ताज्या घडामोडी मे २०२२
Primary tabs
गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.
निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…
राजस्थानमध्ये लाऊडस्पीवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद
https://www.loksatta.com/desh-videsh/chaos-on-loudspeaker-in-rajasthan-…
No Comments
आता म्हणे `द कश्मीर फाइल्स` काल्पनिक सिनेमा, नेमकं सत्य काय ?
https://zeenews.india.com/marathi/entertainment/vivek-agnihotri-angry-o…
काश्मीर फाइल्स खोट्या आणि काल्पनिक कथेवर आधारित असल्याचं वर्णन विकीपीडियावर करण्यात आलं आहे. हा तपशील पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले आहेत...
आर ठाकरेंचे खालील पत्रक वाचल्यावर मला बाळासाहेबांचे भाषण आठवले, ते वरती दिले आहे.
जाता जाता :- बोलो बजंरंगबली की जय ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhonga | Official Trailer | Ameya Khopkar | Sandeep Deshpande | Shivaji Patil | Amol Kagne
हे ओळखूनच, निर्णय घेतला पाहिजे .....
राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय उचललाय. या विषयाचा पाठपुरावा करून मनसेला जनतेचा पाठिंबा वाढण्याची सुतराम शक्यता नाही. मुळात आपली पूर्णपणे गमाविलेली विश्वासार्हता पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी असे १८० अंशात वळण न घेता राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप, महागाई असे विषय घेतले असते तर जनतेचा थोडाफार पाठिंबा मिळण्याची शक्यता होती. पण राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाची त्यांनी आजतागायत दखल सुद्धा घेतलेली नाही, महागाई किंवा महाराष्ट्रात सध्या चालू असलेले अराजक यावर ते तोंडही उघडत नाहीत. याऐवजी त्यांनी जनतेला काडीमात्रही महत्त्वाचा न वाटणारा मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उचललाय ज्यातून त्यांना काहीही फायदा होणार नाही. मनसे मोठा पक्ष व्हावा, सत्ता मिळवावी हे राज ठाकरेंचे उद्दिष्ट केव्हाच बासनात गुंडाळून ठेवलेले दिसते. त्यामुळेच २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सुपारी घेऊन स्वतःच्या पक्षाला निवडणुकीत न उतरविता पक्ष भाड्याने दिला होता. आतासुद्धा अचानक हिंदुत्ववादी झूल पांघरून भोंग्यासारखा अनावश्यक विषय उचलणे हे कोणाची तरी सुपारी घेतल्याचे लक्षण दिसते. मविआ व विशेषतः शिवसेनेकडून दूर जाणारी काही मते थेट भाजपकडे न जाता मनसेकडे जावी यासाठीच ते काही जणांनी लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार वागत आहेत असे माझे मत आहे.
त्यांच्या नादी लागून काही मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा वगैरे लावण्याचा प्रयत्न केला तर पोलिस खटला दाखल होऊन त्यांच्या भावी आयुष्यात फटका बसेल. ठाकरे किंवा इतर कोणाही पुढाऱ्याला लोकांना भडकावून स्वत:चा फायदा करून घेता येतो, पण त्यांच्या नादी लागलेल्यांना काहीही मिळत नाही. मागील आठवड्यात मातोश्रीसमोर बसलेली ८० की ९२ वर्षांची म्हातारी हे एक उत्तम उदाहरण आहे. ५० वर्षे शिवसेनेचे काम करूनही ती अजून १०० स्क्वेअर फुटांच्या पत्र्याच्या घरात राहते. नातवाला नोकरी नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची घोषित मालमत्ता १८४ कोटींची आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कोणत्याही पुढाऱ्याच्या नादी लागून आपल्या आयुष्याची वाट लावून घेऊ नये.
सर्वसामान्य जनतेने कोणत्याही पुढाऱ्याच्या नादी लागून आपल्या आयुष्याची वाट लावून घेऊ नये.
सहमत आहे .....
नाही
विषय योग्य आहे आणि मुंबई निवडणूकीच्या वेळीच उचलला आहे...
महाराष्ट्र राज्यात पण, सरसकट बंदी, हीच भुमिका हवी होती...
ह्या राज्य सरकारचे, सर्व सामान्य माणसाला विचारात न घेण्याचे धोरणच दिसून आले ... अर्थात, मेट्रो कारशेडचा प्रश्र्न असो की तेल शुद्धीकरणाचा प्रश्र्न असो की कोविड बाबतीत धोरण असो....(तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी....)
ज्या राज्यसरकारला, साधा ध्वनी प्रदूषणाचा प्रश्र्न सोडवता येत नाही, ते वीजेचा किंवा इंधन दरवाढीचा प्रश्र्न कसा काय सोडवणार? दारू वर टॅक्स कमी आणि इंधनावर टॅक्स जास्त ...
एक सामान्य नागरिक म्हणून, माझा तरी, ध्वनि प्रदूषण थांबायलाच हवे, हीच भुमिका आहे....
ज्या राज्यसरकारला, साधा ध्वनी प्रदूषणाचा प्रश्र्न सोडवता येत नाही, ते वीजेचा किंवा इंधन दरवाढीचा प्रश्र्न कसा काय सोडवणार?२०१४ ते २०१९ ह्या काळात भाजप सराकरने काय केले? भोंग्यावर बंदी घातली की औरंगाबादचं संभाजीनगर केलं?मेट्रो कारशेडचा प्रश्र्न असो की तेल शुद्धीकरणाचा प्रश्र्नमेट्रो चा घोळ सगळ्यांना माहीत आहे. तो प्रकल्प आता ४ वर्षे पुढे गेला .. बजेट वाढले ते अजुन वेगळे. केवळ अहंकार ह्या एका गोष्टीने मेट्रो व बुलेट ट्रेन चे प्रकल्प रखडले आहेत.
तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या बाबतीत मला ह्या सरकारचे धोरण अजुन अगम्य वाटते आहे. म्हणजे नणार ला विरोध म्हणुन पर्यायी जागा म्हणुन जे गाव निवडले आहे तिथेही १०० टक्के खात्री नाही. प्रकल्पबाधीत लोकांचे (म्हणजे दोन्ही बाजुंचे) म्हणने मुख्यमंत्री ऐकुन घेतील. केंद्र सरकारणे आपली भुमीका स्पष्ट करावी त्यानंतर आम्ही आमची भुमीका स्पष्ट करु असा अत्यंत अगम्य असा पवीत्रा ह्या सरकारणे घेतला आहे.
यात मला काहीही समजले नाही. नाणार ला विरोध आहे, मान्य. मग नवीन जागी तो प्रकल्प उभा करायची स्पष्ट भुमिका घ्यायला काय प्रोब्लेम आहे? मला तर केंद्रावर खापर फोडायची पुर्वतयारी चालु आहे असे दिसते आहे. म्हणजे प्रकल्प झाला तर श्रेय आमचेच. नाही झाला तर चुक केंद्राची.
धोरण लकवा तो हाच ...
उद्धव ठाकरेंना खुश ठेवण्यासाठी फडणवीसांनी काही चुकीचे निर्णय घेतले ज्यातून पर्यायाने महाराष्ट्राचे व पक्षाचे नुकसान झाले आहे.
शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार व जैतापूर प्रकल्प रद्द केल्यामुळे महाराष्ट्राचे नक्कीच नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडून युती करणे व सेनेला तब्बल १२४ जागा देणे या अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या व सत्ताही गमवावी लागली. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या पूर्वीच लिहिल्या आहेत.
महाराष्ट्राचे व पक्षाचे नुकसान झाले आहे.पक्षाचे झाले असावे महाराष्ट्राचे काहीही झालेले नाही ऊलट झाला असेल तर फायदाच झालाय. मुंबईतून अहमदाबादला मोठमोठी कार्यालये हलवण्याचा भाजपचा डाव ऊधळला गेलाय.
हेच धोरण आहे
धरसोड वृत्ती आणि कालापव्यय...
खरोखर सामान्य लोकांची दया येते
त्यांना सर्वच वापरून घेत अस कोणता ही एक पक्ष नाही सर्व च राजकीय पक्षात हीच अवस्था आहे.
नेते धन ,दौलत कमवत असतात.त्यांचे कोणाशी च वैर नसते.
आपसात सर्व व्यवहार सुरळीत चालू असतात.
मारतात, मरतात , जेल मध्ये जातात फक्त सामान्य लोक ज्यांना कार्यकर्ते म्हणतात.
त्यांच्यात असते पण जास्त चरबी.
आज bjp असणारा नेता उद्या काँग्रेस किंवा सेनेत जातो निवडून येतो मंत्री होतो.
कार्यकर्ते एकमेकाची डोकी फोडण्यात व्यस्त असतात..
सून एका पक्षाची आमदार,नवरा दुसऱ्या च पक्षाचा आमदार,सासरा तिसऱ्याच पक्षाचा आमदार .
कोणी ही जिंकू ध्या..
कार्यकर्ते आहेत च सतरंज्या उचलायला.आणि विजय असो असे घोषणा द्यायला.
BJP सरकार chya काळात नक्की काय काय विकास झाला हे त्यांच्या समर्थक लोकांनी सांगावे.
फक्त जुमले आणि फेकाफेक नको.
किती धारण देश भर bjp सरकार नी बांधली.
किती सिंचन योजना bjp सरकार निर्माण केल्या.
किती नवीन मेडिकल कॉलेजेस काढली.आणि आता चालू आहेत.
सामान्य लोकांची आर्थिक स्थिती ह्या सरकार ला सुधारता आली का.
काँग्रेस किंवा बाकी पहिल्या सरकार नी चालू केलेय योजना ह्यांच्या काळात पूर्ण झाल्या.
त्या स्वतःच्या म्हणून सांगू नका.
ह्या वर कोणी उत्तर देणार नाही.
Bjp नी फक्त एकच काम केले.
मित्र श्रीमंत केले.
आर्थिक दरी वाढवली.
गरीब अजून गरीब झाले.
धार्मिक विवाद निर्माण केले.
आणि सर्व मीडिया लं स्वतःच्या प्रचार साठी वापरायला सुरुवात केली.
Republic network aani त्यांचे हिंदी साधी दार चॅनेल.
फक्त फेकाफेक करत असतात.
धार्मिक बाबतीत च २४ तास गुंतलेले असतात.
आणि bjp सरकार चा उदो उदो करत असतात..
लोकांच्या सर्व लक्षात येते.
सहमत. विकास ह्या विषयावर कुठल्याही भाजप नेत्याने पाच वर्षे बोलून दाखवावे असे आव्हाना कुणीतरी केले होते. भाजपेयींनी अर्थातच पळ काढला.
तुमची टायपिंग मिस्टेक झाली असणार. bjp काळातील विकास वर फक्त पाच मिनिट कोणत्याही bjp नेत्याने बोलून dakhvave असे आव्हान असेल ते.
लोकांच्या सर्व लक्षात येते.
कचरे बुवा
म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत भाजपच निवडून येत आहे.
आता अलीकडे सुद्धा पंजाब सोडला तर बाकी चार राज्यात भाजपच बहुमताने आला आहे.
तुमचं जेलीफिश टंकन चालू द्या
जोधपूर राजस्थानमध्ये जालोरी गेट चौकात स्वातंत्र्य सेनानी बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर असलेला भगवा ध्वज बदलून इस्लामिक झेंडा लावण्यात आल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला . मुस्लिम जमावाने पुतळ्याच्या तोंडावर टेपही चिकटवला. ईदगाह परिसरातून सुमारे २०० लोकांचा मोठा जमाव आला होता. त्यांच्या हातात दगड आणि काठ्या होत्या. त्यांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
परशुराम जयंती उत्सवादरम्यान, सालाबाद प्रमाणे जालोरी गेट चौकावर भगवे झेंडे लावले होते. मुस्लिम समाजातील काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला, त्यानंतर प्रशासनाने हिंदू समुदायाला झेंडे हटवण्याची विनंती केली. समुदायाने विनंती मान्य केली आणि स्वातंत्र्यसैनिकाच्या नातेवाईकांच्या आवाहनानुसार एक ध्वज वगळता सर्व काढून टाकले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, "स्वातंत्र्य सेनानी बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांकडून इस्लामी ध्वज लावणे आणि परशुराम जयंतीला लावलेला भगवा ध्वज काढून टाकणे निषेधार्ह आहे."
अजूनही येथे तणाव आहे.
उदारमतवादी हिंदूंना किती समजावून सांगणार?
देशात हिंदूत्ववादी पक्षाचे सरकार हवे होते….
राजस्थान मध्ये दंगल चालू आहे,महाराष्ट्र मध्ये भोंगे प्रकार चालू आहे.गंभीर विवाद आहे यूपी मध्ये बुलडोझर .
दिल्लीत दंगल.पेट्रोल ,डिझेल खाद्य तेल प्रचंड महाग.
आणि देशाचे पंतप्रधान विदेशात स्वतःचेच लाल करत आहेत
विदेशात असून पण भारतातील विरोधी पक्षावर टीका करत आहेत
भारताच्या इतिहासात इतके बालिश पंतप्रधान कधीच होवून गेले नाहीत.
मर्सिडीज बेबी म्हणून भाजप नेते एका मोठ्या नेत्याला टोमणे लगावताहेत. ह्यांच्या आजोंबांकडे आपण युती करा म्हणून जायचो, वडीलांकडेही जायचो. ऊद्या ह्या साहेबांकडे ही आपल्याला युती करा म्हणून जावे लागेल हे भाजप नेते कसे विसरतात?
हायला
आजोबांच्या कर्तृत्वावर नातवाला क्रेडिट द्यायचं म्हणजे फार झालं
क्रेडीट नाही. पण ऊद्या युती करा म्हणून ह्यांचीच मनधरणी करावी लागनार आहे ना भाजपला?
इथे सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही.थोडी तरी सत्ता मिळावी म्हणून काका न चे नातू किंवा senior ठाकरेंचे नातू.किंवा इंदिराजी चे नातू.
ह्यांचे पाय थरण्याची वेळ कधी ही येवू शकते.
हा महाराष्ट्र आहे यूपी नाही.
ह्याची जाणीव असावी.
राहुल जी पब मध्ये गेले.ह्याचे व्हिडिओ bjp ची लोक फॉरवर्ड करत आहेत.
अतिशय संकुचित,अतिशय नॉनसेन्स प्रकार आहे हा.
राहुलजी असतील किंवा कोणताही राजकीय नेता त्यांचे वैयक्तिक आयुष्य विषयी कोणालाच काय देणे घेणे.
पब मध्ये जाणे बेकायदेशीर भारतात तरी नाही..
मग आपल्या अल्प बुद्धीचे प्रदर्शन लोक का करत असतील .
ते कोणत्या सरकारी पदावर पण नाहीत.
Pm,cm, ह्यांनी जरी pub च आस्वाद घेतला तरी ते आक्षेप घेण्यासारखे नाही.
मुळात वैयक्तिक आयुष्य जगजाहीर करण्याची वृत्ती वाईट चं.
बेकायदेशीर,देशविरोधी काम करत असेल तर आक्षेप घेतलाच पाहिजे
मशीद वर लावलेले भोंगे असतील किंवा मंदिरावर लावलेले भोंगे असतील.
त्याचा वापर करून देवाची प्रार्थना केल्या मुळे.त्या आवाजाचा त्रास भारतीय जनतेला होत असेल तर.
कायदेशीर मार्गाने जा..लोकसभेत विधेयक मांडा,त्या वर विस्तृत चर्चा करा.तज्ञ लोकांचे सल्ले घ्या,देशातील विविध सामाजिक संघटना शी चर्चा करा .
आणि भोंगे नकोच .
असा कायदा करा .
कोण विरोध करेल आहे कोणाची हिम्मत.
प्रचंड राक्षसी ताकत असलेली सुरक्षा दल भारत सरकार कडे आहेत.राज्यांकडे आहेत.
कायद्याची अंमलबजावणी करणे सहज शक्य आहे.
मग वाकडा मार्ग का?
प्रश्न चे उत्तर न शोधता लोकांना भडकावून दंगल होण्याचे मार्ग का निवडत असता.
मारतात आणि मरतात सामान्य लोक च मग ती कोणत्याही धर्माची असू ध्या.
केंद्रीय सरकार म्हणून देशाचे हित ह्याला च सर्वात वरचे स्थान हवं.
आणि त्या साठी वैधानिक मार्ग च हवं
राज्यकर्ते,काही मोजकेच चतुर लोक,काही मोजकेच हुशार लोक ,काही मोजकेच सूत्र धार असणारी लोक सोडली तर ९०% लोक जी saman नागरी कायदा हवा म्हणून रस्त्यावर असतात
त्यांना नागरी कायदा म्हणजे काय हे माहीतच च नसते. समान नागरी कायदा तर माहीत असण्याची सुतराम शक्यता नसते
खरेच असा कायदा झाला तर देशातील प्रतेक धर्मावर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार करण्याची कुवत नसते..हिंदू धर्मीय लोकांचे पण असा कायदा नुकसान करू शकतो हे कायदा झाल्यावर जेव्हा त्याची अमलबजा वनी होते आणि त्याची धक लागणे चालू होईल तेव्हाच ह्यांचे डोळे उघडतात.
मेंदू चा वापर न करणारी करोडो लोक देशात असतील तर .
चतुर राजकीय लोकांना,अती हुशार सूत्रधार लोकांना हे मोजकेच दहा एक हजार असतात.त्यांना करोडो लोकांवर राज्य करणे काहीच अवघड नसते .मूठ भर इंग्रज लोकांनी करोडो लोकांवर राज्य करून दाखवले आहे.
वेगळा पुरावा नको.
राजिंदर बग्गा प्रकरणात केजरीवाल उघडे पडले !! पतनाची सुरुवात झालेली आहे.
दिल्लीतील फुकट वीज योजना दिल्ली सरकारने गुंडाळली आहे .
मला वाटतं आपणाला तजिंदर सिंग बग्गा म्हणायचं असावं.....
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर काहीतरी ट्विट केली म्हणून पंजाब पोलिसांनी दिल्लीत येऊन तेजिंदर बग्गांना अटक करणे कसे काय कायदेशीर आहे? एका राज्यातील पोलिसांनी दुसर्या राज्यात जाऊन काही कारवाई करायची असेल तर त्याची एक प्रक्रीया असते- म्हणजे जिथे कारवाई केली जाणार आहे तिथल्या पोलिसांना माहिती देणे वगैरे. ती पूर्ण केली गेली होती का?
बग्गांविरोधात पंजाब पोलिसांकडे अटक वॉरंट होते का? ते वॉरंट पंजाबमधील मॅजिस्ट्रेट जारी करू शकतात का? पंजाब पोलिस म्हणत आहेत की केजरीवालांना धमक्या दिल्याप्रकरणी बग्गांना पंजाबमधील न्यायालयाने आधीच समन्स जारी केले होते पण बग्गा त्यावेळी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांना उचलून न्यावे लागले. पंजाबमधील न्यायालयाने त्यांना समन्स बजावल्याची बातमी आलेली कोणी वाचली/बघितली आहे का? केजरीवालांना धमक्या दिल्या म्हणून कोणाविरोधात समन्स आले ही बातमी दुर्लक्ष होण्याइतकी क्षुल्लक नक्कीच नसावी.
मग तेजिंदर बग्गांचे पंजाब पोलिसांनी अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांमध्ये दाखल केली. जर न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटशिवाय असे पंजाब पोलिस कोणाला उचलून नेत असतील तर ते अपहरणच म्हणायला हवे. मग बग्गांना पंजाबमध्ये नेले जात असताना मधे हरियाणात राज्य पोलिसांनी पंजाब पोलिसांना अडवले आणि त्यांना दिल्लीला परत आणले. तसेच दिल्ली पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या त्या पथकाला रोखून धरले आहे.
कसला सावळागोंधळ चालू आहे? आप चे सरकार म्हटल्यावर असले काहीतरी प्रकार केलेच पाहिजेत का? तेजिंदर बग्गांना दिल्लीतून उचलून आणायचा आदेश कोणी दिला होता? पंजाबच्या गृहमंत्र्यांनी का? तसे असेल तर मग त्यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये?
काही प्रश्नांची उत्तरे प्रॅक्टिकल अन थेरोटीकल दोन्ही टर्म्स वर देऊ शकतो, अन काहींची उत्तरे द्यायला डेटा पॉईंट्स कमी आहेत....
आणि लीगल बाबतीत मी स्पेक्युलेशन करणार नाही बुआ किमान.
उरता उरला प्रश्न पंजाब गृहमंत्र्याचा तर त्याचा अर्थाअर्थी ह्यात काही संबंध (प्रॅक्टिकली) असेल असे वाटत नाही कारण ही शुद्ध कोर्ट अँड ज्यूडीशल प्रोसिजर आहे, बग्गाजींवर केस टाकणारच गृहमंत्री, पंजाब असले तर पदाचा गैरवापर केल्यासंबंधी काही आरोप होऊ शकेल, पण जर मूळ जुनी केसच एखाद कार्यकर्त्याने दाखल केली असेल तर मात्र त्यात फिर्यादी अन आरोपी ह्या साखळीत गृहमंत्री फिट करून त्यावर गुन्हा दाखल करायला खूप सज्जड पुरावे लागणार, ते मिळणे कितपत सोपे कठीण आहे ह्यावर मला वाटतं मी तुम्हाला काहीच सांगणे बरे नाही.
अश्या केसेसमध्ये गुन्हा हद्दीतून अटक हद्दीत येऊन अटक वॉरंट आरोपीवर बजावणाऱ्या तपास अधिकाऱ्याला सहाय्यक असा एक सेक्शन कलम ७९ सीआरपीसी मध्ये आहे, तो म्हणजे सेक्शन ३ जो स्पष्ट म्हणतो की
Whenever there is reason to believe that the delay occasioned by obtaining the endorsement of the Magistrate or police officer within whose local jurisdiction the warrant is to be executed will prevent such execution, the police officer to whom it is directed may execute the same without such endorsement in any place beyond the local jurisdiction of the Court which issued it.
एकंदरीत ह्या कलमात कायदा स्पष्ट म्हणतो की फक्त गुन्हा नोंद झालेल्या हद्दीत असणाऱ्या कोर्टातून वॉरंट मिळाले आणि तपास अधिकाऱ्यास असे वाटले की अटक होणाऱ्या हद्दीत त्या वॉरंट वर स्थानिक अधिकारी/ न्यायालयाचे एन्डोर्समेंट व्हायला अवाजवी वेळ लागतोय तर अश्या परिस्थितीत अशी कुठलीही एन्डोर्समेंट न घेता तो तपास अधिकारी गुन्हा नोंद झालेल्या हद्दीतील कोर्टाने दिलेले अटक वॉरंट गुन्हेगारास अटक करतेवेळी अटक हद्दीत बजावू शकतो.
अर्थात हे कायदेशीर झाले, ह्याला गुन्हे हद्द, गुन्हे स्वरूप, गुन्ह्यात लावलेली कलमे, त्यात बेलचा स्कोप, आरोपीची असल्यास हिस्टरी शीट असे कैक सप्लिमेंटरी डेटा सेट हाताशी उपलब्ध असले तरच पंजाब पोलीस चूक का बरोबर ह्यावर ठाम मत देता येईल, तूर्तास त्यांना ह्यातून कायदेशीर मार्ग असणारे वरील एकच कलम मांडून खाली बसतो
मोदीजी युरोपचा दौरा यशस्वी करुन भारतात परतले आणि लगेच पुढच्या कामाला लागले सुद्धा !!
मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.
मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.
मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.
मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.
या पीडांचे चीत्कार पुढील काही तासातच या धाग्यावर दिसतील.
मविआ दोन प्रकरणात पुन्हा तोंडावर आपटले .. .
१. राणा दांपत्यावर लावलेला राजद्रोहाचा आरोप.
२. पवई तलावाच्या बाजुने बनवलेला सायकल रस्ता बेकायदेशीर ...
खरे तर अत्यंत घिसाडघाई करुन घेतलेले निर्णय होते. दुसर्या प्रकरणात तर न्यायालयाने झालेले बांधकाम तोडुन तिथली जागा पुर्ववत करण्याचा आदेश दिला आहे. म्हनजे जनतेचा पैसा आधी खर्च केला .. त्यावर आता पुन्हा ते बांधकाम तोडायचा खर्च. कुठेतरी जबाबदारी दाखवायला हवी . .
https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/business/bus…
अभिनंदन!
घरगुती गॅस ५० रुपयांनी महागला.
नवनीत राणा वडनगर ला जाऊन कधी मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणतात हे पहावे लागेल.
-दिलीप बिरुटे
:)
विदेशात जावून इव्हेंट मॅनेजमेंट छान वाटलं बघायला.कोणत्या करमणुकीच्या कार्यक्रम पेक्षा जोरात कार्यक्रम झाला
चाहते खुश.
पेट्रोल,,डिझेल,गॅस महाग झाला तरी आता काही फरक पडणार नाही
एकदाच 1000 रुपये ltr petrol आणि गॅस5000 रुपये सिलिंडर कराच.
जो पर्यंत चाहत्यांच दिवाळे वाजणार नाही.तो पर्यंत मज्जा पण येणार नाही.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे
आता या डावाची गरज नाही. महाराष्ट्रातल्या लोकांचे कान पिळून हवी ती कामे दिल्लीवाले करून घेत होते.
५ मे २०२२
बि नागराजु नावाच्या दलित युवकाला सूलताना नावाच्या एका मुसलमान युवतीशी लग्न केल्याबद्दल मारुन टाकण्यात आलेल आहे.
लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सुलतानाच्या दोन भावांनी लोखंडी रॉड ने मारुन चाकुने भोसकुन मारुन टाकल. मोबिन अहमद व मसुद अहमद अशी आरोपींची नावे आहेत.
हिंदु दलिताची ही स्टोरी आहे. ह्या स्टॉरीला मेन मिडीया मध्ये , ट्वीतरवर कोणीही उचलले नाही.
" जय भिम जम मिम " वाल्यांना तर अश्या अनेक प्रकरणात मुग गिळुन गप्प झालेल बघितल आहे.
https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/india/owaisi-condemns-hy…
ओवैसी. आणि मेन मीडिया सुद्धा!
वाम पंथीय लोकांनी आंबेडकरी चळवळ हॅक केली आहे.
वाम पंथीय लोकांचा पूर्ण ताबा ह्या चळवळी वर आता तरी आहे.
आंबेडकरांनी हिंदू शिव्या ध्या ,त्यांच्या धर्माचा अपमान करा,स्वतचं सोडून फक्त हिंदी वर च बोला असा काही संदेश दिला नव्हता.
पण आता चे जयभीम वाल्यांच्या पोस्ट समाज मध्यम वर बघितल्या तर फक्त हिंदू द्वेष ह्याच्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही.
स्वतःच समाज सुधारावा,शिकवा,प्रगत व्हावा असा कोणताच कार्यक्रम ह्यांच्या कडे नसतो.
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://fortune…
Semiconductor चे उत्पादन भारतात चालू होणार .अतिशय briliant अशा मोदी सरकार ने हा निर्णय घेतला होता.
इथे अनेक लोकांनी टाळ्या पण वाजवल्या.
पण ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागत.तैवान मध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली .ह्या सेमी कंडक्टर मुळे.
कर्नाटक मध्ये पहिला प्रोजेक्ट चालू होणार आहे.
महाराष्ट्र ने असल्या प्रोजेक्ट पासून लांबच राहावे.
Smart City Nashik : नाशिकमधून वादग्रस्त स्मार्ट सिटी प्रकल्प गाशा गुंडाळणार; 6 वर्षांत कामे 8, नसत्या उठाठेवी जास्त.
https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/nashik/nash…
स्मार्टसिटी प्रकल्पाची फूसकेपणा नाशिकमध्ये ऊघड झाला.
हळूहळू मोदी सरकरचे सगळे फुसके विकास बाहेर येतील, पण तोपर्यंत देशाची वाट लागली असेल.