Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

स
संजय क्षीरसागर
Tue, 06/16/2020 - 09:04
💬 379 प्रतिसाद
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही. कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही. कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको, कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज. घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ; सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी. स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला, तुमच्या कष्टाचा पैसा ! आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ? _____________________________________ देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या गुरुकडे जायला नको, 'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही, आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही. वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही, जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही, की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही. एका प्रष्णात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही ! इतकी वर्ष काय झक मारलीस का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील, पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल, वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा; तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ, तुम्हाला जवळचे वाटतील. पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी, रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती, तुमचा मैत्रभाव जागेल. चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे, आपण त्यांच्यापुढे छपरी, हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !

प्रतिक्रिया द्या
90705 वाचन

💬 प्रतिसाद (379)
स
संजय क्षीरसागर Sat, 06/20/2020 - 20:38 नवीन
आपण केलेली निराधार `कल्पना '!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Sat, 06/20/2020 - 22:10 नवीन
संजय क्षीरसागर, योगात मीलन अभिप्रेत असतं. म्हणूनंच योग हा द्वैताकडे अंगुलीनिर्देश करतो. आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? एकतर आत्मा हा तरी निराधार आहे, किंवा मग स्वत:ची जाणीव तरी निराधार मानली पाहिजे. देव ही सुद्धा अशीच 'निराधार' कल्पना असू शकते ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 06/21/2020 - 11:53 नवीन
पुन्हा एकदा फंडामेंटल मिस्टेक ! १> योगात मीलन अभिप्रेत असतं. म्हणूनंच योग हा द्वैताकडे अंगुलीनिर्देश करतो. आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? योगा म्हणजे गेटींग कनेक्टेड टू वनसेल्फ ! दुही संपणं म्हणजे योगा ! आता पुढे पण शांतपणे वाचा : _______________________________________ २. > आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? एकतर आत्मा हा तरी निराधार आहे, किंवा मग स्वत:ची जाणीव तरी निराधार मानली पाहिजे. अर्थात ! आत्मा निराधारच आहे. आणि आपणच आत्मा आहोत. त्यामुळे आपण सर्वव्यापी आणि अभंग आहोत, आपलं स्वतःपासून विभाजन असंभव आहे. हे भ्रामक विभाजन संपवण्याचा मार्ग म्हणजे योगा ! एकदा आपणच सत्य आहोत हा उलगडा झाला, की आपल्याला स्वतःची इंद्रियांमार्फत होणारी, भ्रामक जाणीव संपते. उदा. देहाची जाणीव झाली की `आता वय झालं असं वाटणं' थांबतं ! __________________________ त्याबरोबर जाणीवेनं स्वतःचा सतत शोध घेणं थांबतं, कारण जाणीव आपल्या काह्यात आहे, आपण जाणीवेच्या काह्यात नाही. तस्मात, आपली आपल्याला जाणीव होऊ शकत नाही. आपण केवळ एक कायम स्थिती होऊन राहतो, आणि जाणीवेचा उपयोग व्यावहार्य कारणांसाठी करतो, जसा की मी हा प्रतिसाद लिहितो आहे. _____________________________ > देव ही सुद्धा अशीच 'निराधार' कल्पना असू शकते ना? आता बरोब्बर लिहिता-लिहिता पुन्हा चूकलात ! आपण निराधार आहोत ! आपल्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तस्मात, देव या आपणच केलेल्या निराधार कल्पनेचा, आपल्याला काहीही उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 06/20/2020 - 16:58 नवीन
एस, या विधानाबद्दल तुमचं अभिनंदन :
तोवर माझे विशुद्ध नास्तिकत्व कायम राहील.
अभिनंदन अशासाठी की तुम्ही ज्याला 'विशुद्ध नास्तिकत्व' म्हणता त्याला वेदांतात स्वयंभू सत्य अशी संज्ञा आहे. स्वयंभू सत्याचा पुरावा मिळंत नसतो. म्हणूनंच तुम्हाला तुमच्या विशुद्ध नास्तिकत्वाचा कसलाही पुरावा मिळणार नाही किंवा देता येणार नाही. ते स्वयंभू सत्य आहे. जाणतेपणी अथवा अजाणतेपणी तुम्ही वेदांताचा प्रचार केला आहे. म्हणून तुमचं अभिनंदन. आ.न., -गा.पै. टीप : पूर्वी माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवले होते. त्याच धर्तीवर मी नास्तिकमुखी वेदान्त वदविला. असा पराक्रम करणारा माऊलींनंतर मीच, म्हणून माझंही अभिनंदन. हा पराक्रम यापूर्वीही मी गाजवला आहे : https://www.aksharnama.com/client/article_detail/1703
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 06/20/2020 - 18:01 नवीन
प्रोफेसर विद्यासागरांसंबंधीत एक कथा वाचली होती ती आठवली. स्वातंत्र्यपूर्व काळ होता. प्रोफेसर रोज सकाळी स्टाफरुममध्ये आल्यावर स्वतःच्या केबिनमध्ये पाच-सहा मिनिटे ध्यानधारणा करुन ईश्वराचे स्मरण करत असत. आणि हे पाहुन रोज त्यांचे सहकारी त्यांची टर उडवत असत. ईश्वर नाहीच आहे त्यामुळे विद्यासागरांची रोजची पाच मिनिटे वायाच जात आहेत असे सहकार्यांचे चेष्टेयुक्त स्वरात म्हणणे होते. ही गोष्ट रोज न चुकता होत असे. विद्यासागर सस्मित मुद्रेने दुर्लक्ष करीत असत. पण एकदा अतीच झाल्यावर त्यांनी सहकार्यांना सुनावले. जर ईश्वर नसेलच तर रोज पाच असे धरुन काही वर्षांचा हिशोब करता अमुक अमुक तास जीवनातले ठार वाया गेले असे समजु. पण मी जर ध्यानधारणा केली नसती त्या पाच मिनिटात तरीही तुमच्या सोबत टिंगळटवाळी/धुम्रपान वगैरे करुन ती तशीही वायाच जाणार होती. त्यामुळे हा काही इतका मोठा तोटा नाही आहे. पण समजा जर ईश्वर आहेच तर माझी इतक्या वर्षांची गुंतवणुक नक्कीच कामाला येईल पण तुमचा तर पूर्ण जन्मच वाया गेला कि हो.. ह्या स्पष्टीकरणानंतर विद्यासागरांना त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा कधी त्यांच्या ईश्वरभक्तीवरुन परत डिवचले नाही. हाच तर्क इथेही लागु होतो.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/20/2020 - 20:59 नवीन
येत नाही. इथे देव ही निराधार मानवी कल्पना आहे याची चर्चा चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
R
Rajesh188 Sat, 06/20/2020 - 21:16 नवीन
देव आहे ह्याचा अनुभव घेता येतो पण सिद्ध करता येत नाही म्हणून देव ही सध्या तरी मानवी कल्पना आहे असे काही व्यक्ती बोलू शकतात. पण ह्या वाक्यातील सध्या तरी हा शब्द महत्वाचा आहे . देव ठाम पने नाकारणे हे निरक्षर पणाचे लक्षण आहे. ज्या बाबतीत संपूर्ण ज्ञान नाही त्या बाबतीत ठाम पने बोलणे ह्याला अडाणीपणा असेच म्हणले पाहिजे. कारण ज्या गोष्टी का जगात मान्यता आहे आणि अजुन सुध्दा 80 ते 90 टक्के लोक देव आहे ह्या बाबत संशक नाहीत . ह्याचा अर्थ देव ही कल्पना नसून सत्य आहे. खोट्या कल्पना करून एवढ्या मोठ्या जन समूहाला मूर्ख बनवता येणार नाही. देव आहे हे सत्य आहे जोपर्यंत विश्वाचे गूढ पूर्ण पने उकलत नाही तो पर्यंत. आता आजच्या घडीला विश्व जावू ध्या मानवी शरीराचे पण गूढ पूर्णपणे उकलता आलेले नाही. पृथ्वी चा अंतर्भाग,समुद्रातील जीव सृष्टी पण माणसाला पूर्ण माहीत नाही . जो पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तो पर्यंत देव ही कल्पना नसून सत्य आहे हेच त्रिवार सत्य आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 06/21/2020 - 12:54 नवीन
विंदा करंदीकर यांची एक बोधप्रद कविता.( बोधप्रद म्हणजे सर्वसामान्य माणसांना कळणारी. त्यात हा आत्मकथीत स्वयंषोशीत धागाकर्ता येत नाही. कारण त्याला काही कळेल,हीच शक्यता सम्प्लेली आहे!) त्याला इलाज नाही धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही लढवून बांधवांना संहार साधणारा गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 06/21/2020 - 13:20 नवीन
अफाट सुंदर कविता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
संजय क्षीरसागर Sun, 06/21/2020 - 13:31 नवीन
टाकलेली दिसते ! कारण ती तुमच्याच लेखाच्या विरोधात आहे : वाचा : देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले.... आणि तेच काम मीही करतोयं अर्थात, तुम्हाला आपण काय करतोयं तेच लक्षात येत नाही हे प्रतिसादही पुरेपूर दर्शवतात. _______________________________ पुन्हा वाचा : मनोरुगण म्हणजे नक्की काय याची ही तुम्हाला कल्पना नाही, आणि ते ही सहाजिकच आहे. ज्याचा ठावठिकाणा माहिती नाही आणि ज्याला आपली भाषा सुद्धा कळते की नाही याचा पत्ता नाही, अशा व्यक्तीला : जो खुळ्यासारखा (तेही दुसर्‍याच्या घरी जाऊन) हाका मारतो; आणि त्याही पुढे जाऊन, आपल्या हाकांमुळे, ठावठिकाणा माहिती नसलेली व्यक्ती `ऐकणार्‍यावर' खुष होईल इतका निर्बुद्ध विचार करु शकतो, तो खरा मनोरुग्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गामा पैलवान Sun, 06/21/2020 - 20:44 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो. १.
योगा म्हणजे गेटींग कनेक्टेड टू वनसेल्फ !
बरोबर. आसनं व प्राणायाम ही योगाची पहिली पायरी आहे. काही लोकांना या पहिल्या पायरीच्या पुढे जाण्यात रस नाही. म्हणून आसनं व प्राणायाम निरुपयोगी ठरतात का? मग काही लोकांना स्वत:शी कनेक्ट होण्यासाठी देवाची मदत लागंत असेल तर देव भ्रामक कसा काय? जितका योग भ्रामक व सत्य आहे, तितकाच देव ही भ्रामक किंवा सत्य आहे ना? २.
अर्थात ! आत्मा निराधारच आहे. आणि आपणच आत्मा आहोत. त्यामुळे आपण सर्वव्यापी आणि अभंग आहोत, आपलं स्वतःपासून विभाजन असंभव आहे. हे भ्रामक विभाजन संपवण्याचा मार्ग म्हणजे योगा !
आपण स्वत: जर सर्वव्यापी आणि अभंग आहोत, तर मग योग हा देखील भ्रामकच ठरतो. तसाच देव हा ही भ्रामक ठरला तर काय बिघडलं? ३.
एकदा आपणच सत्य आहोत हा उलगडा झाला, की आपल्याला स्वतःची इंद्रियांमार्फत होणारी, भ्रामक जाणीव संपते.
एकदम मान्य. पण ज्या लोकांना हा उलगडा झाला नाहीये त्यांनी काय करायचं? माया ही अशी आश्चर्यजनक नदी आहे की ती ओलांडल्यावर मागे वळून पाहता नाहीशी होते. तुम्ही मायानदी ओलांडली आहे हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 06/21/2020 - 21:23 नवीन
> हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय? तो एवढा काही मोठा लफडा नाही. सरळ समोर बघितलं की स्वच्छ स्वरुप दिसतं. कशाला पाहिजेत त्या प्रतिमा आणि पूजा अर्चा ? एकदा टाइमपास सुरु केला की त्याला अंत नाही, आणि एकदा कत्पना कवटाळली की तोच आधार ! मग भ्रमाला अंत नाही. त्यापेक्षा सरळ समोर बघा, हुकलात, काही गोंधळ होतोयं असं वाटलं, परत शांतपणे समोर बघा एकदा निराकाराशी संलग्नता जमली की कोणताही आधार लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Sun, 06/21/2020 - 21:54 नवीन
> हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय? तो एवढा काही मोठा लफडा नाही. सरळ समोर बघितलं की स्वच्छ स्वरुप दिसतं. कशाला पाहिजेत त्या प्रतिमा आणि पूजा अर्चा ? एकदा टाइमपास सुरु केला की त्याला अंत नाही, आणि एकदा कत्पना कवटाळली की तोच आधार ! मग भ्रमाला अंत नाही. त्यापेक्षा सरळ समोर बघा, हुकलात, काही गोंधळ होतोयं असं वाटलं, परत शांतपणे समोर बघा एकदा निराकाराशी संलग्नता जमली की कोणताही आधार लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
R
Rajesh188 Sun, 06/21/2020 - 21:10 नवीन
देव आहे ह्याचा पुरावा देता येत नाही. म्हणून देव नाही हे कोणी स्वीकारत नाही. बहुसंख्य लोक देव नाकारत नाहीत त्याची कारण आपण चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत. कारण अशी खूप लोक आहेत ते विज्ञान मानतात त्याच बरोबर देव पण मानतात. दिवसभर प्रयोगशाळेत काम करणारा नवीन शोध घेणारा व्यक्ती रात्री पूजा अर्चा करतात. म्हणजे देव नाही हे सिद्ध करून सुद्धा धार्मिक देव मानणाऱ्या लोकांची संख्या बिलकुल कमी होत नाही.उच्च शिक्षित लोक सुद्धा देव धर्म सोडायला तयार नाहीत ह्याची कारण वेगळीच आहेत. ती कारणे कोणती ह्या वर पहिली चर्चा झाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 06/22/2020 - 14:24 नवीन
संजय क्षीरसागर, १.
तो एवढा काही मोठा लफडा नाही.
तेच तर मी सांगतोय. तुम्ही ओलांडलेला लफडा आमच्यासाठी बराच मोठा आहे. तुमच्यासाठी नसेल कदाचित. २.
परत शांतपणे समोर बघा
ही शांतीच तर बेटी गायब आहे. म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच. तुम्ही देव मोडीत काढायला निघालात. त्यामुळे लोकं शांत न होता क्षुब्ध होतात. खळबळलेल्या मनात यथार्थ बिंब कसं प्रकट होणार? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 06/22/2020 - 15:17 नवीन
> म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच. तुम्ही देव मोडीत काढायला निघालात. त्यामुळे लोकं शांत न होता क्षुब्ध होतात. खळबळलेल्या मनात यथार्थ बिंब कसं प्रकट होणार? तुम्ही नेमका मुद्दा काढलात ! प्रचंड धन्यवाद ! अशी चर्चा झाली तर संकेतस्थळाचं भाग्यच ! ____________________________ आपणच तर ती शांती आहोत ! आणि नामस्मरणामुळेच तर ती भंगतेयं, म्हणजे ती हरवल्याचा भास होतोयं. हेच तर मी कित्येक प्रतिसादात सांगतोयं, पण लोकांनी अशी काही जालीम स्तोत्रं आणि मंत्र, दशकानु दशकं घोकलेत की त्यांना वाटतं, आता आणखी घोकू, आलोयं जवळच ! जोपर्यंत ही नामस्मरणाची घंटा बंद होत नाही, तोपर्यंत शांतीशी, आपल्या स्वरुपाशी आपण कनेक्ट होणं असंभव आहे पण पब्लिक विडंबनं काय टाकतंय, कविता काय पाडतायंत, खरडफळा काय बडवतायंत, धागा काय भरकटवतायंत, काय वाट्टेल ते चाललंय ! _______________________________ बघा एकदम साधी गोष्ट आहे : देव हा भंकसपणा आहे कारण त्याच्या बारश्यापासून सगळे सोहोळे आपणच केलेत. आपण मूळातच मौन आहोत, भाषा शिकायला लागते, मौन आपला स्वभाव आहे. तस्मात, संस्कृत काय, वेदघोष काय, मंत्र-स्त्रोतं काय सगळी भंकस आहे शांती आपण खुद्द आहोत, शांतीपासून दूर जाण्याचा उपायच नाही कारण शांती भंग होऊच शकत नाही, मग तुम्ही काय वाट्टेल ती बोंब मारा ! पण या नामघोषानी आपलं अवधान मात्र स्वतःकडे येण्याऐवजी, नामघोषाकडे लागून राहतं आणि मग जन्मभर आपण शोधत राहतो, आणि मग म्हणतो : ही शांतीच तर बेटी गायब आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 06/22/2020 - 18:40 नवीन
संजय क्षीरसागर, मला वाटतं की शांती हा कळीचा मुद्दा आहे. नाम घेतल्याने तुमची शांती बिघडते. याउलट इतरांना ती प्राप्त होत असावी. हे असं का याचा शोध घ्या म्हणून सुचवेन. मी ही घेईन. मला काही सापडलं तर सांगेन तुम्हांस. मी इथे थांबतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 04:20 नवीन
फार बेसिक मिस्टेक केलीत गामाश्री ! शांती तुमची, माझी, इतरांची असा प्रकारच नाही. माझी बिघडते, तुमची वाढते ही कल्पनाच अनुभवशून्यता दर्शवते. शांतता एकच आहे आणि ते आपल्या सर्वांचं मूळ स्वरुप आहे. स्वरूप याचा अर्थ जे आपण मुळातच आहोत. भाषा शिकावी लागते, शांतता आपण खुद्द आहोत. शांतता आणि माझ्यात काहीही फरक नाही, तस्मात माझी शांतता कमी जास्त होण्याचा प्रश्रच नाही. तुम्हाला प्रतिसाद कळला तर तुमचा शोध संपेल ! मला काहीही शोधायची गरज उरलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 06/23/2020 - 14:41 नवीन
संजय क्षीरसागर, तुम्ही शांतिस्वरूप आहात हे मान्य. तसे असूनही तुमच्या विधानांवर लोकं इतके प्रक्षुब्ध का होतात, हे एक गूढच आहे. त्याचा छडा लावणे रोचक ठरावे. उपरोक्त विरोधाभासावरून माझ्या एका जुन्या संदेशाची आठवण झाली. 'प्रेक्षकाचं मन क्षुब्ध राहिलं तर त्या कलाकृतीतून बोध घेता येईल का', असा प्रश्न उपस्थित केला होता. संदर्भ : https://www.maayboli.com/comment/3555998#comment-3555998 असो. काहीही शोधायची गरज तुम्हाला उरलेली नाही म्हणता, तर या धाग्याचं प्रयोजन काय? हे देखील एक गूढच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 15:31 नवीन
१. > तुमच्या विधानांवर लोकं इतके प्रक्षुब्ध का होतात कारण त्यांच्या धारणांना धक्का बसतो ! आणि अशा चुकीच्या धारणांचा समुच्चय म्हणजेच : व्यक्तिमत्व ! अहंकार म्हणजे व्यक्तिमत्व, परंपरागत अध्यात्मातल्या विनम्रभावनं ते फक्त मॉडिफाय होतं. धारणा संपल्या की व्यक्ती मुक्त होते. आणि तर्कसंगत विचार करणार्‍यांना, धारणा मोडीत निघाल्यानं अतीव शांतता लाभते. _______________________________________ २. > काहीही शोधायची गरज तुम्हाला उरलेली नाही म्हणता, तर या धाग्याचं प्रयोजन काय? मला काहीही शोधायची गरज उरलेली नाही, आणि लोकांचा चुकीच्या मार्गानं चाललेला शोध थांबावा, त्यांना ही काही शोधायची गरज राहू नये . पोस्टमधे पाहा : एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
साबु Tue, 06/23/2020 - 13:46 नवीन
संक्षी जी .. एक नवीन धागा किंवा ह्यातच अजून एक प्रश्न वाढवा . जर देवाला कोणी पाहिले नाही तर तो कसा दिसतो हे पण माहिती नाही, मग त्याची चित्रे , मुर्त्या कशावरन तयार केल्या? बहुतांश फोटो हे रविवर्म्याच्या चित्रांवरून प्रेरित आहेत असं वाचलेले कुठे तरी.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 19:03 नवीन
> तर तो कसा दिसतो हे पण माहिती नाही, मग त्याची चित्रे , मुर्त्या कशावरन तयार केल्या ? तुमचं बरोबरे > सगळया चित्रकारांच्या कल्पना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साबु
R
Rajesh188 Tue, 06/23/2020 - 19:47 नवीन
String theory ni जगाची उत्पती कशी झाली हे स्पष्ट होते आणि जगाच्या उत्पत्ती बद्द्ल आता आम्हाला सर्व काही माहीत झाले आहे अशी भाषा नामांकित संशोधक वापरतात . खरे तर काहीच माहीत झालेलं नाही. तर आपल्या सारखी सामान्य लोक मला सर्व माहीत झालेलं आहे आणि बोलतो तेच सत्य आहे असे समजणार च. त्या मध्ये त्यांचा दोष नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कळस Tue, 06/23/2020 - 19:19 नवीन
जवळपास आपण सगळेच लहानपणापासून अस्तिक वातावरणात वाढलो. त्यामुळे सहाजिकच आपण सर्व अस्तिक विचारधारा मानायला लागलो. परंतु शिक्षणामुळे आपली तर्कसंगत विचार करण्याची क्षमता वाढल्याने आपण प्रत्येकाने देव आहे की नाही हा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा आणि तर्कसंगत विचार करून त्याचा निष्कर्ष काढायला हवा. हा विषय वाद घालून निकालात काढता येण्यासारखा नाही. पूर्वापार या विषयावर अनेक वाद झाले आहेत आणि होत राहतील. ज्याला देव मानायचा असेल त्यांनी जरूर मानावा, फक्त एकच विनंती की कमीत कमी एकदा धाडसाने त्याच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाच्या निकषांवर विचार करावा, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 20:08 नवीन
> त्याच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाच्या निकषांवर विचार करावा, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. बरोब्बर ! आणि विज्ञानापर्यंत जाण्याची सुद्धा गरज नाही. एक साधा विचार की मन हे जीवनाचा आधार असू शकत नाही. आणि त्यामुळे मानसिक कल्पना तर त्याहून नाही. पण लोक ज्याला श्रद्धा म्हणतात ती खरं तर भीती असते : फिअर ऑफ द अननोन ! त्यामुळे देवाची कल्पना सोडवत नाही. आधार शोधून भीतीचा संकोच होईल, पण ती जाणार नाही. भीती घालवायचा एकमेव मार्ग म्हणजे निराधार होणं ! ते आपल्याला स्वरुपाशी संलग्न करतं, कारण स्वरुप निरालंब आहे. मग व्यक्ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी होते, भीतीची जागा साहस घेतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस
R
Rajesh188 Tue, 06/23/2020 - 19:37 नवीन
अतिशय शिक्षित,लोक दिवसभर रोजच्या जीवनात तर्कसंगत विचार करून विविध क्षेत्रात चांगले काम करत असतात आणि आस्तिक पण असतात. त्या मुळे हा गैरसमज काढून टाका की आस्तिक लोक तर्कसंगत विचार करत नाहीत. देव नाकरा ,धर्म नाकारा ह्याची जाहिरात कशाला करताय,आग्रह कशाला धरताय लोक समजदार आहेत काय नाकारायचे ह्याचे उत्तर ते स्वतः शोधतील.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 20:14 नवीन
दोनशे २२५ मधले जवळजवळ ३०/४० प्रतिसाद तुमचे असतील ! तुम्ही फक्त एकदा तर्कसंगतीनं देव सिद्ध करुन दाखवाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Tue, 06/23/2020 - 19:52 नवीन
आता सर्व व्यवसाय झाला आहे आताचे संशोधक च विज्ञान चे सर्व नियम पडताळून न पाहता शोध निबंध प्रसिद्ध करतात. सर्व नियम पाळून शोध निबंध प्रसारित करण्याचे प्रमाण फक्त 18% टक्के आहे बाकी खोटे पुरावे जोडणे ,दुसऱ्या नी शोधलेले पुरावे स्वतःच्या नावा वर देणे,भलत्याच प्रयोगाचे पुरावे निष्कर्ष वापरणे असले उद्योग करतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/23/2020 - 20:12 नवीन
संजय क्षीरसागर,
लोकांचा चुकीच्या मार्गानं चाललेला शोध थांबावा, त्यांना ही काही शोधायची गरज राहू नये .
मला वाटतं की लोकांचा चुकीच्या मार्गाने चाललेला शोध तसाच चालू राहू द्यावा. जेणेकरून त्यांना वस्तू गवसल्याचा आनंद लाभेल. या समाधानावर तुम्ही गदा आणीत आहात, अशी काहीशी लोकांची धारणा होत आहे. (परत तिच्यायला धारणा उपटलीच!) तुमचा मार्ग विहंगम आहे हे मान्य. पण मुंगीला जर आपला प्रवास थांबवून उलटं जायला सांगितलं तर ते पटणार नाही आणि रुचणार तर नाहीच नाही. पुढे अमुकेक अडचणी येण्याची शक्यता आहे, इतकं मार्गदर्शन तिला पुरे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 20:22 नवीन
> तुमचा मार्ग विहंगम आहे हे मान्य. पण मुंगीला जर आपला प्रवास थांबवून उलटं जायला सांगितलं तर ते पटणार नाही अहो कुठली मुंगी आणि कसला विहंगम मार्ग ? एकदा सगळंच सत्य आहे म्हटल्यावर आपण ही सत्यच आहोत ! ते ही आत्ता आणि इथेच ! कशाला पुढे कळेल, शोधू दे ? तुम्हाला कळलं असेल तर जयघोष करा, नाही तर पुन्हा वाचा ! नक्की कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
R
Rajesh188 Tue, 06/23/2020 - 20:30 नवीन
गा मा जी फक्त एका व्यक्तीला पेटवण्यासाठी कशाला रक्त आठवतंय. त्यांना योग्य वाटत ते त्यांनी ठरवावे आपल्याला योग्य वाटत आहे ते आपण करणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Tue, 06/23/2020 - 20:33 नवीन
तुम्ही फक्त एकदा तर्कसंगतीनं देव सिद्ध करुन दाखवाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Tue, 06/23/2020 - 20:48 नवीन
मी देव आहे हे प्रत्यक्ष विज्ञान च्या कसोटी वर सिध्द करू शकत नाही कारण देवाचे स्वरूप नक्की काय आहे हे माहीत नाही. पण विश्वास मात्र आहे की पृथ्वी वरील जीव सृष्टी निर्माण करणार कोणी तरी आहे (विश्व विषयी बोलत नाही तो विषय अतिशय अवघड आहे) काही रासायनिक क्रिया होवून सुध्म जीव तयार होतात पण जटिल यंत्रणा असलेले जीव कसे तयार झाले हेच कोणाला माहित नाही. कधी rna कारणीभूत आहे असा समज झाला पण तो स्वतःची कॉपी करत नाही. Kadhi dna कारणीभूत आहे ही शक्यता वर्तवली गेली पण अजुन तरी त्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही. शेवटी जे मटेरियल जटिल जीवन निर्माण करण्यास कारणीभूत आहे ते नष्ट झाले आहे आणि आता अस्तित्वात नाही हा सोयीचा मार्ग निवडला गेला. हा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा मी काय सर्वच देव नाकरातील तो पर्यंत संयम ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शा वि कु Wed, 06/24/2020 - 04:54 नवीन
काही रासायनिक क्रिया होवून सुध्म जीव तयार होतात पण जटिल यंत्रणा असलेले जीव कसे तयार झाले हेच कोणाला माहित नाही. कधी rna कारणीभूत आहे असा समज झाला पण तो स्वतःची कॉपी करत नाही. Kadhi dna कारणीभूत आहे ही शक्यता वर्तवली गेली पण अजुन तरी त्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही. शेवटी जे मटेरियल जटिल जीवन निर्माण करण्यास कारणीभूत आहे ते नष्ट झाले आहे आणि आता अस्तित्वात नाही हा सोयीचा मार्ग निवडला गेला. हा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा मी काय सर्वच देव नाकरातील तो पर्यंत संयम ठेवा.
ह्या गोष्टींची उत्तर माहित नाहीत असे म्हणण्यास काय हरकत आहे ? बळेच देवाने केले म्हणण्यास काय अर्थ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गामा पैलवान Tue, 06/23/2020 - 23:24 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझं मत सांगतो. १.
अहो कुठली मुंगी आणि कसला विहंगम मार्ग ? एकदा सगळंच सत्य आहे म्हटल्यावर आपण ही सत्यच आहोत ! ते ही आत्ता आणि इथेच !
मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना? २.
तुम्हाला कळलं असेल तर जयघोष करा, नाही तर पुन्हा वाचा ! नक्की कळेल.
हे पटलं. नामस्मरण असंच असतं. जोवर अनुभूती येत नाही तोवर जयघोष करायचा असतो. मनातल्या मनांत. एखादी गोष्ट परत परत सांगितली की ती खरी वाटू लागते, असं सु/कु प्रसिद्ध डॉक्टर गोबेल्स म्हणून गेलेत. नामस्मरण ही या नियमाची भारतीय परंपरेतली आवृत्ती आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 06/24/2020 - 00:23 नवीन
एव्हढे बोलुन मी माझे भाशण संपवतो :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कोहंसोहं१० Wed, 06/24/2020 - 01:57 नवीन
@गामा पैलवान, तुम्ही शांतिस्वरूप आहात हे मान्य. माया ही अशी आश्चर्यजनक नदी आहे की ती ओलांडल्यावर मागे वळून पाहता नाहीशी होते. तुम्ही मायानदी ओलांडली आहे हे मान्य >>>>>>> तुम्ही वरील वाक्ये संक्षींना उद्देशून लिहिली आहेत ते खरोखर तुमचे त्यांच्याविषयीची प्रामाणिक मत आहे की उपरोधपणाने लिहिली आहेत? उपरोधिक असतील तर ठीक. परंतु तुमचे तसे प्रामाणिक मत असेल तर खालील 'सत्य' जरूर ध्यानात घ्यावे आणि मगच आपले मत बनवावे. १. जो मनुष्य देवाचे नाव काढले की चवताळून फक्त देव नाही हेच दहावेळा सान्गत बसतो तो शांतीप्रिय असू शकेल? २. मिपावर गोंधळ घातल्यामुळे ज्याला तब्बल ३ वषे मिपावरून ब्लॉक करण्यात आलं होतं तो शांतीप्रिय असू शकेल? ३. जो मनुष्य स्वतःच्या दुराग्रहाखातर आणि अहंकारामुळे ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस अशा वंदनीय महापुरुषांना चुकीचे आणि भ्रमित ठरवतो, मी म्हणतो तेच बरोबर आणि बाकी सगळं झूट अशी टिमकी लावत बसतो त्याने हि मायानदी पार केली असे खरेच तुम्हाला वाटते? ४. ज्याला ईश्वराचे अस्तित्व मान्य नाही, जो मनुष्य रामायण, महाभारत केवळ कविकल्पना आहेत, राम कृष्ण, कालीमाता सर्व कल्पना आहेत हे टेप लावत बसतो, देवाचे नाव कोणी ठेवले असले निरर्थक प्रश्न विचारत बसतो तो मायानदी ओलांडून पैलतीरी पोहोचायची शक्यता खरीच आहे असे तुम्हाला वाटते? ५. जो मनुष्य "आयडी ब्लॉक झाला नसता सत्तांतर होण्याची शक्यता होती" असली फाजील आणि भंपक विधानं करतो आणि पुन्हा त्याला डिफेन्ड करण्याचा प्रयत्नही करतो, मेमरी स्ट्रिंग प्रत्यारोपण असली अवैज्ञानिक विधाने करून इतरांना वैज्ञानिक प्रोसेस (तेही अर्धवट आणि चुकीची) सांगायला बघतो आणि वैज्ञानिक पुरावे मागतो आणि त्यांना मागितल्यास त्याकडे धादांत दुर्लक्ष करतो तो मायेपलीकडे गेला असू शकेल? ६. ज्या माणसाला सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म यांचे एकत्व अनेकदा समजावून सांगितले तरी मान्य नाही, सर्वच सत्य असेल तर सगुण पूजा पण सत्यच हे कळून घ्यायचे नाही त्याने मायेवर विजय मिळवला असेल असे तुम्हाला वाटते? आता याची दुसरी बाजू पाहुयात. आपल्याकडे योगमार्गाचे आणि ज्ञानमार्गाचे बरेच संत होऊन गेले परंतु त्यातल्या अनेकांनी भक्तिमार्गाला पाठिंबाच दिला आहे. ज्ञानदेव माउलींनी हरिपाठ सांगितला आहे. साक्षात्कार झाला तेंव्हा ते म्हणतात 'सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी आज हरी पहिला रे हरी पहिला'. कट्टर अद्वैतवादी शंकराचार्यांनी इतर कोणीच रचली नसतील तेवढी जवळपास सर्वच देवांची स्तोत्रे रचली आहेत, पंचायतन पूजा सांगितली आहे, अनेक देवळांची स्थापना केली आहे. रमण महर्षी, विवेकानंद यांनी सुद्धा भक्तीचे महत्व सांगितले आहे. पतंजलीनी योगसूत्रात ईश्वराचे अस्तित्व दर्शवले आहे. या सर्वांनी ज्ञान आणि भक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगून ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्त्युत्तर ज्ञान हे एकच आहे हे पण वारंवार सांगितले आहे. बाकी तुम्ही मायानदीचा विषय काढलाच आहे तर या नदीमध्ये कोण कसे बुडून जातात आणि खरे कोण तरून जातात याचे रसभरीत वर्णन आपण ज्ञानेश्वरीत वाचलेले असेलच. उगाच ४ पुस्तके वाचून केवळ बुद्धीला समजणे वेगळे आणि खरा त्या सत्याचा अनुभव येणे वेगळे हे न समजताच जो अर्धवट ज्ञानाने स्वतः सर्वज्ञ असल्याचा दावा करतो त्या अहंकारी माणसाचे मायानदीतले वर्णन सुद्धा आपण जाणतच असाल. बाकी मायानदी तरून जाण्यासाठी सद्गुरुरूपी होडीच काय तो एकमेव पर्याय हे जाणून समर्थ म्हणतात तसे सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेसी दृढ चालवावे. आणि सद्गुरू लाभ झाला नसल्यास इष्टदेवतेचा मंत्रजप, दैनिक पूजा अर्चना, ग्रंथाभ्यास किंवा चित्तशुद्धीसाठी काही साधना हेच सत्य जोपर्यंत मायेत आहोत. बाकी सर्व पोकळ गप्पा आणि शब्दांचे खेळ. आता हा सर्व संदर्भ लावून वर सांगितलेले गुण उधळणार्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की संत वचनावर याचा निर्णय करणे कोणासही फार अवघड नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Wed, 06/24/2020 - 06:49 नवीन
मेलेल्याला जीवंत करून त्याच्याकडून पुस्तक लिहून घेतलं इतकी भाबडी कल्पना मान्य करणाऱ्या व्यक्तिच्या लेखनाची दखल, कुणीही सूज्ञ घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० गुरुवार, 06/25/2020 - 23:49 नवीन
मेलेल्याला जीवंत करून त्याच्याकडून पुस्तक लिहून घेतलं इतकी भाबडी कल्पना मान्य करणाऱ्या व्यक्तिच्या लेखनाची दखल >>>>> काय लिहिताय? मेलेल्याला जिवंत करून पुस्तक लिहून घेतले हे मी कधी म्हणालो? इतरांना भ्रमित म्हणता म्हणता तुम्हीच भ्रमित झालेले दिसताय. मी न म्हणालेली वाक्यंपण आता माझ्या नावावर टाकताय. खरंच भ्रमित झालात की प्रत्युत्तर नव्हते म्हणून उगाच खोटे आरोप करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Wed, 06/24/2020 - 14:29 नवीन
कोहंसोहं१०, हा सर्व विचार संजय क्षीरसागर यांनी करायचा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
स
संजय क्षीरसागर Wed, 06/24/2020 - 08:38 नवीन
ज्या लॉजिकसाठी तुमच्याशी संवाद चालू होता, तेच हरवतंय ! १. > मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना ? काय बोल्ता ? भ्रम सत्य असेल तर मग नामस्मरण तरी कशाला ? सत्याचा शोध कशापायी ? २. > हे पटलं. नामस्मरण असंच असतं. जोवर अनुभूती येत नाही तोवर जयघोष करायचा असतो. मनातल्या मनांत. एखादी गोष्ट परत परत सांगितली की ती खरी वाटू लागते, असं सु/कु प्रसिद्ध डॉक्टर गोबेल्स म्हणून गेलेत. नामस्मरण ही या नियमाची भारतीय परंपरेतली आवृत्ती आहे. मग भ्रम गहन झाला की तोतापुरींसारखा अवलिया बोलवावा लागतो, जो एका झटक्यात सगळा भ्रमनिरास करतो ! त्यापेक्षा माझं काम किती डेलिकेट आहे पाहा : नुसतं शांतपणे वाचलं आणि एक साधा प्रश्न स्वतःला विचारला, की घरच्या घरी, बसल्या बसल्या, देव गुल ! देवाचं नांव कुणी ठेवलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 06/24/2020 - 14:25 नवीन
संजय क्षीरसागर, १.
सत्याचा शोध कशापायी ?
मलाही हाच प्रश्न पडलाय. लोकांनी त्यांचे भ्रम जरूर जोपासु द्यावेत. आपल्याला आपल्यापुरतं सत्य समजलं की झालं. २.
एक साधा प्रश्न स्वतःला विचारला, की घरच्या घरी, बसल्या बसल्या, देव गुल ! देवाचं नांव कुणी ठेवलं ?
जो स्वसंवेद्य आहे त्यानेच हे नाव ठेवलं. ॐ आणि अथ हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले. संदर्भ : http://dnyaneshvari.blogspot.com/2012/02/blog-post.html आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 06/24/2020 - 14:51 नवीन
१. तुम्ही म्हटलं होतं : मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना ? त्यावर मी तो प्रतिसाद दिला आहे. २. > लोकांनी त्यांचे भ्रम जरूर जोपासु द्यावेत. आपल्याला आपल्यापुरतं सत्य समजलं की झालं. तुम्ही भ्रम जोपासा, मी सत्याचा उद्घोष करत राहीन > काय प्रॉब्लमे ? ३. > जो स्वसंवेद्य आहे त्यानेच हे नाव ठेवलं. ॐ आणि अथ हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले ? अहो, सत्य ही ध्वनीपूर्व स्थिती आहे. इतका वेळ तुम्ही ज्या` शांतीची' चर्चा करत होतात, ती स्थिती आहे. ती अनिर्मित स्थिती असल्यानं तिथे उच्चारणाला काही अर्थच नाही, मग ते ॐ असो का आणखी काही. ४. > हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले ? हा ब्रह्मदेव आता कुठून काढला ? तो कुणाला आणि केंव्हा भेटला होता ? त्याच्या कंठातून ॐ आणि अथ हे शब्द आल्याचं त्या ब्लॉगवाल्याला कसं कळलं ? आणि आता बॅक टू स्क्वेअर वन ! त्याचं ब्रह्मदेव हे नांव कुणी ठेवलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
R
Rajesh188 Wed, 06/24/2020 - 15:02 नवीन
माणूस बोलायला कधी लागला आणि भाषा कधी निर्माण झाल्या आणि भाषा शोधून काढणाऱ्या लोकांची नावं काय आहेत. त्या बाबत पुरावा आहे का. मला वाटतं ह्या प्रश्नांची पहिली उत्तर शोधली पाहिजेत त्या नंतर देवाचे. नाव कोणी ठेवलं? हा प्रश्न समजायला सोपा जाईल. नाव ठेवण्यासाठी पहिली भाषा हवी ना. तर माझी धागा कर्त्याला विनंती आहे ह्याची उत्तर द्यावीत.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 06/24/2020 - 15:20 नवीन
माणूस बोलायला लागल्यावर, त्यानं देवाचं नांव ठेवलं ! थोडक्यात ही सगळी माणसाची करामत आहे, मग भाषा कुणी का शोधली असेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Wed, 06/24/2020 - 15:30 नवीन
भाषा असेल तरच नाव ठेवणार ना. त्या मुळे हा प्रश्न तुमच्या धाग्या शी संबंधित आहे. हा प्रश्न टाळू नका. 1) माणूस बोलायला कधी लागला? 2) आणि भाषा कशा निर्माण झाल्या त्या कोणी शोधल्या? आणि पुरावा सहित उत्तर ध्या. तुम्ही पुरावा शिवाय विश्वास ठेवत नाही ना . तुमच्या पोस्ट वाचून आमच्यात पण तो गुण आलंय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
R
Rajesh188 Wed, 06/24/2020 - 15:44 नवीन
असे कसे . मग ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघतील. भाषा माणसांनी शोधल्याच नाही. भाषेचा निर्माता माणूस नाही असे आम्ही म्हणू शकतो. त्या साठी तुम्हाला हे सिध्द करावेच लागेल पुरावा देवून की. भाषा मानव निर्मित आहेत आणि अमका तमका त्याचा शोध कर्ता आहे. आणि हे त्याचे पुरावे . तुम्ही देवून takach
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 06/24/2020 - 15:55 नवीन
पुनश्च. भाषेचा उगम कुठून झाला हे माहित नाही असा तर्क काढला तरी भाषेची निर्मिती देवाने केली असे म्हणून तुम्ही मोकळे झाला तरी तुमच्या दावा अर्थपूर्ण होणार नाही. काय राव राजेश. एव्हाना आम्हाला तुमचे सगळे आर्ग्युमेन्ट कळाले. तुम्ही मात्र अजून तोच तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
श
शा वि कु Wed, 06/24/2020 - 15:57 नवीन
पुनश्च. भाषेचा उगम कुठून झाला हे माहित नाही असा तर्क काढला आणि त्यावरून भाषेची निर्मिती देवाने केली असे म्हणून जरी तुम्ही मोकळे झाला म्हणजे काय तुमचा दावा अर्थपूर्ण होत नाही. काय राव राजेश. एव्हाना आम्हाला तुमचे सगळे आर्ग्युमेन्ट कळाले. तुम्ही मात्र अजून तोच तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
R
Rajesh188 Wed, 06/24/2020 - 15:59 नवीन
तुमच्या सोयीचा अर्थ काढण्यासाठी तुम्ही सर्व प्रश्न उडवून लावताय. ज्याची उत्तर माहीत नाहीत. ज्या प्रश्नाची उत्तर माहीत नसतात त्या प्रश्नांची संभाव्य उत्तर एका पेक्षा जास्त असतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा