राजकारण
ताज्या घडामोडी मार्च - भाग २
Primary tabs
ताज्या घडामोडी मार्च - भाग २ येथून पुढे...
ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत.
यासाठी'स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी' किंवा SAHI अशी संस्था स्थापन केली गेली आहे. येल, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, वेलस्ली, मिशिगन स्टेट, ड्यूक आणि रटगर्ससह अमेरिकन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये SAHI, HfHR आणि साधना या संस्थांनी एकत्रितपणे CAA आणि NRC विरुद्ध निदर्शने केली होती. संघटनेने भारतीय सरकारी अधिकार्यांवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला खुले पत्र लिहिले होते.
या वर्षी आता वेबिनार घेतला जाणार आहे.
लिबरल कट्टरवाद असा वाढवला जातो असे दिसते आहे.
सावरकरांच्या साहित्याचा, विचारांचा अभ्यास असणाऱ्या लोकांचे या लेखावर काय मत आहे ?
https://indianexpress.com/article/opinion/columns/truth-about-savarkar-…
ठीक आहे, विशेषतः सेलेक्टिव्ह reading म्हणून..
पूर्ण लेख वाचला, विशेषतः फक्त आंबेडकरांचे पत्र वाचले तरी जाणवते ते.
अवांतर - ज्या माणसाने अंदमानामध्ये मिळेल ते खाऊन दिवस काढले, आणि विविध जातींना एकत्र घेऊन क्रांतिकार्य उभारले, तो अस्पृश्यता मनात असेल ही गोष्ट कठीण. पण असो.
https://youtu.be/N32a6ecs8zY
या व्हिडिओवर माझ्या एका तमिळ मित्राचा प्रतिसाद
10 SL Tamils escaped from Lanka and reached TN Dhanushkodi due to economic crisis in their country. As an Indian - I would say they should migrate to some other country compared to India. They would atleast get a citizenship in some other country whereas my govt likes to give citizenship only to Pakistan Hindus.
I would say it’s better to die in hunger than come to Tamil Nadu. You will be put in Akathikal Mukaam and you won’t get a proper job, education and not even a citizenship in 30 years.
We were far better during Chola and Pandya time. State and Central govt are good at playing politics.
I respect Malayalis in that regard - They do have a greater affinity towards their community. Suppose if there were Lankan Malayalis in place of Lankan Tamils affected in a crisis then they would have welcomed them with open arms in Kerala.
Tamils - Your ancestors might be one of the greats in Naval building, literature and espionage etc but Modern Tamils don’t have a say in our own land itself.
If you take Portugal - if u stay in Portugal and worked there u r eligible to get citizenship. Some SL refugees came here bfr 1980s didn’t get citizenship. I dont think killing of Rajiv Gandhi was the reason to it.
भारत काही धर्मशाळा नाही कि कुणीही यावे आणी त्याला नागरीकत्व द्यावे. श्रीलंकेत आलेले आर्थिक संकट हे त्या देशाच्या सरकारच्या नाकर्ते पणा मुळे आले आहे. तिथल्या लोकांनी त्याचा जाब तिथे विचारावा. भारतात येउन मग्रुरी करु नये.
तुमच्या मित्राला तमीळ लोकांविषयी कणव असेल तर त्याने आपला पगार त्यांना पाठवावा. उगाच भारत सरकारच्या नावाने गळे काढु नये.
बाकी निर्वासितांनी कायमस्वरुपी दुसर्या देशात जायचे नसते. आपल्या देशातले वातावरण ठीक झाले की परत जायचे असते. तेव्हा भारतीय नागरिकत्वाची मागणी चुकीची आहे.
श्रीलंका कर्जबाजारी होण्याच्या आधीपासून लंकन निर्वासित हिंदू भारतात कँपमधे राहतायत. बरीच वर्षे त्यांची भारतीय नागरीकत्वासाठी मागणी आहे. आणि ते कुणीही नाहीत. श्रीलंकन हिंदूच आहेत. आपल्या हिंदू बांधवांबद्दल इतका आकस का तुम्हाला? अर्धवट माहिती लंकन हिंदूंबद्दल की तुम्ही राजीव गांधी नि काँग्रेस समर्थक आहात? नक्की काय?
मुस्लिमांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की…”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत वक्तव्य
https://www.loksatta.com/desh-videsh/muslims-not-minority-in-assam-says…
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्यामधील मुस्लिमांसंदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम असल्याने त्यांना यापुढे राज्यामध्ये अल्पसंख्यांक म्हणून गृहित धरता येणार नाही, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलंय. तसेच १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या त्यासाठी मुस्लीम जबाबदार असल्याचं सांगत हेमंत बिस्वा शर्मा यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे आसामची अवस्था होईल अशी जी इतर समुदायांना भीती वाटतेय ती दूर करण्याचं ‘मुस्लिमांचं कर्तव्य आहे’ असं मत व्यक्त केलंय.
-------
No Comments...
हिजाब वाद पुन्हा उफाळला; मुस्लिमांना जत्रेत दुकान लावण्यावर बंदी
https://www.esakal.com/desh/ban-on-setting-up-shop-for-muslims-at-mahal…
योग्य निर्णय....अगदी असेच, दर्गा जत्रा असेल तर, इतर धर्मियांना दुकाने लावायला परवानगी देऊ नये...
ईडीचा फटका, पाटणकरांचा खटका, फक्त १० पॉईंटमधून समजून घ्या, प्रकरण नेमकं काय?
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/enforcement-direct…
-------
नितेश राणे यांनी, उत्तम प्रतिसाद दिला आहे ...
https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mla-nitesh-ranes-question-to-c…
------
हसत खेळत रहा. मजा करा.
आयुष्य फार सुंदर आहे ...फक्त मेव्हण्याने घोळ करायला नको .
आत्ता पर्यंत....
वाईन, वेल्थ आणि वुमनच चालू आहे....
क्रिकेट मध्ये एके काळी Three W, प्रसिद्ध होते, आता ह्या राजवटीत, हे Three W...
घटना भारताबाहेरची नसून देवभूमी म्हणवल्या जाणार्या केरळ राज्यातली आहे.
पलक्कड जिल्हा न्यायाधीश कलाम पाशा यांनी प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद यांचा कार्यक्रम अर्ध्यात थांबवला.
त्यांना आवाजाचा त्रास होत होता म्हणे!
नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद यांनी या कार्यक्रमावर त्या तयारीवर त्यांनी अनेक तास खर्च केले होते. व्हायोलिन, मृदंगम सह अगदी कमी आवाजात शांत वाद्यांसह ते सादर करण्यात आले होते.
तालिबानांनी अफगाणिस्तानात सर्व प्रकारच्या नृत्य आणि संगित यावर बंदी आणली आहे. इस्लाम मध्ये याला परवानगी नाही असे कारण दिले जाते. हा प्रकार त्या सदृश दिसत आहे. पण हे महाशय न्यायव्यवस्थेत आहेत. तेव्हा ते तेथे काय करत असतील असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कलाम पाशा यांचे भाऊ बी केमल पाशा हे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते!
आता, मानवता वादी आणि उदारमतवादी हिंदू काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल ...
हे असे घडले ! अहो आश्चर्य " आमचा केरळ कसा शांत आणि सर्वधर्मसमभावी आहे ( गोव्या सारखाच ) " अशी वक्तवये करणाऱ्या शशी थरूर यांच्या राज्यात
बंगाल हिंसाचारप्रकरणी २२ अटकेत ; १० घरांवर पेट्रोल बॉम्बच्या सहा्य्याने हल्ला; आठ जणांचा मृत्यू
https://www.loksatta.com/desh-videsh/22-people-arrested-in-birbhum-viol…
विकृत मनोवृत्ती
सर्व तपास CBI कडे वर्ग करा” परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका!
https://www.loksatta.com/maharashtra/supreme-court-orders-parambir-sing…
ED, IT आणि आता CBI..... ह्या राजवटीत, सगळ्या
महत्वाच्या केंद्रीय संस्था यायला लागल्या...
“तुमच्या अशा वक्तव्यांची जागा केराच्या टोपलीत आहे”; सुप्रीम कोर्टाने संजय राऊतांना नाव न घेता फटकारले...
https://www.loksatta.com/desh-videsh/your-statement-place-in-the-basket…
आता, सर्वोच्च न्यायालय देखील, महाराष्ट्र विरोधी का?
परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही.
यावर ती टिप्पणी आहे
CBI ला पण परवानगी दिली नाही ...
आता, न्यायसंस्थेवर पण विश्र्वास नाही ...
असो,
परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही.
डॉक्टर ऐवजी कंपांऊडर कडुन औषध घेतल्याचा परिणाम आहे तो... :)))
आता इडीची इतकी भिती वाटतेय जितकी मुघला सैन्याच्या घोड्यांना संताजी-धनाजी यांची सावली देखील पाण्यात दिसल्यास व्हायची ! :)))
कधी काळी इडी बद्धल भरभरुन बोलणारे आज होलसेल मध्ये फाटल्यावर काय बोलतात ते देखील पहावे. )))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao
माहिती बद्दल धन्यवाद ...
उमर खालिदला न्यायालयाकडून धक्का ; दिल्ली दंगल प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला...
https://www.loksatta.com/desh-videsh/umar-khalids-bail-plea-rejected-in…
उत्तम निर्णय ...
घटनेचं समर्थन नाही, पण गुजरात….”; ममता बॅनर्जींची बंगाल हिंसाचारावर प्रतिक्रिया
https://www.loksatta.com/desh-videsh/mamata-banerjee-reaction-on-bengal…
No Comments
पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली आणि पंजाब ची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ५० हजार करोड ची मागणी केली.
ही बातमी
का? भ्रष्टाचाराला आळा घालून सरकारी खजिन्याची चालवली जाणारी लूट थांबवू हा आपच्या प्रचारातील एक महत्वाचा मुद्दा होता ना? मग आता केंद्र सरकारपुढे हात का पसरत आहेत? घाला भ्रष्टाचाराला आळा आणि वाढवा सरकारचे उत्पन्न.
एका अर्थी हे विदूषक लोक पंजाबमध्ये सत्तेत आले हे चांगलेच झाले. दिल्ली अर्धे राज्य असल्याने नायब राज्यपाल खोडा घालत आहेत, केंद्र सरकार सहकार्य करत नाही, मोदींना माझा खून करायचा आहे वगैरे वगैरे बोललेले खपत होते. आता पंजाब या पूर्ण राज्यात सत्ता मिळाली आहे. असल्या काहीही सबबी तिथे चालणार्यातल्या नाहीत. तेव्हा घोडामैदान फार लांब नाही.
आयजीच्या जीवावर बायजी उदार ...
पंजाब आणि गरीब कसा?
"अख्या भारताची शेती " तिथेच होते ना ( शेतकरी आंदोलनावरून तरी वाटले बुवा !)
असं कसं ? असं कसं ?
शेतकरी मग तो कुठलाही असो .. गरीबच असतो ना?
आता तुम्हाला त्या लोकांच्या भारी गाड्या , ट्रॅक्टर , मोटार सायकल दिसले त्याला आम्ही काय करु? बिचारे गरीब शेतकरी ...
५ - ५ लाख खर्च करुन बिचारे आंदोलन करत होते ... तुम्हाला ना खरा शेतकरी दिसतच नाही ... हुच्च्भ्रु कुठले ..
(ह. घ्या)
(ह. घ्या).. घेत्ले
जसे शिवसेनावाले महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका- विशेषतः शिवसेनेचा जीव ज्यात आहे त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहे त्याप्रमाणे दिल्लीत भाजपवाले घाबरले आहेत असे दिसते. असले प्रकार फार काळ चालत नाहीत. कधीनाकधी निवडणुक घ्यावीच लागेल.
काल काश्मीरी फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याबद्दलही ते म्हणाले की विवेक अग्निहोत्रीने यूट्यूबवर सिनेमा टाकून द्यावा. सर्व देश सिनेमा फुकट पाहील. =))
-दिलीप बिरुटे
यूट्यूबवर सिनेमा टाकणे आणि कर माफी यात फरक आहे
असो विवेक अग्निहो त्रिने धोका पत्करून हा चित्रपट काढला तेवढी हिंमत ना माझ्यात ना तुमच्यात हि
कि यातही शेठ नि संत्र्याचं प्रदेशातून हिंदूंनो चित्रपट बघा म्हणून "भगवा फतवा काढला" असे आपले म्हणणे आहे ?
कुणाला समजावताय, नोटबंदी पासून बरीच लोक बिघडल्यासारखं बोलतात लिहतात. नका लक्ष देत जाऊ.
कुणाला समजावताय,....
हो ना पण राहवत नाही ... एकदातरी वाटते कि प्राध्यपक लेव्हल ची व्यक्ती एकदातरी पोटातील/ हृदयातील जळफळ बाजूला ठेऊन निपक्षपणे परिस्थितीचा आढावा घेईल !
आपणच येडे
प्रत्येक पांचट सिनेमाचा review देणारा व तुकडे तुकडे गँग चे सिनेमे दिल्लीत टॅक्स फ्री करणारा युगपुरुष आज म्हणतोय की द काश्मिरी फाईल्स हा सिनेमा यु ट्युब वर टाका म्हणून..
ज्या पद्धतीने तो केविलवाणे हसत हसत हे वक्त्यव करत होता व त्याचे भाट ज्या प्रमाणे त्याचे हसून समर्थन करत होते ते बघून कळून येते की चोट बहुत गेहरी लगी है..
काल... मेव्हणे... मेव्हणे... मेव्हण्यांचे पाहुणे ! हा दुनियादी चित्रपटातील डायलॉग संदीप देशपांडे यांच्या एका ट्वीट ने मला अगदी "मन से" आवडला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao
हे, अकबर आणि बिरबल, यांच्या कथा मालिकेत वाचले आहे.
https://www.tv9marathi.com/maharashtra/chandrapur-swearing-and-beating-…
मागणी बरोबर पण आंदोलन करण्याचा मार्ग चुकीचा..
महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यावर फार पूर्वीच फुली मारली आहे. जोपर्यंत फडणवीस व चंद्रकांत पाटील भाजपचे प्रमुख नेता आहेत, तोपर्यंत भाजपवर सुद्धा फुली मारली आहे. आआप किंवा मनसे या दोन पर्यायांवर विचार सुरू आहे.
https://maharashtratimes.com/india-news/only-one-pension-for-punjab-mla…
आप ला अजिबात देऊ नका.
मनसे ला दिलेत तरी चालेल.
काँग्रेस आणि आप यामध्ये काहीही फरक नाही.
ह्या चर्चेत श्रीगुरुजींनी मला सांगितले होते की
तेव्हा आता त्यांचा हा शोध संपत आलेला आहे, व तो मनपा किंवा आपपाशी येऊन थांबणार आहे, असे दिसते. आणि भाजपवर त्यांनी लत्ताप्रहार केला आहे. तेव्हा तुमच्या 'आपला अजिबात थारा देऊ नका' ह्या आव्हानाचा उपयोग त्यांच्या बाबतीत होईल असे दिसत नाही, कारण बहुधा त्यांच्या मते आप हा अजिबात न डागाळलेला शर्ट आहे!!
कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (ब संघ) यांच्यावर फुली मारली आहे.
कोणाला मत द्यायचे ते मत देण्याच्या दिवशी ठरवेन. तस्मात सांप्रत शांत रहावे.
तुम्ही कुणाला मत देणार किंवा नाही, ह्यामुळे मला काही तगमग होत नाही. तुम्ही स्वतःच त्याविषयी येथे वक्तव्ये करीत आहात, तेव्हा आठवण करून दिली, इतकेच.
आता, तुमच्या आजच्या प्रतिसादावरून, तुम्ही भाजपावरही महाराष्ट्रापुरती तरी फुली मारली आहेत असे दिसते. तेव्हा तुम्हाला मनसे व आप हे मोठे प़क्ष उरले आहेत. ते तुमच्या १००% डागहीन व्याखेत बसतात काय, हे नि:संदिग्धपणे, सवडीनुसार सांगावे.
सध्या तरी महाराष्ट्रातील आआपची पाटी कोरी आहे आणि मनसेला डाग पाडून घेण्याची अजून संधीच मिळालेली नाही.
तरीसुद्धा कोणाला मत द्यायचे ते मत देण्याच्या दिवशी ठरवेन (कोणाला मत द्यायचे नाही हे आधीच ठरले आहे). तस्मात आपण सांप्रत शांत रहावेआणि प्रतीक्षा करावी.
एखादा पक्ष एका ठिकाणच्या (किंवा राष्ट्राच्या संदर्भांत) डागाळलेला असतो, पण दुसर्या ठिकाणच्या (किंवा, देशाच्या एका प्रांताच्या) संदर्भांत स्वच्छ असतो, हा तुमचा अजब तर्कवाद आहे.
मी प्राण रोखून तुम्ही केव्हा व कोणाला मत देणार, ह्याकडे पाहतोय, असे काही नाही. मला फक्त, येथे आपली राजकीय मते सातत्याने मांडणार्या, तुमची अजब मानसिकता उघड करायची होती.
बरं.
आपला का देऊ नका?? विकास कामे करताहेत ते म्हणून?? की दिल्लीच्या तिजोरीत टॅक्स वाढवला म्हणून??
आप ला मत का देऊ नये?
अपेक्षा ही अजून खूप काही आहे...
महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ नये?
१) कट्टर हिंदूविरोधी व भ्रष्टाचारात आकंठ बुडलेल्या राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आमदारांविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही, त्यातील अनेकांना पक्षात आणून भाजपचे रूपांतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'ब' संघात केले, राष्ट्रवादीशी युती करून सरकार स्थापन केले.
२) शिवसेनेच्या मागणीवरून नाणार, जैतापूर असे प्रकल्प रद्द केले, मुंबई महापालिकेत जनतेने जवळपास सेनेइतक्याच जागा देऊनही सेनेला संपूर्ण महापालिकेत रान मोकळे करून देऊन मतदारांना व स्वपक्षीयांना तोंडघशी पाडले.
३) विविध पक्षातून अत्यंत भ्रष्ट व जातीयवादी नेत्यांना पक्षात आणून पावन केले.
४) आपली खुर्ची टिकविण्यासाठी, प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या व रोज भाजपवर अत्यंत अर्वाच्य टीका करणाऱ्या सेनेचे अत्यंत किळसवाणे लांगूलचालन करून महाराष्ट्राचे नुकसान केले.
५) खोटे अहवाल तयार करून अराखीव जागांचे प्रमाण कमी करून अराखीव वर्गावर प्रचंड अन्याय केला.