देवाचं नांव कुणी ठेवलं ?
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
💬 प्रतिसाद
(379)
श
शा वि कु
Wed, 06/17/2020 - 16:45
नवीन
उत्क्रांतीत झालेले बदल हे त्या स्पेशीच्या अस्तित्वाला टिकवण्यासाठीच होतात. हे बदल घडवून आणता येत नाहीत हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तुम्ही म्हणत होता की प्रत्येक प्राणी आपापल्या साच्याप्रमाणे वागतो- तर असा साचा वगैरे लॉंग रन मध्ये नसतो, हे सांगण्याचा प्रयत्न होता.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 06/17/2020 - 16:09
नवीन
अहो संक्षीसर मिपांकरांशी वाद घालुन डोके फोडण्यापेक्षा ह्या व्यक्तीला पटवुन द्या तुमचे म्हणणे. बरेच अनुयायी मिळतील.
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Wed, 06/17/2020 - 21:54
नवीन
वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये प्रथम एक हायपोथेसिस मांडले जाते आणि प्रयोगाद्वारे ते हायपोथेसिस बरोबर आहे का नाही हे तपासले जाते. नसल्यास हीच प्रोसेस पुन्हा रिपीट केली जाते. आणि सर्व पातळीवर तपासून घेतले जाते आणि शेवटी त्याचा सिद्धांत होतो. जोपर्यंत काहीही सिद्ध होत नाही तोपर्यंत हायपोथेसिस च्या दोन्ही शक्यता असतात. ते हायपोथेसिस सिद्धांत असू पण शकते आणि नसू पण.
आता देवाच्या अस्तित्वावर कोणत्या वैज्ञानिकाने कधी काही रिसर्च केला आहे का, कोणते हायपोथेसिस मांडले आहे का याची माहिती द्यावी. मांडलेले हायपोथेसिस सत्य आहे का नाही यावर कोणते प्रयोग झाले आहेत त्याचेही पुरावे, माहिती द्यावी. नसल्यास जी गोष्ट अजून विज्ञानाने तपासण्यास घेतलेलीच नाही ती गोष्ट नाहीच असे कशावरून म्हणता?
आता आपल्या संस्कृतीमध्ये गेल्या हजारो वर्षात ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल बराच विचार झालेला आढळतो. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी यावर संशोधन केले आणि ईश्वरी साक्षात्कार होण्यासाठी काय करावे लागेल याचीही माहिती देऊन ठेवली जी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. आता या वाटेवरून जे चालले त्यांना तो लाभ झाला. अशी लाभ झालेली माणसे गेल्या हजारो वर्षात अनेक झाली. त्यांचे म्हणणे एवढेच आहे की सांगितलेले करून बघा आणि ठरवा. एक प्रकारे आपले प्राचीन ऋषी मुनि हे वैज्ञानिकच.
आता स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे तथाकथीत बुद्धिवाद्यांना एक साधा प्रश्न आहे: तुम्ही स्वतः महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून पाहिलंय का? नसेल तर तो खोटा आहे हे कशावरून म्हणता?
विज्ञानाने सिद्ध झाले नाही म्हणतात तर देव नाही हे सुद्धा सिद्ध झालेलेच नाही अजून. कोणत्या वैज्ञानिकाने हे प्रयत्न करून पाहिले आहे? कोणती सामग्री त्यासाठी वापरली आहे, त्या रिसर्च ला कोणाची मान्यता लाभली आहे हे सप्रमाण दाखवा आणि मगच पुढे बोला.
आता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा न्यूटन अस्तित्वात येण्यापूर्वीही होता आणि आल्यावरही तसाच आहे. न्यूटनने फक्त त्या सिद्धांताचा शोध लावला. पण म्हणून शोध लावण्याआधी गुरुत्वाकर्षण अस्तित्वातच नाही असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाच
जे अजूनही सिद्ध झालेले नाही त्याला नाही म्हणण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. बरे ज्यांनी तो आहे हे म्हणले आहे त्यांनी सिद्ध करण्यासाठी जे जे करायला सांगितले ते पण तुम्ही करायला तयार नाही मग कशाला बोलता?
बरे ज्यांना देवाचा साक्षात्कार झाला त्यांना मनोरुग्ण म्हणले आहे लेखकाने. उलटपक्षी हि सर्व अत्यंत प्रतिभावान आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची माणसे होती. कोणता सिध्दपुरुष विज्ञानाच्या कसोटीवर मनोरुग्ण ठरला आहे दाखवा. नुसती पोकळ विधाने करण्याने, तुमचा गैरसमज आहे म्हणण्याने, दहा वेळा तेच तेच बोलल्याने कोणी विध्न्याननिष्ठ होत नाही. उलटपक्षी स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे संक्षी जेंव्हा स्वतः "आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती" अशी भंपक विधाने करतात तेंव्हा तेच मनोरुग्ण वाटतात.
स्वतः उगाच काहींच्या काही विधाने कोणत्याही वैज्ञनिक आधाराविना करायची, मेमरी स्ट्रिंग काय प्रत्यारोपण काय आणि वर पुन्हा स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणायचे यावरूनच त्यांचा दुतोंडेपणा दिसून येतो.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/17/2020 - 22:29
नवीन
देव आहे हा देवभोळ्यांचा हायपोथेसिस आहे
तस्मात, तो आहे हे सिद्ध करण्याची जवाबदारी दावा करणाऱ्यांची आहे.
तुम्ही बेसिक्स माहिती करुन घ्या म्हणजे इतका आकांडतांडव करावा लागणार नाही.
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Wed, 06/17/2020 - 22:47
नवीन
कदाचित तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीत. देवाचे अस्तित्व सिद्ध करणारे महापुरुष होऊन गेलेत आणि सांगूनही ठेवलाय की त्यासाठी काय करावे लागेल. तुम्ही ते न करता हा त्यांचा प्रॉब्लेम नाही तुमचा आहे.
तो आहे हे सिद्ध करण्याची जवाबदारी दावा करणाऱ्यांची आहे >>>>> जबाबदारी दावा करणाऱ्यांची असते. जर तो नाही हा दावा तुम्ही करत आहेत तर तो कशावरून हे सिद्ध करा. देव नाही हा हायपोथेसिस धरून ते कोणत्या वैज्ञानिकाने सिद्ध केले आहे ते सांगा मग नाही हे ठाम विधान करा.
ज्या विज्ञानाचा हवाला देऊन देव नाही हे सतत ठसवायचा प्रयत्न करीत आहात त्या विज्ञानानेच देवाचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न केला नसेल तर तुम्ही कसले विज्ञानवादी?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 08:27
नवीन
> महापुरुष होऊन गेलेत आणि सांगूनही ठेवलाय की त्यासाठी काय करावे लागेल ?
कुठल्या दुनियेत राहता ?
कोणत्या माहापुरुषानं सांगितलेली,
काय साधना तुम्ही केली आहे ?
त्या साधनेनं तुम्हाला देव दिसलायं का ?
कुठल्या तरी पुस्तकातली पानं इथे पेस्ट करण्यापलिकडे,
तुमच्याकडे दुसरं काही आहे का ?
__________________________
आणि आता हा बेसिक प्रष्ण :
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 14:57
नवीन
प्रथम तुम्ही ती साधना करून खोटी आहे हे सिद्ध करून दाखवा. ते जमत नसल्यास ज्या विज्ञानाचा हवाला देऊन मिरवताय त्या विज्ञानाने देव नाही हे कुठे सिद्ध केलाय ते दाखवा तुम्हाला तुमच्या अशास्त्रीय विधानाची साधी पाठराखण करता येत नाहीये आणि स्वतःला विज्ञानवादी म्हणवताय...अश्यांना ढोंगी हा शब्द जास्त उपयुक्त आहे.
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 05:45
नवीन
हे विधान करण्यापूर्वी तुम्ही थोडा जरी विचार केला असता तर असले विधान करण्याची तुमचं धाडस झालं नसतं.
तुम्ही विसरला असाल तर आठवण करुन देतो, काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वतः मेमरी स्ट्रींग्जचा एक अचाट दावा केला होता. त्याचं जेव्हा जेव्हा पुरावे मागितले तेव्हा तेव्हा तुम्ही शेपूट घालून पळ काढलात.
काल इथल्या अभ्यासू सदस्याने तुमच्या दाव्यातील फोलपणा दाखवून दिल्यावर आपली चूक मान्य करण्याऐवजी तुम्ही चक्क खोटं बोललात.
तुम्ही इतरांना त्यांचा दावा सिद्ध करा म्हणत आहात तर मग तुमच्या अचाट दाव्याचीही सिद्धता करा. द्या या प्रश्नांची उत्तरे आणि मगच इतरांना तोंड वर करुन बोला:
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 14:58
नवीन
एकदम परफेक्ट. कोळी आपल्याच जाळ्यात शेवटी अडकलाच :)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 06/17/2020 - 22:30
नवीन
संजय क्षीरसागर,
१.
हवा तरी कुठे दिसते? पण असतेच ना. प्रकाश बाहेर पडंत नसला तरी कृष्णविवरही अस्तित्वात असल्याचं मानलं जातंच ना? तशीच काली का अस्तित्वात असू शकंत नाही?
माणसाचं मन जसं दिसंत नाही, तशीच मनातली काली दिसंत नाही. तुम्ही तरी तुमची हृदय, फुफ्फुसादि इंद्रियं पहिली आहेत का? जरा काही दुखलं तर प्रत्येक वेळा तुमचे अवयव कापून उघडायचे का? कुठेतरी शब्दप्रामाण्य मानावं लागणारच ना?
२.
देवाविषयी चर्चा करतांना चमत्कार अभिप्रेत नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 09:08
नवीन
> तशीच काली का अस्तित्वात असू शकंत नाही?
सर, नॉट एक्स्पेक्टेड फ्रॉम यू !
एनी वे.
हवा दिसायला कशाला हवी ?
श्वास कोंडल्यावर माणूस मरत नाही का ?
कालीच्या अस्तित्त्वाचा काय पुरावा आहे ?
> माणसाचं मन जसं दिसंत नाही, तशीच मनातली काली दिसंत नाही.
उलट आहे !
मन आहे म्हणून काली आहे.
मनापलिकडे ती कुठेही नाही.
तुम्ही जप थांबवा, काली गायब !
> कुठेतरी शब्दप्रामाण्य मानावं लागणारच ना ?
तुमची तीच लॉजिकल मिस्टेक पुन्हा होतेयं !
बाप नांवाची व्यक्ती आहे म्हणून त्या शब्दाला अर्थ आहे (तो बाप आहे की नाही ही गोष्ट वेगळी),
काली असं काहीही नाही,
ते फक्त देवभोळ्यांनी,
स्वतःच्या कल्पनेला दिलेलं नांव आहे.
> देवाविषयी चर्चा करतांना चमत्कार अभिप्रेत नाहीत ?
नम्र गापै,
चमत्काराचं दुसरं नांव देव आहे !
जो चमत्कार करतो तो देव
जर काली असाध्य पोट दुखी बरी करत नसेल
तर तीला कुणीही विचारणार नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 06/18/2020 - 08:04
नवीन
देव (निर्माता) आहे असे वाटणाऱ्या लोकांची संख्या देव (निर्माता) नाही असे वाटणाऱ्या लोकांपेक्षा किती तरी जास्त आहे.
आणि हा विषय उथळ विषय नाही की एका वाक्यात देवाचे अस्तित्व नाकारता येईल.
देवाचे नाव कोण ठेवते असला उथळ प्रश्र् ज्ञानि व्यक्ती विचारणार नाही.
जो खरोखर हुशार व्यक्ती आहे तो त्याची सविस्तर बाजू सर्व संबंधित
विषयाला अनुसरून मांडेल.
योग्य ठिकाणी उदाहरणे देईल आणि त्या मधून काय निष्कर्ष काढायचा हे वाचकांवर सोडेल.
कारण फक्त गृहितक मांडूनच तुम्हाला तुमचे मत व्यक्त करायचे आहे.
Practivly nirmata nahi he proof करण्याचा प्रयत्न अजुन तरी कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
फक्त देव भोळे पना,भक्त
असले शब्द वापरून तुम्ही तुमचा
मुद्घा स्पष्ट करू शकत नाही.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Fri, 06/19/2020 - 16:16
नवीन
१. मानवी रूपातला देव - 'दिव्यत्वाची ये जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' या न्यायाने विनम्र भावाने सामान्यजनांनी ज्यांच्या ठायी दैवी गुणसंपदा पाहिली, त्यांना बहाल केलेले देवत्व. उदा. प्रभू रामचंद्रांचा उल्लेख या धाग्यावर कुणीतरी केलेला होता. त्या काळातल्या प्रचलित नामकरण विधीनुसार भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मणाप्रमाणेच त्यांचे नामकरण झालेले असले, तरी श्री रामचंद्र या व्यक्तीच्या ठायी दैवी गुणसंपदेचा उत्कर्ष झालेला असल्याने तत्कालिन सामान्य जन तसेच श्रेष्ठ मुनिवरांनी देखील मान्य केल्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले. देवत्व किंवा विभूतीमत्व असे प्राप्त होते. गुण, अवगुण, पाप, पुण्य, नैतिक, अनैतिक या विषयीच्या धारणा काळानुसार बदलत असल्या, तरी तत्कालिन परिस्थितीमधे या व्यक्ती अलौकिक गणल्या जाव्यात हे सहज मान्य होण्यासारखे आहे. अशा व्यक्तींनी प्रस्थापित केलेले काही आदर्श चिरकाल टिकून राहणारे असल्याने त्यांची आजही पूजा केला जावी (उदा. प्रभु रामचंद्र) हे साहजिकच आहे. भगवद्गीतेतला दैवासुरसंपत्ती विभाग योग हा अध्याय या दृष्टीने अभ्यास करण्याजोगा आहे. दैवी गुणसंपदेचा उत्कर्ष असलेल्या व्यक्ती या दृष्टीने देवाची हवी तेवढी नावे असू शकतात. हे संकल्पना इतकी व्यापक आहे की सचिन तेंडुलकरचा उल्लेख क्रिकेटचा देव असा केला जातो. गमतीचा भाग म्हणजे देव या संकल्पनेचा शोषण आणि अन्याय करण्याकरता दुरूपयोग होताना दिसल्याने त्या संकल्पनेला विरोध करत असलेल्या महापुरूषांनाही त्यांच्या अनुयायांनी देवत्वच बहाल केल्याचे दिसते. असो.
२. नैसर्गिक शक्ती: मानव आणि निसर्ग यांच्यात एक गूढगहिरे नाते आहे. निसर्गातल्या शक्तींचा, जीवजंतूंचा प्रकोप मानवाला भयभीत करणारा असतो. त्याचवेळी या शक्तींवर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत आणि त्या आपली काळजी घेत आहेत अशी एक 'अस्तित्वाबद्दलची कृतज्ञतेची' भावना देखील असते. या दोन्हीतून निसर्गातल्या शक्तींनी आपल्याला अपाय करू नये अशी विनवणी करत असलेल्या तसेच त्यांचे आभार मानण्यासाठीच्या सुंदर कविकल्पनांची, काव्याची निर्मिती झाली. सूर्य, अग्नि, वरूण इ. ना देवत्व प्राप्त झाले. देवतांची ही नावे रूढ झाली. सरळ साध्या मनाच्या माणसाच्या अंतर्मनातुन उत्स्फूर्तपणे निघालेले ते उद्गार आहेत. निसर्गाला आपंण पायदळी तुडवू शकतो किंवा गुलाम करू शकतो असा अनाठायी उन्माद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावर मानवी मनात पैदा होण्याच्या आधीच्या कालखंडातल्या या गोष्टी आहेत.
३. प्रतिकात्मकता: माणसाच्या अंगी असलेल्या सद्गुणामधे सर्वोच्च गुण कुठला असेल तर तो आहे सृजनात्मकता. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या आश्रयाने वावरत असलेल्या मानवाने जगाचे समग्रतेने आकलन करण्याच्या प्रयत्नात असताना काही प्रतिके तयार केली. उदा. कालसापेक्षतेत सतत सुरू असलेल्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाच्या प्रक्रियेला प्रतिकात्मकतेत बद्ध केले. त्या अर्थाने उत्पत्ती (मूळभावः वासना, कामना, कामवासनेतून केलेली नवनिर्मिती), स्थिती (मूळभावः कृपा करणे, प्रतिपाळ करणे, मानवी जीवनात शक्य असलेल्या सगळ्या भूमिका लीलया निभावणे, नवे आदर्श प्रस्थापित करणे इ.) आणि लय (मूळ भावः हलाहल पचवून शांत राहण्याइतकी सहनशीलता, कडेलोटाच्या वेळेला प्रलय करण्याची क्षमता) या तिन्हींची प्रतिके अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु आणि महेश स्वरूपात आकाराला आली. या तिन्हींचे दत्तस्वरूपात एकत्रीकरण केले.
४. जिथे द्रष्टा दृष्य द्रष्टत्व या त्रिपुटीचा अंत झाल्याची प्रचिती येते असे म्हणा, अमुक देवतेचे दर्शन झाले असे म्हणा, अपरोक्ष अनुभूती येते असे म्हणा किंवा समाधी, मोक्ष, निर्वाण, परब्रह्म, निर्गुण, निराकार असले शब्द वापरा - एखादी व्यक्ती जेव्हा एखादी विलक्षण अनुभूती घेतल्यानंतर तिच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याने सामान्य व्यक्तीसारखी न वावरता जणू देवत्वाच्या भावनेनेच या भूतलावर वावरते, तेव्हा सामान्य लोक अशा व्यक्तींना देवाचाच अंश मानायला लागतात. त्यांना विभूतीमत्व प्राप्त होते. या न्यायने देखील देवाच्या विभूती वाटेल तितक्या असू शकतात. असो.
हे सगळे लक्षात घेता देवाचे नाव कोणी ठेवले हा प्रश्न गैरलागू ठरतो. शेवटी 'नाव' ही देखील मानवनिर्मित कल्पना आहे, ती अमिबांच्या जगतात नाही. आपल्या भावविश्वातल्या, अनुभवविश्वातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव दिल्याशिवाय माणसाला स्वस्थ बसवत नाही. पाळीव प्राण्यांचेदेखील माणूसच नामकरण करतो. त्याच मानव समाजाने दैवी शक्तीचे, तिच्या प्रतिकांचे आणि दैवी व्यक्तींचे नामकरण करावे किंवा त्यांना भगवान, महर्षी, ब्रह्मर्षी, ब्रह्मचैतन्य इ. उपाध्या बहाल कराव्यात हे साहजिकच आहे. असो.
देव आणि धर्म यावरून संघर्ष होतात, ते टाळण्यासाठी या संकल्पनाच रद्द करा असा आग्रह धरणे एककल्ली, अतिरेकी आणि मानवी स्वभावाच्या विरोधात जाणारे आहे. भ्रष्टाचार, काळाबाजार, साठेबाजी अशा अनेक अनैतिक गोष्टी बंद व्हाव्यात या साठी 'चलन' ही संकल्पनाच रद्द करा असे सांगणे व्यवहार्य आहे का? मुळात देव आणि धर्म यावरून संघर्ष होतात हे आकलन अपूर्ण आणि दुर्दैवी आहे. संघर्ष नेहेमी मानवी समूहांच्या (हवे तर झुंड म्हणा) हितसंबंधांत वितुष्ट निर्माण झाल्याने होतात. अस्मिता आणि अहंकार या मुळे होतात. देव आणि धर्म न मानणार्या व्यक्ती देखील अस्मिता आणि अहंकार दुखावला गेल्यावर संघर्षच करतात! ते एकाच धर्माच्या दोन राष्ट्रांमधे होतात, तसेच दोन साम्यवादी किंवा दोन लोकशाही राष्ट्रांमधेही होताना दिसतात. असो.
(वर उल्लेख केलेली प्रतिकात्मकता जगभर वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. तिचे एक आगळेवेगळे सौंदर्य आहे.)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 06/19/2020 - 16:37
नवीन
मी या धाग्यावरील काही प्रतिसाद वाचत असताना प्रश्न पडायचा की धागाकर्त्यांना आणि प्रतिसादकांना कोणता/कसा देव अभिप्रेत आहे. कारण प्रत्येकाच्या मनातील देवाची कल्पना वेगळी असते. मी जरी कल्पना म्हणत असलो काहींसाठी ते सत्य आहे आणि त्यांच्यापुरते ते बरोबरही आहे. त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही.
या वेगवेगळ्या देवविषयक संकल्पना खुप छान मांडल्या आहेत.
मला यात अजून एक संकल्पना जोडावीशी वाटते, ती म्हणजे संकट़काळी धावून येणारा, भक्तीने प्रसन्न होणारा, नवस-उपास यांना पावणारा, दुष्टांचे निर्दाळन करणारा देव.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/20/2020 - 21:13
नवीन
> भक्तीने प्रसन्न होणारा, नवस-उपास यांना पावणारा, दुष्टांचे निर्दाळन करणारा देव !
मूवांच्या हवाहवाई प्रतिसादापेक्षा हा प्रतिसाद एकदम प्रामाणिक आहे
आणि सगळ्या भक्तांच्या मनात असाच देव आहे, पण
इथे इतकं खरं बोलायला अजून कुणीही तयार नाही !
__________________________
तर मुद्दा असा की अशा संकटकाळी धावून यावा
अशी फोल अपेक्षा धरली गेलेल्या, कुठेही नसलेल्या,
देवाचं नांव ही
भक्तांनीच ठेवलं आहे !
तस्मात, त्या नांवाला काही अर्थ नाही आणि
त्या मृगजळामागे धावण्यातही अर्थ नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 06/20/2020 - 21:32
नवीन
फक्त ह्याच पोस्ट च विचार केला तर फक्त संजय ह्या व्यक्ती लाच देव नाही असे ठाम वाटत आहे .
बाकी कोणाचेच असे ठाम मत नाही .
ह्याचे एकाच कारण आहे अर्धवट ज्ञान वर ठाम मत शहाणी लोक मांडत नाहीत.
माणसाने एकतर शाहणे असावे नाहीतर वेडे पण अर्धवट असू नये.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/21/2020 - 11:57
नवीन
त्याची जाणीव ठेऊन,
हा व्यक्तीगत प्रतिसाद सोडून देतो !
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 06/19/2020 - 16:57
नवीन
@मूकवाचक,
प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Fri, 06/19/2020 - 18:08
नवीन
तुम्ही सुरुवातीलाच देव ही एक संकल्पना आहे असे म्हणता. देव ही एक प्रक्रिया अथवा व्यक्ती अथवा एन्टीटी अथवा वस्तू नाही असे तुमचेही मत असावे. (चुभुद्याघ्या)
धाग्याचा उद्देशही हाच असावा असे वाटते.
धाग्याचा हा उद्देश असावा असे मला तरी नाही वाटले (? पुन्हा चुभुद्याघ्या)
आणि देवाच्या संकल्पनेतले जे आयाम तुम्ही सांगितले आहेत त्यांच्यासाठी देव हा समानार्थी/वापरला जाणारा शब्द आहे असे तुमचे म्हणणे आहे काय ? तर जर या अर्थांनी कुणी देव हा शब्द वापरत असेल, तर he is happily and knowingly being misunderstood. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे बऱ्याचश्या संस्कृतींमध्ये देव ही संकल्पना सापडते,त्या बऱ्याचश्या ठिकाणी देव हा शब्द सुपरह्यूमन बिइंग या अर्थानेच वापरला जातो. जनमानसांमधली देवाची कल्पना ही त्या त्या धर्माच्या धर्मग्रंथांमधून घेतलेली असते. माझ्या धर्माबद्दलच्या माहितीप्रमाणे देव हा शब्द धर्मातही creator entity म्हणूनच वापरलेला असतो. तुम्ही दिलेल्या उदाहरणातच पहा ना. श्रीरामांना देव म्हणून केवळ त्यांच्या गुणांमुळे ओळखले जाते का ?सर्व गुणी व्यक्तींना देव न मानले जाता, एखाद्या अमानवी शक्तीशी सम्बंधित व्यक्तींनाच देवत्व प्रदान केलेले आढळते. श्रीरामांच्या गुणांसोबत येणाऱ्या मर्यादापुरुषोत्तम या उपाधीसोबत त्यांच्या सुपरह्यूमन अंशासाठी विष्णूंनी घेतलेले मानवरूप हे सुद्धा त्यांच्या परसोनाचा भाग आहे. यावर कोणी म्हणेल की "हे केवळ एक वैचारिक रूपक आहे, विष्णू ह्या प्रतिपालक शक्तीचे श्रीराम जणू रूप आहेत, श्रीरामांबद्दल वाटणाऱ्या आदरासाठी त्यांना दिलेली एक काव्यात्मक पावती आहे" तर हा केवळ mental आणि शाब्दिक जिम्नॅस्टिक झाला. या बाबतीत का बरे कोणी आक्षेप घेईल ? जर देव हा तुम्ही उल्लेखलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा समानार्थी शब्द आहे, तर हा दोन etymologists मधला संवाद होईल, आपल्या दोघांमध्ये नाही.
कोणाला उर्जेला देव म्हणायचे असेल आणि कोणाला तुम्ही वर उल्लेखलेल्या कोणत्याही गोष्टीला देव म्हणायच असेल, तर आक्षेप घेणारा नास्तिक कोण लागून गेला ? पण देवाचा उल्लेख हा समोरच्याने काय अर्थाने घेतला आहे, ह्याची शहानिशा व्हावी, असे म्हटले जाऊ शकते.
नास्तिक संस्थापित धर्म आणि धर्मस्थानांबद्दल तिरसटपणे वागतो ते ह्याच कारणामुळे. बऱ्याच वेळेस देवाची व्याख्या हि तुमच्या मानवतावादी व्याख्येसारखी नसते. तिथे देव हा भक्तीच्या बदल्यात काम करणारा, quid pro quio मानणारा त्रिकालाबाधित सर्वशक्तिमान व्यक्ती असतो. अशा धर्मावर्ती आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीशी होणाऱ्या संवादात तुमच्यासारख्या सज्जन लोकांना वाईट वाटतं हे दुर्दैवच, आणि एका प्रकारचा कम्युनिकेशन गॅपच. पण ते टाळता येणासारखं नाहीच. शेवटी देव हा शब्द जितका तुमचा, तितकाच त्यांचापण आहे.
शंभर टक्के सत्य. पण एक आहे, धर्म सुद्धा काही हितसंबंध तयार करतो, जे धर्महीन व्यक्तीसाठी नसले असते. त्यामुळे धर्मामुळे ज्या लढाया इतरत्र झाल्या नसत्या त्याही होतात.
निर्विवाद पणे.
तुमच्या प्रतिसादाचे माझ्यापरीने खंडन करून झाल्यावर सरतशेवटी-
तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.
हा भाग पूर्ण डोक्यावरून गेला. समजावून सांगाल काय ?
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Fri, 06/19/2020 - 18:35
नवीन
हा भाग पूर्ण डोक्यावरून गेला. समजावून सांगाल काय ?>>>>>>>>>> प्रतिसादकर्ते त्यांच्या दृष्टीने प्रतिसाद देतीलच पण एकंदरीत तुमचे प्रतिसाद संयमित आणि जिज्ञासू वृत्तीचे वाटल्याने सांगू इच्छितो कि हा सर्व भाग वेदांतात खूप छान स्पष्ट करून सांगितला आहे आणि तेही तर्काचा आधार घेऊन. तुम्ही वेदांताचा म्हणजेच पर्यायाने उपनिषदांचा अभ्यास केल्यास सखोल माहिती मिळू शकेल. शंकराचार्यांनी १० उपनिषदांवर भाष्य केले आहे त्यामुळे ती प्रमुख मानली जातात. जमल्यास ती एकदा नक्की अभ्यासून पहा.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 06/19/2020 - 18:59
नवीन
१. मानवी रूपातला देव : उदा. प्रभु रामचंद्र !
ही वाल्मिकींनी लिहिलेली स्टोरी आहे.
वाल्या कोळ्यानी स्वतः अतोनात पापं केल्यावर
त्याच्याविरुद्ध नैतिकतेचं एक उदात्त मॉडेल म्हणून ही काऊंटर निर्मिती केली आहे.
या उदत्तीकरणाच्या नादात वाल्मिकी एंडला अँटी-क्लायमॅक्स करतात.
ज्या सीतेसाठी हे रामायण घडलं,
जीनं रामाला आयुष्यभर साथ दिली,
शेवटी अग्नीदिव्य का काय ते सुद्धा केलं
तीचाच राम पब्लिक डिमांडवर त्याग करतो !
थोडक्यात, निती-अनितीच्या गोंधळलेल्या कल्पनातून लिहिलेली ही स्टोरी आहे.
तस्मात, अशा स्टोरीच्या नायकाला देव मानणारे कायम
योग्य-अयोग्यच्या गोंधळात सापडलेले दिसतात.
___________________________________
२. नैसर्गिक शक्ती: सूर्य, अग्नि, वरूण इ. ना देवत्व प्राप्त झाले.
अस्तित्वाप्रती कृतज्ञता असणं विधायक आहे
पण सूर्य, अग्नि, वरूण यांची वारेमाप देवळं नाहीत.
शिवाय त्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत,
त्यामुळे ती नांव केवळ असलेल्या गोष्टींचा निर्देश करतात.
त्यांच्यावरुन धार्मिक आखाडे तयार होत नाहीत.
तस्मात, हा मुद्दा गैरलागू आहे.
____________________________
३. प्रतिकात्मकता: दत्तस्वरूप !
काय बोल्ता ?
गुरुचरित्रात लावलेल्या एकेक स्टोर्या आणि चमत्कार इथे लिहाल का ?
________________________________________
४. जिथे द्रष्टा दृष्य द्रष्टत्व या त्रिपुटीचा अंत झाल्याची प्रचिती येते असे म्हणा :
ही प्रचिती कुणाही प्रामाणिक साधकाला येऊ शकते
त्यात देव वगैरे काही भानगड नाही.
पण अशी प्रचिती एखाद्याला आली असो-नसो
भक्तगण त्याच्या मागे अशा काही स्टोर्या लावतात
की इतरांना सत्याचा उलगडा हे सामान्यांचं काम नाही असं वाटायला लागतं
बघा :
भगवान श्री. रमण महर्षींची प्रदीर्घ काळ भक्तीभावाने देखभाल करणार्या श्री. माधव स्वामींना एका वर्षापूर्वीच १२ जुलै १९४६ रोजी देवाज्ञा झालेली होती. माधव स्वामीच या सफेद मोराच्या रूपात पुनर्जन्म घेउन परतले आहेत अशी कित्येक भक्तांची धारणा होती. सफेद मोर जेव्हाजेव्हा आश्रमातल्या सभागृहात यायचा, तेव्हा न चुकता तिथल्या लाकडी कप्प्यांमधे व्यवस्थित मांडणी केलेया ग्रंथांच्या रचनेचे जणू परीक्षणच करायचा. हयात असताना हे काम माधव स्वामी पार पाडत असत. माधव स्वामींनी डागडुजी केलेल्या, पुनर्बांधणी केलेल्या ग्रंथांना तो न चुकता चोचीने हळुवार स्पर्श करायचा, इतर पुस्तकांना मात्र तो शिवत नसे. हे काम संपले, की दरवाजाजवळच्या ज्या बाकावर बसून माधव स्वामी विश्रांती घेत, त्याच बाकावर त्याच जागी बसून मोरही विश्रांती घेत असे.
शुद्ध सात्विक' मोर आणि भगवान रमण महर्षी.
_____________________________________
असो, तुमच्या पाल्हाळीक प्रतिसादामुळे माझाही प्रतिसाद तसा झाला.
मुळ मुद्दा हा आहे :
जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही,
तीचं नांव कुणी ठेवलं ?
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 06/19/2020 - 19:06
नवीन
तस्मात, अशा स्टोरीच्या नायकाला देव मानणारे कायम योग्य-अयोग्यच्या गोंधळात सापडलेले दिसतात
रामाला देव मानणारे सगळे योग्य अयोग्यच्या गोंधळात? काही विदा?
रामाला देव मानले नाही तर हा सगळा गोंधळ कसा संपेल?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 06/19/2020 - 20:22
नवीन
> रामाला देव मानणारे सगळे योग्य अयोग्यच्या गोंधळात, काही विदा?
पहिलाच लेसन बघा : डॅडींचा शब्द काही झालं तरी पाळा !
आता कैकई ही दशरथाची सेकंड वाईफ
दशरथानं तीला केंव्हा तरी दोन वर दिले होते (रामाला न विचारता)
ऐन वेळेला कैकई म्हणते मेरे बेटेको किंग बनाओ (हे एकवेळ युती करुन सोडवता येईल)
पण न्यूली मॅरीड रामाला वनवासात पाठवा ?
आता रामभक्त या लेवलला जाऊ शकेल का ?
बरं गेला, तर त्याची सीता त्याला फॅमिली कोर्टात भेटायला बोलवेल
आणि परत दशरथावर डोमॅस्टिक वायलंसची फिर्याद गुदरेल ती वेगळीच.
> रामाला देव मानले नाही तर हा सगळा गोंधळ कसा संपेल?
एक सिंपल एथीकल रुल आहे :
दुसर्याला वापरु नका आणि
दुसर्याला तुम्हाला वापरु देऊ नका
रामायण फॉलो करायची काही गरज नाही
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 06/19/2020 - 20:54
नवीन
अशी मुक्ताफळं दुसऱ्या स्वतःच्याच धाग्यावर उधळली आहेत .
पण तो न्याय मर्यादा पुरुषोततम श्री राम ह्यांना लावला जात नाही.
ह्या वरून समजा नास्तिक पणाचा आव आणून हा व्यक्ती हिंदू च्या भावना दुखावतील असे वर्तन करत आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 06/19/2020 - 21:21
नवीन
अर्धा का असेना,
पहिला योग्य प्रतिसाद दिलात !
> बुध्द ला व्यक्ती समजू नका स्थिती समजा !
बरोब्बर !
ती निराकार स्थितीच देवत्त्व आहे
त्यामुळे तिला कोणतंही नांव देण्याची गरज नाही
आणि तीच सर्व चराचर व्यापून आहे
त्यामुळे तीचं मंदीर बांधता येत नाही !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 06/19/2020 - 21:38
नवीन
बुध्द ही व्यक्ती किंवा अवस्था ही लबाड लोकांनी निर्माण केलेली कल्पना आहे.
ह्या मध्ये सत्य काही नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 06/19/2020 - 19:18
नवीन
तुमची मत देवा विषयी भारतात मतदानाला टाकली तर फक्त 6 ते जास्तीजास्त 8 टक्के लोक तुमच्या मताला सहमती दर्शव तील
म्हणजे फक्त 135 कोटी लोकांपैकी फक्त 10 कोटी लोक.
125 कोटी लोक तुमच्या मताच्या विरोधात मत दर्शवतील.
तू मुळे तुम्ही किती ही नाही नाही केले तरी तुमच्या मताची जागा कचऱ्याची पेटी हीच आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/18/2020 - 08:09
नवीन
माणसाने. विषय संपला. बाकी चालू द्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 08:40
नवीन
नाही डिबी.
उत्तर मिळतं !
> देवाचं नांव कुणी ठेवलं ? माणसाने.
इतकी साधी गोष्ट आहे !
म्हणजे माणसानंच बारसं केलेली,
देव ही एक कल्पना आहे !
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 08:53
नवीन
मग तुम्ही सांगा, मेमरी स्ट्रिंग्ज हे वैज्ञानिक सत्य आहे की तुमच्या मेंदूतून निघालेली अचाट कल्पना?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/18/2020 - 11:06
नवीन
देव ही कल्पना आहे हे उत्तर मिळतं. मान्य.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 11:16
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 08:56
नवीन
देवाच्या अस्तित्वाची अशक्यता ही सिद्ध करता येत नाही, आणि नक्कीच, देवाचे अस्तित्व शेवटचे उत्तर म्हणून अशक्य नाही आहे.
पण हे सिद्ध न करता येणं हे युनिकॉर्न,सांता क्लॉज, दंतपरी, ब्रह्मराक्षस, व्हॉल्डेमॉर्ट, व्हाईट वॉकर, झोंबीज या सर्वांना लागू होते. तेव्हा यांच्या सुद्धा अस्तित्वाची शक्यता आहे असे म्हणावे काय ? त्यामुळे, एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करता येत नाही, हे ती गोष्ट अस्तित्वात आहेच याचे आर्ग्युमेन्ट कधीही होऊ शकत नाही.
(बाकी Stephen Hawking यांनी निर्मात्याला काही जागा नाही असे आर्ग्युमेन्ट केले आहेच.)
जर अशक्यता न सिद्ध होणं हा निकष असेल तर सर्व जग ऍटलासच्या खांद्यावर / शेषनागाच्या डोक्यावर असू शकते ही शक्यता सुद्धा खरी असू शकते मानून चालावे काय ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 09:13
नवीन
> हे सिद्ध करता येत नाही, हे ती गोष्ट अस्तित्वात आहेच याचे आर्ग्युमेन्ट कधीही होऊ शकत नाही.
अबसोल्यूटली पर्फेक्ट !
- Log in or register to post comments
स
संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 10:23
नवीन
एखाद्याने एखादी गोष्ट आहे असं म्हटल्यानंतर त्याला त्याचे पुरावे देता येत नसतील तर त्याने करावे?
१. बोलती बंद झाल्याने पुरावे मागणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावे
२. उघडे पडल्यावर खोटे बोलावे
३. स्वतः अशास्त्रीय विधाने केली असतानाही दुसऱ्याना विज्ञान काय हे शिकवावे
३. वरील तिन्ही गोष्टी कराव्यात
सांगा बरं.
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 15:10
नवीन
त्यामुळे, एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करता येत नाही, हे ती गोष्ट अस्तित्वात आहेच याचे आर्ग्युमेन्ट कधीही होऊ शकत नाही ----------> मग हेच लॉजिक ती गोष्ट अस्तित्वात नाहीच यालापण लागू होते. तसे झाल्यास स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे संक्षी देवाचे अस्तित्व नाहीच हे ठामपणे १०० वेळा सांगत आहेत ते कोणत्या विज्ञानाच्या आधारावर? यात त्यांचा तथाकथित ढोंगीवादीपणाच सिद्ध होतो.
वैज्ञानिकांनी देव आहे हे हायपोथेसिस घ्यावे त्यावर रिसर्च करावा आणि सर्व प्रयोगाअंती तो नाही हे ठामपणे मांडावे आणि सर्व रिसर्च शेयर करावा. आपल्या जुन्या ऋषींनी जेंव्हा ईश्वराच्या अस्तित्वावर संशोधन केले तेंव्हा त्यांना जे काही मिळाले ते त्यांनी प्राचीन ग्रंथात नमूद केले आहे आणि इतरांना तो अनुभव घ्याचा असल्यास साधना पद्धती सांगितल्या आहेत. ज्याला इंटरेस्ट आहे त्याने तो मार्ग जरूर अवलंबावा.
असे संशोधन करण्यास आजच्या वैज्ञानिकांना करण्यास कोणी अडवले आहे? असे केले असल्यास याचा आधार घेऊन देव नाही असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ. नाहीतर आधाराविना केलेलं सर्व पोकळ दावे आणि ढोंगीपणा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 06/18/2020 - 10:31
नवीन
हे तुमचे पक्क मत आहे .
कारण अशी खूप उदाहरण विज्ञान विश्वात आहेत ती सिध्द झालेली नाहीत पण गृहीत धरलेली आहेत
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 10:40
नवीन
उदा ?
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 10:50
नवीन
नक्कीच, वैज्ञानिक सुद्धा गृहीत धरतात. पण या गृहीत धरलेल्या गोष्टीचा disclaimer दिला गेला असतो,( "x खरे आहे असे मानून चालले तर y सिद्ध होते") आणि याबाबतीत नवीन माहिती आली तर पूर्वीची गृहीतके रद्दबातल होतात. थोडक्यात, वैज्ञानिक सत्य त्या त्या परिस्थितीत असलेल्या पूराव्यांवरच आधारित असते. तसेच या गृहितकांची इतर तज्ञांकडून योग्य अशी चिरफाड आणि टिका होते.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 06/18/2020 - 12:08
नवीन
भारताने 1983 ला विश्व चषक जिंकला होता हे सत्य आहे .
पण कोणतीच चित्रफीत उपलब्ध नसेल,कोणतेच फोटो उपलब्ध नसतील ,कोणते
खेळाडू जिवंत नाहीत,कोणताच प्रेक्षक जिवंत
नाही.
म्हणजे तुमच्या कडे कोणताच पुरावा नाही तर 1983 ला भारताने विश्वकप जिंकला होता ही घटना खोटी ठरते का?
तुमच्या मताप्रमाणे पुरावे नाहीत म्हणून ती खोटी ठरली पाहिजे होती.
पयथ्यागोरास नी प्रथम पृथ्वी गोल असेल असे सांगितले तेव्हा त्यांच्या कडे कोणते पुरावे होते.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 12:38
नवीन
1) पायथागोरसने aesthetic shape म्हणून पृथ्वी spherical आहे असे जे आर्ग्युमेन्ट केले ते तर्कशुन्यच आहे. ते बरोबर ठरले हा निव्वळ योगायोग. त्याला त्रिकोणाकर आवडत असला असता तर तो पृथ्वी त्रिकोणी आहे म्हटला असता. त्याचे भाकीत बरोबर ठरले म्हणून त्याचे आर्ग्युमेन्ट बरोबर होत नाही.
2) तुमचे वर्ल्डकप बद्दलचे म्हणणे- नक्कीच. जर भारत जिंकला ही माहिती मिळवायचे सगळे सोर्स हायपोथेटिकली बंद झाले,तर्क करायचे सुद्धा सगळे दरवाजे बंद झाले, तर भारत जिंकला हे विधान करता येणार नाही! आता यावर तुम्ही म्हणाल कि तर्क करता येत नसला म्हणून भारत जिंकला हे सत्य थोडीच बदलते ? अगदी योग्य. पण तुम्ही बोलत आहेत ते खरं काय ते माहिती आहे या जागेतून.
मी एक तुमच्या हायपोथेटीकल भविष्यातला माणूस आहे असं समजा. मला माहीतच नाही की कुठला देश जिंकला ते! त्यामुळे मी काय म्हणीन ?-
भारत वर्ल्डकप जिंकला असण्याची शक्यता आहे, पण तसं मी ठामपणे म्हणू शकतं नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आणि न्यूझीलंड जिंकले असण्याची शक्यता तितकीच आहे, जितकी भारत जिंकण्याची आहे. आणि त्याही पुढे, तर्काचा अजिबात आधार नसलेल्या गोष्टीची शक्यता आणखीनच कमी. उदा- 1983 चा वर्ल्डकप माकडांची टीम जिंकली.
म्हणजे , या अर्ग्युमेंटने देव सिद्ध करायला, तुम्ही स्टॅन्ड घेताय, कि देव तर बुवा अस्तित्वातच आहे (जस मगाशी तुम्हाला माहित होतं की भारत जिंकलाय). आणि इथही, माझा स्टॅन्ड आहे की, "देव असू शकतो, पण आत्ता तरी तसं मानायचं काही कारण नाही" (जसा मी मगाशी म्हणत होतो, कि भारत जिंकलाय हे मी खात्रीशीर सांगू शकत नाही.)
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 15:38
नवीन
भारत वर्ल्डकप जिंकला असण्याची शक्यता आहे, पण तसं मी ठामपणे म्हणू शकतं नाही...देव असू शकतो, पण आत्ता तरी तसं मानायचं काही कारण नाही --------> याचा पुढील विचार करुन बघुया. तुमचे क्रिकेटचेच उदाहरण घेऊ. आता तुम्हाला तुमच्या ४-५ मित्रांनी सांगितले की १९८३ चा वर्ल्ड कप भारत जिंकला आहे आणि तुलापण हे माहित करून घ्यायचे असल्यास दूरदर्शन नावाच्या यंत्रावर बातमी पहा किंवा वर्तमानात बातमी पहा किंवा प्रत्यक्ष टीममधील प्लेयरला विचार. कारण त्यानी त्या त्या मार्गाने खरे जाणुन घेतले. अश्या वेळी प्रथम तुम्ही कदाचित त्यांच्यावर विश्वास ठेवाल कारण तुमच्या वेगवेगळ्या मित्रांनी जे अतिशय विश्वासू आहेत त्यांनी स्वानुभवरून वेगवेगळ्या मार्गाने एकच माहिती तुम्हाला दिली आहे. पण तुम्हाला खरेच सत्य जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही स्वतः त्यांनी सांगितलेला एखादा मार्ग अवलंबाल. आता सर्व परफेक्ट करून जर तुम्हाला समजले की १९८३ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला नाही तरच तुम्ही ठामपणे म्हणू शकता की तुमच्या सर्व मित्रांनी सांगितलेले खोटे आहे. पण यापैकी काहीच न करता किंवा काहीही पुरावा, अनुभव, आणि सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न न करता नुसत्याच १९८३ चा क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला नाही अश्या १०० वेळा बोंबा जर कोणी मारू लागला तर तुम्ही त्याला मुर्ख मानाल की विज्ञाननिष्ठ?
त्याच्प्रमाणे एखाद्याला पुढचा प्रश्न पडू शकतो की या देशात अनेक असामान्य व्यक्ती ज्या वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेल्या त्या सर्वांनी तर एकमुखाने देवाचे अस्तित्व स्वानुभवावर मान्य केले आहे वर हेही सांगितले आहे कि तुम्ही स्वतः तो अनुभव घेऊ शकता. तेंव्हा जिज्ञासेपोटी त्यान्च्यावर विश्वास ठेवून एखाद्याने त्यांनी सुचवलेला मार्ग अवलंबला तर ते योग्य की कोणताही शास्त्रीय पुरावा नसताना महानुभावांनी सांगितलेले सगळेच खोटे आणि ते मूर्ख पण मी सान्गितलेले मात्र खरे असे १००दा ओरडून सांगणे हे योग्य?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 06/18/2020 - 12:22
नवीन
गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे असे अनुभवाने सिद्ध झाले आहे पण गुरुत्वाकर्षण बल कशामुळे निर्माण होते ह्याचे उत्तर कोणाकडेच नाही मग ते गुरुत्वाकर्षण हे बल देव निर्माण करतो असा मी दावा केला तर तो दावा चुकीचं आहे हे सिद्ध करायला कोणाकडेच काही पुरावा नाही.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 12:46
नवीन
1) गुरुत्वाकर्षण देव निर्माण करतो.
2) सर्व जग ऍटलास ने पेलून धरले आहे.
3)सर्व जग हे एका मोठ्या राक्षसाच्या शेम्बडात सामावले आहे, आणि त्या राक्षसाने शेमबुड पुसला कि जग नष्ट होणार.
हे सगळे दावेच आहेत, आणि कोणताही दावा खोटा म्हणून सिद्ध करता येत नाही. एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करता न येणे हा ती गोष्ट असण्याचा पुरावा नव्हे !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 06/20/2020 - 17:31
नवीन
जे नाही हे सिद्ध करता येत नसेल तर ते आहे हा दावा तसाच राहतो तो चुकीचा ठरत नाही.
माणसाला जे आवाज ,वास येत नाहीत ते कुत्र्यांना येतात .
म्हणजे माणसाला एकदा वास चे ज्ञान होत नाही एकदा आवाज ऐकायला येत नाही म्हणजे तो वास ,आवाज अस्तित्वात नसतो असे म्हणता येत नाही .
कारण त्या दोन्ही गोष्टींचे ज्ञान प्राण्यांना होते त्याची त्यांना जाणीव होते.
आपल्या डोळ्यांनी जे दिसत तेवढेच अस्तित्वात नसते हे सायन्स च सांगते .
किती तरी टक्के दृश्य माणसाला दिसत नाहीत म्हणजे ती अस्तित्वात नाहीत हा विज्ञान विरोधी मत आहे.
मेंदू ची जेवढी क्षमता तेवढ्याच गोष्टीची जाणीव होते.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sat, 06/20/2020 - 18:25
नवीन
अशक्यता सिद्ध होत नसल्यानेच तर शक्यता आहे असे मानले आहे. पुनःश्च- अशक्यता सिद्ध होत नसल्याने अस्तित्व नक्की होत नाही. वरील मुळ प्रतिसादातल्या तीन शक्यता वाचाव्यात. त्याही तुम्हाला मान्य आहेत का , अशक्यता सिद्ध होत नाही म्हणून ?
कुत्र्याला जास्तीचे वास येतात हे समजण्यासाठी पुरावे आहेत. त्या पुराव्यांवरच तर तुम्ही हे विधान केले आहे. देव डोळ्यांना दिसत नाही म्हणून तो अस्तित्वात नाही हे भयंकर बालिश आर्ग्युमेन्ट आहे आणि इथे कोणीही केलेले नाही. दिसत तर हवाही नाही, जस गा.पै. म्हणत होते. हवा जर वेगवेगळ्या घटकांचे वायुरूप अशी डिफाईन केली तर त्यातले विविध घटक (ऑक्सिजन, नायट्रोजन, co2) हे अस्तित्वात आहेत हे सिद्ध करता येतं. तशा प्रकारे देव सिद्ध करता येत नाही. सायन्स त्याहीपुढे जाऊन केवळ दिसतच नाही, तर कोणत्याही पाच इंद्रियांमधून पकडता न येणाऱ्या, पण 1) शास्त्रीय उपकरणांमध्ये निरखता येणाऱ्या 2) निरखता ही न येणाऱ्या पण तर्काने सिद्ध करता येणाऱ्या गोष्टी सुद्धा मान्य करते. मला माझ्या सेन्सेसनीच देवाला पहायचे आहे/वास घ्यायचा आहे/ स्पर्श करायचा आहे/ चव घ्यायची आहे(!)(!) / ऐकायचे आहे असा दुराग्रह नाहीच.
मेंदूनेच कल्पना समजावून घेऊन मेंदूच्याच क्षमतेच्या बाहेर ? एनी वेज, ही माझी मर्यादा आहे. मला तर बुवा मेंदू पल्याडच्या गोष्टीच्या असण्यावर व नसण्यावर दावा करता येत नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 06/20/2020 - 19:05
नवीन
2) सर्व जग ऍटलास ने पेलून धरले आहे.
3)सर्व जग हे एका मोठ्या राक्षसाच्या शेम्बडात सामावले आहे, आणि त्या राक्षसाने शेमबुड पुसला कि जग नष्ट होणार.
तुमच्या प्रतिसाद मधील दोनच घेवूया कारण पाहिले वाक्य मी उपहासाने लिहलेले होते.
ह्या दोन्ही वाक्यांचा शब्द शाह अर्थ घेतला तर तो मला मान्य नाही .
पण त्या वाक्यात जो भावार्थ लपलेला आहे तो चुकीचा नाही असे मात्र माझे स्पष्ट मत आहे.
सर्व जग एटलास नी पेलून धरलेले आहे.
ही समजूत किती तरी वर्षा पूर्वीची आहे तेव्हा कोणतीच साधने अस्तित्वात नव्हती.
लोकांना अक्षेत ग्रह तारे तरंगताना दिसायचे त्या नुसार आपली पृथ्वी सुद्धा मोकळ्या पोकळीत तरंगत आहे ह्याची जाणीव त्यांना होती पण असे का घडत असेल ह्याची माहिती नव्हती.
गुरुत्वाकर्षण आणि बाकी बलांची त्या वेळी माहीत नव्हती.
कोणतीच वस्तू अधांतरी राहू शकत नाही ह्याची मात्र जाणीव होती म्हणून त्या वेळच्या माहिती च्या उपलब्ध नुसार पृथ्वी Atlas ni
पेलून धरली आहे असे समजण्यात आले.
आपण ज्याला ब्लॅक होल म्हणतो ते ह्या साठी की ते दिसत नाहीत त्या मधून प्रकाश किरणे सुद्धा बाहेर पडत नाहीत त्या मुळे .
पण पुढे अजुन प्रगती झाली तर नवीन प्रकाश किरणांचा शोध लागेल आणि आपण ती उपकरणाने बघू शकू .
तेव्हा ब्लॅक होल हे ब्लॅक नसून तीव्र प्रकाश फेकणारे आहे आणि प्रकाशमान आहे असे माहीत पडेल.
तेव्हा ब्लॅक होल विषयी चर्चा करताना ब्लॅक होल हे नाव चुकीचं होत असे म्हणता येईल का?
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sat, 06/20/2020 - 19:34
नवीन
माझा अगदी हाच मुद्दा आहे.आत्ता अस्तित्वात असलेल्या माहितीवर आत्ता मूल्यमापन होईल. भविष्यात नवी माहिती मिळाली तर नक्कीच, नाव बदला.
बाकी जर ऍटलास आणि ब्लॅक हॉल हे तर्काच्या एकाच पातळीवर आहेत असे तुमचे म्हणणे आहे काय ?
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sat, 06/20/2020 - 19:35
नवीन
माझा अगदी हाच मुद्दा आहे.आत्ता अस्तित्वात असलेल्या माहितीवर आत्ता मूल्यमापन होईल. भविष्यात नवी माहिती मिळाली तर नक्कीच, नाव बदला.
बाकी जर ऍटलास आणि ब्लॅक हॉल हे तर्काच्या एकाच पातळीवर आहेत असे तुमचे म्हणणे आहे काय ?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 06/18/2020 - 14:34
नवीन
बरेच दिवसांनी कुणीतरी संयतपणे, अतिशय सोप्या शब्दांत वैज्ञानिक दृष्टीकोन समजावून सांगितला. तुमची समोरच्याचा प्रश्न हाताळण्याची पद्धत तर वाखाणण्याजोगी आहे. तुमचे स्वतंत्र लेखही वाचायला आवडतील.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »