राजकारण

ताज्या घडामोडी मार्च - भाग २

Primary tabs

ताज्या घडामोडी मार्च - भाग २ येथून पुढे...

ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत.
यासाठी'स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी' किंवा SAHI अशी संस्था स्थापन केली गेली आहे. येल, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, वेलस्ली, मिशिगन स्टेट, ड्यूक आणि रटगर्ससह अमेरिकन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये SAHI, HfHR आणि साधना या संस्थांनी एकत्रितपणे CAA आणि NRC विरुद्ध निदर्शने केली होती. संघटनेने भारतीय सरकारी अधिकार्‍यांवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला खुले पत्र लिहिले होते.
या वर्षी आता वेबिनार घेतला जाणार आहे.

लिबरल कट्टरवाद असा वाढवला जातो असे दिसते आहे.

अहो हल्ली जावई करतांना अश्याच सरकारी नोकरीतला बघतात. पन्नास हजार पगार आणी दीड लाख वरकमाई म्हणजे चांगला जावई.

कधी मधी काही दिवस सस्पेंड व्हावे लागले तरी चालेल, जर काही महिने जेल मधे जावे लागले असेल तर त्याहुन उत्तम काही दिवसांत सगळं काही ठीक होते. जेलमधे गेली म्हणजे रग्गड कमवले असणार ! ईतके रग्गड की त्यातले थोडेसे पैसे चारुन प्रकरण मिटवता आले. म्हणजे उत्तमच की !

किमान दहा कोटीचा भ्रष्टाचार केला तरच पक्षांत प्रवेश मिळतो. जितक मोठा भ्रष्टाचार तितके मोठे पद ! खुपच जास्त केला तर मंत्रीपद ! अश्या विचार सरणीचे सरकार महाराष्ट्रांत आहे.

किमान दहा कोटीचा भ्रष्टाचार केला तरच पक्षांत प्रवेश मिळतो. जितक मोठा भ्रष्टाचार तितके मोठे पद ! खुपच जास्त केला तर मंत्रीपद ! अश्या विचार सरणीचे सरकार महाराष्ट्रांत आहे. आणी देशात?
राणे, विखे पाटील, दरेकर ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते मिहणूनच तियाना भाजपने प्रवेश दिला असावा नाही?

कॉमी

चालायचे म्हणजे काय ? उगाच काहीही ?

२०१४ मधली बातमी सध्याची बातमी आहे अश्या अर्थाने पोस्ट झाली होती इतकेच पॉईंट केले.

Trump

भाउ, येथेच तर घोडे पेंड खातेय.
--
एकंदरीत व्यवस्थेच सुधारणा करायच्या सोडुन आम्ही केले कि बरोबर आणि तुम्ही केले की चुक ह्यामुळेच सगळे वांदे होत आहेत.

प्रत्येक गोष्टात नेहरूंना दोष देनार्यांच्या दृष्टीने ही बातमी लेटेस्टच म्हणायला हवी.

साहना

म्हणूनच म्हणते आकडे इतके छोटे का ?

चौकस२१२

"फस गाये रे ओबामा" या चित्रपटाची आठवण झाली.. "फिनोती " ची रक्कम महागाई मुलळे वाढवावी लागते त्यातील गुंडाला

Trump

ब्रम्हपुत्रा नदीतुन मालवाहतुक

निनाद

या नंतर कथित इतिहासकार ऑड्रे ट्रुशके यांनी असे काही झालेच नाही वगैरे म्हणण्याचा प्रयत्न केला. बळी ठरलेल्या हिंदूंनाच खोटे ठरवण्याचा या बाईचा प्रयत्न आहे. OpIndia ने Whatsapp व्हिडिओ कॉलद्वारे श्री श्री राधाकांता जिऊ मंदिराशी संपर्क साधला. त्यांनी मंदिराची भेंत पाडली गेली आहे हा दावा खरा आहे हे दाखवून दिले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/journalist-fahad-shah-arrested-aga…

देशविरोधी पोस्ट समाज माध्यावर टाकल्याप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पत्रकार फहाद शाह यांना अटक केली.

--------

एक जण, 100 कोटी गैर मुस्लिम लोकांना मारण्याची धमकी देतो, तर दुसरा देशविरोधी पोस्ट टाकतो....

आमदार समर्थकांचाच अवैध धंद्यात सहभाग; शिवसेनेचा गंभीर आरोप.

https://www.loksatta.com/maharashtra/mlas-supporters-involved-illegal-b…

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्षवेधी मांडणारे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याच समर्थकांचा मतदारसंघातील अवैध धंद्यात प्रत्यक्ष सहभाग असून आमदारांचेही त्याला छुपे समर्थन आहे. पोलिसांवर दबाव टाकण्यासाठीच त्यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे.

-------

आता, सचिन मुळूक यांनाच, शिवसेना सोडचिठ्ठी देण्याची शक्यता जास्त आहे.

“मोदींनंतर भाजपा टिकू शकणार नाही”, ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींचं मोठं विधान....

भाजपा काही कायमस्वरूपी राहणारा पक्ष नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपा टिकू शकणार नाही”, असं मोईली म्हणाले आहेत.
-------

हे असे भ्रमाचे भोपळे, कॉंग्रेस मध्ये आहेत...

मोदी हा आत्ताचा भाजप नेता आहे, नंतर गडकरी, अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, भाजपची हिंदू हितवादी फळी खूप मोठी आहे.

शिवाय, आमच्या सारखे हिंदू हितवादी मतदार, घराणेशाहीची पुजा करत नाहीत...बाजपेई, अडवाणी बाहेर पडले तरी, मतदार तुटलेले नाहीत...भाजपचे बरेचसे कार्यकर्ते, फक्त हिंदू हितवाद लक्षांत घेतात. महाराष्ट्र भाजपला, महाजन, मुंडे, खडसे गेले तरी काहीही फरक पडलेला नाही...

घराणेशाहीची पुजा करत नाहीत...बाजपेई, अडवाणी बाहेर पडले तरी, मतदार तुटलेले नाहीत
विखे घराणे
राणे घराणे
मुंडे घराणे
महाजन घराणे
फडणवीस घराणे हे कोठल्या पक्षात आहेत?

sunil kachure

भारतात घराणेशाही सर्व राजकीय पक्षात आहे.
न्याय व्यवस्थेत पण घराणे शाही आहे.
बाप न्यायाधीश सून वकील मुलगा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट .अशी अनेक उदाहरणं मिळतील..
सरकारी नोकरदार मध्ये अनु कंपा तत्वावर अनेक पोर बाळ सरकारी नोकरीत आहेत.
अगदी क्रिकेट,सिनेमा, झाडून सर्व क्षेत्रात घराणे शाही आहे.
त्या मुळे घराणेशाही विषयी कोणीच बोलू नये.
सर्व काचेच्या घरात आहेतः

sunil kachure

नम्र विनंती आहे कोषातून बाहेर या.
भारतात कोणताच राजकीय पक्ष आदर्श नाही.
कोणत्याच संघटना आदर्श नाहीत.
कोणतेच विचारवंत आदर्श नाहीत.
कोणत्याच क्षेत्रात कोणी आदर्श नाही
स्वार्थी लोकांचाच बोलबाला आहे
त्या मुळे कोणीच कोणाला आदर्श समजू नका.स्वतःला तर कधीच परिपूर्ण समजू नका

बेकायदा झोपड्यांना लाखोंचा भाव; कळव्यातील व्यवहारांबद्दल गृहनिर्माण मंत्रीच हतबल

https://maharashtratimes.com/maharashtra/thane/illegal-huts-cost-millio…

आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही लोकांचे म्हणणे असेलच....

sunil kachure

काँग्रेस आणि bjp हे राष्ट्रीय पक्ष आहेत.
आणि महाराष्ट्र मध्य सर्व देश पोट भरत आहे..
Maharashtra नसता तर देशाची अवस्था आफ्रिका पेक्षा वाईट असती.
हेच नालायक राष्ट्रीय पक्ष देशातील भिकारी मुंबई मध्ये आणून झोपड्या निर्माण करत आहेत

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

https://www.loksatta.com/maharashtra/mim-imtiyaz-jaleel-offers-alliance…

ज्या MIMच्या नेत्याने, 100 कोटी गैर मुस्लिम लोकांना मारण्याची धमकी दिली होती, त्या पक्षा बरोबर, कुठलाच पक्ष युती करण्याची शक्यता नाही...

एमआयएम भगव्याला विरोध करणारी संघटना, तडजोड शक्य नाही,’ शिवसेनेने जलील यांची ऑफर धुडकावली

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-wont-go-with-mim-said-shi…

---------

समुद्रात बुडालेली Enron, बाहेर येतांना बघीतली आहे, त्यामुळे, हा देखील , बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असा प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे...

निनाद

कर्नाटक हायकोर्टाने हिजाब ही इस्लाममध्ये अनिवार्य प्रथा नाही हे मान्य केल्यानंतर दोन दिवसांनी, तामिळनाडू तौहीद जमात (TMTJ) नावाच्या इस्लामी संघटनेने मदुराई येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. TMTJ नेते कोवई आर. रहमतुल्ला यांनी जाहीर केले की जर हिजाब प्रकरणाच्या निकालावर न्यायाधीश मारले गेले तर, त्यांच्या मृत्यूसाठी ते स्वतः जबाबदार असतील. यावर मात्र कोणतीही चर्चा झालेली दिसली नाही.
या पुर्वीच हर्षा नावाच्या हिंदूची मुस्लिम जमावाने याच कारणावरून हत्या केली आहे. यावरून दिसून येते की ही धमकी पोकळ नाही!

निनाद

अहमदाबादमधील एका विवाहित महिलेने नसरुखान पठाण नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे की, त्याने प्रेमात पडण्याचे नाटक करून तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर नसरुखान पठाण याने महिलेची बदनामी करण्याची धमकी देत ​​सुमारे अडीच लाख रुपये घेतले आणि अहमदाबाद येथील तीन दरवाजाजवळील पटवा रस्त्यावरील एका घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
गुन्हेगार नसरुखान पठाण याने तिला प्रियकर असल्याचे भासवून तिला अजमेर दर्गा आणि इतर अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर अनेक महिने बलात्कार केल्याचे आता उघड झाले आहे.
फत्तेवाडी येथे राहणारी महिला आपल्या कुटुंबासह राहते आणि घरकाम करते. त्यांचे पती रिक्षा व्यवसाय करतात. या जोडप्याला ११ वर्षांची मुलगी आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी या महिलेने फेसबुकवरील एन के पठाण नावाच्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि तीच्या आयुष्याची वाताहत झाली!

निनाद

देश गुजरात या वृत्तपत्रानुसार गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे नवे प्रकरण समोर आले आहे. भरूचच्या आमोद तालुक्यातील पुरसा गावातील चार मुस्लिम आणि भरूचमधील एका मौलवीला हिंदूंना जबरदस्तीने इस्लाम धर्मात आणल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. पुरसा गाव हे आमोद तालुक्यातील कांकरिया गावाच्या अगदी जवळ आहे जेथे २०२१ मध्ये आदिवासी वसावा समाजातील शेकडो हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
अन्वरखा इब्राहिम पठाण, गेमलसंग भरतसंग सिंघा, इम्रान नूरभा मलेक आणि जहांगीर गुलाम सरदार मालेक अशी पर्सा प्रकरणातील पाच आरोपींची नावे आहेत.

अलीकडेच गुजरातमधील भरुचमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक धर्मांतरण झाल्याची नोंद झाली आहे जिथे मुस्लिमांनी आदिवासी समुदायातील अनेक लोकांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केले आहे. येथे कोणत्याही हिंदू लोकांचे /हिंदू संघटनेचे लक्ष नाही.

उदारमतवादी जनता, काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...

“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते? पवार सरकार”, सेना खासदार गजानन किर्तीकरांच्या वक्तव्यानं खळबळ

https://www.tv9marathi.com/politics/shivsena-mp-gajanan-kirtikar-said-n…

घरचा आहेर ...

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी तरुणी आली समोर; म्हणाली “संजय राऊतांनी…”

https://www.loksatta.com/pune/a-girl-accused-shivsena-leader-raghunath-…

ज्या राजवटीत, महिलांना न्याय मिळत नाही, ती राजवट लयाला जाते ...

sunil kachure

राजकीय नेत्यांच्या डावपेचात फसू नका.
सर्व सामान्य लोक फक्त खेळणी आहेत
देशाची संपत्ती काहीच मोजकेच लोक बळकावत आहेत.
तुम्ही फक्त हिंदू मुस्लिम करत बसा.
सावध राहा भावनिक होवू नका .नाही तर पुढे खूप कठीण काळ येईल
धर्म जात,हे विष आहे आणि ते फक्त सामान्य लोकांसाठी च असते..
उद्योगपती,राजकीय नेते .
त्याचा फायदा घेवून संपत्ती वर कब्जा करतात .
डोके उघडा.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद

https://www.loksatta.com/maharashtra/shivjayanti-issue-ncp-mla-amol-mit…

आता, कॉंग्रेस कुठली कालगणना सुचवतो? हे वाचणे रोचक ठरेल...

प्रदीप

जानेवारी २०२१ मधे, शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन, सुप्रीम कोर्टाने, 'त्या तीन कायद्यांची' अंमलबजावणी स्थगित केली व देशभरांतील शेतकर्‍यांचे सदर कायद्यांसंबंधी मानस जाणण्यासाठी, कोर्टाने एक चौकशी समिती नेमली.

ह्या समितीने, तिचा अहवाल सुप्रीम कोर्टास, मार्च २०२१ मधे पाठवला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून तो आजतागायत प्रसिद्ध केलेला नाही. त्या समितीतील एक सदस्य, श्री. अनिल घनवट -- जे शेतकरी संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत, व ज्यांनी कै. शरद जोशी ह्यांच्या खांद्याला खांदा लावून, सुरूवातीपासून त्या संघटनेची उभारणी केली आहे-- ह्यांनी स्वतःहून तो अहवाल मीडियांतून आज प्रसिद्ध केला.

त्यानुसार, समितीला एकूण ७३ शेतकरी संघटनांपैकी, ६१ संघटनांनी (म्हणजे ८५%) कायद्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

मात्र, कायदे उत्तरेतील काही मूठभर संघटनांच्या तथाकथित आंदोलनामुळे प्रथम कोर्टाकडून स्थगित व नंतर, सरकारकडून रद्द करण्यांत आले आहेत.

थोडक्यात काय तर केंद्र सरकारने शेपूट घालायला नको होती. असेही पंजाब मधील मते त्यांना मिळणार नव्हती. युपी मधे मतांवर काही फारसा परिणाम झालेला नाही.
असो. आता कोणताही राजकीय पक्ष शेतकर्‍यांच्या खर्‍या प्रश्नांना हात घालायला धजावणार नाही. त्यांची थातूरमातूर मोफत वीज, कर्जमाफी असल्या तुकड्यांवरच बोळवण केली जाईल.

सरकार दोन पावले मागे आले आहे ...

शिवाय, शेतकरी वर्गाला, स्वतःचे मार्केट स्वतःच शोधायला लागेल, ही जाणीव झाली ...आंतरजाला मुळे आता ते शक्य पण होईल... थोडा वेळ लागेल पण, गावोगावी, तात्पुरत्या सहकारी संस्था पण सुरू होतील ... जसे आमचा गृप करतो....

ज्या कुणाला, डायरेक्ट शेतकरी वर्गा कडून, गूळ, हळद, तांदूळ, ओले काजू हवा असेल, त्यांनी जरूर संपर्क करा...

मागच्याच आठवड्यात, डायरेक्ट शेतकरी वर्गा कडून, ओले काजू खरेदी केलेे, घरपोच डिलीव्हरी आणि उत्तम माल...

सरकार दोन पावले मागे आले आहे या वाक्याशी असहमत. सरकार हा विषय आता कायमचा ऑप्शन ला टाकील.
उरलेल्या मुद्यांशी सहमत.
मागील आठवड्यातच एका मुस्लिम व्यापारी मित्राशी बोलणे झाले. त्यांचा पिढ्यान पिढ्या आंबे विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊन नंतर धंद्याचा चेहरा मोहरा बदललाय. आता बरेचशे शेतकरी व्यापार्‍यांना माल देण्याऐवजी फेसबुक / व्हॉटसप द्वारे जाहिरात करतात. गुगल पे / पेटीएम ने पैसे घेतात आणी आंब्याचा मोबदला अधिक १०० / २०० रु. ज्यादाचे पैसे घेऊन घरपोच डिलेव्हरी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या धंद्यावर चांगलाच परिणाम झाला आहे.

आता आंब्यात जास्त कमाई नाही मात्र रमजानचा महिना येतोय. त्यामुळे कलींगड, केळी, कांदा, बटाटा आणि पपई हा माल स्वस्तात कुठे मिळेल ते शोधतो आहे. रमजानच्या महिन्यात फळविक्रीमधे भरपूर कमाई होते असा त्याचा अनुभव आहे.

प्रदीप

सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या अखत्यारीत कायदे स्थगित केले. त्यानंतर, चौकशीचा घोळ घातला. घोळ अशासाठी, की उत्तरेतल्या ज्या संघटनांनी तथाकथित 'आंदोलन' पुकारले होते, त्यांनी वारंवार सांगूनही, समितीपुढे यायचे नाकारले. तेव्हा, ह्या समितीच्या निष्कर्षावर कोर्ट काही ठोस पाऊले उचलेल (वा सरकारला उचलू देईल) ही आशा मावळली होती.

त्यावेळीच, आता कायदे काही अंमलात लवकर आणता येणार नाहीत, हे उघड झाले. तेव्हा ते तसेच सुरू ठेऊन फायदा काहीच नव्हता. त्याही पुढे जाऊन बहुधा देशाच्या सुरक्षिततेची स्थिती, पंजाबांत, खालिस्तानी चळवळीच्या आंदोलनांतील सहभागाने/ पुढाकाराने-- बिघडत चालली होती. मी असे वाचले होते की, पंजाबांत, ह्या कायद्यांमुळे अढतियांच्या पोटावर केंद्र सरकार पाय आणते आहे, व पर्यायाने, तेथील गुरुद्वारांचे फंडिंगही जाणूनबुजून छाटून टाकते आहे, असा प्रचार खूप होऊ लागला होता. थोडक्यात, हे कायदे सिखांच्या विरूद्ध आहेत, असा प्रचार तेथे चालवला गेला होता, म्हणे. तेव्हा शेपूट घालणे, देशहितासाठी जरूरीचे होते.

केंद्राने हा कायदा लागू करण्याचे राज्य सरकारांना आवाहन करायला हवे होते. कमीत कमी भाजपाशासीत राज्यांनी हा कायदा लागू केला असता तर येत्या दोन चार वर्षात त्याचे फायदे तोटे समोर आले असते. नंतर त्यात योग्य ते बदल करता आले असते असे वाटते. सध्या विरोधक आणि समर्थक दोघेही आपापल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन विरोध वा समर्थन करत आहेत.

1. ह्या आंदोलनाला, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पाठिंबा होता. कॉंग्रेस कधीच जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हा आणीबाणी पासून माझा अनुभव आहे ...

2. ह्या आंदोलनाला, माझ्या ओळखीतल्या कुठल्याही वंशपरापरागत शेती करणार्यांचा पाठिंबा न्हवता... पण एक झाले की, शेतकरी आता, आंतरजालाच्या माध्यमातून स्वतः मार्केट शोधायला लागले.

हे आंदोलन, शेतकरी वर्गा साठी, इष्टापत्तीच ठरले ...

sunil kachure

नवीन कायद्यात अशी काय कलम होती की त्याचा आधार घेवून शेतकऱ्यानं ठरवून कंगाल करायचा मार्ग ओपन झाला असता.शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपती,सरकार ह्या जोड गोळी नी हडपल्या असत्या.
कायदे रद्द झाले ते योग्य च झाले आणि कायद्याला जो विरोध होता तो पण योग्य च होतं

आनन्दा

पुरावा द्या, किंवा तुमच्याकडे पुरावा नाही हे मान्य करा..
तुम्ही बहुतेकशी विधाने हवेत गोळीबार केल्यासारखी करत असत, यापुढे तुमच्या प्रत्येक वादग्रस्त वक्तव्याबद्दल पुरावा मागितला जाईल याची नोंद घ्यावी.

त्यावरून, काय ते ओळखा ...

पुस्तकांत लिहिलेले, प्रत्यक्षांत आलेले, बघवले नसेल...

कंजूस

आणि राजकीय उलाढाली वाढल्या. आज आता ताबडतोब चक्रे फिरत आहेत. चानेलना मोठी बातमी मिळाली. मा. मुख्यमंत्री स्वत:च कार चालवत परतले.
इंडिअन एक्सप्रेसच्या बातमीनुसार एका जवाहिऱ्यावर २०१७ सालीच चौकशी/खटला चालू आहे. त्यात खोलात जाताना नवीन धागे हाती लागत आहेत.

एकूण खोल खोल आहे प्रकरण.

श्रीलंकेत तांदुळ ५०० रुपये किलो, साखर ३०० रुपये किलो इतकी प्रचंड महागाई वाढली आहे. देश कोसळण्याच्या बेतात आहे. तिकडून तमिळ शरणार्थी भारतात यायला सुरुवात झाली आहे. एका बातमीनुसार नाविक लोक भारतीय हद्दीत आणून सोडण्यासाठी ५० हजार पासून पुढे कितीही अशी रक्कम आकारत आहे. एकंदरीत शेजारी अस्थिर झाला की त्याचे दुष्परीणाम आपल्यालाही भोगायला लागणार आहेत. एवढे करुन श्रीलंकंन लोकांना भारताबाबत कितपत आत्मियता आहे माहित नाही.

कंजूस

१चहा,२.कॉफी,३.मसाले जिन्नस आणि ४.पर्यटन यावर अवलंबून असेल तर क्र ४ नुकसानीत गेलं असेल. समुद्री उत्पादन किती खाली वर गेलं हेसुद्धा पाहायला हवं.

sunil kachure

हे सर्व शरणागत नियमानुसार मुंबई आणि महाराष्ट्र च्या बोकांडीवर च येवून बसणार आहेत .सिंधी,आले.
बांगलादेश मधून बंगाली आले ते बंगाल मध्ये न जाता मुंबई ,महारष्ट्र च आले..
आता हे तामिळी पण हक्क नी पोट भरता येणारे राज्य म्हणून महाराष्ट्र कडेच कूच करतील.

मग तुम्हाला काय वाटते ?
तुमचे आवडते महाराष्ट्रवादी पक्ष उठाव लुंगी, बजाव पुंगी चा पुढचा पुढचा भाग लावणार ?
की वणक्कम ! म्हणत सामी सामी गाण्यावर नृत्य करुन त्यांचे स्वागत करणार ?

sunil kachure

मुंबई,पुणे,thane, नागपूर,नाशिक,नवी मुंबई, औरगाबद ही प्रगत शहर महाराष्ट्र साठी शाप आहेत की वरदान
बाकी राज्य पेक्षा मराठी लोकांचा कमी भाषिक अभिमान,हिंदी राष्ट्र भाषा असा स्वतःच समज करून घेणे,बाकी राज्यांपेक्षा उत्तम सम हवामान.
बाकी राज्यांपेक्षा तुलनेने चांगली कायदा आणि सुव्यवस्था,शांतता .
हे महारष्ट्र साठी शाप आहे की वरदान