ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)
Primary tabs
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
बातमी आर्यन खान संबंधी आहे, त्याच्या गुन्ह्यातील सहभागाविषयी झालेला तपास हा सदोष असल्याचे खुद्द एनसीबीने स्थापन केलेल्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष आहे, एकट्या वानखेडे साहेबांचा विषय आहे असे वाटत नाही, अंतर्गत पडताळणीत खात्यांतर्गत चौकशीतच जर असे मत होत असेल तर खात्याच्या विश्वासार्हतेच्या अनुषंगाने विचार झालेला उत्तम असेल असे वाटते.
आणि पूर्ण केस खोटी का खरी हे बाहेर येईलच असेही काही नाही, जसे एक विचार तुम्ही मांडला आहे की "६ आरोपी अजूनही आरोपी आहेत म्हणजे केस खोटी नसावी" तसेच कोणी असेही म्हणू शकेल की "आर्यन खान गुंतलेला असण्याचे हाईप करून नंतर किमान सारवासारव करायला ६ लोक अडकवून ठेवलेत"
हे दोन्ही विचार स्पेक्युलेटीव्ह आहेत, ह्यातलं काहीही खरं असू शकेल अन काहीही खोटं, तुमचं लॉजिक खरं ठरावं अश्या माझ्या आपणाला शुभेच्छा पण देतो इथेच.
पुढे काय ? हा मात्र आता कळीचा प्रश्न असेल इतके नक्की.
कॉरडेलिया क्रूझ केसमध्ये आंतरराष्ट्रीय लिंक नाहीत, मुंबईतील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी बातमी आली आहे
सामीर वानखेडे ह्यांच्यावर कारवाईचे रेकमेंडेशन केले गेले आहे खात्यांतर्गत चौकशीअंती.
आरोप ठेवलेल्यांची निर्दोष सुटका होणे हे पहिल्यांदा घडलेले नाही. पूर्वी असंख्य वेळा हे घडले आहे. एखाद्या खटल्यात काही आरोपी (सर्व नव्हे) निर्दोष सुटले म्हणून तपास अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचा इतिहास नाही. अमित शाहांना सुद्धा सोहराबुद्दिन, इशरत जहा, न्यायाधीश अशा अनेक प्रकरणात अडकविले होते व त्या सर्व प्रकरणातून ते निर्दोष सुटले. पण म्हणून त्यांना अडकविणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे या प्रकरणातही वानखेडेंवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.
माझ्या गावात एक आंधळा व्यक्ती होता.जन्मजात नव्हता पण नंतर काही कारणाने
त्याची दृष्टी गेली.
पण आम्ही जेव्हा त्याच्या बरोबर प्रवास करायचो तेव्हा त्याला आता कुठे पोचलो आपण असे विचारले तर तो अंदाजाने योग्य उत्तर द्यायचं..म्हणजे डोळे नसून पण तो डोळस होता.
लोक डोळे असून पण आंधळी आहेत.
अमित शाह ना cbi कोर्ट नी निर्दोष सोडले आहे.
कोर्टात केस चालली साक्षी पुरावे झाले आणि त्यांना निर्दोष सोडले.
आर्यन ची जी कोर्टात उभी च राहिली नाही.
आरोप पात्र च दाखल नाही अजून.
Ncb च्या खात्या अंतर्गत चौकशीत आर्यन वर मुंबई युनिट नी चुकीची खोटी कारवाई केली असा निष्कर्ष काढला आहे
आणि ncb नी clean chit दिली आहे
अमित शाह,आणि आर्यन ह्यांच्या प्रकरणात फरक आहे.
अमित शाह निर्दोष सुटले आहेत
आणि आर्यन ला clean चिट दिली आहे.
मुंबई युनिट वर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार Ncb ला आहे..
आर्यन कोर्टात पण त्या अधिकाऱ्यानं विरोधात केस दाखल करू शकतात.
हायकोर्टाला पूर्ण अधिकार आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा.
वानखेडे हे उच्चपदस्थ आय आर एस सेवेचे अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर "कडक कारवाई" होईलच असे काही ठाम कोणालाच म्हणता येणार नाही पण कोणावर तरी बडगा उगारला जाणारच, ते कोणीतरी कोण असेल ते पाहणे रोचक ठरेल.
मी आपला आज "ताज्या घडामोडी" वाचल्या तश्या सुचिबद्ध करतोय तूर्तास, कारवाई काय होईल / होणार नाही, हे अर्थातच कालौघात कळेलच, आपण सामान्य नोकरदार माणसे बुआ, पेपरात आले ते इमानेइतबारे ताज्या घडामोडीत मांडले इतकेच.
समीर वानखेडे साहेबांची चेन्नईला बदली
अखेर नवाब मलीक जिंकले.
मला वाटतं "समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमवतील" असे ते विधान होते. आता समीर वानखेडेंनी राजीनामा दिला तर तुमचे विधान बरोबर म्हणता येईल. तोवर, ही ट्रान्सफर म्हणजे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे असे म्हणायला वाव असावा
खाली पुरावा म्हणून विडिओ जोडतो आहे:-
मी वानखेडेंची नोकरी घालविणार, मी वानखेडेंना तुरूंगात पाठविणार, असे ते विधान होते. तसे ट्विट सुद्धा होते.
प्रत्यक्षात नवाबच तुरूंगात गेला आणि नोकरी (मंत्रीपद) पण गेल्यातच जमा आहे.
वानखेडे नवीन जागी Additional Director या पदावर गेले आहेत. ही बहुतेक पदोन्नती असावी.
फक्त खालील भाग सोडून
कारण ही पदावनती पण नाही आणि पदोन्नती पण नाही, नोमेनक्लेचर बदलले आहे फक्त, पद तेच (सेम पगार पातळी अधिकारकक्षा) आहे
नवाब मलीकने भाजपचा डाव समीर वानखेडेची कुंडली काढून ऊधळून लावला. त्या रागातून सूडबुध्दी ने भाजपने मलीकांवर कारवाई केली. आता बहुतेक वानखेडेंच्या नोकरीचा बदल्याच मलिकांची सुटता अशी जील भाजपने केली असावी. आर्यन सूटला, आता मलाक सूटतील. भाजपच्या हाती वानखेडेची नोकरा सोडली तर दुसरं काहीच हाती लागलेलं दिसत नाही.
अखेर नवाब मलीक जिंकले.
हे वर आपणच लिहिलेले आहे ना?
मलिक स्वत: तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत त्यांच्या जामीनाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे खालच्या न्यायालयात त्यांना जामीन केंव्हा मिळेल हे अल्लाच्या मर्जीवरच आहे.
साहेब काहीही करू शकतात असे बडबडणाऱ्या लोकांसाठी साहेब स्वतःच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाहीत हि वस्तुस्थिती स्वीकारणे फार क्लेशदायक आहे
त्यांचे जावई तर ९ महिने तुरुंगात होता आता आपल्या विरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी तो झगडतो आहे.
बाकी मलिक यांनी मी वानखेडेंची नोकरी घालविणार, मी वानखेडेंना तुरूंगात पाठविणार अशी दर्पोक्ती केली होती तसे काहीही होणार नाही
कारण वानखेडे महाराष्ट्रात नाहीत त्यामुळे त्यांना खोट्या प्रकरणात गोवणे आता तितके सोपे राहिलेले नाही.
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध केंद्र सरकारची परवानगी लागते ती २०२४ पर्यंत नक्की मिळणार नाही आणि बहुधा २०२९ पर्यंत सुद्धा मिळणार नाही.
तेंव्हा अखेर नवाब मलीक जिंकले.
नवाब मलीकने भाजपचा डाव समीर वानखेडेची कुंडली काढून ऊधळून लावला
असली बिनबुडाची विधाने करताना आपण आपले अज्ञान आणि पूर्वग्रह आणि द्वेष जाहीर करत आहात.
तेंव्हा शिका आणि मोठे व्हा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
त्यांना खोट्या प्रकरणात गोवणेप्रकरण खोटो नव्हते म्हणून तर भाजपला तातडीने त्याना ह्याप्रकरणातून काढून टाकावे लागले. नी नंतर चेन्नई ला हलवावे लागले. भाजप नेत्यांच्या तोंडातून शब्द फूटत नव्हता ई तकी तडाखा मलीकांनी दिला होता.बाकी मलिंकांनी आर्यन खान बाहेर काढून दाखवला. भाजपच्या हातात धुपाटणे आले. मलिकही वानखेडेंच्या नोकरीच्या बदल्यात बाहेर येतील. एकंदरीत ते जिंकले असेच म्हणावे लागेल.
असली बिनबुडाची विधाने करताना आपण आपले अज्ञान आणि पूर्वग्रह आणि द्वेष जाहीर करत आहात.तेंव्हा शिका आणि मोठे व्हा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बिनबुडाची विधाने आपण करत आहात डाक्टर. आपले भाजप प्रेम समजू शकतो पण सत्य परिस्थीती स्विकारण्याची ताकद ठेवा. त्यासाठी चांगल्या डाॅक्टर ला भेटा. बरे होण्यासाठी शुभेच्छा.
पडलो तरी नाक वर आहे म्हणण्याची तुमची शैली आवडली
लगे रहो!
बाकी मलिक जिंकूनही तुरुंगातच आहेत आणि तरी (महा वसुली आघाडी असल्याने) निर्लज्जपणे मंत्रिपदावर आहेत
आणि वानखेडेंचा पगार चालूच आहे आणि राहणार आहे.
बाकी मलिक जिंकूनही तुरुंगातच आहेतमलिक वेगळ्या प्रकरणात तूरूंगात आहेत. नी भाजप वर थोडसं “राष्ट्रहीत” फेकलं की भूजबळांसारखे बाहेर येऊन भाजपेयींच्या नाकावर टिच्चून पुन्हा मंत्रीपद सांभाळतील.
(महा वसुली आघाडी असल्याने) निर्लज्जपणे मंत्रिपदावर आहेत
मविआ आहे म्हणून तुरूंगात तरी आहेत ते भाजप सरकार असतं तर “जेलात जाता की भाजपात येता?“ ह्या तत्वावर ते भाजपत दिसले असते किंवा “राष्ट्रहीत” पुरवून तोडीपाणी करून “क्लिनचीट” तरी मिळवली असती. हा महाराष्ट्र आहे भाजपशासीत बिहार नाही.वानखेंडेंना तातडीने हिया प्रकराणातून बाहेर काढून चेन्नईला पळवावं लागलं तसेच आर्यन खानही सूटला. मलिकांना खान सोडवायचा होता तो सूटला बोनसमध्ये वानखेडेंची ट्रान्सफरही झाली. :) त्यामूळे मलीक जिंकले भाजप हरली :)
त्या काळात शाहरुख दिल्लीला जाऊन गुपचूप मोदी-शहांना भेटल्याचेही वाचले होते.छान. त्यावेळी आर्यन प्रकरणात अनेक मोठमोठे लोक सापडतील वगैरे वल्गना झाल्या होत्या. पतंग ऊडवून सलमान सूटला. आता शाहरूख सूटला. मोदीजींची लिला अगाध आहे. त्यांचा आशिर्वाद घेतला की कोर्टातून निर्दोष मूक्तता होते किंवा आरोपपत्रातून नाव वगळले जाते.बरे झाले कसाब ला काॅंग्रेसनेत्याच वेळी लटकवलं नाहीतर त्यानेही मोदीजींचे आशिर्वाद घेतले असते.
शिक्षेची अमलबजावणी थोडी लांबली असती आणि कसाब नी कृपा आशीर्वाद घेवून प्रसाद चढवला असता तर आता तो पण निर्दोष सुटला असता.
Rajiv Gandhi चे खुनी पण सुटले ना.
महत्त्वाकांक्षी विरार-अलिबाग मार्गिकेसाठी पाच हजार झाडांवर कुऱ्हाड, तर ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/5-thousand-trees-w…
मी आधीही म्हणालो होतो की, खांडववन जाळल्या शिवाय, इंद्रप्रस्थ होत नाही.....
पण, हे राज्य सरकार मात्र, आरे साठी एक नियम तर इतरांसाठी वेगळा नियम ....
https://www.lokmat.com/international/saudi-arabia-crude-oil-saudi-arabi…
आर्यन खान वर आरोप आणि अटक.
१) सुशांत सिंग ह्या bjp नेत्याचा पुतण्या,भाचा कोण असेल त्याची मुंबई मध्ये आत्महत्या.
CBI किती वर्ष तपास करतेय पण अजून कोणावर आरोप पत्र पण कोर्टात दाखल केले नाही तशी बातमी पण नाही
ना हत्येचे कोणते पुरावे मिळाले आहेत
२) त्याच्या आत्महत्या नंतर काहीच काम नसणाऱ्या महाराष्ट्र मधील bjp नेत्यांचा नंतर ड्रामा .आणि bjp samarthak tv Chanel च तमाशा चालू झाला.
३)त्या वेळी बॉलिवूड आणि मुस्लिम हे कसे नशेडी आहेत ह्याचा प्रचार आणि .
Ncb हि कधीच active नसणारी केंद्रीय एजन्सी अचानक फक्त महाराष्ट्र मध्येच active झाली.
त्यांनी त्या काळात धाडी टाकल्या एका पण घटनेचे आज काय झाले .
काही कोणी सांगत नाही.
४)त्याच योजनेचा भाग म्हणून आर्यन खान लं अटक आणि फक्त आरोप .
कोणी तरी bjp samarthak व्यक्ती नी पार्टी मध्ये ड्रग वापरले जात आहे असे NCB ल सांगितले आणि त्यांनी धाड टाकली.
सरकारी आयएएस , आयपीएस अधिकारी जो पर्यंत राजकीय पाठिंबा मिळत नाही तो पर्यंत अशी हवेत कारवाई करूच शकत नाही..
आता काहीतरी settle ment झाली आणि आर्यन वरील आरोप मागे घेतले .
हे राजकीय पातळीवर च झाले असणार.
फक्त स्टेडियम मध्ये कुत्रा फिरवला म्हणून दिल्ली मध्ये आयएएस पती पत्नी ची वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली.
ह्या वरून राजकीय दबाव काय असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाहीं
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://bfsi.eco…
येस बँक loan प्रकरणी अविनाश भोसले ना सीबीआय नी अटक केली आहे.
येस बँक
स्थापना 2004 वाजपेयी गेले आणि मनमोहन आले ते वर्ष.
म्हणजे नक्की कोणत्या सरकार च्या काळात ह्या बँकेला धंदा करण्याची परवानगी मिळाली ते सांगता येत नाही.
आणि 2020 लं तर ही बँक बुडाली.
एकाद्या हॉलिवूड चित्रपट सारखी story आहे.
औरंगजेब के राज में तोड़े गए थे 1000 मंदिर, इन जगहों पर बनाई गई हैं मस्जिदें
https://zeenews.india.com/hindi/india/from-kashi-vishwanath-to-mathura-…
ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
https://www.sumanasa.com/go/2lKdp6
अशा बातम्या जास्त महत्वाच्या आहेत देशाचे भविष्य अवलंबून आहे.प्रतेक भारतीय लोकांचं भावी काळ सुखाचा असेल की अडचणीचा हे ह्या वर अवलंबून आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने इमरान प्रतापगडी नावाचा उत्तर प्रदेशचा उमेदवार निवडला आहे.
स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना, काय मत प्रदर्शित करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...
गोव्यात बिफ कमी पडू गेणार नाही -पर्रिकर.
गाय ही पवित्र आहे, गहत्या बंदी व्हावी. - युपी भाजप.
मतांसाठी पलटी मारनारे कोण?? हिंदू मुर्ख समजू नये
त्यांना सेना हिंदूत्ववादी की भाजप हे माहीतीय.
पी. चिदंबरम हा घाणेरडा माणूस महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट झाली आहे. २०२४ मध्ये (कु)सुमार केतकर सुद्धा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाऊ नयेत असे फार वाटते.
हा प्रतापगडी सुद्धा तितकाच घाणेरडा आहे. महाराष्ट्रातून परप्रांतीयांना राज्यसभेत पाठविण्याची शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची उच्च परंपरा अजिबात खंडीत झालेली नाही याचा आनंद होत आहे.
विधानपरीषदेवर कोथरूडच्या जोशीबाईंना तिकीट
देऊ सांगून चंपांना निवडूण आणले. नी नंतर विधान परिषदेचे तिकीटच दिले नाही म्हणे. कोथरूडकरांनाही भाजपने फसवले. :) तरी कोथरूडकर पुढल्या वेळी भाजपचाच आमदार निवडून देतील. (स्वाभिमान वगैरे?? ह्या फक्त गप्पा आहेत :)
प्रतापगडी या माणसाचे नावच पहिल्यांदा ऐकले. काँग्रेसमध्ये असल्याने तो चांगला* असायची शक्यता तशी फारच कमी तरीही तो माणूस कोण हेच आधी माहित नसल्याने तो कितपत घाणेरडा आहे याची कल्पना नाही.
*: सध्याच्या काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात राजकारणात सक्रीय नसले तरी रमाकांत खलप हे काँग्रेसमधील चांगल्या नेत्यांचे एक नाव लगेच आठवते. स्थानिक पातळीवर आणखी असे काही नेते असले तरी ते मला माहीत नाही. पण राज्य-राष्ट्रीय पातळीवर असे नाव लगेच मला तरी आठवत नाही.
काँग्रेसमध्ये असल्याने तो चांगला* असायची शक्यता तशी फारच कमीविखे पाटील, नारायण राणे, कृपाशंकर, हे चांगले की वाईट? का भाजपात आल्यामूळे आता त्यांना चांगले म्हणावे?
हा अत्यंत भडक व वादग्रस्त विधाने करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. अर्थात हा कॉंग्रेसमध्ये शोभून दिसतो.
'Muslims must kill 4-6 persons before dying’: Congress’ new minority cell head Imran Pratapgarhi and his hate-filled ‘shayari’.
हे त्याचे भडक विधान प्रसिद्ध आहे. त्याची अशी अनेक भडक विधाने खालील संकेतस्थळावर दिली आहेत.
https://www.opindia.com/2021/06/congress-minority-cell-head-appointment…
हा प्रियांका वड्राचा नीलाक्षतनय असल्याने त्याला २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी व आता राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये हा सपच्या उमेदवाराविरूद्ध जवळपास सहा लाख मतांनी हरला होता.
संजय राउत काही फार वेगळे गृहस्थ नाहीत
“ईडी” ला न घाबरता भाजपवर थेट टिका करनारे महाराष्ट्रात फक्त राऊत आहेत. अशी हिंमत असनारे नेते राज्यात खुप कमी आहेत. ऊद्या युती करायची तर भाजपेयींना ह्यांच्याच पाया पडाव्या लागू शकतात.
हायला
हा भुजबळांचा नवा अवतार दिसतोय
पंजाबमधे आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर, पंजाबच्या गुप्तचर विभागाच्या ऑफिसवर आरपीजीने हल्ला, दोन राज्यस्तरिय कबडीपटूंची हत्या व काल झालेली मुसेवालाची हत्या या ज्या घटना घडत आहेत त्या पाहून असे दिसते की सध्या पंजाबची वाटचाल पुन्हा ८० व ९० च्या दशकातील खालिस्तानी दहशतवादाच्या दिशेने होत आहे.
लगेच सरकारला दोष. नावडतीचे मीठ अळणी. एवढा शस्त्रसाठा पंजाबात कुठून येतोय हे पाहणे केंद्रीय संस्थांचे काम आहे. गृहमंत्री झोपा काढताहेत की?? मूलाकडून बीसीसीआय चा हिशेब घेताहेत??
संशयाला वाव आहे....
प्रतिसाद, प्रसाद_1982, यांनाच असल्याने, लोचटांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये
..
मुंबई पाकव्याप्त कश्मार वाटनार्या, २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले असे मूक्ताफळे ऊधळनार्या, कंगना रानावतचा धाकड सिनेमा १०० कोटी बजेटचा सिनेमा ४ कोटी कमावून आपटला. भक्तांच्या दुखाःत मी सहभागी आहे. :)
सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा - कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील.
भाजपचे मनूवादी विचार हळूहळू अश्या प्रकारे बाहेर पडताहेत. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची गरज काय? हे यातून स्पष्ट होते.
ह्यावर भक्तविहारी काय मत व्यक्त करतात हे पाहणे रोचक ठरेल.
महाराष्ट्र मधून पण गैर मराठी लोकांना राज्यसभेत पाठवणे हे काही नवीन नाही.
मुळात राज्यसभा आणि लोकसभा ह्या मध्ये फरक आहे.
विविध क्षेत्रात चांगले काम करणारे,अभ्यासू लोक ,तज्ञ लोक ह्यांची निवड राज्य सभेत व्हावी हा मुळ हेतू.
इथे मराठी,अमराठी असा भेदभाव करता येणार नाही.
पण मुळ हेतू लं डावलले चालणार नाही.
पण हल्ली नीतिमत्ता ,हेतू सर्व च पक्षांनी त्यागला आहे.
मुस्लिम विरोध करण्या पेक्षा मुस्लिम कसे मुख्य प्रवाहात येवून समाजात मिसळून जातील..
असे राजकारण केले की समाजकारण पण होईल च.
https://www.indiatoday.in/india/story/qutub-minar-row-mosque-hindu-temp…
आता उदारमतवादी हिंदू काय प्रतिसाद देतात? हे वाचणे, रोचक ठरेल ...
तेया पेक्षा फक्त मतांसाठी हिंदूत्वाची कातडी पांघरलेला भाजप पक्ष काय भूमीका घेतो हे पाहणे जास्त रोचक ठरेल.
दुर्दैवाने, या विधानाशी शतशः सहमत.
https://www.indiatoday.in/amp/india/story/mosques-built-demolishing-tem…
ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
तरूण भारत, पांश्चजन्य मध्ये आलीय का?
5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी
https://lokmat.news18.com/crime/threatened-to-make-offensive-photo-vira…
पीडितेने घटनाक्रमाची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर पोलिसांना एक आवेदन देण्यात आलं. यात तरुणीने आरोपीद्वारा धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचं सांगितलं. याचा तपास करीत असताना आरोपी सोहेलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकात भाजप सरकार असल्याने न्याय मिळेल का ह्याबाबत मला शंका आहे.
हे प्रकार थांबले पाहिजेत