देवाचं नांव कुणी ठेवलं ?
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
💬 प्रतिसाद
(379)
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 16:02
नवीन
देवाच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे नाहीत
म्हणून त्याची दोन संभाव्य उत्तर आहेत.
देव असेल.
किंवा देव नसेल पण.
दोन्ही उत्तर नाकारता येणार नाहीत.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 16:23
नवीन
तुम्ही एक तरी प्रतिवाद प्रतिसाद वाचताय का याबद्दल शंका येत आहे.
1,2
या दोन प्रतिसादांव्यतिरिक्त सुद्धा इथे कोणीही देवाच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता नाहीच आहे. इथे केवळ आत्ता पुराव्याच्या अभावव्यर देवावर विश्वास ठेवायचा का ? हि चर्चा चालू आहे. पुन्हा विचारतो. ऍटलासच्या/शेषनागाच्या अवयवावर सम्पूर्ण विश्व सामावले आहे, त्यावर पण विश्वास ठेवायचा काय, असे असण्याची अशक्यता सिद्ध करता येत नाही म्हणून ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/24/2020 - 17:31
नवीन
इतक्या गंडलेल्या लॉजिकला सुद्धा,
तुम्ही लॉजिकल उत्तर देता !
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 18:00
नवीन
उत्सुकता आहे, तर्कामध्ये कुठेही फट उरली नाही की काय रिऍक्शन आहे पाहायची :))
पण अवघड दिसतंय.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 17:40
नवीन
इथे स्वतः धागा कर्ता आणि काही आयडी ठाम पने देव नाही असे म्हणत आहेत.
जे देव मानतात त्यांना देव भोळे ,अडाणी म्हणत आहेत हे तुमच्या वाचनात येत नाही का.
की सरळ सरळ खोटे बोलणे हे पुरोगामी होण्यासाठी आवश्यक गुण च आहे.
प्रश्न ची उत्तर मिळत नाही म्हणून तर निर्माता असावा असे विचार मांडले जातात.
तुम्ही घरी गेला आणि घरात कोणी नसताना घरात सर्व जेवण तयार असेल तर हे जेवण कोणी बनवलं हा प्रश्न पडेल ना तुम्हाला.
आणि हा प्रश्न तो पर्यंत प्रश्न च राहील जो पर्यंत उत्तर मिळत नाही.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 17:57
नवीन
तुम्ही ठामपणे म्हणाल का की ड्रॅगन नावाचा प्राणी अस्तित्वातच नाही ? का तिथेही असू शकतो बुवा असं उत्तर आहे ?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 18:17
नवीन
पृथ्वी वर जे जीवन दिसत आहे ते अतिशय सुनियोजित आहे.
इथे प्रत्येक सजीवाला अन्न आहे.
प्रतेक प्राणी स्वतःची पुनरुत्पादन करतो.
हवेतील सर्व वायूचे प्रमाण योग्य आहे.
हे सर्व अस्तित्वात आहे .नष्ट झालेले नाही .
पण हे एवढे सूनियाजित कसे आहे त्या पाठची कारणे काय आहेत ह्याची उत्तरं अजुन पण माणसाला माहीत नाहीत.
त्या मधील फक्त दोनच उदाहरणे तुम्हाला दिली होती.
जटिल रचना असलेले जीव निर्माण कसे झाले ह्याचे उत्तर कोणाकडे नाही.
फक्त माणसाच्याच मेंदू ची उत्क्रांती का झाली .
भाषा कशा निर्माण झाल्या.
असे किती तरी प्रश्न आहेत.
देव आहे हे सिध्द करता येत नसले तरी जीवसृष्टी आता अस्तित्वात आहे ना ती दिसतोय ना.
ड्रॅगन चे पुरावे नसतील आणि आता पण तो अस्तित्वात नसेल तर तो आहे असे समजायला आम्ही काय वेडे आहोत काय.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 18:27
नवीन
हाच विचार मनात घोळवावा ही ईनंती करून मी माझे भाषण संपवतो :))
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 18:31
नवीन
माझ्या पूर्ण प्रतिसाद च अर्थ काय आहे हे चांगले समजून सुद्धा फक्त चारच सोयी ची वाक्य घेवून राजकारणी मंडळी सारखे प्रतिसाद का देताय.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 18:52
नवीन
तुमचा मुद्दा intelligent design सिद्ध करण्यासाठी आहे ना ? कि बुवा इतकं सुसज्ज आणि सुनियोजित जग हे केवळ एक निर्मातच करू शकतो ? खरोखरी उत्क्रांतीची आणखीन माहिती घ्या. हा दावा जेव्हा ख्रिश्चन व्यक्तींनी केला, तेव्हा माणूस 10000 वर्षांपूर्वी असाच्या असा तयार झाला असा त्यांचा (गैर)समज होता.
तुमचा असा समज नसावा. पण तुम्हाला हे जे सुनियोजित जग दिसतंय ते असे काही सुरु नाही झाले. आजूबाजूचे वातावरण काही केवळ आज दिसते तश्या जीवनाला तारण्यासाठी तयार नाही झाले, तर जीवन या वतातवरणात स्वतःला तारता येईल असे निर्माण झाले.
सुरुवातीचा जीव जन्मला तेव्हा एकंदरीत जीवनासाठी परिस्थिती भयंकर प्रतिकूल होती. त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक हे बदल जीवांमध्ये घडत गेले, आणि मग ही तुमची सुनियोजित पृथ्वी बनली.
आता तुम्ही उत्क्रांती कशी भंपक आहे हे सांगा. वाट बघीन हो :)
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 19:28
नवीन
निर्जीव मधून सजीव निर्माण झाले हा दावा केला गेला.
हे सत्य आहे का हे शोधून काढण्या साठी विविध प्रयोग संशोधक मंडळी नी केले आणि विविध रसायने मिळून एक जैविक घटक बनत आहे तो सजिवाची लक्षणे दाखवतो हे दिसून आले .
पण त्या स्थिती पासून जटील रचना असलेले जीव कसे बनले.
जटिल जीव निर्माण होण्यासाठी गुणसूत्र आवश्यक असतात .
ती कशी निर्माण झाली हे आज पर्यंत प्रयोगातून सिद्ध झालेले नाही.
तुम्ही जे उत्क्रांती चे उदाहरण देत आहात ती खूप पुढची स्टेप आहे सजीव निर्मिती पूर्ण झाल्या नंतरची.
डार्विन नी मुळात उत्पती विषयी दावा केलाच नाही.
वनस्पती विषयी एक चक्कार शब्द त्यांनी काढला नाही.
थोडक्यात उत्क्रांती वाद उत्पती विषयी काहीच भाष्य करत नाही.
तुम्ही उत्क्रांती चा सिद्धांत चा संबंध कोठे ही जोडू नका.
धूमकेतू द्वारे जीवन पृथ्वी वर उत्पन्न झाले असे अनेक गृहितक आहेत.
वातावरण बदलत गेले तसे जीवन फुलत गेले हे गृहितक आहे ते काही सिद्ध झलेला सिद्धांत नाही.
ऑक्सिजन असेल तरच सजीव निर्मिती होईल हे खरे नाही.
पृथ्वी वर असे काही अप्रगत जीव आहेत त्यांना ऑक्सिजन ची गरज नाही.
अती उच्च तापमानात जिवंत राहणारे पण जीव आहेत.
त्यामुळे सजीव निर्मिती साठी अमकेच तापमान हवे असे काही नाही.
अजुन पर्यंत बाकी ठिकाणी सजीव सृष्टी चा शोध न लागण्याचे हेच तर कारण आहे.
आपण ऑक्सिजन,पाणी,तापमान च शोधत बसलोय .
असे माझे नाही संशोधकांचे मत आहे.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 18:35
नवीन
हे तुमचे आर्ग्युमेन्ट भयंकर जुने आणि तितकेच हाणून पाडलेले आहे. पाश्चात्य थिओलॉजिस्ट याला वॉचमेकर आर्ग्युमेन्ट म्हणतात. खरोखर चर्चा करायची असल्यास हे वाचा- A Failed Metaphor for Intelligent Design
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 18:52
नवीन
प्रतिवाद जुनाच असेल पण अजुन अनुत्तरीत आहे.
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये हवेतच तिर मारले आहेत .
तुम्ही दिलेल्या लिंक मधले विचार का पटवून ghavet असा उलट प्रश्न ते वाचणाऱ्या व्यक्ती ल नक्कीच पडतील.
Baseless orgument आहे.
स्टिफन हॅकिंग आणि बाकी संशोधक मंडळी नी स्ट्रिंग theory ni विश्वाचे रहस्य उलगडले आहे असे दावे केले ते कसे हास्यास्पद होते हे किती तरी लोकांनी योग्य उदाहरणे देवून सिद्ध केले आहे.
वाद प्रतिवाद आमच्या पण वाचनात असतात.
आपल्या बुध्दी ला जोपर्यंत पटत नाही तो पर्यंत कोणी सांगतोय म्हणुन ते खरे असेल हे मी समजत नाही.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Wed, 06/24/2020 - 19:00
नवीन
स्ट्रिंग थियरी समजल्याचे आणि हाणून पाडल्याचे दावे. इथे स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणणारा माणूस पण त्यावर काही कमेंट करणार नाही मात्र तुमचं चालू आहेच. ते स्ट्रिंग थियरी चा प्रतिवाद करणारे लोक काय तर्काला फाटा मारत नाहीत. वा रे वा. अस चालत नाही भौ. काय पटलं नाही ते सांगायचं असतंय. मुळात निर्मात्याने जग निर्मिले हाच हवेतला दावा आहे. प्रतिवाद कसा जमिनीवर होणार ? ठीक आहे. पुन्हा तेच. हवेत तिर मारणे हे पण जरा मनात घोळवावे हि ईनंती :))
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 06/24/2020 - 17:01
नवीन
संजय क्षीरसागर,
आपला इथला प्रतिसाद वाचला. माझं मत सांगतो.
१.
काहीच नाही. सत्याचा उद्घोष व नामस्मरण एकसारखे आहेत, इतकंच सांगायचं होतं.
२.
ते स्वसंवेद्य असल्याने त्याला स्वत:ला वाटेल ते कार्य करू शकते.
३.
बरोबर.
४.
का म्हणून? ते जे काही सत्य आहे, त्याला काही करावंसं वाटलं तर अडवणारं कोणीच नाही. त्याने स्वत:च्या अस्तित्वाचा आवाज काढला तर तो निरर्थक कसा काय?
५.
बालक त्याच्या आईच्या सांगण्यावरनं एखाद्या पुरुषाला बाप म्हणू लागतं. तसाच तो पहिला जीव हा आपल्या सगळ्यांचा आदिपिता आहे. त्याचं नाव ब्रह्मदेव असो वा अब्राहम वा अजून काही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/24/2020 - 17:24
नवीन
१. > सत्याचा उद्घोष व नामस्मरण एकसारखे आहेत ?
सत्याचा उद्घोष म्हणजे आपण सत्य आहोत याचा उद्घोष, आणि
नामस्मरण म्हणजे काल्पनिक देवाच्या नांवाचा पुकारा.
२. > ते स्वसंवेद्य असल्याने त्याला स्वत:ला वाटेल ते कार्य करू शकते.
काय बोल्ता ?
सत्य ही स्थिती आहे आणि ती कायम अकर्ता आहे.
३. > जे काही सत्य आहे, त्याला काही करावंसं वाटलं तर अडवणारं कोणीच नाही. त्याने स्वत:च्या अस्तित्वाचा आवाज काढला तर तो निरर्थक कसा काय?
वर २. वाचा
४. > बालक त्याच्या आईच्या सांगण्यावरनं एखाद्या पुरुषाला बाप म्हणू लागतं. तसाच तो पहिला जीव हा आपल्या सगळ्यांचा आदिपिता आहे. त्याचं नाव ब्रह्मदेव असो वा अब्राहम वा अजून काही.
आता हा पहिला जीव कुठून काढला ?
तो सगळ्यांचा आदिपिता आहे हे तुम्हाला कसं कळलं ?
ही आदीपिता थिअरी प्रस्थापित बायॉलॉजीला कसा हरताळ फासते ?
थोडक्यात, या आदीपित्याचे पेरेंटस कुठे असतात ?
त्यांची नांव काय आणि ती कुणी ठेवली ?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 18:26
नवीन
हा प्रश्न तर विचारून झाला .
पण भाषा कशी निर्माण तिचा निर्माता कोण है पुराव्या नी सिध्द करा असे सांगितले तर त्याला फाटे फोडण्यात आले आणि हा गैर सोयीच्या प्रश्न कडे दुर्लक्ष केले गेले.
भाषा च नसेल तर नाव कसे देणार.
त्या साठी भाषा मानव निर्मित आहे हे तर सिद्ध करा.
हे सिद्ध झाले की देव माणसाने निर्माण केले असे कबुल करण्यात आम्हाला काही कमी पना नाही.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 06/24/2020 - 19:26
नवीन
बाकी चर्चेत जास्त भाग घेतला नाही.. भाषे बद्दल थोडेसे बोलतो..
हे असे पण सिद्ध करता येईल :
जर सिद्ध करायचे असल्यास.. दोन लहान मुलगा मुलगी जे जन्मले आहेत नुकतेच ज्यांना भाषा येत नाही त्यांना एकत्र ठेवा खुप वर्षे.. कोणाशी न बोलता.. त्यांना भाषा येणार नाही.. मग नंतर कायम एकत्र असल्यावर त्यांचे हावभाव.. बोलणे.. वगैरे सगळे टिपा..
आणि ते जर कसल्याही सांकेतिक भाषेत बोलले.. किंवा कसे तर ती त्यांची भाषा.. आणि नाहीच बोलले.. कसलेच एकमेकां प्रती हावभाव, सांकेतिक चिन्ह.. तर मान्य करू
भाषा ही अशीच develop झाली आहे.. एका रात्रीत मराठी, इंग्लिश भाषा develop झाली नाहीच.. नाईल नदी किनारी सांकेतिक संदेश सापडलेले आहेच..
बाकी मूळ धागा खूपच विनाकारण लांबला गेला आहे.. असे वाटते..
मला इतकेच म्हणायचे आहे.. देव असेलही असे तुमच्या म्हणण्याने मी मान्य करेल..कोणाला का दुखवावे.. आपले आपल्या पाशी पण
पण पृथ्वी समुद्रात बुडाली म्हणुन विष्णूने वराह अवतार घेऊन तिला उचलून आणले.. तर ती कुठल्या समुद्रात बुडाली होती..? का तो समुद्र आटला..
म्हणजे निदान देव आहे हे मनातले सोडू नका.. पण ह्या असल्या कथा मानवाने निर्माण केल्यात हे तरी मान्य करावेच लागेल..
बाकी काय बोलू..
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 06/24/2020 - 20:09
नवीन
संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे हे अनेकांनी मान्य केले आहे .
पण इथे देव नाही असे ठाम पने सांगणारे संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे हे सिद्ध झालेले असून सुद्धा मान्य करणार नाहीत.
आणि संस्कृत ला देवाची भाषा असे सुद्धा म्हंटले जाते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 06/24/2020 - 21:12
नवीन
संजय क्षीरसागर,
तुमचा वरचा संदेश वाचला. माझं मत सांगतो.
१.
आपण सत्य आहोत याचा सतत उद्घोष करावा तर लागतोच ना? तसंच नामस्मरण सतत करावं लागतं.
२.
सत्य ही स्थिती होऊच शकंत नाही. स्थिती बदलते. सत्य बदलंत नाही.
३.
ज्याअर्थी सजीवापासनं सजीव उत्पन्न होतांना दिसतो, त्याअर्थी प्रत्येक सजीवास बाप आहे. ही साखळी मागे नेली की कोणतरी एक आदिपिता असणार हे तर्कानं ताडता येतं.
४.
बालक आईला विचारतं की माझा बाप कोण. तसंच आपण सिद्धपुरुषांन विचारायचं आदिपिता कोण.
५.
प्रस्थापित जीवशास्त्राला तर उत्क्रांती म्हणजे काय हे ही नीटसं कळलेलं नाही. फार काय आधुनिक जीवशास्त्रात सजीवाची अधिकृत व्याख्याही उपलब्ध नाही.
६.
आदिपिता स्वयंभू आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/25/2020 - 16:59
नवीन
१. > आपण सत्य आहोत याचा सतत उद्घोष करावा तर लागतोच ना? तसंच नामस्मरण सतत करावं लागतं.
आपण सत्य आहोत हा उलगडा एकदाच होतो
मग `तुम्ही सत्य आहात' हा उद्घोष, ज्यांना `उलगडा झालेला नाही' त्यांचासाठी केला जातो.
तो उद्घोष करणार्याचा छंद असतो, अनिवार्यता नाही.
या उलट नामस्मरणाचा हेतू (काल्पनिक) देव आहे, हे स्वतःला सतत पटवण्यापलिकडे काहीही नसतो.
नामस्मरण हा वरकरणी भक्ताचा आनंद वाटला, तरी मुळात ती त्याची अनिवार्यता असते.
थोडक्यात, ते खेळणं मागणार्या लहान मुलाचं (म्हणजे मनाचं) लक्ष दुसरीकडे वळवणं आहे.
एकदा मुलाचं लक्ष तुम्ही केलेल्या विक्षेपावरुन (नामस्मरणावरुन) हटलं की
मुलाचा पुन्हा खेळण्याचा हट्ट सुरु (मन पुन्हा कार्यान्वित) !
भक्तानी नामस्मरण थांबवलं की देव गुल !
___________________________________
आता मूळ विषय :
अ) तुम्ही नामसाधनेचा जोरदार पुरस्कार केलायं
ब) वर एका प्रतिसादात तुम्ही स्पष्टपणे म्हटलंय : ही शांतीच तर बेटी गायब आहे. म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच.
तुम्ही फक्त एक गोष्ट सिद्ध करा :
नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि
नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ?
क) नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे.
उदा. परमहंसांना कालीमाता दिसे आणि ते तिच्याशी गप्पा मारत.
मग तोतापुरींना तो भ्रम घालवण्यासाठी,
त्यांच्या आज्ञाचक्रावर तीक्ष्ण वस्तूनं हल्ला करावा लागला.
हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे.
शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
आणि सगळ्यांना भास व्हायला लागले,
तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
गुरुवार, 06/25/2020 - 23:44
नवीन
पुन्हा तोतापुरी!!
मागच्या एका धाग्यात रामकृष्ण परमहंस आणि तोतापुरीची पूर्ण कथा देऊन मी तुमचे अज्ञान उघडे पडले होते. मी तेंव्हाच सांगितले होते की तोतापुरींनी कालीचे अस्तित्व कसे मान्य केले आणि त्या कथेचा संदर्भ, पुरावा ही दिला होता. हेही सांगितले होते की हा प्रसंग रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य यांनी त्यांच्या पुस्तकात नोंदवला आहे. एवढेच नाही तर आणि तो प्रसंग अगदी चित्रपटात सुद्धा आला होता आणि मी त्या चित्रपटाची लिंक अगदी वेळेसकट दिली होती. एवढे देऊन सर्वांना इथे तुमचे अज्ञान समजले आहे अर्थात तुमच्यासारख्या अहंकारी माणसाने ते कळूनही केवळ अहंकारास्तव त्यालाही विरोध केला होता पण पुन्हा तोच विषय इथे काढून परत परत स्वतःचा अज्ञानीपणा कशाला चव्हाट्यावर आणलाय?
उगाच आपला चुकीचा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी नवीन धागा काढायचा आणि आडून आडून त्याच गोष्टी परत लिहायच्या यावरून खरंच मलाही तुम्ही हे सर्व पेड अजेन्डयाखातर करताय अशी शंका यायला लागलीये.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 06/26/2020 - 08:46
नवीन
संजय क्षीरसागर,
१.
शांती ही अनुभवायची चीज आहे. ती मिळवण्यासाठी नामस्मरण हा पहिला टप्पा आहे. मात्र तुमचा मार्ग वेगळा असू शकतो.
२.
शेवटी हा#यचं आहे तर गिळायचं कशाला, असा हा प्रश्न आहे. थेट सूर्यप्रकाश का नये पिऊ?
याचं उत्तर असं की बहुसंख्य शरीरांची रचनाच तशी आहे म्हणून. निर्गुणसाधना करण्यासाठी आधी सगुणसाधनेत पारंगत असावं लागतं.
३.
गुरूंचा शोध हा साधनेचा भाग आहे. डिमांड-सप्लाय व्यवहार नव्हे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 06/26/2020 - 09:06
नवीन
१. > शांती ही अनुभवायची चीज आहे. ती मिळवण्यासाठी नामस्मरण हा पहिला टप्पा आहे
खरा मुद्दा हा आहे :
नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि
नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ?
२. > शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
शारीरिक प्रक्रिया साधनेच्या फलिताशी जोडणं हा तर्कहीन प्रकार आहे.
खाण्याचा आणि साधनेचा काहीएक संबंध नाही.
शिवाय तुमच्या तर्कहीन विधानातून होणारा विनोद पाहा :
नामस्मरणाची परिणीती देव दिसण्यात होते असा सर्व संतांचा दावा आहे > नाम हे खाणं असेल तर मग रिझल्ट काय येईल ?
३. > गुरूंचा शोध हा साधनेचा भाग आहे. डिमांड-सप्लाय व्यवहार नव्हे.
तुम्हाला मुद्दा कळला नाही, किंवा तुम्ही तो सोयिस्कररित्या टाळतायं !
प्रश्न गुरु शोधण्याचा नाही. पुन्हा वाचा :
क) नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे.
उदा. परमहंसांना कालीमाता दिसे आणि ते तिच्याशी गप्पा मारत.
मग तोतापुरींना तो भ्रम घालवण्यासाठी,
त्यांच्या आज्ञाचक्रावर तीक्ष्ण वस्तूनं हल्ला करावा लागला.
हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे.
शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
आणि सगळ्यांना भास व्हायला लागले,
तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 06/26/2020 - 13:18
नवीन
संजय क्षीरसागर,
तुमच्या प्रश्नांना यथाशक्ती उत्तरं देतो.
१.
हे असं असल्याचं अनेकांच्या अनुभवास आलेलं आहे.
२.
नामस्मरण पक्कं झालं की अजपाजप सुरू होतो. शांती तशीच राहते. हे (किंवा तत्सम) माऊलींनी सांगितलेलं आहे.
३.
शारीरिक प्रक्रिया उदाहरण म्हणून दिली होती. तुम्ही मेमरी स्ट्रिंग्ज, आणि डिस्क ड्राईव्ह फॉर्माटिंगची उदाहरणं दिलेली होती. त्याच धर्तीवर मी खाण्याच्या रचनेचं उदाहरण दिलं.
४.
साधकाने साधकासारखं वागणं इष्ट असतं. मात्र तुमच्या स्वत:च्या आवडी भिन्न असू शकतात.
५.
बरोबर. सर्वंच नसले तरी बहुतांश संत हेच म्हणतात.
६.
आजीबात नाही. ही नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे.
७.
काली सगुण आहे. सगुण घालवायचं असेल तर त्यासाठी निर्गुणाची अनुभूती यायला हवी. तुम्हाला काली झटकून टाकायची ( = डिसमिस करायची ) आहे. याउलट तोतापुरींना कालीच्या पल्याड असलेलं निर्गुण तत्त्व दाखवून द्यायचं होतं.
मात्र प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी असते. ज्ञानेश्वरांनी नामदेवाचा सगुण विठोबा घालवला नाही. त्यांनी नामदेवांस विसोबा खेचरांकडे पाठवलं.
८.
म्हणूनंच साधक परमेश्वरास आर्तपणे विनवतात.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 06/26/2020 - 14:46
नवीन
त्याबद्दल प्रथम तुम्हाला शुभेच्छा !
१. > नामघोषातून शांती कशी मिळते ? हे असं असल्याचं अनेकांच्या अनुभवास आलेलं आहे.
थोडक्यात, तुमचा तसा अनुभव नाही, आणि
जे तसा अनुभव क्लेम करतात ते `माझा पास' म्हणून उत्तर टाळतायंत.
म्हणजे एकूणात काय परिस्थिती आहे हे लक्षात आलं असेल.
__________________________________
२. > नामस्मरण पक्कं झालं की अजपाजप सुरू होतो. शांती तशीच राहते. हे (किंवा तत्सम) माऊलींनी सांगितलेलं आहे.
आता नीट वाचा :
अजपा याचा अर्थ मन पूर्णपणे अनैच्छिक होणं,
मनाची क्रिया इतकी अनियंत्रित होते की ती थांबवणं अशक्य होतं.
एखादा अविरत ध्वनी मेंदूत घुमू लागला तर तो मनाच्या ऐच्छिक क्रियेत कायम विक्षेप करत राहील.
अशा व्यक्तीची स्मृती अस्ताव्यस्त होईल कारण काही आठवायचं म्हटलं की तो ध्वनी सारखा मधेमधे येत राहील.
अशीच अवस्था तरुण प्रेमिकांची होते,
(तारुण्यात प्रेम केलं असेल, तर आठवून पाहा)
त्यांना एकमेकांशिवाय इतर काही सुचत नाही;
याचं कारण मन अनैच्छिक होणं हे असतं,
त्यामुळे यांचा वास्तवावरचा फोकस दिशाहीन होतो.
_________________________________________
३.> नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे. >बरोबर. सर्वंच नसले तरी बहुतांश संत हेच म्हणतात.
एकाही संतानी नाम बंद करा असं सांगितलेलं नाही.
__________________________________
४. > हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे. >आजीबात नाही. ही नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे.
तोच तर मुद्दा आहे !
एका हातानं नामस्मरणाची घंटा सतत बडवत राहिल्यावर दुसरीकडे,
त्यातून निर्गुण शांती लाभेल हा दावाच हास्यास्पद आहे !
थोडक्यात, व्यक्ती पळायचं सोडणार नाही आणि मनात मात्र स्थिर व्हायची इच्छा करणार !
___________________________________________
४. > तुम्हाला काली झटकून टाकायची ( = डिसमिस करायची ) आहे. याउलट तोतापुरींना कालीच्या पल्याड असलेलं निर्गुण तत्त्व दाखवून द्यायचं होतं.
आता हे तर खरंच शांतपणे वाचा :
काली ही निर्गुणानं स्वतःची केलेली भ्रमिष्ठ अवस्था आहे.
निर्गुण कालीच्या मागे असता तर एक वेळ ठीक आहे,
पण निर्गुणंच काली सोडायला तयार नाही !
म्हणून तोतापुरींना वार करायला लागतो.
______________________________________
५. > आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ? > म्हणूनंच साधक परमेश्वरास आर्तपणे विनवतात.
आता परत वरचा ४ शांतपणे वाचा !
ज्या परमेश्वराची तुम्ही निर्मिती केलीये तो बोगस आहे, आणि
ज्याला तुम्ही त्याच्यापासून सुटकेसाठी बोलावतायं,
तोही तितकाच बोगस आहे.
कारण दोन्हीही परमेश्वर तुमच्या मेंदूपलिकडे कुठेही नाहीत !
_____________________________________
आणि ही उघड गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण लेखाचा आणि माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 06/26/2020 - 15:32
नवीन
निर्गुणाचा (ही) बोध हे केवळ उपांग आहे. सगुण-निर्गुण एकच तत्व आहे हा संपूर्ण बोध, हे देखील नामस्मरण साधनेचं एक फलीत आहे.
ज्याप्रमाणे दुधात पोषक तत्वं असतात, व दुध पिल्याने ति पोषक तत्व शरीरात आत्मसात होतात, त्याचप्रमाणे नामात सच्चीदानंद आहे.. नाम साधनेने ते तत्व शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याला आत्मसात करायला होतं. अगदी पहिल्या दिवसापासुन हा अनुभव येतो का? तर सुरुवात अगदी पहिल्या स्मरणापासुन होते. पण ज्या प्रमाणे प्रत्येक शरीराची पचन क्षमता भिन्न असते व त्याप्रमाणे दुधातले पोशकतत्वे आत्मसात केले जातात त्याच प्रमाणे प्रत्येक मनुष्याला नामसाधनेतुन सच्चीदानंद कसा आणि कधि गवसतो यात भिन्नता असते. पण एण्ड रिझल्ट पक्का असतो.
तुमच्या चर्चेत लुडबुड करण्याची अजीबात इच्छा नाहि. पण यदाकदाचीत कोणि हि चर्चा वाचलीच तर उगाच त्याचे/तिचे नामसाधनेबद्दल गैरसमज होऊ नये म्हणु हा प्रतिसाद प्रपंच.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 06/26/2020 - 21:43
नवीन
अर्धवटराव,
तुमचा प्रतिसाद योग्य व उचित आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 06/26/2020 - 23:23
नवीन
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझं मत सांगतो.
१.
जेव्हढा अनुभव आहे त्यावर तर्क बांधायला काय हरकत आहे?
२.
I doubt that. माझ्या मते अजपा म्हणजे स्वत: मुद्दाम न करता आपोआप होणारा जप.
३.
असू शकेल.
४.
आजिबात होत नाही. स्वानुभव आहे.
५.
नाही होत असं. स्वानुभव आहे.
६.
अमान्य. ऐच्छिक मनाच्या पलीकडे बरंच मोठं अनैच्छिक मन आहे.
७.
उलट उदाहरणही उपलब्ध आहे. विसोबा खेचरांनी कुठलाही वार न करता नामदेवांचा सगुण विठोबा अलगदपणे सोडवला.
८.
आपल्या मेंदूवर सर्वस्वी आपलंच नियंत्रण असतं, असं थोडंच आहे? मेंदूची बरीच ( ९० % ? ) क्षमता म्हणे सुप्त असते.
९.
मेंदूच्या पलीकडे चैतन्य असतं, ही एकमेव गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.
१०.
प्रसंसेबद्दल धन्यवाद! मला मात्र हे कथन नैसर्गिक वाटतं. खास काही सांगितल्याचं वाटंत नाही. तुम्हांस ते प्रामाणिक वाटलं, हा तुमचा मोठेपणा आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/27/2020 - 07:42
नवीन
पुन्हा एकदा प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
सर्व नामसाधकांना या प्रतिसादाचा अतोनात आणि कायमचा उपयोग होईल.
आता शांतपणे वाचा :
१. > जेव्हढा अनुभव आहे त्यावर तर्क बांधायला काय हरकत आहे ? > आजिबात होत नाही. स्वानुभव आहे. > नाही होत असं. स्वानुभव आहे.
याचा अर्थ शांती लाभेल हा तुमचा अनुभव नसून तर्क आहे आणि
अजपाजप हा स्वानुभव होऊनही तुम्हाला ती लाभलेली नाही.
थोडक्यात, नामस्मरणाच्या दुसर्या पायरीवरही रिझल्ट नाही.
_______________________________________________________________
आता नामसाधनेच्या अंतीम पायरीवरचा इष्ट देवतेचं दर्शन,
हा शेवटचा भ्रम उरला आहे !
आणि त्याबद्दल तुमची अशी कल्पना आहे :
> विसोबा खेचरांनी कुठलाही वार न करता नामदेवांचा सगुण विठोबा अलगदपणे सोडवला.
हे भव्य विधान आहे !
याचा अर्थ तुम्ही आधी विठोबा तयार करणार आणि
मग तुम्हाला अनिवार्यपणे,
त्याच्यापासून सुटका करुन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.
थोडक्यात, हा तुम्हीच निर्माण केलेला विठ्ठल,
तुम्हाला निर्गुणाचं दर्शन होण्याच्या मार्गात अडसर होणार !
मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार !
_______________________________________________
एकतर विसोबानी नामदेवांचा विठ्ठल कसा सोडवला, या प्रक्रियेची तुम्हाला काहीही माहिती नाही,
दुसरी गोष्ट, इथे फुल कॉपी / पेस्ट मारणार्या एका सदस्याच्या लेखातला हा उतारा वाचा :
संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल. प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण.
थोडक्यात, उपलब्ध कागदपत्रांनुसार, विसोबांनी नामदेवांचा विठ्ठल सोडवलेला दिसत नाही.
_________________________________
एकूणात तुमच्या प्रामाणिक आणि स्वानुभवातून लिहीलेल्या प्रतिसादाची इतीश्री अशी की
नामस्मरण हा निव्वळ टाइमपास आहे,
त्यातून शांती लाभणं तर दूरच, परत विसोबा खेचर शोधावा लागतो, आणि
तो विसोबा सुद्धा नामदेवांचा विठ्ठल सोडवू शकत नाही !
_______________________________
> मेंदूच्या पलीकडे चैतन्य असतं, ही एकमेव गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.
अर्थात !
पण ते चैतन्य पराकोटीच्या ध्वनीशून्यतेत काम करतं,
त्याचा नामस्मरणाशी सुतराम संबंध नाही.
सूर्याभोवतीचं १५ कोटी किलोमिटर त्रिज्येचं वर्तुळ, पृथ्वी ज्या सहजतेनं आवर्तीत करतेयं
त्यात इतकी ध्वनीशून्यता आहे की आपणही तिच्याबरोबर ती परिक्रमा करतोयं,
याची कुणाला यत्किंचितही जाणीव नाही.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 06/27/2020 - 10:06
नवीन
संजय क्षीरसागर,
१.
मी नाम घेतो ते देवाचं अनुसंधान साधण्यासाठी. म्हणजे देव माझ्या सोबत आहे ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी. यातनं उत्पन्न झालेल्या उपफळांचा मी फारसा विचार करीत नाही.
२.
मला देवदर्शनाची आंस नाही. तो बरोबर असला म्हणजे झालं. दिसला नाही तरी माझं व्यक्तीश: काहीही बिघडंत नाही. पण दिसला तर आवडेल मला.
३.
विठ्ठल नामदेवाने निर्माण केलेला नाही. तो पंढरपुरात स्वयंभूपणे उभा आहे.
४.
हा 'तुम्ही' म्हणजे नेमकं कोण? विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही.
५.
मला गरज नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे. पाहिजे तेव्हा त्यातला हवा तेव्हढा विदा जाणून घेऊ शकेन, इतका आत्मविश्वास आहे.
६.
विठ्ठल सोडवणे म्हणजे सगुण रुपापल्याड असलेलं निर्गुण रूप दाखवणे.
७.
आहेच मुळी. एकदा का जप मनात मुरला की तो मस्तपैकी टाईमपास होऊन राहतो. कबीर म्हणून गेलेत : राम हमारा जप करे, हम बैठे आराम
८.
मला आजवर लाभली नाही म्हणून तुम्हांस लाभणार नाही असं थोडंच आहे? शिवाय मला उद्या शांती लाभू शकते. ती शक्यता जागृत आहेच. नामस्मरणातनं अनेकांना शांती मिळाली आहेही.
९.
तरीही स्पंदन असतंच. ते स्पंदन म्हणजे नाम.
१०.
तिथेही स्पंदन आहेच. थोडक्यात 'नाम' सर्वत्र आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/27/2020 - 11:09
नवीन
१. मी नाम घेतो ते देवाचं अनुसंधान साधण्यासाठी. म्हणजे देव माझ्या सोबत आहे ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी.
थोडक्यात, नामाच्या आधारावर तुम्ही एक काल्पनिक देव धरुन ठेवला आहे.
नाम बंद की देव गुल !
२. मला देवदर्शनाची आंस नाही. तो बरोबर असला म्हणजे झालं. दिसला नाही तरी माझं व्यक्तीश: काहीही बिघडंत नाही. पण दिसला तर आवडेल मला.
तुमच्या कल्पनेतला देवच तुम्हाला दिसू शकतो !
गोंदवलेकरांना राम शिकवला नसता तर त्यांना तो दिसला (?) नसता !
३. विठ्ठल नामदेवाने निर्माण केलेला नाही. तो पंढरपुरात स्वयंभूपणे उभा आहे.
मोदी युगपुरुष आहेत या भक्तांच्या श्रद्धेत आणि तुमच्या वरच्या विधानात फारसा फरक नाही.
४. विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही.
तुमच्यासाठी विसोबा शोधणारे ज्ञानदेव ऑलरेडी आहेत ?
कुठे असतात आणि केंव्हा भेटले ते तुम्हाला ?
५. मला गरज नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे. पाहिजे तेव्हा त्यातला हवा तेव्हढा विदा जाणून घेऊ शकेन, इतका आत्मविश्वास आहे.
वरच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला इष्ट देवता दिसायला लागली तर
तिच्यापासून सुटकेचा, तुमच्याकडे कोणताही मार्ग दिसत नाही.
६. विठ्ठल सोडवणे म्हणजे सगुण रुपापल्याड असलेलं निर्गुण रूप दाखवणे ?
तुम्हाला अजून सगुण दिसायला तयार नाही,
ते दिसल्यावर तुमचे ज्ञानेश्वर तुमच्यासाठी विसोबा आणणार
मग ते तुम्हाला निर्गुण दाखवणार, आणि
कसा ते तुम्हाला माहिती नाही !
तुम्ही माझे सगळे मुद्दे यथोचित सिद्ध केले !
७. आहेच मुळी. एकदा का जप मनात मुरला की तो मस्तपैकी टाईमपास होऊन राहतो.
पुन्हा एकदा धन्यवाद !
८. मला आजवर लाभली नाही म्हणून तुम्हांस लाभणार नाही असं थोडंच आहे? शिवाय मला उद्या शांती लाभू शकते. ती शक्यता जागृत आहेच. नामस्मरणातनं अनेकांना शांती मिळाली आहेही.
पुन्हा तीच चूक !
शांती आपण खुद्द आहोत. त्यासाठी नामस्मरणाची आवश्यकताच नाही.
पण आता तुमचे प्रतिसाद तर्कहीन झाल्यामुळे ते कळण्याची शक्यता मालवली.
९. तरीही स्पंदन असतंच. ते स्पंदन म्हणजे नाम.
स्पंदनासाठी नामाची आवश्यकता नाही.
हृदय चालू आहे म्हणून धडधड ऐकू येतेयं,
तुम्ही घोड्याच्या पुढे गाडी जोडतायं !
१०. तिथेही स्पंदन आहेच. थोडक्यात 'नाम' सर्वत्र आहे.
शांततेत स्पंदन आहे आणि स्पंदन आहे म्हणून नाद आहे.
तस्मात, मूळ शांतता आहे; नाद नाही
____________________________________________
एकूणात तुमच्याशी आतापर्यंत चर्चा छान झाली
पण आता प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालल्यानं मला चर्चेत स्वारस्य उरलेलं नाही.
तरीही गामाश्री, तुमच्या सभ्य आणि सयंमशील प्रतिसादांना मनःपूर्वक दाद देतो !
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sat, 06/27/2020 - 17:01
नवीन
शांततेत जर स्पंदन असेल तर ती शांतता नाही!
शांतता म्हणजे शून्य.
- (शांत होण्याची आस असलेला) सोकाजी
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/27/2020 - 19:08
नवीन
काय बोल्ता ?
शांतता सर्वव्यापी आहे, स्पंदन नाद सर्व काही तिच्यात आहे.
शून्य हे शांततेचं दुसरं नांव आहे, आणि
सर्व प्रकटीकरण (हे अस्तित्त्व) शून्यानं तर धारण केलंय !
ती शांतता किंवा ते शून्यच तर सर्व चराचर व्यापून आहे, आणि
त्यामुळे तेच आपलं स्वरुप आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/29/2020 - 17:31
नवीन
मुळात ज्याला इथे शांतता म्हटलं जातय ति म्हणजे स्पंदन जाणवणार्याची क्षमता संपणं आहे. एका मर्यादेपलिकडे ध्वनी ग्रहण करता येत नाहि... त्यालाच शांतता म्हटलं तर ति ग्रहण करणार्याची लिमीटेशन झाली. तिथे खरच शांतता आहे कि ध्वनी तरंगांचं आपल्याला न उमगलेलं रूप आहे याचा अंदाज बांधता येतो किंवा आणखी खोलात जायचे प्रयत्न करता येतात. शांतताच सर्वकाहि आहे म्हणणे अर्धसत्य तरी आहे किंवा संपूर्ण असत्य तरी.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 06/27/2020 - 10:23
नवीन
गा.पैंशी सहमत.
ह्यावरुन एक कथा आठवली.
अरबस्थानातील एका उंट व्यापाराकडे १७ उंट होते.तो मृत्युशय्येवर असताना त्याच्या ३ मुलांच्या भवितव्याबाबत चिंता वाटत असे.३ मुले साधारण बुध्दीमत्तेचे असल्याने कुणा एका मार्गदर्शकाची त्यांना गरज आहे हे तो ओळखुन होता. आपल्या मृत्युपत्रात त्याने असे लिहिले कि एकुण उंटांपैकी १/२ मोठ्याला,१/३ मधल्याला व १/९ धाकट्याला द्यावेत.कुठलाही उंट मरता कामा नये व जोपर्यंत वाटणी बरोबर होत नाही तोपर्यंत तिघांनी मिळून काम करावे जेव्हा होईल तेव्हा ज्याने कोणी मदत केली त्याचा सल्ला पुढे मानावा वगैरे. तिघांनाही वाटणी काही करता येईना. शेवटी एक फकिर तिथुन स्वतःच्या उंटावरुन जात असताना त्याला ह्या समस्येबद्दल कळले व त्याने त्यांना मदत करायची इच्छा दर्शविली. मदत म्हणुन त्याने आपला एकुलता एक उंट त्या ३ बंधुंना दिला. मग आता नवीन संख्येनुसार १८ मधले ९ उंट मोठ्याने घेतले,६ उंट मधल्याने व २ उंट धाकट्याला मिळाले. एकुण वाटणी झालेले उंट ९+६+२ मिळुन १७ असे झाले व फकिराने आपला उंट परत घेतला.
सगूणापलिकडील निर्गुण दाखवणे हा प्रकार मला वरील उदाहरणातील फकिराने फिरवलेल्या उंटासारखा वाटतो. उंट वापरलाही गेलाय व वापरला नाहीही गेलाय.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/27/2020 - 11:19
नवीन
निर्गुण असा कशात काढता घालता येत नाही !
तो एकच आहे आणि त्यातच सगळं आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 06/27/2020 - 12:22
नवीन
तुम्ही म्हणता तसे असुही शकेल. पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sat, 06/27/2020 - 17:03
नवीन
जो पर्यंत स्वानुभूती येत नाही तोपर्यंत सर्वच थियराॅटिकल असतं, सायंन्समधेही!
- (प्रॅक्टिकल) सोकाजी
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 06/27/2020 - 17:32
नवीन
>जो पर्यंत स्वानुभूती येत नाही तोपर्यंत सर्वच थियराॅटिकल असतं, सायंन्समधेही!
एक्झॅक्टली सोत्रिसर.
विज्ञानात सिध्दता असते तर अध्यात्म्यात प्रचिती.!
वरील उंटाच्या उदाहरणात ही फकिराच्या बाजुने पाहिले तर उंटाची गरज नाही म्हणजे नसलेला उंट तीन बंधुंना दिला व त्यांची समस्या सोडवली व तो नसलेला उंट परत स्वतःकडे आणला. पण ते तिघे बंधु फकीराच्या पातळीवरचे नसल्याने त्यांच्यासाठी एक उंट असा फिरवावा लागला. समजा इथे फकिराने असे म्हटले असते कि बाबांनो माझ्याकडे एक उंट आहे त्याचे नाव "अल्लारखा" वा "अल्लाबक्ष" वगैरे तत्सम काहीतरी ठेवु. तो मी तुम्हाला इथे दिला असे समजा आता कॅलक्युलेशन करा व समस्या सोडवा.तशीही समस्या सुटली असती पण इथे जर तिघा बंधुंनी कुतर्क केला असता कि जो उंट नाहीच आहे त्याचे नाव तुम्ही कसे ठेवता तर ही समस्या कदाचितही ना सुटती.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/27/2020 - 18:58
नवीन
करेक्ट !
प्रचिती नसल्यानं अशी उदाहरण पसरली आहेत आणि
कुणी संतांनं असं उदाहरण दिलं की पब्लिकला वाटतं `हाऊ ग्रेट !'
पण मजा म्हणजे त्यालाही त्यातलं काही कळलेलं नसतं,
तो त्याच्या गुरुकडून मिळालेला माल पुढे पोहोचवत असतो.
सत्य ही निर्वस्तू आहे आणि
तीच सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे.
तुम्ही ती काढणार कशातून ? आणि
ठेवणार कुठे ? कारण निर्वस्तू असल्यानं तीचं विभाजनही होऊ शकत नाही,
म्हणून तर नैनं च्छिंदंती शस्त्राणी म्हटलंय.
आणि तीनंच सर्व व्यापल्यानं तीला कुठेही ठेवता येत नाही.
म्हणून निर्वस्तू अक्षय आहे; तीच्यात वृद्धी किंवा घट होत नाही.
___________________________________________
त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण गैरलागू आहे.
तसंच ते सगुणातून निर्गुण अलगद काढता येईल या भ्रामक कल्पनेला ही गैरलागू आहे.
त्यामुळे अध्यात्म एकदम क्लिअर-कट आहे : एकतर निर्गुणाचा उलगडा झाला किंवा मग नाही झाला.
आधी सगुण साधू मग नामदेवाला, ज्ञानदेव विसोबा खेचराकडे पाठवतील, आणि
तो अलगद सगुणातून निर्गुण वेगळा काढून दाखवेल,
याला काव्यात्मक कल्पनेपलिकडे काही अर्थ नाही.
कारण निर्गुण ही निर्वस्तू आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 06/27/2020 - 19:35
नवीन
ते कसे? माझ्यामते भावंडांच्या मटेरिअलिस्टीक सत्य परिस्थितीत फकिर भेटल्यानंतर काहीही फरक पडला नाही.पण एक समस्या सुटली आहे. नसलेला उंट फिरवला आणि चमत्कार घडला आणि सत्यही तसेच राहिले.
माझ्यामते सगुणातुन निर्गुणाला बाहेर काढणे असे नसुन सगुणाच्या सहाय्याने निर्गुणाची अनुभुती घेणे असे असायला हवे.
म्हणजे एखादा तरण-शिक्षक आपल्या शिष्याला आधी डबा बांधुन पोहायला शिकवेल. पण एका निर्णायक क्षणी तो डबा आता जोखड होतोय तुच काढुन टाक असे म्हणेल वा स्वतःच त्याचा डबा काढुन शिष्याला पाण्यात ढकलेल.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/27/2020 - 19:42
नवीन
गापैंशी यावर झालेली सविस्तर चर्चा बघा.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 06/27/2020 - 20:28
नवीन
तीनशे प्रतिसाद झाल्यावर.. कोणाच्या विचारात जर फरक पडला नाही तर, दोन्ही साईड ने बोलणाऱ्यांनी विषय बंद करण्यास काही हरकत आहे काय?
सहज वाटले..
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 06/27/2020 - 22:08
नवीन
फक्त धागा कर्त्यालं पटल तरच निर्माता अस्तित्वात आहे नाही पटल तर नाही.
धार्मिक विचारांनी सुयोग्य समाज निर्माण होतो अन्यथा नाही हे धागा कार्त्याला पटले तरच सत्यात उतरले.
कशाला त्यांना पटवण्याचा आटापिटा करताय कारण त्यांच्या सारखा विचार करणारी लोक अल्प संख्यक आहेत.
आपले विचार त्यांना पटले पाहिजेत ही आपली मजबुरी नाही.
अन् त्यांचे विचार आपल्याला पटले पाहिजेत ही त्यांची गरज आहे.
हा धागा बंद करणे च उत्तम.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 17:45
नवीन
निर्माण होतो अन्यथा नाही ?
वाचा :
>दुसर्याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 06/28/2020 - 18:03
नवीन
ह्या जगाचा कोणी तरी निर्माता आहे ह्या वर माझा विश्वास आहे.
आणि कसे जगावे,जगण्याची उद्दीष्ट काय असावीत, समाजात वावरताना वर्तन कसे असावे.
सुख ,दुःखाच्या कल्पना ह्या विषयी धर्म जे सांगतो ते अती उत्तम दर्जाचे च आहे .आणि मला ते पटत
धर्म अस्तित्वात आले नसते तर आताच सुनियोजित समाज,कुटुंब अस्तित्वात आलीच नसती.
हे पण ठाम मत आहे
तुमची मत बरोबर असतील तुमच्या पुरती त्या वर माझा काही आक्षेप नाही.
आणि तुमचीच मत योग्य आहेत ती सर्वांनी स्वीकारावी असे तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
मी तुमच्या मताशी सहमत नाही.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 18:52
नवीन
म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/28/2020 - 19:36
नवीन
म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 06/27/2020 - 22:32
नवीन
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
करेक्ट. इलेक्ट्रॉन देखील कुणीही पाहिला नाहीये. त्याचीही केवळ कल्पनाच करता येते. त्याचं थेट रूप न दिसता ती कल्पना गणिती समीकरणांच्या मार्गे मांडावी लागते.
२.
समीकरणाचा कागद फाडला की इलेक्ट्रॉन गुल होत नाही.
३.
समीकरणातला इलेक्ट्रॉन इतका झगझगीतपणे दिसतो की तो गृहीत धरून त्याचे गुणधर्म शोधणाऱ्या अनेक लोकांना नोबेल पारितोषिक मिळालं.
४.
गोंदवलेकरांचं माहीत नाही. क्षमस्व!
५.
'इलेक्ट्रॉन अमुकेक स्थानी अस्तित्वात आहे' असं थेट विधान करता येत नाही. तरीपण त्याचं वस्तुमान मोजलं जातं. आणि ते मोजतांना तो स्थिर आहे असं मानलं जातं. हा तिढा कसा सोडवणार? हा पेच सुटंत नाही तोवर इलेक्ट्रॉनचं अस्तित्व ही एक भक्तांची श्रद्धाच असणारे.
६.
ते माझा देव बघून घेईल. त्याला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्याला योग्य वाटेल तेव्हा मला यथोचित माणसं भेटतील.
७.
माझ्या देवाला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे हा भर मी त्याच्यावर टाकला आहे.
८.
एकदम बरोबर. यालाच देवावर भरवंसा असणे म्हणतात.
९.
धन्यवाद! माझं थोडंतरी सहाय्य झालं. :-)
१०.
तुमच्यासाठी नसेल. बहुसंख्य साधकांसाठी स्पंदन हेच नाम आहे.
११.
हे कळलं नाही.
१२.
बरोबर.
१३.
बरोबर. प्रत्येक नाद स्पंदनजन्य नसतो. उदा. : अनाहत नाद.
१४.
तुमच्या मताचा आदर आहे. मी सुद्धा थांबायचं म्हणतो.
असो.
एकंदर चर्चेवरनं मला वाटतं की तुम्ही ज्याला देव (किंवा परम तत्त्व) म्हणता ते आकाशासारखं स्थितीशील आहे. याउलट मी (व बहुसंख्य लोकं) ज्याला देव म्हणतो तो चेष्टाकर म्हणजे हालचाल करणारा आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना:.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »