Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
काथ्याकुट
चर्चा
राजकारण
अर्थसंकल्प

प्रतिक्रिया द्या
542105 वाचन

💬 प्रतिसाद (783)
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 13:17 नवीन
बाजपेयींनी अतिरेक्यांला विमान दिले होते , त्यांना कुठून अटक करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रम्प Fri, 02/08/2019 - 13:31 नवीन
विमान अपहरण घटने मध्ये अतेरिकयाना विमानात बसवून सोडल्या बद्दल तुमचे काँग्रेस चे नेते सुद्धा प्रसंग गांभीर्य दाखवतात हो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Fri, 02/08/2019 - 14:53 नवीन
अतिरेकी तुमच्याच धर्माचे व लाडक्या पाकिस्तानातुन आलेले होते. जी कॉंग्रेस ब्रिटीशांना भारत सोडुन जायला आम्हीच मजबुर केल अश्या गमजा करत होत त्यांना ६५ वर्षांमध्ये पाकिस्तानला संपवता आल नाही , हे म्हणे अहिंसेचे पुजारी !! संधी मिळेल तिथे तोंड मारणारे भ्रष्ट बाजारु !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 15:14 नवीन
काँग्रेसची 65 , तर भाजपाचेही आता 10 वर्षे झाली, त्यांनी 1/6 प्रश्न तरी सम्पवला का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Fri, 02/08/2019 - 15:00 नवीन
लाल बहादुर शास्रीजीच्या मारेकर्यांना पहिल्यांदा अटक करा मग ईतरांच बोला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 15:15 नवीन
मोदी 5 वर्षे सत्तेत आहेत , सांगा त्यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
भ
भंकस बाबा Fri, 02/08/2019 - 17:36 नवीन
अकलेचा, एका विशिष्ट परिस्थितित वाजपेयी सरकारने विमान पुरवले होते. सुप्रीम कोर्टाने दिलेली फाशी जो अतिरेकी सिद्ध झाला होता त्यासाठी रात्रि कोर्ट उघडायची क़ाय अगतिकता होती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 18:02 नवीन
बरे झाले की , कोर्टाचा निकाल अर्धी रात्र लवकर लागला. कोर्ट दोन तीन महिने बसून सुट्टी घेते , एक रात्र केले काम , तर तितकेच 12 तास लवकर निकाल लागला, अन त्या वाचलेल्या बारा तासात अजून एखादी केस जरा पुढे सरकली असेल, काय वाईट झाले ? तुमचे ते हे , 70 तास काम करतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ड
डँबिस००७ Fri, 02/08/2019 - 13:21 नवीन
NDA चे खासदार टाळ्या वाजवत होते तर विरोधी पक्षाचे तोंडात बोट घालुन बसले होते ! विरोधी पक्ष नेता श्री मल्लिकार्जुन खर्गेंच्या तोंडातुन एक शब्द आला नाही !! देशाच्या संसदेत विरोधी पक्षाला सरकार विरुद्ध बोलायला तोंड उरलेल नाही. ज्यांना, ना काही माहिती, ना अधिकार, ते लोक सरकारने वाट लावली असा आरोप करत आहेत, कोणत्या आधारावर ? तुम्हाला वाटत म्हणुन ? मग विरोधी पक्ष काय करत आहे ? ह्यांच्या तोंडाला कोण आवरणार ?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/08/2019 - 15:06 नवीन
ज्यांना, ना काही माहिती, ना अधिकार, ते लोक सरकारने वाट लावली असा आरोप करत आहेत, कोणत्या आधारावर ? तुम्हाला वाटत म्हणुन ?
आमच्या हापिसात देखील काही व्यक्ती नेहमी हेच रडगाणे गात असतो कि सरकार चांगले नही.. वाट लावली . फालतू धंदे करत आहेत सरकारमधले लोक.. GST ने देशाची वाट लावली.. इ इ. एके दिवशी विचारले त्याला कि बाबा मग काँग्रेस चांगली का?? समजा पप्पू जी यांना पंप्र केले तर चालेल का? तर हो म्हणाला. पण पप्पू आल्यानंतर नेमके काय बदल अपेक्षित आहेत ते मात्र नाही सांगितले.. त्या व्यक्ती शांतता प्रिय धर्माचे पाईक आहेत. असे लोक माझ्या मते एकतर एका घराण्याचे मानसिक गुलाम आहेत किंवा काँग्रेस सत्तेत असल्यावर त्यांना एक प्रकारचा धार्मिक मॉरल सुपोर्ट मिळत असावा किंवा तसा भास होत असावा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे Fri, 02/08/2019 - 15:10 नवीन
एक जालावर फिरत असलेला विनोद माझ्यासमोर एक माणूस तावातावाने सांगत होता कि श्री मोदी चोर आहेत आणि श्री राहुल गांधी हेच आमचे खरे नेते मी त्याला म्हणालो परमेश्वर तुम्हाला श्री राहुल गांधी यांच्या सारखा मुलगा देवो आणि मला श्री मोदींसारखा. बघता बघता त्याची दातखिळी बसली ))=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 15:17 नवीन
मोदीसारखा जावई चालेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 02/08/2019 - 15:21 नवीन
चालेल कि जर देशासाठी इतका त्याग करणार असेल तर बायकोला सोडलं तर त्यात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
स
सुबोध खरे Fri, 02/08/2019 - 15:23 नवीन
हे मी स्वतःबद्दल( माझ्या मुलीबद्दल बोलतो आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 17:34 नवीन
(संपादित) विरुद्ध उरलेले 12 संसारी पंतप्रधान पीएसेम च्या माणसाकडून एक कोहार्ट स्टडी , चाय स्क्वेअर स्टडी की काय काय असते , ते एकदा करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रम्प Sat, 02/09/2019 - 00:44 नवीन
तुमच्या विनोदवीर चा लग्ना चा प्रश्न अगोदर सोड़वायला सांगा म्हणजे गांधी कुटुंबा ने स्वकष्टाने कमवलेल्या हजारो कोटि ला वारसदार मिळेल !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Sat, 02/09/2019 - 14:30 नवीन
उरलेले 12 संसारी पंतप्रधान हा हा हा !! संसारी पंत प्रधान ?? दुसर्याच्या बायकोला प्रेम पत्र लिहीणारे हुच्च नितीमत्ता असलेले पहीले पंत प्रधान ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 05:18 नवीन
खूपच बालिश बोलणे आहे तुमचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:37 नवीन
एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले? १. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक 'मॉब लिंचिंग' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला. २. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात 'डोंगर पोखरून उंदीर' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:38 नवीन
३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो 'चुनावी जुमला' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या. ४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:40 नवीन
५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका 'लो बॅलन्स ' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. 'ना खाऊंगा , ना खाणे दूंगा' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले. ६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:41 नवीन
७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. रामाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला 'प्लास्टिक सर्जरी' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले. ८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 16:14 नवीन
रामाला ऐवजी हनुमानाला असे वाचावे .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:42 नवीन
९. 'स्मार्ट सिटी' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर 'स्मार्ट सिटी' म्हणून उदयास आलेले नाही. १०. 'स्वछ भारत' योजना चालू केली, हातात झाडू घेऊन छायाचित्रे काढून घेतली, प्रसार माध्यमात झळकले, नंतर हि योजना कुठे गायब झाली कोणालाच कळाले नाही. लोखों - कोटी (खोटे आकडे) संडास बांधल्याचे नाटक केले गेले, प्रत्यक्षात योजनेचे तीन-तेरा वाजले. गावेच्या गावे हागणदारी मुक्त केल्याचे जाहीर केले, मीडियाने त्या गावांना भेट दिल्यावर सरकारचे पितळ उघडे पडले. गंगा साफ करण्यासाठी केंद्रात स्वतंत्र खाते तयार करण्यात आले, कोटी-कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले मात्र गंगेची अवस्था 'जैसे थे' च राहिली.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:43 नवीन
११. 'स्टार्ट अप' इंडिया, 'मेक इन इंडिया', 'स्किल इंडिया' या योजनांची पुरती वाट लागलेली आहे, त्या फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. एवढी गावांत वीज पोहोचली तेवढ्या गावांत वीज पोहोचली अशा आरोळ्या ऐकण्यात आल्या तथापि प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे सिद्ध झाले. १२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:44 नवीन
१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे. १४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 15:46 नवीन
१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? एच ए एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. होऊ द्या ना एकदा 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!.................................
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 02/08/2019 - 16:00 नवीन
पुढच्या वेळेस उचलेगिरी करुन छोटे छोटे टाका म्हणजे लोक वाचतील तरी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
व
व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 16:08 नवीन
उचल्या अर्थात उचलेगिरी करणारा ट्रम्प आहे, मी नव्हे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sat, 02/09/2019 - 00:38 नवीन
ख्या !!!! ख्या !!!!! अगदी तुमच्या काँग्रेस नेत्यांच्या परंपरेप्रमाणे ' तो मी नव्हेच !! '
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 05:11 नवीन
माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
L
lakhu risbud Mon, 02/11/2019 - 05:37 नवीन
"मी नाही त्यातली अन काडी लावा आतली" हा खेळ किती दिवस खेळणार आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
ध
धनावडे Fri, 02/08/2019 - 17:20 नवीन
पोस्ट करताना काही विचार वैगरे करवा म्हणतो थोडा बर असत तब्येतीला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
श
शलभ Fri, 02/08/2019 - 19:48 नवीन
ते राहुल चा वारसा चालवत आहेत. काही पण कचरा उचलून टाकायचा फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 05:16 नवीन
व्यर्थ आणि बावळट बडबड ! भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जास्त फरक आहेत कुठे? मोदी आणि राहुल दोन्ही नुसते बोलघेवडे आहेत, हे कधीच सिद्ध झालेले आहे! माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
शलभ Sat, 02/09/2019 - 09:01 नवीन
व्यर्थ आणि बावळट बडबड
स्वतःला चांगलं ओळखता. तुमचे पोस्ट्स बघूनच कळतंय कुणाला फॉलो करताय. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 09:35 नवीन
कोणाला??????? खूप मोठा भ्रम !!! तुमचा काहीतरी जबरदस्त गैरसमज झाल्याचे दिसते आहे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
भ
भंकस बाबा Sat, 02/09/2019 - 04:09 नवीन
राफेल मधे घोटाळा झाला. आता व्हिडिसी इतके पोटतिड़कीने बोलत आहे तर आपल्याला मान्य करावे लागेल, पण ते येड़ पत्रकार परिषदेत टॉयलेटपेपर येव्हढ तुकड़ जेव्हा पुरावा म्हणून फड़फड़वतं तर तेच संसदेत का नाही फड़फडवत? याचे उत्तर द्या व्हिडिसी , मी आजन्म कोंग्रेसला वोट करिन। नाहीतर तुम्हीच या आमच्याकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 05:09 नवीन
राफेल मध्ये घोटाळा झाला कि नाही झाला हे समजण्यासाठी किमान जेसीपी द्वारे चौकशी तरी व्हायला नको का? या सरकारमधील खोटारड्या नेत्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे नाही काय? इथे प्रश्न काँगेसला मत देण्याचा नाही, भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे धर्मान्ध, जातीयवादी, निर्लज्ज, मानवद्रोही सरकार हटविणे सर्वांचे आद्य कर्तव्य असायला हवे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ट
ट्रेड मार्क Sun, 02/10/2019 - 01:20 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे जेसीपी नसून जेपीसी आहे ज्याचा फुलफॉर्म जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी असा आहे. तर अश्या या जेपीसीचा तुम्ही जप लावलेला आहे त्या कमिटीमध्ये कोण कोण असतात हे तुम्हाला माहित आहे का? जेपीसीमध्ये सर्वसाधारणपणे २/३ मेम्बर संसदेतील तर १/३ राज्यसभेतील असतात. तसेच त्यांची संख्या त्या त्या पक्षांच्या संसदेतील संख्येच्या प्रमाणात असते. म्हणजे जर आता जेपीसी केली तर त्यात भाजपचे नेते जास्त असणार आणि काँग्रेसचे थोड्या प्रमाणात असतील. बाकी जे आरडाओरडा करत आहेत त्या पक्षांचे तर कदाचित कोणीच असणार नाहीत. असो. तर यापूर्वी पण बरेचदा जेपीसी बसवली गेली आहे. त्यात एक प्रमुख केस आहे बोफोर्सची. जेव्हा बोफोर्सच्या घोटाळ्याची चौकशी करायला जेपीसी बसवली गेली तेव्हा त्यात काँग्रेसचे संसदेतील संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचेच सदस्य जास्त होते. म्हणजे चोरी ज्यांनी केली तेच किंवा त्यांचेच साथीदार जेपीसीमध्ये होते. सन १९८८ च्या एका वर्तमानपत्रात आलेला हा रिपोर्ट वाचा. जेपीसी बसवूनही नंतर बोफोर्स केस कोर्टात गेलीच आणि एवढंच नव्हे तर कोर्टाने असे पण नमूद केले की राजीव गांधींनी जेपीसीचा वापर "कव्हर अप" म्हणून केला. या पार्श्वभूमीवर जेपीसी न बसवता परस्पर सुप्रीम कोर्टाकडे जाणे श्रेयस्कर का नसावे? सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊनही जेपीसी असं काय शोधून काढणार आहे? भारत सरकार सोडून द्या पण फ्रांस सरकार, दासूचे मुख्य, आपले एअर चीफ यांनी सगळ्यांनी समजावून सांगूनही मंदभक्तांना का समजत नाहीये? कालच राफेलच्या सौद्यात "Pricing Negotiation Committee" चे तत्कालीन मुख्य (निवृत्त) एअर चीफ मार्शल एसबीपी सिन्हा यांनी सुद्धा PMO कडून कुठलाही दबाव नव्हता तसेच कोणा ठराविक कंपनीला फेव्हर करा वगैरे कुठलीही सूचना नव्हती असे स्पष्ट केले.तसेच रागा जी एसपी शर्मांची चिट्ठी दाखवत आहे त्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की एसपी शर्मा यांचा या सौद्याशी काहीच संबंध नव्हता तर त्यांनी हे का लिहिले असावे आणि ते आता का जाहीर केले जात आहे? तसेच या सौद्यात मध्यस्थ कोण आहे त्या व्यक्तीचे वा कंपनीचे नाव तुम्हाला सांगता येईल का? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट झालेल्या करारात मध्यस्थ का आणि कसा घेता येईल? काही महिन्यांपूर्वीच तर विरोधक ओरडत होते की सरकारने परस्पर करार केला कोणालाच मध्ये घेतले नाही किंवा विचारले नाही. मग आता का आरडाओरडा होतोय? ५९००० कोटी रुपयांच्या करारात ३०००० कोटी अनिल अंबानीला कसे देता येतील? अनिल अंबानीने Dassault Reliance Aerospace Limited नावाची कंपनी स्थापन केली यात ५१% गुंतवणूक रिलायन्स आणि ४९% दासूने केली. दासू आणि रिलायन्स मधील हा करार साधारणतः ८५० कोटी रुपयांचा आहे. कालच बातमी आली आहे की Dassault Reliance Aerospace Limited मध्ये Falcon विमानाचे भाग बनवण्याचे काम चालू झाले. Falcon विमान भारत घेत नाहीये आणि Falcon व राफेल ही दोन्ही पूर्णतः वेगळी विमाने आहेत हे स्पष्ट करतो. आता तुम्ही राफेल हा घोटाळा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी इथे २-५ मुद्दे सांगा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
ड
डँबिस००७ Fri, 02/08/2019 - 19:46 नवीन
VDC अरेच्या !! तुम्हाला ईतकी माहीती आहे म्हणजे पुरावा असेलच ? का Whatsapp वर आलेला Forward आहे ? ईतका तगडा पुरावा असताना हे NDA सरकार अजुन सत्त्येत कशी काय राहीली ? नसलेल्या पुराव्यावर रफालच्या नावांने तो रा गा संसदे बाहेर बोंब ठोकत असतो, असले पुरावे हाती आले असते तर आकाश पाताळ एक केल असत कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी !! बाकी तुम्हाला काय वाटत त्याच्यावर सरकार काय झाडाच एक पान सुद्धा पडणार नाही !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 02/09/2019 - 03:16 नवीन
राहुल कैलासाला जाऊन आला , तुम्ही आलात ?नाही ना , का सांगा ? कारण तुमचा हिंदुधर्म घराणेशाहीतून आला आहे, पण राहुलचा हिंदुधर्म स्वकष्टअर्जित आहे . स्वकष्टार्जीत गोष्ट असली की मनुष्य मेहेनत घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 05:01 नवीन
अरेच्या !! तुम्हाला ईतकी माहीती आहे म्हणजे पुरावा असेलच ? का Whatsapp वर आलेला Forward आहे ?..................... मे महिन्यात सत्तापालट होणार आहे आणि सर्व भंकस लोक खडी फोडायला तुरुंगात जाणार आहेत. सर्व काही पुराव्यांनुसारच होणार आहे. काळजी नसावी. हे १५ मुद्दे मी स्वतः लिहिलेले आहेत, Whatsapp चा इथे मुळीच संबंध नाही. ईतका तगडा पुरावा असताना हे NDA सरकार अजुन सत्त्येत कशी काय राहीली ? नसलेल्या पुराव्यावर रफालच्या नावांने तो रा गा संसदे बाहेर बोंब ठोकत असतो, असले पुरावे हाती आले असते तर आकाश पाताळ एक केल असत कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी !!............... फक्त तीनच महिने बाकी आहेत, मोदी सरकारची उचलबांगडी नक्क्की होणार आहे. त्या काँग्रेसचे मला काही सांगू नका, भाजप व काँग्रेस हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, याची कृपया नोंद घ्यावी. मात्र हे निर्दयी सरकार उलथवून लावणे खूप-खूप गरजेचे होऊन बसले आहे. बाकी तुम्हाला काय वाटत त्याच्यावर सरकार काय झाडाच एक पान सुद्धा पडणार नाही !!..................... लोकशाहीत एक-एक मत महत्वाचे असते, हे विसरून चालणार नाही. हे धर्मान्ध, जातीयवादी, निर्लज्ज, मानवद्रोही सरकार घालविण्यास खारीचा वाटा नक्कीच उचलू, यात शंका नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 02/09/2019 - 06:05 नवीन
काँग्रेसच्या भ्रष्टयाचाराचा भांडाफोड करू हे 20-25 बडबडत आज भाजपे सत्तेत आले आहेत , बाजपेयीं अन मोदींनी किती लोकांना तुरुंगात घातले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 02/09/2019 - 06:18 नवीन
पण संघ जातीयवादी आहे असे गेले ५० वर्षे म्हणणारे प्रणव मुखर्जी काही महिन्यांपुर्वी संघाचे कौतुक करते झाले. मध्यप्रदेशात सत्तेवर आलो तर संघावर बंदी घालू असे काँग्रेसवाले म्हणाले होते रे ब्लॅक-कॅट्या. असो. सध्या राहुलने पुन्हा राफेल प्रकरण उचलून धरले. द हिंदू ह्या वर्तमान पत्राने सगळा कागद दाखवला नाही. सोयीपुरताच दाखवला. पर्रेकरांनी जो शेरा मारला आहे तो राहूल व हिंदूने लपवला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 02/09/2019 - 08:08 नवीन
मध्यप्रदेशात जिंकलो तर शासकीय जागेत शाखा घेण्यावर बंदी घालू , असे ते बोलले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डँबिस००७ Sat, 02/09/2019 - 07:39 नवीन
VDC, तुम्हाला भाजपा आवडत नाही , कॉंग्रेस पसंद नाही मग तुमच अमुल्य व्होट कोणाला देणार ? महा गठबंधन ला ? त्यातही कॉंग्रेस आहेच की ! भाजपाला सशक्त असा पर्याय अजुन तरी उपलब्ध नाही ! त्यामुळे तुमचे व्होट वाया जाणार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 07:48 नवीन
मत मुळीच वाया जातही नाही आणि जाणार सुद्धा नाही! त्या काँगेस आणि भाजप सोडून कोणालाही मत देऊ, अपक्षाला देऊ, नाहीतर 'नोटा' आहेच! लुटारू, भ्रष्टाचारी, धर्मान्ध भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणेच देशाच्या हिताचे आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
L
lakhu risbud Mon, 02/11/2019 - 05:42 नवीन
मे महिन्यात सत्तापालट होणार आहे आणि सर्व भंकस लोक खडी फोडायला तुरुंगात जाणार आहेत. सर्व काही पुराव्यांनुसारच होणार आहे. काळजी नसावी आणि सत्तापालट नाही झाला तर हे थुंकलेले जाहीररीत्या गिळण्याची तयारी असू द्या म्हणजे झाले . तेव्हा गोलपोस्ट बदलू नका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.
ड
डँबिस००७ Sat, 02/09/2019 - 07:50 नवीन
राफेल मध्ये घोटाळा झाला कि नाही झाला हे समजण्यासाठी किमान जेसीपी द्वारे चौकशी तरी व्हायला नको का? कॉंग्रेसची सत्ता असताना १० वर्षांत वायुदलाला एकही विमान विकत घेउन दिल नाही ? का ? भारताला कमजोर करण्यासाठीच ना ? मग त्पांच्यावर कोण कारवाई करणार ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा