ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२
Primary tabs
किशन भारवाडचा खून - आरोपी सब्बीर आणि जमालपूर येथील मौलाना.
अहमदाबाद जिल्हा रहिवासी असलेल्या किशन भारवाड यांची २५ जानेवारी रोजी धंधुका तालुक्यात दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. किशनजी घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सब्बीर, इम्तियाज आणि जमालपूर येथील मौलाना अयुब जावरवाला यांनी यापूर्वी मे २०२१ मध्ये पोरबंदर येथील रहिवासी साजन ओडेदरा याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोरबंदरमध्ये तो सापडला नाही.
एटीएसचे एसपी आयजी शेख यांनी सांगितले की, किशन भारवाडच्या हत्येप्रकरणी मौलाना कमरगानी उस्मानी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका फेसबुक पोस्टमुळे किशन भारवाडची हत्या करण्यात आली आहे. एका बैठकीत कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे. त्यामुळेच कमर गनीच्या सांगण्यावरून या दोन्ही आरोपींनी किशन भारवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अरेरे
द्वेषाची पातळी इतकी खाली घसरली कि आणीबाणीचे समर्थनहि करायला लागलात?
छान!
उत्तम प्रगती आहे.
आणीबानीत वाईट काय होतं पण?? १ कोटी लोकांचा नसबंदी, सार्वजनीक शिस्त, भिकारी, फेरीवाले मुक्त शहरं, रेल्वे वेळेवर धावायच्या. भूदान चळवळीत ज्यांच्या शब्दामे लोकांनी हजारो एकर दमीनी दान केल्या अश्या विनोबा भावोंनी त्याला अनुशासन परिव फूकट म्हटलेलं नाही. काॅंग्रेसच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवनार्यांचं काय जातंय आणीबानी वाईट म्हणायला?
आम्ही भक्त जरी असलो तुमच्या भाषेत अगदी अंध भक्त जरी असलो तरी २०२४ जर बहुमत न मिळून सुद्धा जर सत्ता सोडायला नकार दिला तर आम्ही भक्तच त्यांच्या विरोधात आंदोलन करू तुमच्या सारखं चुकीच्या गोष्टीच समर्थन नाही करणार.
ख फ वर वाचलेल तुम्ही MPSC आणि UPSC ची तयारी करताय, अवघड आहे सगळ.
जाता जाता शाळा कादंबरी वाचा त्यात आणीबाणी च वर्णन आहे, बोकिलांना भक्त म्हणू नका आता.
एम पी एस सी करन्याचा फायदा हाच, “तटस्थ नी खरा” ईतिहास समजतो.
अवघड आहे, शुभेच्छा.
जर इतिहासचा विकृत किंवा चुकीचा लिहीला आहेत असा जर आक्षेप असेल तर, त्या इतिहासाला “तटस्थ नी खरा” समजणे कितपत योग्य? शेवटी तुम्ही तुमची मते तीच पुस्तके वाचुन बनवली असणार!!!
https://mitrokhinarchiveii.blogspot.com/
१६५० आणि १९६० च्या दशकात भारतातील केजीबीच्या ऑपरेशन्सचा विस्तार होत असताना, केंद्राने सीपीआयमध्ये आयबीच्या पूर्वीच्या प्रवेशाची व्याप्ती शोधून काढल्याचे दिसते. केजीबीच्या अहवालानुसार, १९५९ मध्ये बंगाल कम्युनिस्ट पक्षाचे सचिव बनलेले प्रमोद दास गुप्ता यांच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की त्यांना १९४७ मध्ये भरती केले होते.
--
जानेवारी १९६६ मध्ये शास्त्रींच्या आकस्मिक मृत्यूनंतर, काँग्रेस नेत्यांच्या टोळीने ('सिंडिकेट') नेहरूंची कन्या इंदिरा गांधी (केजीबीने व्हॅनो नावाचे कोड) यांना उत्तराधिकारी म्हणून निवडले.
--
१९७०च्या काळात के जी बी कडून आलेली नोटांनी भरलेली सुटकेस नियमितपणे पंतप्रधानांच्या घरी नेली जात असे!!
स्मृती इराणींचा अगम्य आणि तर्कशुन्य युक्तिवाद
थोडे विस्कटुन सांगाल काय? प्रश्न काय होता आणी स्मृती इराणींचा युक्तिवाद चुकीचा कसा काय आहे ते जरा सविस्तर सांगाल काय ?
प्रश्न होता की वैवाहिक संबंधातून झालेल्या अत्याचारांना कायद्याने वगळले आहे, त्याबद्दल काय दखल सरकारने घेतली आहे?
त्यावर त्या म्हणाल्या हा मुद्दा कोर्टात असल्याने मी त्यावर जास्त बोलू शकत नाही. (ओके सो फार.)
पण पुढे म्हणाल्या- प्रत्येक पुरुष बलात्कारी नसतो आणि प्रत्येक लग्न हिंसक असते असे समजणे चुकीचे ठरेल.
(ज्या ते म्हणाल्या ते अर्थातच खरं आहे- तो मुद्दाच नाही. पण इथे त्या प्रश्नकर्त्याने सगळे पुरुष बलात्कारी असतात किंवा सगळी लग्न हिंसक असतात असा दावा केलाच नव्हता, तसं आजिबात सजेस्ट सुद्धा केलं नव्हतं. तर मग महिला व बालकल्याण मंत्र्यांनी महिलांच्या हक्कासंबंधीत अत्यंत संवेदनशील मुद्द्यात अशी रँडम कमेंट का करावी ? एकूण, वैवाहिक जीवनात होणाऱ्या गुन्ह्याला क्रिमीनलाइझ करण्याची निरुत्सुकता दाखवली गेली. पुढे त्याच टोनमध्ये सुशील मोदी म्हणाले- तसा कायदा पारित केल्यास लग्नसंस्था नष्ट होऊन जाईल.)
वैवाहिक जीवनात बलात्कार झाला आहे हे कसे ठरवणार?
ज्या संघटना आहेत त्यांना स्त्रिया शी देणेघेणे आहे भारताशी
फक्त भारतील सामाजिक जीवन ,कुटुंब व्यवस्था कशी नष्ट करायची हेच त्यांचे ध्येय आहे
एकदा समाज अस्थिर झाला की देश अस्थिर होण्यास बिलकुल वेळ लागत नाही.
अणुबॉम्ब पेक्षा धोकादायक असतात .है असले एनजीओ आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत
त्या साठी सरकार मजबूत असावे लागते.
आणि देशाचे सौभाग्य आहे मोदी सारखे मजबूत पंतप्रधान देशाला लाभले आहेत
का हो १८८ प्रभू, तुमचा आय.डी हॅक वगैरे झाला की काय?
मला इतर जीवनात सुद्धा कसे ठरवले जाते याबद्दल कल्पना नाही. पण कायद्यातून वैवाहिक जीवन exclude करण्याची काय आवश्यकता आहे ?
आणि मी फॉरेन्सिक तज्ञ नसल्याने तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऑफहॅन्ड देऊ शकत नाही.
अर्थात, मिपाच्या भाग्याने १८८ विषयातले तज्ञ सुयोग्य मार्गदर्शनासाठी तयार आहेत.
पण कायद्यातून वैवाहिक जीवन exclude करण्याची काय आवश्यकता आहे ?
बलात्कार हा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे भावनेच्या भरात एखाद्या महिलेने सकाळी सकाळी नवऱ्यावर गुन्हा दाखल केला तर नवरा अटकेत जाईल आणि तेथून त्याला सुटायला न्यायालयातूनच आदेश मिळवावा लागेल. न्यायालयातील थकीत खटल्यांची यादी पाहिली तर हा कालावधी कितीही दिवस/ महिने असू शकेल.
मोबाईल दिला नाही म्हणून फाशी लावून घेणाऱ्या मुली आणि सासू/ नवरा बोलला म्हणून रॉकेल घेऊन पेटवून घेणाऱ्या स्त्रिया भारतात कमी नाहीत.
भारतीय मनोवृत्तीमुळॅ जी स्त्री नवऱ्याला एक दिवस जरी तुरुंगात पाठवेल तिच्या वैवाहिक जीवनाची १०० % वाताहत अगदी खात्रीने होईल.
याशिवाय
आताशी कुठे Misuse of Section 498A under IPC ( घरगुती हिंसा कायद्याच्या) दुरुपयोगाबद्दल न्यायालये सजग होत आहेत. त्यात जर कलम ३७६( बलात्कार) अधिक झाले तर त्याचा किती दुरुपयोग होईल याची आपल्याला कल्पना आहे का?
नवरा बायकोचे पटत नाही आणि त्यांचा मार्ग वेगळा होणार आहे असे दिसले तर बायकोने नुसते बलात्कार झाला असा आरोप केला कि नवरा गेला कोठडीत आणि जामीनसुद्धा नाही. मग कौटुंबिक समुपदेशन वगैरे होण्याची शक्यता नाहीच( ज्यासाठी सरकारने समुपदेशक पगारावर नेमलेले आहेत).
अशा अनेक गोष्टींचा सांगोपांग विचार कायदे करण्यापूर्वी करावा लागतो.
उगाच बलात्कार्याला फाशी द्या सारखी वैवाहिक बलात्काराची सवंग लोकप्रयतेची घोषणा देणे हे गरिबी हटाव सारख्या घोषणा देण्याइतकेच सोपे आहे
पण प्रत्यक्षात आणणे जवळ जवळ अशक्य आहे.
भाजपने केलेली कोणतीही गोष्ट चुकीचे असते या मनोवृत्तीतून प्रथम बाहेर या.
आणि
अभ्यास वाढवा.
कायद्याचा गैरवापर होतो म्हणून एखादी चुकीची गोष्ट गुन्हाच नाही असे म्हणणे ?
१०० अपराधी सुटले तरी चालेल पण एकाही निरपराध्यास शिक्षा झाली नाही पाहिजे हे आपल्या न्यायव्यवस्थेचे ध्येय आहे असं आम्हाला शाळेत शिकवले गेलय.
कायद्याचा गैर वापर होतो ह्याचा अर्थ जे घडलेच नाही तरी ते घडले असे सांगून कायद्याचा वापर करणे.
ह्या मुळे अनेक निरपराध लोक तुरुंगात जातात
गैर वापर करणे हे गुन्हा करण्या पेक्षा पण मोठा अपराध आहे
पुरुष हा फक्त नवरा नसतो किंवा स्त्री ही फक्त काही फक्त बायको नसते.
पुरुष बाप,भाऊ,नवरा,मित्र, सह कर्मचारी पण असतो.
स्त्री पण अशा सर्व भूमिकेत असते.
काही स्त्रिया कायद्याचा सर्रास गैर वापर करतात ह्याची अनेक उदाहरणे आहेत.
त्या मुळे फक्त पुरुषावर अन्याय होतो असे नाही.
आई ही पण स्त्रीचं असते,बहीण ही पण स्त्री च असते,मैत्रीण ही पण स्त्रीचं असते ह्या सर्व स्त्रियांवर पण अन्याय होतो.
आता समाजातील स्त्रियांनीच ह्या उथळ स्त्री वादी ढोंगी स्त्रियांच्या विरुद्ध निदर्शने केली पाहिजेत.
आणि पुरुषांनी अशा कायद्यानं वर करडी नजर ठेवली पाहिजे .
अलिप्त पना सोडून दिला पाहिजे.
बाकी कोणत्याच स्त्री वर अन्याय झालाच नाही पाहिजे .त्या वर दुमत असण्याचे कारण नाही.
@sunil kachure
आई ही पण स्त्रीचं असते,बहीण ही पण स्त्री च असते,मैत्रीण ही पण स्त्रीचं असते ह्या सर्व स्त्रियांवर पण अन्याय होतो.
आता समाजातील स्त्रियांनीच ह्या उथळ स्त्री वादी ढोंगी स्त्रियांच्या विरुद्ध निदर्शने केली पाहिजेत.
आणि पुरुषांनी अशा कायद्यानं वर करडी नजर ठेवली पाहिजे .
अलिप्त पना सोडून दिला पाहिजे.
बाकी कोणत्याच स्त्री वर अन्याय झालाच नाही पाहिजे
कोणत्याही चर्चेत अनेक बादरायण आणि असंबद्ध मुद्दे आणून गोलगोल बोलून त्याची वाट लावलीच पाहिजे का?
याबद्दल आपल्याला कोणी अतिरिक्त भत्ता देतो का?
टाडा- पोटा वगैरे रद्द करायची मागणी करताना ही अक्कल कुठे पेंड खायला गेली होती का?
कायद्याचा गैरवापर होतो म्हणून एखादी चुकीची गोष्ट गुन्हाच नाही असे म्हणणे ?
गुन्हा नाही असा कोण म्हणतंय ? पण रोगापेक्षा इलाज भयंकर असा होऊ नये एवढीच इच्छा आहे.
केवळ आपलाच मुद्दा बरोबर हा हेका सोडून द्या.
बलात्काराच्या कायद्याबद्दल एक मूलभूत टिप्पणी आहे. कधी वेळ मिळाला तर वाचून घ्या.
rape is an offence difficult to prove, even more difficult to disprove.
३७६ कलमाखाली एकदा स्त्रीने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप केला कि तो "झाला आहे" असेच कायदा मानतो.
तो "केला नाही" असे सिद्ध करणे हि आता पुरुषाची जबाबदारी आहे.
फ्लॅव्हिया अग्नेस या "स्त्रीवादी" कार्यकर्त्या या कायद्याबद्दल काय म्हणतात तेही वाचून घ्या
https://www.business-standard.com/article/current-affairs/proving-marit…
प्रचंड सहमत.
लिब्बू लोक अशी घाण सगळीकडेच करत असतात.
लिब्बू लोक अशी घाण सगळीकडेच करत असतात.
बाडीस
प्रश्न असा होता की भादंवि कलम ३७५ जे बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यासाठी वापरले जाते. ज्यात कठोर शिक्षा होउ शकते ते कलम वैवाहीक जीवनात झालेल्या बलात्कारासाठी वापरावे का? सध्याच्या कायद्यात वैवाहीक जीवनात बलात्कार मानला जात नाही. परंतु त्या कायद्यानुसार स्त्री ला बर्यापैकी संरक्षण आहे. जसे की शारीरीक / लैंगीक / वर्बल / आर्थीक बाबतीत स्त्री ला संरक्षण प्राप्त आहे. त्यात लैगीक अपराध हा स्त्री ला अपमानीत व्हावे लागेल किंवा तिला लज्जीत व्हावे लागेल असे क्रुत्य अपराध म्हणुन मानले जाते.
आता राहीला प्रश्न बलात्कार या गुन्ह्याचा. त्यात कुठलाही ईंटर्कोर्स हा गुन्हा मानला जातो. तसे कलम लागुन त्याला त्याप्रमाणे शिक्षा होते. आता नवरा बायकोच्या भांडणात जर बायकोने तक्रार केली व त्याला ३७५ कलम लावले तर तो बलात्कारी होतो. मग याचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढते. म्हणुन हे कलम वैवाहीक तक्रारीसाठी बरोबर नाही. बाकी जर बायको ने घरगुती हिंसा या कलमाखाली तक्रार केली तर त्याची दखल घेतली जातेच.
त्यामुळे केली तक्रार आणी लावले ३७५ कलम असे होणे चुकीचे आहे. म्हणुन त्या असे म्हणाल्या की प्रत्येक माणुस (विवाहीत) हा बलात्कारी नसतो व प्रत्येक लग्न हिंसक नसते. त्यामुळे जनरलाझेशन करुन तसे कलम लावता येणार नाही.
(बाकी मी काही कायद्याचा तज्ञ नाही. जितके समजले तसे लिहिले)
हा फार मोठा विषय आहे आणि ताज्या घडामोडीत त्यावरची चर्चा नको म्हणून मी काही लिहिलेले नाही.
अन्यथा तो एक वेगळ्या स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
कशी एनजीओ विदेशी मदती वर भारताची संस्कृती,लग्न संस्था ,कुटुंब व्यवस्था मोडीत काढण्यासाठी प्रयत्न शिल आहेत.
सर्व एनजीओ ना आर्थिक मदत कोठून मिळते ह्यांची काटेकोर चोकशी सरकार नी करावी.
लग्नानंतर होणाऱ्या अत्याचार साठी अगोदर च पुरेसे कायदे आहेत आणि त्याचा गैर वापर पण होत आहे.
लग्नानंतर येणाऱ्या नवऱ्या बरोबर च्या सेक्स संबंधाला कायद्याच्या कक्षेत आणा अशी काही जण मागणी करत आहेत
ह्याचा खूप दुरुपयोग होवू शकतो.
नवरा ,बायको मध्ये अविश्वास निर्माण होवून ती संस्था च नष्ट होईल .
हेच तर काही लोकांना हवं आहे.
जे अन्यायग्रस्त हे अल्पसंख्य समाजातील च असतो आणि अन्याय करणारा हा बहुसंख्य समाजातील च असतो .
असे समजून काही कायदे भारतात आहेत.
तसे च स्त्री ही नेहमीच अन्यायग्रस्त असते आणि पुरुष हेच अन्याय करणारे असतात.
असे पण कायदे भारतात आहेत
आणि राज्यघटनेच्या सर्व सामान ह्या तत्व शी विसंगत आहेत.
बलात्कार च्या केस मध्ये जर स्त्री चे नाव गुप्त ठेवले जाते तर तोच न्याय पुरुषांना पण पाहिजे पुरुषांचे नाव पण गुप्त ठेवले गेले पाहिजे.
TRIAL पूर्ण होई पर्यंत मीडिया REPORTING ला बंदी च हवी.
खोट्या आरोप केल्या मुळे पुरुषांच्या इज्जती ला गंभीर धोका पोचतो.
असे समतोल कायदे हे असेलच पाहिजेत
माझ्या परिचित व्यक्तीबाबत घडलेली एक गोष्ट आहे. संबंधित मनुष्य एका बँकेत खूप मोठ्या पदावर नाही तरी मध्यम पदावर आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काहीतरी बोलला त्यानंतर तिने सरळ एच.आर कडे सेक्श्युअल हॅरॅसमेंटची तक्रार करेन अशी धमकी दिली. त्यानंतर तो किती घाबरला होता हे मला माहित आहे. त्यानंतर त्या मुलीला काही बोलणे सोडाच तो तिला टाळायलाच लागला. कधी एकदा ही बया सोडून जाते याची वाट तो बघायला लागला होता. लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी काही दिवस ती बया एकदाची दुसरीकडे गेली आणि याचा जीव भांड्यात पडला. समजा तिने अशी तक्रार केली असती तर एच.आर ने चौकशी न करता त्याला नोकरीवरून काढून टाकले असते आणि कदाचित पोलिस तक्रार होईपर्यंत आणि तुरूंगात जाईपर्यंत परिस्थिती आली असती. आता तो म्हणत आहे की तो कोणा मुलीला-स्त्रीला इंटरव्ह्यूलाच बोलावणार नाही. दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यावे लागते. त्याला असे वाटायला लागले तर त्यात त्याची काहीही चूक आहे असे मला तरी वाटत नाही. हा प्रकार २०१८ मध्ये झाला होता आणि तिथपासून फेब्रुवारी २०२० पर्यंत म्हणजे जवळपास दीडेक वर्ष त्याच्या डोक्यावर ती टांगती तलवार होती. हा प्रकार झाल्याचे कळल्यानंतर मला पण तसे घाबरायलाच झाले. हल्ली माझ्या टिममध्ये फार चर्न होतो असे नाही त्यामुळे विशेष इंटरव्ह्यू वगैरे घ्यावे लागत नाहीत. इंटरव्ह्यूलाच बोलवायचे नाही असे मी तरी करत नाही पण समजा अर्जदार लिब्बू आहे असा बोलण्याच्या टोनमधून किंवा अन्य कशातूनही चुकूनही संशय जरी आला तर मात्र थेट रिजेक्ट. थोडे काम मला जास्त करावे लागले तर ते मी करेन पण ही नसती ब्याद गळ्यात कोण घेणार?
याविषयी काहीतरी करायला पाहिजे हे नक्की. लिब्बू लोकांकडून असल्या प्रकाराचे समर्थनच चालते असे म्हटले तरी चालेल. किंवा समर्थन करणे अगदी अशक्य असेल तर मग तोंडदेखल्या 'हो ते चुकीचेच आहे' असे म्हणून नेहमीचे तत्वज्ञान झोडणे सुरू होते. जोपर्यंत तुम्ही लिब्बू लोकांबरोबर सहमत असता तोपर्यंत त्यांच्याइतकी सौजन्याने वागणारी आणि सहिष्णू जमात दिसायची नाही. पण चुकून एकदा त्यांना विरोध करून बघा. मग एखाद्या अगदी हार्डकोअर फासिस्टाला लाजवतील असे असहिष्णू बनून हे लोक अंगावर येतात. जाम डोक्यात जातात हे लोक.
१००८% सहमत!
बाकी,
तुमच्या परिचिताला आलेला दुर्दैवी अनुभव, भारतात उत्पादन क्षेत्रातील एका कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या माझ्या एका परिचितालादेखील आलेला होता.
लोकांचा ब्रेन wash 100 वर्षापासून केला गेलेला आहे.
पण.
चीन हा भारताचा खरा शत्रू आहे.तो भारताला खूप प्रचंड नुकसान पोचवू शकतो.
त्याच्या वर आर्थिक,लष्करी,राजनैतिक संबंध ठेवताना खूप सावध भूमिकेत भारताने असणे गरजेचे आहे.
पाकिस्तान भारताचा शत्रू च आहे पण चीन इतका बलशाली नाही .भारत त्याला कधी ही चिरडू शकतो
.
चीन भारताचा पूर्ण नाश करण्याचे प्लॅन करत असेल तेव्हा पाकिस्तान फक्त काश्मीर ताब्यात मिळावे इतकाच प्लॅन करत असतों
Limbardu म्हणून जी विचार श्रेणी आहे ती भारताला मुळापासून सुरुंग लावून उध्वस्त करण्याची इच्छा ठेवून आहे.
इस्लामिक पाकिस्तानी जी विचार श्रेणी आहे ती भारताला मुळापासून उध्वस्त करण्याची नाही.
आपल्या स्वतःच्या फायद्या साठी आपल्याला कोणाशी लढायचे आहे ते आपल्याला समजणे गरजेचे आहे.
गझवा-ए-हिंद काय आहे?
फक्त भीती आहे.
इस्लामिक दहशत वाद पासून स्वतःचे रक्षण करण्यात हिंदू सक्षम आहेत.
ते हिंदू च्या संस्कृती वर ,कुटुंब प्रणाली,समाज व्यवस्था ह्या वर पाठीमागून घाला घालत नाहीत.
ते दिलदार शत्रू आहेत,छातीवर वर करतील
पण पाठीत वर करून भारताचा विनाश नाही.
अनिस, ढोंगी स्त्री वादी,ढोंगी मानवता वादी .असले प्रकार ते करत नाहीत.जे काही मतभेद असतील ते मैदानात .सोडवायला त्यांची पसंती असते
जर हिंदु सक्षम आहेत किंवा होते तर
या विधानाइतका काळा विनोद दुसरा काही नसेल.
वर Trump यांनी लिहिलेच आहे; त्याशिवाय, शेकडो वर्षांपासून हिंदू (सनातनी, बौद्ध ,जैन, शीख इ) वास्तव करत असलेला भूभाग आक्रसत चालला आहे, आणि त्याची गती सातत्याने वाढत चालली आहे. हिंदू स्त्रियांवर आजवर जितके अत्याचार झाले आहेत तितके कदाचित दुसऱ्या कोणत्याच जनसमूहातील स्त्रियांवर झाले नसतील.
दुख्तरे हिन्दोस्तां नीलाम ए दो दीनार
तुम्ही योग्य तेच बोलत आहात.
पण ते सरळ आक्रमण करून ,हिंसा करून अत्याचार करतील आपण त्याचा विरोध करू शकतो.
जिंकू शकतो किंवा मरू शकतो.
पण बाकी स्लो poision सारख्या विचार धारा .हिंदू ना आतून पोखरून खोकला बनवतील .माहीत पण पडणार नाही
कॅन्सर सारखे आहे हे कधी शरीर पूर्ण कमजोर होते आणि मृत्यू दरात उभा राहतो हे शेवटच्या क्षणा पर्यंत कळतं नाही.आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते
सावध करणे गरजेचे आहे त्यांना काय डावपेच आहेत आणि ते त्यांच्याच कसे मुळा वर येतील ह्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याची जबाबदारी अर्थातच आपली आहे.
कचुरेसाहेब, पक्ष बदलला की आय डी हॅक झालाय?
अगदी अनपेक्षित लिहीले आहे.
मी ज्या विषयावर लिहल आहे तो राजकीय विषय नाही .सामाजिक विषय आहे.
जिथे सामाजिक हिता चा प्रश्न असतो तिथे राजकीय दृष्टिकोन सोडून द्यावा लागतो.
समान नागरी कायदा अस्तित्वात नसल्या मुळे.
घटस्फोट,नवऱ्याच्या संपत्ती वर हक्क ह्या कायद्याच्या कक्षेत फक्त हिंदू च येतात.
तीन तलाक अजून चालू आहे ह्या वरून हे मत आहे
फक्त हिंदू धर्माने आणि ख्रिस्त धर्माने स्त्रियांना पूर्ण स्वतंत्र दिले आहे.
बाकी लोकांनी नाही .
त्या धर्मात त्या अजून गुलाम च आहेतं
हे नक्की का?
आपण इतके अगाध ज्ञान कुठुन मिळवता?
काही उदाहरणे आणि मग तुम्हीच निष्कर्ष काढला तर उत्तम.
१) हिंदू धर्माच्या अंध श्रद्धा निर्मूलन करतो म्हणून श्रद्धा वर हल्ला .
मुस्लिम करत आहेत की दुसरेच
२) मध्ये पुण्यात किंवा बाकी ठिकाणी कॉलेज मध्ये सत्य नारायण ची पूजा घातली त्याला विरोध मुस्लिम लोकांनी केला की विरोध करणारे दुसरेच होते
३)भारताची प्राचीन उज्ज्वल परंपरा ,विविध वास्तू शिल्प,विविध विषयावर प्राचीन ग्रंथात दिलेली माहिती.
हे सर्व बकवास आहे खोटे आहे .
असे लेबल कोण लावत मुस्लिम लावत नाहीत दुसरेच लावत असतात .त्या मुळे प्राचीन ज्ञान वर भारतात सखोल अभ्यास होत नाही.
युरोपियन राष्ट्र तो अभ्यास करतात.
४) भारताची कुटुंब व्यवस्था,लग्न संस्था ह्या वर मुस्लिम आक्षेप घेत नाहीत घेणारे दुसरेच आहेत.
हे दुसरेच छुपे पण धोकादायक आहेत
.
ते कोण हे तुम्ही शोधा
पुण्यामध्ये शिवसैनिकांचा किरीट सोमय्यवरती हल्ला, कल सौम्यांनी राऊता वर आरोप केले आणि आज लगेच हल्ला केला. राज्यातल्या सत्ताधारी पक्षाची उघड उघड गुंडगिरी चालू आहे.
आता बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही अशी तक्रार कोनी करू शकनार नाही. :)
मारहाणीचा निषेध!
आता बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही अशी तक्रार कोनी करू शकनार नाही. :)
मारहाणीचा निषेध!
राजकीय वाद हे गुंडगिरी ,मारहाण ह्याच्या मध्ये परावर्तित होवू नयेत .
ही संस्कृती राज्यात बिलकुल फोफावली नाही पाहिजे
सरकार नी दोषी व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करावी..
आरोपी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असतील तरी.
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://marathi…
हा ऐतिहासिक निर्णय आहे.देशात मेडिकल शिक्षण भयंकर महाग झाले होते.
हुशारी आहे पण पैसे नाहीत म्हणून अनेक मुलांची डॉक्टर होण्याची स्वप्न पूर्ण होत नव्हती
भारत अनेक भावी दर्जेदार डॉक्टर ना मुकत होता.
फिशींग अलर्ट देतेय आमची विषाणु प्रतिरोधक यंत्रणा....
Bedrohung gesichert Wir haben die Verbindung zu marathi.abplive.com sicher abgebrochen, da die Seite mit URL:Phishing infiziert war
Wir können auch Sie von anderen Arten von Bedrohungen schützen.
UPGRADE FÜR IHREN SCHUTZ DURCHFÜHREN
Details anzeigen
8b9431882293/220206.0751+01000
चांगला निर्णय.
प्रशासन माझी लिंक delete करावी .विषाणू अलर्ट मिळत असेल तर.