राजकारण

चालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)

Primary tabs

मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.

https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…

hrkorde

पावसात छत्री सुद्धा धरली होती म्हणे.

फाईल हातात घेऊन टागोरांची नक्कल करून झाली.
आता विमानात कागद वाचून शास्त्रीजिंची नक्कल केली.

श्रीगुरुजी

ही बातमी थरूरने goof up केलेली आहे हे त्या बातमीतच पुढे लिहिलंय.

कपिलमुनी

त्याकाळी नेहरूंनी सीजीआय किंवा व्ही एफ एक्स वापरून व्हिडीओ तयार केला होता म्हणे

श्रीगुरुजी

पण ट्रुमन विमानतळावर स्वागताला येऊन उपयोग काय झाला? याच अमेरिकेने नेहरूंच्याच काळात १९५४ मध्ये १२० F-86 लढाऊ विमाने पाकिस्तानला दिली होती.

कपिलमुनी

चर्चेचा मुद्दा विमानतळावर स्वागत करायला अध्यक्ष येतो की नाही हा होता.

तसा शिनपिंग बरोबर झुल्यावर झुलून आणि पाकिस्तान ला जाऊन शिरखुरमा खाऊन काय उपयोग झाला ? अशीही चर्चा होईल.

सध्या जो मान नेहरूंना दिला गेला तो शेठ ला मिळाला नाही इतकाच आहे.

श्रीगुरुजी

लाहोल विलाकुवत! वल्ला हबीबी!!

नेहरूंना अमेरिकेने काहीतरी मान दिला म्हणे आणि नेहरूंनी त्याची एक चित्रफीत करून प्रसिद्धी पण केली (ज्याचा देशाला शून्य उपयोग झाला आणि असला मान देऊनही अमेरिका पाकड्यांच्याच बाजूला राहिली), पण तो मान लालबहादूर शास्त्री, इंदिरा, राजीव, नरसिंहराव, मनमोहन इ. ना का दिला नसावा? आणि मोदींना असला दिखाऊ मान न देता सुद्धा अमेरिका ३७० कलम, सर्जिकल हल्ला वगैरे विषयात पाकड्यांच्या बाजूला न जाता भारताच्या बाजूने का आहे?

कपिलमुनी

मुद्दा वेगळा चर्चा वेगळी !

गोलपोस्ट बदलणे चालू राहू द्या ,

शिनपिंग , नवाझ वगैरे सोयीस्करपणे बाजूला ठेवू .

सुक्या

सध्या जो मान नेहरूंना दिला गेला तो शेठ ला मिळाला नाही इतकाच आहे.

नेहेरु नंतर क्रमाने राधाक्रुष्णन, ईंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी , पी व्ही नरसिंहाराव, ईंद्र कुमार गुजराल, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी जाउन आले. त्यात किती जणांना नेहेरुंसारखा (एयरर्पोर्ट वर जाउन रीसिव्ह करायचा) मान मिळाला ?

त्यामुळे मान फक्त (मोदी) शेठ ला मिळाला नाही हे वाक्य चुकीचे आहे. (मोदी) शेठ च्या जागी ईंद्र कुमार गुजराल टाकले तरी वाक्य तसेच राहते ..

गॉडजिला

यप.

सुक्या

सधारणपणे विदेशी पाहुण्यांना विमानतळावर रीसिव्ह करायला जायचा जो प्रोटोकॉल अमेरीकेत आहे तो डिपार्ट्मेंट ऑफ स्टेट च्या अखत्यारीत आहे. त्यांचे "Office of the Chief of Protocol" हे सारे सोपस्कार प्रेसिडेंट च्या वतीने पार पाडते.
ऑफीशियल स्टेट व्हि़जीट च्या वेळेस मात्र अमेरिकन प्रेसिडेंट पाहुण्यांना रीसिव्ह करायला व्हाईट हाऊस च्या दक्षिण लॉन वर जातात.

प्रत्येक देशाचे हे राजशिष्टाचार वेगळे असतात. त्यात प्रसंगी बदलही होतात. येणार्‍या पहुण्याची भेट ही किती महत्त्वाची आहे / त्यामुळे देशाला काय / किती फायदा होईल यावर हे सारे अवलंबुन असते.

श्रीगुरुजी

६०-७० वर्षांपूर्वी पाहुण्या देशाच्या प्रमुखाचे स्वागत करायला तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष विमानतळावर उपस्थित रहात असावे. परंतु काही काळाने प्रोटोकॉल बदलला असावा व त्यामुळे कोणत्याही देशाचा/ची प्रमुख अमेरिकेत आला/ली तरी अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जात नसावे. अलिकडच्या काळात अमेरिकेचा अध्यक्ष एखाद्या देशाच्या प्रमुखाचे स्वागत करायला विमानतळावर उपस्थित राहिल्याचे वाचनात आले नाही. थसे झाले असल्यास लिंक द्यावी. कदाचित पोप किंवा इंग्लंडच्या राणीसाठी अपवाद असावा. परंतु तसे वाचनात आले नाही.

सुक्या

हो. ६०-७० वर्षांपूर्वी तशी प्रथा असावी.
सध्याच्या काळात तरी मला अमेरिकेचे अध्यक्ष स्वागतासाठी विमानतळावर गेला असे कुठे दिसले नाही.

स्टेट व्हीजीट हा संपुर्ण वेगळा विषय आहे. त्यात पहुण्यांचे स्वागत करायला अमेरिकेचे अध्यक्ष स्वतः सपत्नीक जातात; पण व्हाईट हाउस च्या लॉनवर. त्यांतर तोफांची सलामी , परेड , संध्याकाळचे भोजन , बॉलरुम डांस असला कार्यक्रम असतो.

वर्किंग व्हीजीट ही वेगळी .. यात मीटींग / पत्रकार परीषद वगेरे असते. क्वचीत शिष्ट्मंडळावरोबर दुपारचे भोजनही असते.

अनन्त अवधुत

सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख हे संयुक्त राष्ट्रांच्या सभे साठी आलेले आहेत, अमेरिकेच्या स्टेट व्हिजीट साठी नाहित.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, स्टेट व्हीजीट हा संपुर्ण वेगळा विषय आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्याची प्रथा नाही (किंवा मोडित निघाली)
राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या जोडीदाराने पाळावयाच्या राजशिष्टाचाराच्या थोड्या अधिक माहितीचा दुवा.

प्रदीप

अमेरिकेन सरकारच्या 'सेक्रेटरी ऑफ स्टेट' च्या अखत्यारीतील "ऑफिस ऑफ द चीफ प्रोटोकॉल" ह्यांच्या अधिपत्याखाली, परदेशी राष्ट्रप्रमुख तसेच इतर परदेशी सरकारी मंडळीसाठी आचरणांत येणारे प्रोटोकॉल्स येतात. सर्वसाधारपणे, त्या ऑफिसनुसार, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भेटी पांच प्रकारांत मोडतात--

१. स्टेट व्हिजीट
२. ऑफिशिअयल व्हिजीट
३. ऑफिशिअयल वर्कींग व्हिजीट
४. वर्कींग व्हिजीट
५. प्रायव्हेट (खाजगी) व्हिजीट

ह्यांत प्रत्येक भेटीच्या दरम्यान, खालीलपैकी कुठल्या गोष्टी केल्या जातील/ सुविधा दिल्या जातील, तसेच भेट अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या निमंत्रणावरून आहे किंवा खाजगी, ह्यांत फरक आहे.

वरीलपैकी पहिल्या दोन, स्टेट व्हिजीट व ऑफिशिअयल व्हिजीट ह्या फक्त राष्ट्रप्रमुख (भाताच्या संदर्भांत पंतप्रधान, राष्ट्रपति, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपति) ह्यांच्यासाठीच आहेत. तसेच पहिल्या चार प्रकारच्या भेटी, अमेररिकन राष्टप्रमुखांच्या आमंत्रणावरूनच केल्या असाव्यात.

प्रोटोकॉलमधे, व्हाईट हाऊसच्या जवळच असलेले 'ब्लेयर हाऊस' किती दिवस/ रात्रींसाठी उपलब्ध केले जाईल, अमेरिकन राष्ट्राध्याक्षांची भेट असेल का, व्हाईट हाऊसच्या दक्षिण दरवाज्याच्या समोर असलेल्या हिरवळीवर तोफांच्या सलामीसकट आगमनचा सोहळा असेल का, स्टेट डिनर असेल का, इत्यादी बाबींत फरक आहे. ह्यांपैकी पहिल्या दोन प्रकारांत अगदी सूक्ष्म फरक आहे, तर त्या दोघांत व तिसर्‍या व चौथ्या प्रकारांत जरा जास्त फरक आहे.

येणार्‍या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत ते जिथून अमेरिकेत प्रवेशणार, त्या 'पोर्ट'वर कसे केले जाईल, ह्याविषयी येथे थोडी त्रोटक माहिती आहे. पण ह्यावरून असे दिसते की स्वत: राष्ट्रपति अथवा उपराष्ट्रपति ह्यांपैकी कुणी हजर रहावे, ह्याविषयी प्रोटोकॉलमधे काहीही माहिती सापडत नाही. मात्र वरील दुव्यांत आगमनाचा व परतीचा सोहळा व्हाईट हॉलच्या दक्षिणेकडील हिरवळीवर होण्यासंबंधी काही उल्लेख आहेत.

तेव्हा थोडक्यांत विमानतळावर कोण हजर होते, हा काही महत्वाचा मुद्दा नाही.

वरील दुव्यांवरून असे दिसते की, सर्वोच्च पातळीवरील 'स्टेट व्हिजीट्स' एका वर्षांत जास्तीत जास्त सहा होतात. इतर मात्र अनेक असू शकतात.

अमेरिकन सरकारच्या 'इतिहासा'च्या दुव्यावर कुठल्या देशाचे, कोण राष्ट्रप्रमुख, कुठल्या वर्षी व कुठल्या पातळीवरील व्हिजीट्ससाठी अमेरिकेत गेले होते, त्याची माहिती आहे. वर्षाच्या हिशेबांत पाहिले तर १९४९ साली, सर्व मिळून फक्त पाच राष्ट्रप्रमुखांनी तेथे भेट दिली आहे. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले असल्याने हे झाले असावे. ह्या पाचांत नेहरूंचा समावेश आहे. त्याविषयी थोडे सविस्तर पुढे लिहीतो. मात्र, उदा. २०१४ मध्ये एकंदरीत ७४ व्हिजीट्स आहेत, तर २०१९ मधे सर्व मिळून ४० आहेत.

आता, नेहरूंच्या १९४९ मधील बहुचर्चित भेटीचे पाहूयांत*.

तेथील सरकारच्या 'इतिहासा'च्या दुव्यावरून ते तिथे अधिकृतरीत्या ११ ते १५ ऑक्टोबर ह्या दरम्यान होते. मात्र, काही इतर दुव्यांवरून असे दिसते की त्यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर १९४९ ह्या महिन्यांतील सर्व मिळून सुमारे एक महिना अमेरिका व कॅनडा ह्या देशांत काढले, त्यांत त्यांनी अनेक भेटी घेतल्या व काही ठिकाणी भाषणेही केली. त्यांतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कॉन्सिन येथे ४ नोव्हे. १९४९ रोजी केलेल्या भाषणाचा येथे गौरवपूर्ण उल्लेख आहे.

UW President E. B. Fred declared Nehru’s visit memorable for its scholarship and exchange with a nation where “the true aristocrat is a man of learning.”

तर, अगदी नवीन घडी बसवणार्‍या देशाचा राष्ट्रप्रमुख इतका दीर्घकाळ देशाबाहेर, स्वतःच्या विद्वत्तेची जाणीव करत, भाषणे देत फिरतो, हे स्वतःचे मार्केटींग नव्हे तर नेमके दुसरे काय आहे? त्या प्रदीर्घ मुशाफिरींत, त्यांनी तेथील उद्योजकांच्या भेटीगाठी केल्याचे कुठेही नमूद झालेले नाही. त्यांच्या दुर्दैवाने व तत्कालिन भारतीय जनतेच्या सुदैवाने तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वांत नव्हते. रेडियो जेमतेम सुरू झाला होता, दूरचित्रपाणी दूरच राहिली.

अर्थात पुढे, त्यांच्या कारकीर्दीच्या कालखंडांत जगणारे आम्ही, त्यांना मुले कशी आवडतात, गुलाब कसे आवडतात, इत्यादी माहिती चघळत होतो. त्यांचा जन्मदिन, १४ नोव्हेम्बर भारतांत, 'बालदिन' म्हणून साजरा केला जात असे. १९६२ च्या चीन युद्धानंतर- ज्याविषयी भारतीयांनी काही न बोललेलेच बरे-- मग जे सिनेतारक- तारकांचे जवानांसाठी मदत गोळा करण्याकरीता मेळावे भरवण्यात आले, त्यांतील त्यांचा सहभाग-- विशेषतः लताबाई 'ऐ मेरे वतन के लोगों' ब्रेबॉर्न स्टेडियमवरील कार्यक्रमांत गात असतांना समोर बसलेल्या त्यांच्या डोळ्यांत अश्रू कसे आले, ह्याच्या रसभरीत कहाण्याही आम्ही पचवत होतो.

हे सर्व वैयक्तिक मार्केटींग नव्हे तर नक्की काय होते? हे असले काही मोदींनी आता केले तर काय गहजब होईल?

(* ह्यांतील दुवे मला चंद्रसूर्यकुमारांनी पुरवले आहेत).

श्रीगुरुजी

उत्तम प्रतिसाद!

नेहरूंच्या भेटीच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष उपस्थित असल्याने भारतासाठी काही चांगले झाल्याचे वाचनात नाही. मोदी अनेक देशांच्या भेटीवर जातात व त्याचा फायदा वेळोवेळी दिसत आहे.

चीन, जपान, रशिया, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स अशा कोणत्याही देशांचे प्रमुख अमेरिकेत अधिकृत राजनैतिक भेटीवर आले तरी अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित असल्याचे मागील ३-४ दशकात वाचनात आले नाही. त्यामुळे मोदींंच्या स्वागताला बायडेन विमानतळावर न येणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

hrkorde

अमेरिकेत मार्केटिंग करून नेहरू अमेरिकेत इलेक्शन लढवणार होते का ?

अमेरिकेत कुणाला न भेटताही नेहरू काळात भारतात धरणे , विमानतळ , एम्स , आय आय टी , पीएसयु झाले,आणि गावभर फिरूनही विश्वगुरु सगळे विकून टाकत आहेत , ना सरकारी क्षेत्रात निर्मिती , ना खाजगी क्षेत्रात मेक इन इंडिया

प्रदीप

अमेरिकेत मार्केटिंग करून नेहरू अमेरिकेत इलेक्शन लढवणार होते का ?

तुम्ही इतका बालिश प्रश्न विचाराल असे वाटले नव्हते. पण असो.

साधारणपणे, प्रत्येक मोठा नेता नार्सिसिस्ट असतो व तसा तो असलाच पाहिजे, अन्यथा त्याला देशाचा राज्यशकट, स्वतःच्या मतानुसार चालवणे अशक्य आहे. हे नेहरू, इन्दिरा गांधी, मोदी ह्या सर्वाच्या बाबतीत लागू आहे. तेव्हा तशा प्रत्येक नेत्याने स्वतःचे मार्केटिंग - देशांतर्गत तसेच परदेशांतही -- करणे आवश्यक आहे. व हे सर्वजण ते तसे करीत आलेले आहेत. तसेच परदेश दौर्‍यांत उद्योजकांना व देशास उपयोगी पडतील अशा संस्थांच्या प्रमुखांना भेटणे, हे महत्वाचे काम तेव्हाही नेहरूंनी केले असावे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. तुम्ही धरणांचा उल्लेख केला आहे, तेव्हा आपले पहिले मोठे धरण, भाक्रा नांगल येथे उभारण्यांत आले, त्याची केवळ आखणीच नव्हे, त्यर प्रत्यक्ष बांधणीचे कार्यही १९४६ सालीच सुरू झालेले होते असे विकीपेडियाचा दुवा सांगतो:

The agreement for this project had been signed by the then Punjab Revenue Minister, Sir Chhotu Ram in November 1944 with Raja of Bilaspur and finalised the project plan on 8 January 1945. Preliminary works commenced in 1946.

ऐम्स स्वतःविषयी म्हणते:

The health survey and development committee ,chaired by Sir Joseph Bhore, an Indian Civil Servant ,had in 1946 already recommended the establishment of a national medical centre

पण हे तपशिलही आपण येथे सोडून देऊयात.

फक्त हे रिसोर्सेस आणण्याचे काम करण्यासाठी, देशाचा राज्यशकट चालवणार्‍या नेत्याने, परदेशांतील दौर्‍यांत किती वेळ घालवायचा, व तो नक्की कायकाय करण्यांत, ह्याचा प्रश्न उपस्थित होतो. आता इतक्या उशिरा १९४९ साली नेहरूंनी ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या परदेश दौर्‍यांत नक्की कुठेकुठे भेटी दिल्या व कसल्या कामांसाठी ह्याविषयी फारसा तपशिल मिळत नाही.

मी उल्लेखिलेल्या यु. व्हिस्कॉन्सिन येथे जाऊन केकेल्या भाषणामुळे देशाला काय मिळण्याची शक्यता होती? तेथे त्यांनी स्वतःची प्रगाढ वगैरे स्कॉलरशिप दाखवली, ह्यापलिकडे काय? ही असली भाषणे जगन्नेते करीत असतात व त्यांतून त्यांना भरपूर पैसेही मिळतात (टोनी ब्लेयर, ओबामा ही अलिकडची ठळक उदाहरणे). पण हे पदावरून उतरल्यावर करावयाचे उद्योग आहेत. देशाच्या कामासाठी, देशाच्या खर्चाने (पैसा व अमूल्य वेळ) करावयाचे नव्हेत.

येथे नेहरूंनी पंप्र असतांना केलेल्या परदेशवार्‍यांची जंत्री दिलेली आहे, ती फारशी चूक असावी असा संशय नसल्यास जरूर पहावी. १९४९ च्या दौर्‍यांत, आयर्लंड येथील कुराह रेसकोर्सला दिलेली एक भेटही आहे!

त्या दुव्यानुसार त्यांच्या पंप्र कालावधीत नेहरूंनी ४७ देशांना वेळोवेळी भेटी दिल्या- ह्यांतील काही भेटी एकाहून जास्त वेळा!सर्व मिळून एकंदरीत ७१ दौरे आहेत. दळवळ्ण अतिशय कठीण, व वेळकाढू होते अशा काळांत एक पंप्र बाहेर फिरण्यांत इतका वेळ, पैसा घालवू शकतो, हे थक्क करणारे आहे.

आणि गावभर फिरूनही विश्वगुरु सगळे विकून टाकत आहेत , ना सरकारी क्षेत्रात निर्मिती , ना खाजगी क्षेत्रात मेक इन इंडिया

ह्या फालतू, गैरलागू भरकट- उचकाऊ (ट्रोलिंग) भागास मी तर प्रतिसाद देणार नाहीच पण इतर कुणीही तसा देऊ नये असे मी येथे आवाहन करतो. विषय भरकटला जाऊ नये.

Rajesh188

अमेरिकन अध्यक्ष नसतील कोणाला received करायला विमान तळावर जात.
त्यांना पूर्ण खात्री आहे आपण काहीच इज्जत दिली नाही तरी जगातील नेते अमेरिका मध्ये येणार.

hrkorde

औरंगजेब काळापासून असेच आहे

.....======

जर्मनीच्या अध्यक्ष बाईला हस्तआंदोलन केले म्हणे

हिला कधी पनवती लागणार ?

अफगाण परिस्थिती व भारतातील कोविड लस ह्यावर चर्चा केली म्हणे , ती ह्यात काय करणार होती ?

रंगीला रतन

हिला कधी पनवती लागणार ?
ती बै च मोठी पनवती असल्याचे ऐकून आहे :p

Rajesh188

राज्यकर्त्या नी धर्म ,जात,प्रांत हे बघायचे नसते.पाकिस्तान,अफगाणिस्तान,आणि काही मुस्लिम राष्ट्र का बदनाम आहेत,हे देश का प्रगती करू शकले नाहीत .
कारण धर्मावर आधारित राजकारण.
Bjp आता सत्तेवर आहे त्यांच्या कडून देशातील गरिबी कमी होण्यासाठी प्रयत्न होणे आवशक्या आहे,देशभर सिंचन व्यवस्था,विजेची उपलब्धता,कायदा आणि सुव्यवस्था,आर्थिक समानता ,मागास राज्यांची प्रगती,प्रगत राज्य वरील स्थलांतरित लोकसंख्या चा बोजा कमी
करणे,.
महागाई वर नियंत्रण,भ्रष्टाचार वर नियंत्रण.
ही काम अपेक्षित आहेत
पण मोदी साहेब पासून सर्व च bjp चे नेते आणि कार्यकर्ते .
हिंदू ,मुस्लिम,दलित,उच्च वरणीय, ओबीसी ह्या भोवती च फिरत आहेत
आज ची लोक सुबुद्ध आहेत .विचार करतात.
असल्या धार्मिक,जातीय द्वेष करून जे राजकारण करतात त्यांना ओळखतात .
मुस्लिम शिक्षिका नी हिंदू मुलाला मारले,लव्ह जिहाद हे कायदा आणि सुव्यवस्था ह्या संबंधित प्रश्न आहेत .गुन्हेगार लोकांवर कडक कारवाई करा फाशी ध्या
पण तसे घडत नाही.
त्या मुस्लिम शिक्षिका वर mp सरकार नी काय कारवाई केली हे पण सांगा..

Rajesh188

सर्व मुंबई करना माहीत आहे प्लॅटफॉर्म वरून रेल्वे निघून गेली तरी घोषणा झोपलेले असतात.
रेल्वे platform वर च आहे अश्या अर्थाच्या घोषणा करत असतात..कोणाचे कोणावर नियंत्रण नाही . ७० वर्षात ह्या मध्ये काहीच बदल घडला नाही सरकार आली आणि गेली.
हे फक्त एकच उदाहरण आहे अशी अगणित उदाहरणे आहेत
कशाला अमेरिकन अध्यक्ष भारतीय पंतप्रधापदा ना रिसिव्ह करायला विमान तळावर येईल त्याची तेव्हढी किंमत च नाही.

रावसाहेब चिंगभूतकर

कमाल आहे! नेहरूंच्या वेळी तर परवडायची की !!

Rajesh188

हीच विचारसरणी लोकांनी ओळखली आहे.म्हणून तर १०५ असून पण बाहेर काढले

रंगीला रतन

तुमचा एक फोटो पाठवा च, लॉकेट बनवून गळ्यात घालणार च आहे मी.

hrkorde

1 सरदार + 105

रावसाहेब चिंगभूतकर

त्या म्हाताऱ्या बायका कट्ट्यावर कुडकूड कुडकूड बोलत नाहीत का, तसे इथल्या एक दोघांचे प्रतिसाद सतत धुसफूसत असल्यासारखे असतात. छत्री घेतली म्हणून कॉपी केली, फाईल धरली म्हणून कॉपी केली. जणू काय त्या माणसाला हे काय धुसफूसतात त्याचा फरक पडणार आहे. तो माणूस अकख्या विरोधी पक्षाला चुना लावून त्याला हवं ते करतो आणि करणार आहे. तो तुमची पर्वा करणार आहे का? तुम्ही तडफडा. ते तडफडणं वाचून खरं सांगायचं तर मजा येते.

hrkorde

पुढचा आयडी

काकूंबाई कुडकुडकर

Advance booking

आग्या१९९०

जसं काय नेहरूंवर आरोप केल्याने ते जिवंत होऊन येणारच आहेत शिक्षा भोगायला. त्यांना जे करायचे होते ते करून गेले ते. आता तडफड करून काय फायदा?

रावसाहेब चिंगभूतकर

थोडा फरक आहे. नेहरूंवर आरोप नेहरूंसाठी केले जात नाहीयेत. ते नेहरूंच्या वंशजांसाठी केले जातायत. आणि तडफड नव्हे अतिशय थंड डोक्याने केले जातायत. ज्या डोक्यांनी 370 कलम रद्द केलं, ट्रिपल तलाक चा कायदा आणला, राम मंदिर केलं, राष्ट्रीय नागरिक्तवाबद्दल कायदा आणला आणि जे आता समान नागरी कायदा आणणार आहेत ते असल्या फालतू गोष्टींबद्दल तडफडणार आहेत का? तडफडणार तुम्ही. आणि स्यूडो-secularism शेवटचे आचके देऊन मरताना पाहून सेलिब्रेट करणार ते आम्ही.

hrkorde

नेहरूंचे वंशज म्हणजे कोण ? मनेका आणि वरुण का ?

कोणत्या कोर्टात नेहरूंचे वंशज गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब झाले म्हणे ?

सुबोध खरे

National Herald case: Sonia and Rahul Gandhi granted bail (२०१५)

The Court also observed that the evidence in the instant case was documentary in nature.

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/national-…

लालू प्रसाद यांच्या १९९६ च्या केसचा निकाल २०१८ मध्ये लागला तसाच या केसचा निकाल लागेपर्यंत वेळ लागेल परंतु सकृतदर्शनी पुरावा आहे असे न्यायालय म्हणतंच आहे. RJD supremo Lalu Prasad was today sentenced to 14 years in jail and fined Rs 60 lakh by a special CBI court in connection with the fourth fodder scam case pertaining to fraudulent withdrawal of Rs 3.13 crore from Dumka treasury in the early 1990s,

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/lalu-pras…

वाट पहावी लागेल.

मुळात जनता न्यायालयात निकाल लागलेलाच आहे.

श्री वराहुल गांधी कायमचे भावी पंतप्रधान म्हणून राहणार आहेत साहेबांसारखेच.

जनतेच्या न्यायाचा आवाज येत नाही.

गॉडजिला

जनतेच्या न्यायाचा आवाज येत नाही.

जनतेचा न्याय म्हणजे बेलबॉटम मधली रॉ आहे तर…

hrkorde

निवडणुकीत पडले म्हणजे जनतेला न्याय दिला ?
निवडणुकीत तर मेट्रोमॅन श्रीधरनपण पडलेत. आणि सेंगरपण निवडून आलाय.

आणि 20, 25 हजार नेते सोडले तर उरलेली जनता तर निवडणुकीत उभी रहात नाही , त्यांचा न्याय कसा होतो म्हणे ?

आणि राहुल गांधीचे काय बिघडले म्हणे ? पूर्वीही खासदार होता, आजही आहे

hrkorde

जनतेने

निनाद

निर्देशांनंतरही कोझिक्कोड केरळ आकाशवाणीने वीर सावरकरांवर नाटक सादर करण्यास नकार दिला आहे. कोझिक्कोड आकाशवाणी रेडिओ स्टेशनने वीर सावरकरांवर नाटक करण्यास नकार दिला आहे जन्मभूमीच्या अहवालानुसार, कोझिक्कोड रेडिओ स्टेशन मास्तरांनी तिरुअनंतपुरम रेडिओ स्टेशनला या निर्णयाची माहिती दिली आहे. आकाशवाणीने आकाशवाणीच्या सर्व राज्य युनिट्सना सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात वीर सावरकरांवरील नाटकाचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा केरळ स्टुडंट्स युनियनने मोर्चा काढला होता आणि सावरकरांच्या साहित्याचा समावेश अभ्यासात केल्याचा प्रयत्न केल्या बद्दल कन्नूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या प्रती जाळल्या होत्या.

सुरिया

ही बातमी "द ऑर्गनायझर"ची.

कोझीकोडे आकाशवाणी रेडिओ स्टेशनने वीर सावरकरांवर नाटक प्रसारित करण्यास अनिच्छा दाखवली आहे, अशी माहिती जन्मभूमी दैनिकाने दिली आहे. अखिल भारतीय रेडिओने आकाशवाणीच्या सर्व राज्य युनिट्सना वीर सावरकरांवरील नाट्य चालू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. आकाशवाणीने नाटकाची स्क्रिप्ट दिली होती, जी स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करायची होती. केरळमध्ये आठ रेडिओ स्टेशन आहेत, आणि रोटेशन आधारावर नाटके तयार केली जातात. कोझीकोडे रेडिओ स्टेशनने तिरुअनंतपुरम रेडिओ स्टेशनला कळवले आहे की वीर सावरकरांवरील नाटक उद्या प्रसारित केले जाऊ शकत नाही. अहवालानुसार, कोझीकोडे रेडिओ स्टेशन मास्तर म्हणाले की त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्यामुळे सध्याची समस्या उद्भवली आहे. त्याच वेळी, स्टेशनमास्तरला नाटक दुसऱ्या रेडिओ स्टेशनवर हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. नंतर आकाशवाणीने स्पष्ट केले की हे नाटक तिरुअनंतपुरम स्टेशनद्वारे तयार केले जाईल आणि 30 सप्टेंबर रोजी प्रसारित केले जाईल.

ती ही दै जन्मभूमी ह्या मल्याळम दैनिकावर आधारीत.
.
मूळ बातमीत नाटक प्रसारित करण्यास एक स्टेशन असमर्थ. तेही कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यामुळे. तेही आठपैकी एका स्टेशनवर.
ऑर्गनायझर म्हणते अनिच्छा. त्यानंतरही बातमीचा उत्तरार्ध प्रामाणिकपणे दिलाय.
इथला प्रतिसाद म्हणतोय नकार.
.
कळला ना अजेंडा?

hrkorde

स्वातंत्र्यदिनाच्या पोस्टरवर मोदी नेहरूंना नाकारू शकतात , कुणीतरी अजून कुणाला नाकारले तर इतके का नाचायचे ?

सुबोध खरे

सरकारी नोकरीत आदेशाचा अवमान करणे आणि कुणी कुणाला नाकारणे यातील मूलभूत फरक आपल्याला समजत नाही?
कि
समजावून घायचाच नाही?

आग्या१९९०

ब्रिटनने तर भारतीय नागरिकांना कोविड सर्टिफिकेट असूनही थेट प्रवेश नाकारला, विलगीकरणाची अट टाकली. निदान सर्टिफिकेटवरील फोटोचा तरी मान राखायचा होता. कुचंबणा होते काहींची, तडफडही व्यक्त करता येत नाही.

सुबोध खरे

भारताच्या पासपोर्ट वर दर्शनी भागावर अशोक चिन्ह असते.

पासपोर्ट वर व्हिसा देण्यास नकार दिल्यास त्याचा अवमान होत नाही का?

आमरण उपोषण आंदोलन करा बरं!!!!!!

आग्या१९९०

पासपोर्ट वर व्हिसा देण्यास नकार दिल्यास त्याचा अवमान होत नाही का?
काहीही. काय ती तुलना अशोक चिन्ह! कुठे तो इंद्राचा... जाऊदे नाय पचनार.
वैध पासपोर्ट असेल तर व्हिसा नाकारण्यासाठी अन्य कारणे असतात. त्यामुळे अपमान होत नाही. तडफड बळी नं.१
जगात फोटोलाच काय व्यक्तिलाही फार विचारत नाही कोणी.

Rajesh188

भारत सोडून जगात आणखी कोणत्या देशात लसीकरण च्या प्रमाणपत्रावर राष्ट्राध्यक्ष ,किंवा पंतप्रधान, ह्यांचा फोटो आहे का?
बऱ्याच देशांनी पण फुकट लस दिली असणार जनतेला.

गामा पैलवान

कपिलमुनी,

सध्या जो मान नेहरूंना दिला गेला तो शेठ ला मिळाला नाही इतकाच आहे.

हे उलटंही असू शकतं. बिडेन निवडणुकीत झोल करून सत्तेत आल्याने त्यास मोदींसारखा जनतेचा पाठिंबा नाही. मोदींनी त्याची भेट घेतली तर उगीच त्याला वैधत्व प्राप्त होईल. म्हणून मोदींनीच भेट नाकारलेली असू शकते.

आ.न.,
-गा.पै.