देवाचं नांव कुणी ठेवलं ?
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
💬 प्रतिसाद
(379)
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 12:21
नवीन
आणि तुमचा तर्कही काही वेळा काम करतो, म्हणून तुमच्यासाठी एक प्रयत्न करतो.
१. > इलेक्ट्रॉन देखील कुणीही पाहिला नाहीये. त्याचीही केवळ कल्पनाच करता येते. त्याचं थेट रूप न दिसता ती कल्पना गणिती समीकरणांच्या मार्गे मांडावी लागते.
सत्य सिद्ध आहे !
ती इलेक्ट्रॉनसारखी (किंवा देवासारखी) कल्पना नाही.
सिद्ध याचा अर्थ जे ऑलरेडी प्रूव्ड आहे,
ज्याच्या पुष्टीकरणार्थ कोणताही पुरावा सादर करण्याची गरज नाही.
आता हे शांतपणे वाचा :
जगात एकमेव विधान असं आहे ज्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही, ते म्हणजे : मी आहे !
बाकी कोणतीही गोष्ट सिद्ध करायला लागेल,पण
`मी नाही' म्हणायला सुद्धा, तुमचं असणं अनिवार्य आहे.
आणि हा `मी' सार्वजनिक आहे.
तो आपल्या सर्वांचा एकच आहे.
त्यामुळे तो स्थानबद्ध नाही.
________________________________
मी नव्हतो किंवा मी नसेन या सुद्धा कल्पना आहेत कारण त्या देहाधारित आहेत.
थोडक्यात, मी नव्हतो किंवा मी नसेन हा कुणाचाही अनुभव नाही.
तस्मात, मी आहे हे विधान कालबद्ध नाही.
__________________________
याचं एकच कारण आहे ते म्हणजे आपणच सत्य आहोत !
आणि ही इतकी उघड गोष्ट आहे की त्यासाठी देव, इलेक्ट्रॉन, किंवा काहीही मधे आणण्याची गरज नाही.
________________________________________
मग लफडा काये ?
तर प्रत्येक जण `मी आहे' हा व्यक्तिगत आणि खाजगी मामला समजतो !
प्रत्येकाला असं ठामपणे वाटतं की तो विशिष्ठ देह आणि नांव असलेली व्यक्ती आहे.
हा भ्रम युगानुयुगं, मानसिकतेत इतका खोल गेला आहे की बोलता सोय नाही.
त्यात संत महंतांनी `निर्गुण प्राप्तीसाठी सगुणोपासनेचं' असं काही स्तोम माजवलंय की
एकालाही आपण सत्य आहोत ही उघड गोष्ट मान्य करायची लाज वाटते !
आणि त्यापुढे जाऊन तसं म्हणणं म्हणजे अहंकाराची भाषा समजली जाते.
_________________________________
वास्तविकात, अहंकार हा चुकीच्या धारणांचा एकत्रित परिणाम आहे.
स्वतःला व्यक्ती समजणे आणि मग स्वतः सत्य असतांना, ते प्राप्त करण्याचा घाट घालणे
हा खरा अहंकार आहे कारण `अहं-आकार' या मूलभूत धारणेतून तो निर्माण झाला आहे.
__________________________________
तस्मात, देव ही मानवी कल्पना न सत्यप्राप्तीसाठी गरजेची,
न तीच्यामुळे कुणाला काही संरक्षण, न कृपा, न कोप.
देवच नाही म्हटल्यावर त्याचं तुम्हीच ठेवलेलं नांव,
त्याच्या इतकंच निरुपयोगी आहे ही उघड गोष्ट आहे.
थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि
कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका.
उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा.
दुसर्याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/28/2020 - 08:57
नवीन
देवाचं नाव माणसाने ठेवलं यावर एकमत झाल्याबद्दल सर्वांचे आभार.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sun, 06/28/2020 - 09:01
नवीन
:))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 06/28/2020 - 09:07
नवीन
अर्थात,
दरवर्षी आम्ही देवाचा जन्म भक्तिभावे अगदी पाळण्याला झोके देऊन साजरा करतो त्यामुळे नाव ठेवणे क्रमप्राप्त आहे.
.
नाव ठेवणाऱ्या माणसाचा वंशज
अभ्या
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 06/28/2020 - 10:01
नवीन
चूक होते आहे अभ्या...! (ह्या धाग्यावरचे पॉप्युलर विधान..)
इथे माहीत असलेल्या देवाला त्याचे माहीत असलेले नाव देतोयस तू.
हा म्हणजे "तुम्हारा नाम क्या है बसंती" सारखा प्रकार आहे.
पण ते असो ह्या निमित्ताने हा २९९ वा प्रतिसाद..
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 06/28/2020 - 10:15
नवीन
बरे. माझी चुक झाली.
खरे तर देवाला देव का म्हणायचे सुरुवात आहे माझी पण हरकत नाही.
धडकनमध्ये सुनील शेट्टी "देव" नाव घेऊ शकतो तर कसलीच हरकत नाहीये खरोखर.
.
३०० झाले ब्वॉ.
झरक्सिस खुष हुवा.
आहू........
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 06/28/2020 - 09:36
नवीन
३०० तरी होऊ द्यायचे. ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 06/28/2020 - 09:47
नवीन
तुम्ही घ्या मनावर. पास न देता खेळा टिच्चून मग ३०० काय ५०० पण कमी पडतील.
बाकी सगळ्याबाबत आम्हाला आदरच आहे.
सद्य परिस्थितीत दोन चार प्लस वण ठोका सहमतीचे. होतील ३००.
.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 06/28/2020 - 11:03
नवीन
नको.
मी तेवढ्यासाठी जुना धागा वरती आणतोय.
चितळेसाहेबांच्या धाग्याला फक्त ८८ प्रतिसाद?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/28/2020 - 13:36
नवीन
आता हे शांतपणे वाचा :
आता शांतपणे वाचा :
आता हे तर खरंच शांतपणे वाचा :
आता परत वरचा ४ शांतपणे वाचा !
आता नीट वाचा :
पुन्हा वाचा :
वर २. वाचा
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 14:08
नवीन
तस्मात, देव ही मानवी कल्पना न सत्यप्राप्तीसाठी गरजेची,
न तीच्यामुळे कुणाला काही संरक्षण, न कृपा, न कोप.
देवच नाही म्हटल्यावर त्याचं तुम्हीच ठेवलेलं नांव,
त्याच्या इतकंच निरुपयोगी आहे ही उघड गोष्ट आहे.
थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि
कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका.
उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा.
दुसर्याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/28/2020 - 15:55
नवीन
या धाग्यावर लोकांना "देव नाही" हे सांगण्याची तुम्हाला इतकी नशा चढली आहे की माझ्यासारख्या नास्तिकालाही तुम्ही "देव नाही" हे सांगत आहात.
भानावर या संजयजी :)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 16:19
नवीन
>आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ ?
केंव्हा झाला हा बदल ? आणि कशामुळे ?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/28/2020 - 16:56
नवीन
ज्या तत्परतेने तुम्ही खोदकाम केलेत त्याला दाद द्यायला हवी.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 17:18
नवीन
काही हरकत नाही.
पण विचारसरणीत बदल कशामुळे झाला ?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/28/2020 - 18:31
नवीन
>> ४ वर्षाला युगे म्हणतायं !
अहो गंमतीत म्हटलं होतं ते. तुम्ही लगेच माझा तो प्रतिसाद मी केव्हा दिला होता पाहून आलात ना. :)
>> पण विचारसरणीत बदल कशामुळे झाला ?
मिपावरील समाज प्रबोधन करणारे नास्तिक लोकांचे लेख वाचून मलाही नास्तिक व्हावंसं वाटू लागलं. मग मी लगेच अमेझॉनवरुन How to be an atheist in 21 days हे पुस्तक मागवलं. त्या पुस्तकाच्या फिलॉसॉफीनुसार रोज एक चाप्टर वाचू लागलो. २१ व्या दिवसाच्या रात्री रिचर्ड डॉकिन्स माझ्या स्वप्नात आला आणि नास्तिकपंथाचा गंडा माझ्या हातावर बांधला. माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशिर्वाद दिला, "आजन्म नास्तिक भव". बाविसाव्या दिवशी सकाळी मी अंतर्बाह्य नास्तिक झालो होतो.
जोक्स अपार्ट, सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणं ही मी वैयक्तीक बाब मानतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी उचित समजत नाही. क्षमस्व.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 18:59
नवीन
ही मी वैयक्तीक बाब मानतो ?
काय सांगता ?
पण इथे तर तुम्ही मोठ्या झोकात, पब्लिक फोरमवर म्हटलंय :
" माझ्यासारख्या नास्तिकालाही तुम्ही "देव नाही" हे सांगत आहात. "
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/28/2020 - 19:09
नवीन
ही मी वैयक्तीक बाब मानतो हे मी नास्तिक का आहे याची चर्चा मला करायची नाही अशा अर्थी होतं ते.
>> पण इथे तर तुम्ही मोठ्या झोकात, पब्लिक फोरमवर म्हटलंय
हो, मला माहिती नव्हतं मी तसं लिहीण्याने तुमच्या भावना दुखावतील. सॉरी हा.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 19:17
नवीन
ज्या ठामपणे तुम्ही लिहीलंय ते वाचून नवल वाटलं.
सगळा लेख तर देव ही कल्पना आहे यावर आहे.
तुमचं अजून नक्की ठरत नाही असं म्हणा !
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/28/2020 - 19:22
नवीन
>> तुमचं अजून नक्की ठरत नाही असं म्हणा !
तुम्हाला वाटतंय ना, मग तसंच असणार ते.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 19:07
नवीन
त्यानं एकतर नामस्मरणात बाधा येईल आणि
`शांत झोप ' जाऊन `जाग येईल' ते वेगळंच !
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 06/28/2020 - 19:38
नवीन
:)
आमेन
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 19:44
नवीन
अभिनंदन.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 06/29/2020 - 05:59
नवीन
एकच गोष्ट साध्य करायला विविध मार्ग असतात हे पटलं तर.
:)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/29/2020 - 07:13
नवीन
पळवाट शोधायचा तुम्हाला `नवीन मार्ग' सापडला,
असा अर्थ आहे !
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 06/29/2020 - 07:57
नवीन
:)
आमेन.
:)
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Mon, 06/29/2020 - 10:07
नवीन
हे एक नंबर आहे.
नामस्मरणाने हजरजबाबीपणा वाढतो. :)
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 06/29/2020 - 10:29
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Mon, 06/29/2020 - 09:09
नवीन
देवाची कृपा, अजुन काय !! ;)
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sun, 06/28/2020 - 18:08
नवीन
खुदा
बुरा लगा तो होगा ऐ खुदा तुझे,
दुवा में जब,
जम्हाई ले रहा था मैं―
दुआ के इस अमल से थक गया हूँ मैं !
मैं जब से देख सुन रहा हूँ,
तब से याद हैं मुझे,
खुदा जला बुझा रहा है रात दिन,
खुदा के हात मैं हे सब बुरा भला―
दुआ करो !
अजीब सा अमल है ये
ये एक फर्जी गुफ्तगू,
और एकतर्फ़ा― एक ऐसे शख्स से,
ख्याल जिसकी शक्ल है
ख्याल ही सबूत है ।
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 18:44
नवीन
अजीब सा अमल है ये
ये एक फर्जी गुफ्तगू,
और एकतर्फ़ा― एक ऐसे शख्स से,
ख्याल जिसकी शक्ल है
ख्याल ही सबूत है ।
__________________________
अजीब आलम है दोस्तों तुम्हारा,
अगर कोई खुदासे बातें करें तो जमानेने
उसे सर-आखोंपे बिठा लिया, और
अगर कोई खुदसे बातें करे तो उसे
पागलखाना करार दिया |
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 20:39
नवीन
किती सुरेख कविता आहे ही, तीचा मराठीत अर्थ असा !
देवा, तुझी प्रार्थना चालू असतांना मला जांभई आली;
तुला नक्कीच वाईट वाटलं असणार.
तुझ्या या पवित्र प्रार्थनेनं,
मी आता थकलोयं.
जेंव्हापासनं मी ऐकतोय आणि पहातोयं,
तेंव्हापासून मला आठवतंय की
देव दिवस-रात्र उजळवतो आणि मालवतो,
देवाच्या हातात सगळ्यांचं भलं-बुरं आहे -
प्रार्थना करा !
अजब पावित्रता आहे ही,
हा एक फसवा संवाद,
जो एकतर्फी आहे - आणि तोही अशा व्यक्तीशी,
की कल्पनाच जिचा चेहरा आहे, आणि
कल्पनाच जीचा पुरावा !
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Mon, 06/29/2020 - 06:47
नवीन
अमल चा हिंदी अर्थ अपवित्रता आहे, पण तो इथे त्या अर्थाने वापरला नसावा. इथे उर्दू अमल अभिव्यक्त आहे. नशा, अमली पदार्थांमधला अमल.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/29/2020 - 07:08
नवीन
अमलचा हिंदी अर्थ निर्मल, स्वच्छ असा आहे आणि ते उपहासात्मक आहे.
उर्दू शब्द म्हणून तुम्ही म्हणता तसा `नशेचा अंमल' हा पण एक अँगल आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 06/29/2020 - 08:38
नवीन
ओळी आवडल्या.
इथे अमल चा अर्थ जबरदस्ती असा असावा. (अमलबजावणी वा अमलात आणणे मधला अमल)
माहौल हा अर्थ असावा..
म्हणजे एकुण कवितेचा अर्थ खयाली पुलावा मधल्या पुलावाला कित्ती चविष्ट आहे असे म्हणण्याची जबरदस्ती करुन थकुन गेलोय असे म्हणायचे असावे कवीला असे वाटते.(चुभुदेघे.)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/29/2020 - 09:00
नवीन
ते वरच्या प्रतिसादात दिलेत.
अर्थात, तुम्ही काढलेला निष्कर्श :
> एकुण कवितेचा अर्थ खयाली पुलावा मधल्या पुलावाला कित्ती चविष्ट आहे असे म्हणण्याची जबरदस्ती करुन थकुन गेलोय असे म्हणायचे असावे कवीला असे वाटते
एकदम करेक्टे !
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Mon, 06/29/2020 - 09:14
नवीन
खरंय कायो. हा पण अर्थ जमतोय.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 06/28/2020 - 19:31
नवीन
कोणी तरी सांगितलं देव आहे आणि जगभरातील लोक देव आहे असे मानायला लागले पूजा अर्चा करायला लागले असे घडले नाही.
किती तरी वर्ष गेली असतील ह्या मध्ये.
त्या पासून निरंतर बदल होत गेले आणि अजुन पण होत आहेत .
पण देव (भले कल्पना असली तरी अजुन घट्ट टिकून आहे)
एकादी कल्पना (सिध्द करता येत नाही म्हणून कल्पना असे म्हणुया)हजारो वर्ष टिकून राहण्याचे हे एकमेव उदाहरण असावे.
पण देव ,माणसाच्या प्रगतीत आडवा पण आला नाही लोकांनी श्रद्धा पण ठेवली आणि नव नवीन शोध पण लावले.
विज्ञान आणि श्रद्धा ह्यांची भेसळ न केल्या मुळे च ते शक्य झाले.
आता सरळ सरळ एक काही तरी निवडा असा अतिरेकी विचार काही लोक करत आहेत.
विज्ञान तरी निवडा नाही तर देव तरी निवडा
हा अतिरेक आहे त्या ची विक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून लोक त्याचा विरोध करतात.
शोध चालू आहे निर्मात्याचा.
तो प्रश्न निकाली निघणार नाही इतक्यात कारण अजुन पण खूप काही सिध्द होणे बाकी आहे.
जसा काळ पुढे सरकत जाईल आताचे शोध सुद्धा खोटे ठरतील सत्य काही वेगळेच आहे अश्या नवीन गोष्टी माहिती पडतील.
आणि एक दिवस देव सत्य की कल्पना हे पुराव्या सहित सिद्ध होईल .
तो पर्यंत wait and watch .
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 19:40
नवीन
म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.
आणि तुमच्या मते तुमच्यासारखे ९८ % लोक आहेत !
म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.
________________________________
हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 06/28/2020 - 20:03
नवीन
धार्मिक लोक प्रगल्भ नसतात आणि नास्तिक प्रगल्भ असतात ( भले संख्येने नगण्य असले तरी).
हे पण तुम्हीच ठरवत आहात.
हाच तो हट्ट वादी पना तुमच्या स्वभावात आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 20:09
नवीन
> धर्म अस्तित्वात आले नसते तर आताच सुनियोजित समाज,कुटुंब अस्तित्वात आलीच नसती.
हे पण ठाम मत आहे > 28 Jun 2020 - 9:33 pm | Rajesh188
हे तुम्ही लिहिलंय !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 06/28/2020 - 20:56
नवीन
हट्ट वादी पना सोडा लोकांना ठरवू ध्या त्यांना काय योग्य वाटते ते.
साधं सिंपल आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/29/2020 - 06:55
नवीन
म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.
आणि तुमच्या मते ९८ % लोक तुमच्यासारखे आहेत !
म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.
________________________________
हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 06/28/2020 - 21:11
नवीन
आपण समजतो तेच सर्वांनी मान्य करावे हे नास्तिक लोकांना वाटत असते.
आणि हेच लोकांना खटकते.
नास्तिक त्या मध्ये भारतीय नास्तिक हे कट्टर धर्म वेड्या व्यक्ती पेक्षा जास्त आग्रही असतात.
हे कोडेच आहे..
तुम्ही प्रगल्भ आहात ना मग तुम्ही विचाराचा अतिरेक का करताय .
आग्रह का धरत आहात.
लोकांना ठरवू ध्या ना.
नरेंद्र दाभोलकर सारखा विचारी व्यक्ती सुद्धा शालेय शिक्षणात देव नाही हे शिकवावे असा विचार व्यक्त करतो तेव्हा ही भारतात चाललेली नास्तिक चळवळ ही कट कारस्थान आणि प्रायोजित आहे असे लोकांना वाटते.
शालेय शिक्षणात देव आहे हे शिकवत नाहीत.
धर्मग्रंथ शालेय शिक्षणात समाविष्ट नाहीत.
मग देव नाही हे मात्र शाळेत शिकवा असे विचार कसे व्यक्त होवू शकतात .
प्रायोजक असल्या शिवाय भारतात असे विचार व्यक्त होवूच शकत नाहीत.
जगातील कोणत्याच देशात देव नाही हे शालीय शिक्षणात मुलांना शिकवा ही मागणी होत नाही पण भारतात तसे विचार व्यक्त होतात.
प्रतेक व्यक्ती विचार करू शकतो .
व्यक्ती व्यक्ती च्या मानवी मेंदूच्या क्षमतेत विशेष फरक नसतो.
हे तरी सायन्स स्वीकारा.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/30/2020 - 08:34
नवीन
म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.
आणि तुमच्या मते ९८ % लोक तुमच्यासारखे आहेत !
म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.
________________________________
हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 06/28/2020 - 22:21
नवीन
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
संपवणारा मी कोण? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
२.
माझा दिवसाला फक्त १५ मिनिटं नित्यपाठ असतो. बाकी काहीही करीत नाही. मात्र लोकांना याची गरज असू शकते.
३.
एकदम बरोबर.
४.
पहिली गोष्ट म्हणजे समाजाला नीतिमान करण्याची किंवा ठेवण्याची माझी जबाबदारी नाही. दुसरं असं की नीती काय व अनीती काय हे प्रसंग पाहून ठरवावं लागतं. एक उदाहरण देतो. पांडवांवर लाक्षागृहात जाळून जायची वेळ आली होती. पण त्यांच्या जागी एक स्त्री व तिचे पाच पुत्र जळून मेले. आता, या मृत्यूंना जबाबदार कोण? पांडव की दुर्योधन?
सांगायचा मुद्दा असा की ईश्वरी अस्तित्वाशिवाय ( म्हणजे देव मानल्याशिवाय) न्याय, नीती इत्यादिंना आधार प्राप्त होणार नाही.
५.
खरा देव पापपुण्यादि द्वैताच्या पल्याड आहे. मात्र देवाचा धाक असेल तर माणूस क्रूरपणे वागणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Mon, 06/29/2020 - 03:59
नवीन
हे योग्य नाही असे वाटते. स्वतःच्या व स्वतःसारख्या इतरांच्या वेल बिइंग साठी माणूस स्वतःवर आणि इतरांवर बंधनं घालून घेण्यास तयार नाही होऊ शकत, देव नसेल तर ? दैवी शक्तीने सांगितलेल्या नैतिकतेच्या नियमांमध्ये माणूस कायमच बदल करत असतो. काही नियम अगदी नव्याने वाढवत असतो. असे असताना देवाच्या अभावात नैतिकता उरणार नाही हे का म्हणावे ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/30/2020 - 08:43
नवीन
माणूस क्रूरपणे वागणार नाही ?
काय बोल्ता ?
वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय,
स्वतःचे प्राण पणाला लावण्याइतक्या इतक्या उदात्त आस्तिकतेचं
हे जगासमोर आलेलं सर्वात रिसेंट आणि अत्यंत ठळक उदाहरण आहे.
धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा,
इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 06/30/2020 - 11:01
नवीन
इथे धर्म दोषी नाही ज्यांनी केले आहे ती धर्मांध लोक होती,धर्माचा चुकीचं अर्थ लावणारे कट्टर धर्मांध,.
कट्टर म्हणजे मीच म्हणतो ते जगानी ऐकावे नाही तर त्यांना जगण्याचा हक्क नाही अशा विचाराची.
नस्तीक्ता पण वाईट आहे असे इथे कोणीच बोलत नाही
तुम्ही जो विचार करता देव,धर्मा विषयी तो सोडा असे इथे कोणी म्हणत नाही.
पण कट्टर नास्तिक बनू नका(कट्टर धर्मांध लोकांसारखे कट्टर नास्तिक) अतिरेकी विचारसरणी सोडा .
तुमच्या मताचा अतिरेक करू नका नाही तर नंतर तुमचे काहीच ऐकून घेतले जाणार नाही
आणि मी ह्या निष्कर्ष पर्यंत पोचलो आहे संजय जी हे कट्टर नास्तिक( कट्टर धर्मांध अतिरेकी विचाराचे ह्या अर्थाने) आहेत.
त्यांचे विचार कोणी ऐकले नाहीत की ते त्या वर थोपण्याचा प्रयत्न करत असतात.
हा अतिरेक च झाला .
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/30/2020 - 11:37
नवीन
धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा,
इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »