमुळे वायुदलाच्या काम सोपे झाले. https://en.wikipedia.org/wiki/RISAT-2 https://www.indiatoday.in/science/story/isro-launches-communication-satellite-gsat-7a-1412861-2018-12-19 वायुदलाच्या वैमानिकांबरोबर अशा अनेक पडद्या मागच्या कलाकारांना मनापासून मानाचा मुजरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
य
यश राज Tue, 02/26/2019 - 14:58 नवीन
वायुदलाच्या वैमानिकांबरोबर अशा अनेक पडद्या मागच्या कलाकारांना मनापासून मानाचा मुजरा
+++++१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रेड मार्क Tue, 02/26/2019 - 22:10 नवीन
निर्णय घेणाऱ्यांपासून ते प्रत्यक्ष कारवाई करणारे तसेच त्यांना पडद्याआडून साथ देणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा. आज असल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्यांना खरी श्रद्धांजली वाहिली गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डँबिस००७ Tue, 02/26/2019 - 14:38 नवीन
How's the JOSH ? High Sir !!! How's the Jaish !! Dead Sir !!
  • Log in or register to post comments
C
Chandu Tue, 02/26/2019 - 14:52 नवीन
ये तो सीर्फ झाकी है
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 15:47 नवीन
चीनची काही प्रतिक्रिया ? चीनचीच जास्त भीती आहे खरं तर. राहून राहून असं वाटतंय की जर्जर झालेल्या पाकिस्तानला उचकावुन आणि मोक्याच्या क्षणाला त्यांची साथ सोडून देऊन चीन योग्य क्षणांची वाट पाहील आणि पाकिस्तानचा खऱ्या अर्थाने घास घेईल.आपल्या हातात फारसे काही पडणार नाही.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 02/26/2019 - 17:31 नवीन
माहित नाही भविष्यात पाकिस्तान क़ाय प्रत्युत्तर देईल , पण पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणाऱ्या सगळ्या रथी महारथी नां हादरा नक्की बसला आहे . कित्तेक जण अजूण त्या धकक्यातून सावरले नसल्या मुळे मीडिया ला चुकवत आहेत
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 02/26/2019 - 17:41 नवीन
सर्जिकल स्ट्राईक २ च्या मागे २०० तासाची प्लॅनिंग होती !! वेगवेगळ्या विमानतळावरुन एकाच वेळेला अनेक फायटर प्लेन्सनी आकाशात झेप घेतली !! ही विमाने वेगवेगळ्या दिशेने गेली त्यामुळे पाकिस्तानात रडारवर नजर ठेउन असलेल्या डिफेंस टिमला लक्षात येण्याच्या आत १२ मिराज विमानांनी आपल फॉर्मेशन बनवल आणि LOC जवळ पोहोचले ! भारताच्या ह्या विमानांनी आपली जवाबदारी पुर्ण करुन परत असताना पाकिस्तानच्या F-16 नी वाट अडवायचा प्रयत्न केला पण १२ मिराज विमानांचा ताफा बघितल्यावर F-16 परत गेले !!
  • Log in or register to post comments
स
स्वलेकर Tue, 02/26/2019 - 17:56 नवीन
मांजर गप्प का आहे?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 02/26/2019 - 19:08 नवीन
पेकाटात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वलेकर
इ
इरसाल Tue, 02/26/2019 - 23:12 नवीन
इथे काहि नमुने आहेत चांगल केल त्याला चांगल तर म्हणत नाहित वर नाक कापुन अवलक्षण करत आहेत दळभद्रि लेकाचे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/01/2019 - 14:05 नवीन
नगरीनिरंजन,
माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्‍या व्यक्तीची
द्वेषाचं राजकारण खेळायचंहोतं तर मोदींनी दंगली अवघ्या ७२ तासांत कशा काय आटोक्यात आणल्या? गुजरात दंगलींचा पूर्वेतिहास पाहता दंगली किमान आठवडाभर तरी चालायला हव्या होत्या ना? १९६९ च्या दंगली सप्टेंबर-ऑक्टोबर अशा चालू होत्या. १९८५ च्या दंगली तर चक्क ८ महिने (फेब्रुवारी ते ऑक्टोबर) चालू होत्या. पण ३ दिवसांत आटोक्यात आणणारे मोदी मात्र मुस्लिमद्वेष्टे! तुम्हाला काय वाटतं खरं सांगा, मोदी जर खरोखर मुस्लिमद्वेष्टे असते तर गुजरातच्या २६ च्या २६ लोकसभा जागा भाजपला कशा मिळाल्या असत्या? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 03/01/2019 - 15:32 नवीन
गा मा जी.. एकदम बरोबर.. सुप्रीम कोर्ट, SIT, CBI इ सर्वांनी पूर्ण चौकशी करून.. जरी मोदीजींना निर्दोष ठरवले असले तरी यांच्या डोक्यातून 2002 जाणार नाही. ज्या पद्धतशीर पणे मोदिंना विनाकारण बदनाम केले गेले आणि अजूनही करतायेत ते निश्चितच चिंताजनक आहे.. पण याउलट खांग्रेस चे जे जे मान्यवर आज जामिनावर फिरतायेत ते कोणतीही चौकशी होण्याआधीच *निर्दोष * असतात. आणि बरेच मान्यवर चौकशी न होता निर्दोष म्हणून मेले.. नंतर त्यांना भारतरत्न दिले गेले आणि गल्ली ते दिल्ली स्मारके बांधली गेली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नगरीनिरंजन Sat, 03/02/2019 - 01:25 नवीन
निर्दोष व निरागस ते आहेतच हो, पण प्रेते इकडून तिकडे नेणे गुन्हा नाहीय ना; त्यामुळे त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे. प्रेते अहमदाबादला नेली गेली ह्यात दुमत नाही. त्यात मोदी दोषी किंवा निर्दोष असण्याचा प्रश्न कुठे येतो? शिवाय त्यांनाही भारतरत्न मिळणारच आहे. थंड घ्या. द्वेषाचे राजकारण करायला स्वतः हिंसाचाराचे दोषी असावे लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ड
डँबिस००७ Sat, 03/02/2019 - 08:49 नवीन
शिवाय त्यांनाही भारतरत्न मिळणारच आहे फरक ईथेच आहे, भारताचा पहीला भारत रत्न नेहरुंना मिळालेला होता , नव्हे तो त्यांनी स्वतःच स्वतःला दिलेला होता. भारत रत्न पंत प्रधानांकडुन प्रस्तावित होत असतो. नेहरूंना भारत रत्न मिळताना ते स्वतःच भारताचे पहीले पंत प्रधान होते !! श्री मोदीजींना भारत रत्न मिळेलच, शंकाच नाही !! पण तो त्यांच्या पंत प्रधान पदी असताना नाही तर त्यांच्या नंतर येणार्या पंत प्रधानाला द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • «
  • ‹
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा