राजकारण

चालू घडामोडी -श्रीलंका अराजक

Primary tabs

आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे.
राष्ट्रपती गोताभये हे राष्ट्रपतीभवनातून पळून गेले आहेत. जनतेने राष्ट्रपतीभवनात घुसून तेथला ध्वजही उखडून टाकला आहे. तिथे जनतेचा कब्जा झालेला आहे.
जनतेने गॉल मधे चाललेले श्रीलंका ऑस्ट्रेलिया मॅचही स्टेडियम मधे घुसून बंद केली आहे.
श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात शिल्लक नाही , ( चीनच्या कृपेने). त्याना कोणी कर्जही देण्यास तयार नाही.
या गोष्टीचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे.
श्रीलम्केसारखा जवळचा देश अराजकतेचा सामना करतोय. जनता रस्त्यावर उतरलेली आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग आहे.
सनथ जयसूर्या या जनतेचे नेतृत्व करायला पुढे आलेला आहे.
परिस्थिती दर तासातासाला अधीकच वाईट होत चालली आहे

डँबिस००७

योगेंद्र यादव हे सेंद्रिय शेती समर्थक आहेत

माझ्या आठवणी प्रमाणे श्री योगेंद्र यादव हे श्री.अरविंद केजरीवालचे समर्थक होते पण केजरीवालांनी त्यांच्या पाठीत लाथ घालुन बाहेरचा रस्ता दाखवला.

श्री.अरविंद केजरीवालचे दिल्लीतले व पंजाबातले राजकारण बघता ह्या दोन राज्याची वाटचाल श्री लंकेच्याच दिशेने होत आहे हे स्पष्ट आहे.

त्यामुळे श्री योगेंद्र यादव ह्यांच्या चॉईस बद्दल शंका घ्यायला वाव आहे.

क्लिंटन

योगेन्द्र यादवसारख्या माणसाला पार्श्वभागावर लाथ मारून (अगदी तसेच शब्द योया आणि प्रभू यांच्याविषयी केजरीवालांनी वापरले होते) हाकलून दिल्याबद्दल केजरीवाल हे खूपच मोठे मुत्सद्दी म्हणायला पाहिजेत असे आता म्हणावेसे वाटते. असला गुड फॉर नथिंग माणूस आपल्याला नंतर कटकटीच उभ्या करेल म्हणून त्यांनी ६७ जागा जिंकून दीडेक महिन्यातच त्याला हाकलून दिले. २६ जानेवारी २०२१ रोजी तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या नावावर दिल्लीत जो प्रकार झाला त्यानंतर योया गुरगावमध्ये ज्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहात होता तिथल्या लोकांनी 'असली घाण आपल्या कॉम्प्लेक्समध्ये नको' असे म्हणत त्याच्या पुतळ्याला जोडे हाणले होते असेही वाचल्याचे आठवते. कोणाही सेन्सिबल व्यक्तीला योया आवडायचा नाही.

मुनीवर केजरीवालांनी विकासकामांचा धडाका सावल्यामुळे काही लोकांत घबराट पसरलाीय.

मुनीवर केजरीवालांनी विकासकामांचा धडाका सावल्यामुळे काही लोकांत घबराट पसरलाीय.

श्री.अरविंद केजरीवालचे दिल्लीतले व पंजाबातले राजकारण बघता ह्या दोन राज्याची वाटचाल श्री लंकेच्याच दिशेने होत आहे हे स्पष्ट आहे. श्रिलंकेत ऊच्च दर्जाची सरकारी शाशा आहेत? मोहल्ला क्लिनीक मध्ये चांगले ऊपटार होतात? स्त्रियांना फूकट बससेवा आहे? एवढं करूनही टॅक्स ऊत्पन्न वाढतंच आहे तसेच नेत्यांच्या खिशात पैसा जात नाहीये. तुन्हाला श्रिलंका म्हणायचं होत की युरोपीय देश??
श्रिलंका हा युरोपात येत नाही. तो भारताच्या दक्षीणेला आहे.

श्री.अरविंद केजरीवालचे दिल्लीतले व पंजाबातले राजकारण बघता ह्या दोन राज्याची वाटचाल श्री लंकेच्याच दिशेने होत आहे हे स्पष्ट आहे. श्रिलंकेत ऊच्च दर्जाची सरकारी शाशा आहेत? मोहल्ला क्लिनीक मध्ये चांगले ऊपटार होतात? स्त्रियांना फूकट बससेवा आहे? एवढं करूनही टॅक्स ऊत्पन्न वाढतंच आहे तसेच नेत्यांच्या खिशात पैसा जात नाहीये. तुन्हाला श्रिलंका म्हणायचं होत की युरोपीय देश??
श्रिलंका हा युरोपात येत नाही. तो भारताच्या दक्षीणेला आहे.
तुम्हाला नकाशए शिकण्याची
गरज आहे.

श्रीगुरुजी

आपले पंतप्रधान तरी वेगळं काय करत आहेत? तज्ज्ञ लोकांचे ऐकायचेच नाही.

योगेंद्र यादव व राजू शेट्टी या दोघांपैकी कोणत्या तज्ज्ञाचे मोदींनी ऐकलं पाहिजे?

आग्या१९९०

योगेंद्र यादव व राजू शेट्टी या दोघांपैकी कोणत्या तज्ज्ञाचे मोदींनी ऐकलं पाहिजे?
सेंद्रिय शेतीने खरोखरच उत्पादकता वाढत असेल तर कोणाचेही ऐकले तरी हरकत नाही. नसेल वाढत तर उगाच प्रयोग करू नये. श्रीलंकेचे उदाहरण समोरच आहे. एकतर सांगितल्याप्रमाणे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकले नाहीत, सेंद्रिय शेती प्रयोगाने ते निम्म्यावर आणू नये म्हणजे झाले.

डँबिस००७

सेंद्रिय शेतीने खरोखरच उत्पादकता वाढत असेल तर कोणाचेही ऐकले तरी हरकत नाही.

भारतात हजारो वर्षांपासुन केमिकल खत विरहीत शेती होत आलेली आहे. आताची केमिकल खत आली तरीही बर्याच जागी अजुनही केमिकल खताशिवायच शेती होते. आपल्या घरापुरत केमिकल खत न वापरता अन्न धान्य पिकवण्याकडे अनेक शेतकर्यांचा कल आहे.

सेंद्रीय खतामुळे फळ भाज्या उत्तम दर्ज्याच्या, चांगल्या चवीच्या, उत्तम आकाराच्या, दिर्घ काळ टिकणार्या होतात असे दिसुन आलेले आहे.
त्याचा स्वःताला अनुभव ही आहे.

सेंद्रिय खतांनी उत्तम दर्ज्याची केमिकल विरहीत फळे, भाज्या व धान्य पिकवता येतात ज्याला बाजार पेठेत चांगला भाव मिळतो व उत्तम डिमांड असतो, केरळ सारख्या राज्यात अशी ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या बाजारात आल्या आल्या हातोहात विकल्या जाऊन, बाजार दोन तासात रिकामा झालेला पाहीलेला आहे. केरळ मध्ये जमिनी उपलब्ध नसल्याने शहरातील लोक आपल्या घराच्या गच्चीवर गॅलेरीत अशी सेंद्रिय शेती करत असतात. ह्याची सुरुवात काही वर्षांपुर्वीच झालेली असुन त्याच लोण केरल मध्ये सर्वत्र पसरलेल आहे.

दुबईत सर्वात महाग भाज्या, फळे ही हॉलंड वरुन येतात. हॉलंडहुन आलेले नॉर्मल टॉमेटो सुद्धा इतर टॉमेटोपेक्षा ४ ते ५ पटिने महाग असतात. विषेश म्हणजे अश्या फळ भाज्यांना "ऑरगॅनिक" असे गोंडस नाव द्यायची गरज नसते फक्त हॉलंडहुन आलेले इतक पॅकेटवर लिहीलेल असल तर लोकांचा त्यावर विश्वास बसतो. ह्या विषयावरच्या तज्ञाकडे बोलताना त्याने मला सांगीतल की हॉलंडहुन आलेला हा सर्व माल मुळातच हॉलंडमध्ये पिकवला जात नाही, तो पिकवला जातो इजित्पच्या वाळवंटात, ग्रीन हॉऊसच्या आवरणात, कंट्रोल्ड वातावरणात. इजित्पहुन हा माल हॉलंडमध्ये नेला जातो व तिथुन पॅकिंग करुन सगळीकडे वितरित केला जातो.

केमिकल खताच म्हणाल तर त्या साठी स्वावलंबी होण्यासाठी भारत सरकारने बरेच प्रकल्प बाहेरच्या देशात जिथे नॅचरल गॅस मुबलक
प्रमाणावर मिळतो त्या देशात राबवलेले आहेत. उदा. ओमान देशात २००५ साली भारत सरकार च्या वतीने ईफ्को व ओमान सरकारचा ३७५ ट्न प्रती दिवस युरिया उत्पादनाचा प्रकल्प उभार लेला आहे. त्या प्रकल्पात पुढच्या २० वर्षांपर्यत तयार झालेला सर्व युरीया भारत सरकारच विकत घेईल अशी तरतुद त्या करारात केलेली आहे.

राघव

चांगली माहिती! धन्यवाद. :-)

आग्या१९९०

सेंद्रीय खतामुळे फळ भाज्या उत्तम दर्ज्याच्या, चांगल्या चवीच्या, उत्तम आकाराच्या, दिर्घ काळ टिकणार्या होतात असे दिसुन आलेले आहे.
त्याचा स्वःताला अनुभव ही आहे.

सेंद्रिय फळ भाज्यांचे शेल्फ लाईफ कमी असते. त्यामुळे हा माल जवळच्या बाजारपेठेत द्यावा लागतो, दूरवर पाठवण्यासाठी खर्च जास्त येतो. ह्यावर तुमचा स्वतःचा अनुभव ( टिकवण क्षमता )तपशीलात देता येईल का?
सेंद्रिय पद्धतीने कापूस पिकवून किती उत्पादन मिळते? कापसाच्या दर्जात काही फरक पडतो का? कीड नियंत्रण खर्च किती कमी होतो? हेच धान्याच्या बाबतीतही लागू होते. फक्त दर्जा सुधारून देशाची अन्न मागणी पूर्ण होईल का? उत्पादन नक्कीच वाढत नाही उलट कमीच येते. देशाची गरज भागवण्यासाठी दुप्पट जमीन लागणार. हे शक्य आहे का? रासायनिक कीटक नाशकांचा वापर करता येत नसल्याने
सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास पीकपालट करावे लागते, किंवा नांगरपलटी करून एक हंगाम शेत पडीक ठेवावे लागते. नाहीतर किडीचा प्रादुर्भाव होतो. किती शेतकऱ्यांना हे परवडेल? सेंद्रिय शेती म्हटली म्हणजे डोळ्यासमोर फक्त रसरशीत फळे आणि हिरव्यागार भाज्या समोर येतात, धान्य,कडधान्य, तेलबिया हे पटकन समोर येत नाही. सेंद्रिय फळभाज्या शहरात दुप्पट भावाने खपत असतील परंतु देशातील किती लोकं दुप्पट भावाने धान्य घेऊ शकतील? कुठलेही रासायनिक खत, कीटकनाशक न वापरता आपल्या भागात पिकनारे धान्य सतत तीन वर्ष काढून बघा आणि आपले आर्थिक गणित जुळते का ह्याचा अनुभव कुणीही घेऊ शकतो. मी गहू करून बघितला मला अजिबात परवडलेले नाही.

राघव

रासायनिक कीटक नाशकांचा वापर करता येत नसल्याने
सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास पीकपालट करावे लागते, किंवा नांगरपलटी करून एक हंगाम शेत पडीक ठेवावे लागते. नाहीतर किडीचा प्रादुर्भाव होतो. किती शेतकऱ्यांना हे परवडेल?

यात अनुभव नसल्याने अगदी बालीश प्रश्न वाटेल, पण शंकानिरसन करावे -
रासायनिक कीटक नाशकांचा वापर कायम ठेवला आणि खतं मात्र सेंद्रीय वापरली.. असं करता येऊ शकतं काय? की त्याचे काही अडथळे/साईड इफेक्ट्स असतात?

आग्या१९९०

रासायनिक कीटक नाशकांचा वापर कायम ठेवला आणि खतं मात्र सेंद्रीय वापरली.. असं करता येऊ शकतं काय?
सध्या भारतात मिळणाऱ्या ८० - ९० % सेंद्रिय फळभाज्या अशाच प्रकारे पिकवल्या जातात. सगळेच रोग सेंद्रिय कीटकनाशकांनी आटोक्यात येत नाही, रासायनिक कीटकनाशके वापरावीच लागतात. सर्टिफिकेट घेणारे फार कमी असतात. सेंद्रिय खत, सेंद्रिय कीटकनाशक आणि RO चे पाणी वापरले तर १०० % खात्रीने सेंद्रिय उत्पादन मिळू शकते. बाकी सेंद्रियच्या नावाने लुबाडणूक चालू आहे.

डँबिस००७

राघव ,
रासायनिक कीटक नाशकांचा वापर करता येत नसल्याने
सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास पीकपालट करावे लागते, किंवा नांगरपलटी करून एक हंगाम शेत पडीक ठेवावे लागते. नाहीतर किडीचा प्रादुर्भाव होतो. किती शेतकऱ्यांना हे परवडेल?

बराच मोठा विषय आहे, थोडक्यात सांगता यायच नाही, तरी प्रयत्न करेन,

खरतर, रासायनिक खताचा पिकावर खुप काही वाईट परिणाम होत नाही.
रासायनिक खताचा म्हणजे पिकाला लागणारे महत्वाचे घटक जसे की एन. पि. के. (नायट्रोजन, फॉस्फोरस व पोटॉशियम) हाताने भरवणे. हे महत्चाचे घटक मिळवण्यासाठी वनस्पतीला अन्यथा जी मेहनत लागते ती ह्या दिलेल्या तयार खतामुळे करावी लागत नाही. पण वनस्पतीला एन. पि. के. शिवाय बरेच धातु कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याच्या शिवाय तांबे, बोरॉन , जस्त, मॉलि सारखे धातु पण लागतात. अश्या मिनरल्स , धातुंमुळे वनस्पतींची रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. त्यांच्या पेशीत सॉफ्टनेस येतो , अश्या वनस्पतींना फळाच्या ओझ्यासाठी काठीचा आधार द्यावा लागत नाही. अश्या मिनरल्समुळे वनस्पतीत एक प्रकारचे वलय निर्माण होते ज्यामुळे कीटकांना अश्या वनस्पती आपल्या कडे आकर्षीत करत नाही किंबहुना किटकच अश्या वनस्पती कडे आकर्षीत होत नाहीत.

जमिनीत बर्याच प्रमाणावर बॅक्टेरीया, छोटे जिव जंतु रहात असतात (जसे की गांडुळ) ही मंडळी जमिनीतील खाद्य पदार्थांचा वापर करुन वनस्पतीला योग्य अश्या अनेक मिनरल्स, पोषक तत्वांचा निर्माण करत असतात. पिकांचा खाली पडलेला पाला पाचोळा जेंव्हा सडतो त्याचे विघटन ह्याच बॅक्टेरीया, जिवजंतु मार्फत होत असते. अश्या जैविक विघटनाने वनस्पतीला योग्य असे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याच्या शिवाय तांबे, बोरॉन , जस्त, मॉलि सारखे धातुचे प्रकार तयार होत असतात. जमिनीत रासायनिक खत सोडल्याने अश्या बॅक्टेरीया व छोट्या जिव जंतु वर परिणाम होऊन त्यांचे जमिनीतले प्रमाण नाहीसे होते.

सर्वात जास्त नुकसान रासायनिक कीटक नाशकांचा वापरामुळे होते. अशी रासायनिक कीटक नाशके जमिनीला (जमिनीतील जिव
जंतुना ) घातक असतात. ही रासायनिक कीटक नाशके विघटन होत नसल्याने तशीच दिलेल्या पाण्याबरोबर वनस्पतीत शोषली जातात त्यामुळे मनुष्याला अपाय करतात. वनस्पतीवर फवारलेली रासायनिक कीटक नाशके अशी वनस्पती पाण्यात धुवुन निघुन जातीलच अस नाही त्यामूळेच मॉल मध्ये फळ भाज्या धुवण्यासाठी केमिकल क्लिनर विकत मिळतात. रासायनिक कीटक नाश कांना पर्याय नसला तरीही निम कीटक नाशके उपयुक्त ठरत आहेत.

प्रत्येक कीटकाचा उपाय रासायनी़क किटकनाशक वापरुनच करावा लागतो असे नाही. ज्या प्रदेशातली वनस्पती आहे ती त्या प्रदेशातल्या कीटकांना आपल्यापासुन दुर ठेवण्याचे हारमोन्स / केमिकल स्वःता मध्ये तयार करत असते पण जर किटक जर नविन असेल तर त्यावेळेला वनस्पतीचा नाईलाज होतो. असा प्रकार हल्ली आढळुन आलेला आहे.

मार्च २०२२ मध्ये कसाव्वो मिलीबग नावाचा एक बग भारतात आढळला. हा भारताच्या बाहेरुन आलेला बग अतिशय खतरनाक असुन
शेतीची ईतकी नासधुस करतो की हातात १०-२०% माल सुद्धा रहात नाही. त्याच्यावर उपाय म्हणुन भारत सरकारने आफ्रिकेतुन एक माशी
आयात केलेली आहे. ही माशी ह्या मिलीबगला खाते.

आज ठरवुन उद्या पासुन सेंद्रिय शेती सुरु करता येत नाही. कित्येक दशके रासायनीक खत वापरल्यामुळे जमिनीचा कस गेलेला असतो, त्या जमिनीत बॅक्टेरीया, छोटे जिव जंतुंचे प्रमाण नगण्य असते. जो पर्यंत जमिनीतले जीव परत येत नाहीत तो पर्यंत शेतीला उपयुक्त परिस्थिती निर्माण होत नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी जमिन तयार करण्यासाठी काही वर्षे जातात. पण एकदा जमिन तयार झाल्यावर मात्र शेती चांगली होऊ शकते.

राघव

खरंच मोठा विषय आहे! :-)

आज ठरवुन उद्या पासुन सेंद्रिय शेती सुरु करता येत नाही. कित्येक दशके रासायनीक खत वापरल्यामुळे जमिनीचा कस गेलेला असतो, त्या जमिनीत बॅक्टेरीया, छोटे जिव जंतुंचे प्रमाण नगण्य असते. जो पर्यंत जमिनीतले जीव परत येत नाहीत तो पर्यंत शेतीला उपयुक्त परिस्थिती निर्माण होत नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी जमिन तयार करण्यासाठी काही वर्षे जातात. पण एकदा जमिन तयार झाल्यावर मात्र शेती चांगली होऊ शकते.

पण मग हे सर्व करून फायदा मिळण्याइतपत चांगली शेती होण्यासाठी बराच काळ लागणार असेल तर, नफ्याच्या गणितात हे बसवायचे कसे? कदाचित शेतजमिनीचा थोडा-थोडा भाग सेंद्रीय पद्धतीनं शेती करण्यासाठी हळूहळू तयार करत जायचा हा एक प्रकार असू शकेल, पण पुरेसे पडेल किंवा नाही हे कळत नाही.

एवढ्या अडचणी आणि आपल्याकडची बरीचशी शेती अजूनही पावसावर अवलंबून.. यामुळे अगदी तयार जमीन जरी मिळाली तरी पाण्याच्या अडचणीमुळे नुकसान होण्याची देखील शक्यता असणारच.

सुक्या

धन्यवाद डँबिस००७.
अगदी हेच लिहिनार होतो पण टंकाळा आला. रासायनीक खतांमुळे नुकसान होते हा जानुनबुजुन केलेला अपप्रचार आहे. माझ्या मते रासाननिक खते ही द्यावीच लागतील नाहीतर जमीनीचा पोत इतका खराब होइल की त्यात काहीही उगवनार नाही. जैविक विघटनाने वनस्पतीला मिळनारे खाद्य हे खुप सावकाश मिळते. त्यात जर तण झाले तर बरेच पोषकद्रव्य तेच शोषुन घेतात.

सेंद्रीय शेतीसाठी शेतजमीन ३ वर्षे पडीक ठेवावी लागते. काही ठेकाणी हाच कालवधी ७ वर्षे इतका प्रचंड आहे. रासायनिक कीटक नाशकांचा वापर करता येत नाही तसेच रासायनिक खते ही वापरता येत नाहीत. या सगळ्यांचा परीणाम म्हणजे पीक कितीही चांगले असले तरी उत्पादन कमी होते. त्यामुळे भाव जास्त ठेवावा लागतो.
यात शेतकर्‍याचे बजेट नसेल तर हा सारा आतबट्याचा व्यवहार होतो. भारतात जिथे शेतकरी हंगामी उत्पन्नावर उपजिवीक करतो तिथे ३ वर्षे जमीन पडीक ठेवणे त्याला कितपत परवडेल?

कंजूस

"अध्यक्षांचा राजिनामा मिळाल्याशिवाय पलेस सोडणार नाही" - आंदोलक.
आता सर्वपक्षीय सरकार बनवणार आहेत तर ते
सत्तांतर करायला अधिकृत अध्यक्ष असणे गरजेचे आहे.
तमिळ लोकांचाही एक पक्ष आहे आणि त्यांचे उमेदवारही सर्वपक्षीय सरकारात घ्यावे लागतील.
((पलेसमधल्या जीममध्ये जी उपकरणे ठेवली आहेत ती आंदोलक वापरत आहेत ते पाहून फार मजा वाटते. अगदी सायकलसुद्धा चालवत आहेत प्रामाणिकपणे.))

श्रीगुरुजी

लाओस व केनया या देशातही अन्नधान्यटंचाई निर्माण झाली असून श्रीलंकेसारखेच आंदोलन सुरू झाल्याचै वाचले.

निनाद

लाओस हा देश चीन च्या फार आहारी गेलेला आहे आणि त्याची किंमत आता चुकवावी लागते आहे. त्यामानाने व्हिएतनाम मात्र साम्यवादी असूनही भारताच्या बाजूने झुकलेला राहिला आहे. व्हिएतनामी लोक चीन ला शत्रू मानतात.

संजय पाटिल

एकंदरीत जे जे देश चीनच्या आहारी गेलेत त्यांची वाट लागणार असे दिसत आहे....
पाकिस्तानचा नंबर लवकर येऊदे...

संजय पाटिल

एकंदरीत जे जे देश चीनच्या आहारी गेलेत त्यांची वाट लागणार असे दिसत आहे....
पाकिस्तानचा नंबर लवकर येऊदे...

पलेसमधल्या जीममध्ये जी उपकरणे ठेवली आहेत ती आंदोलक वापरत आहेत ते पाहून फार मजा वाटते. अगदी सायकलसुद्धा चालवत आहेत प्रामाणिकपणे.))

कुठल्याच प्रकारची तोडफोड, आगजनी किंवा सरकारी संपत्तीला नुकसान नाही. मीळालेली रोकड आंदोलकांनी पोलिसाना दिली. आंदोलक कुठल्याच प्रकारचे नुकसान करू नका आसे बाकीच्या लोकांना सांगत आहे. खरोखर कौतुकास्पद आणी शीकण्या सारखे पण.

मला आशा वाटते हा देश नक्कीच या संकटातून बाहेर पडेल.

शांतीसेना पाठवली चुक की बरोबर यात न पडता एवढेच म्हणेन की तत्कालीन श्रीलंका सरकारने शेजारच्या देशाने दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून घ्यायला पाहीजे होता. हितसंबंध दोघांचेही आडकले होते.

विजुभाऊ

श्रीलंकेत लोक शिस्तीत रांगा लावून राष्ट्रपतींचा प्रासाद पहायला गर्दी करताहेत.
इतक्या अराजकातही लोकांची शिस्त खरंच वाखाणण्याजोगी आहे

शलभ

हो. श्रीलंकन लोक शिस्तप्रिय आहेत. 5 वर्षापूर्वी फिरायला गेलो होतो. बऱ्याच शहरी आणि ग्रामीण भागात फिरलो. लोक झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडताना दिसले.

गामा पैलवान

राघव, तुमचा इथला प्रतिसाद अत्यंत समर्पक आहे : https://www.misalpav.com/comment/1146550#comment-1146550
बरीच मेहेनत घेतलेली दिसते. धन्यवाद! :-)

निनाद, वरील संदेशास दिलेला तुमचा प्रतिसादही वाखाणणीय आहे : https://www.misalpav.com/comment/1146561#comment-1146561

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान

लोकहो,

श्रीलंकेत इतकी टोकाची परिस्थिती आली तरी मोदी ढिम्म आहेत. खरंतर ते सहाय्यार्थ धावून जाणारे आहेत. पण श्रीलंकेत का गेले नाहीत, कोणास ठाऊक. काहीतरी खटकतंय खरं. की मोदींनीच हा बनाव घडवून आणलाय?

आ.न.,
-गा.पै.

सुक्या

कॉन्स्पिरिसी थेयरी चे शतक वगेरे करायचे असेल तर सांगा ... आम्ही पण हातभार लाउ ...

कंजूस

पूर्वी तमिळ लोकांना ( म्हणजे भारतातून मजूर म्हणून गेलेले) फार त्रास दिलाय हे विसरून चालणार नाही. मला एका तमिळ सहकाऱ्यांनी सांगितले की त्यांना मतदानाचा हक्क नाही. त्यामुळे ते आंदोलनं, विरोध करतात. ( खरं खोटं काय माहिती.)
तिकडे एक तमिळ पार्टीही आहे. मग त्यांना घेणार का सर्वपक्षीय सरकारात?
भारताची अफगाणिस्तानातील गुंतवणूक ( ३लाख कोटी??) डुबीत जमा आहे. श्रीलंकेतही डुबेल. म्हणजे काहीतरी मदत देऊन कायमचे पाणी सोडावे लागेल.

राघव

धन्यवाद निनाद, डँबिस आणि गा.पै. :-)
कंकाका आणि श्रीगुरुजींनी देखील काही उपाय मांडलेले आहेत.

@निनाद,

प्रचंड गवगवा करून सरकार कडून रासायनिक खतांना कायदेशीर बंदीच घालून घेतली होती श्रीलंकेने. मग अन्नधन्य उत्पादन शक्यच झाले नाही. आणि सर्व आर्थिक भार अन्न आयातीवर गेला. रासायनिक खतांना कायदेशीर बंदी करा हा गवगवा एका एनजीओ ख्रिस्ती संघटनेकडून घडवून आणला होता असे म्हणतात. आणि त्याचे महत्त्वाचे लोक नंतर गायब झाले. (खखोदेजा!)

मला तरी ही कॉन्स्पिरसी वाटते. केवळ खतांचा वापर बंद करून पूर्ण धान्य उत्पादन डबघाईला येणे हे पटत नाही. याशिवायही काही गोष्टी पडद्यामागे घडलेल्या असाव्यात.
भारतीय उपखंडातली शेती ही मुख्यतः ऋतूमानावर अवलंबून असते. जर वेळेवर शेतीची कामे झाली नाहीत तर देशाच्या नाजुक आर्थिक परिस्थितीवर अन्न तुटवड्याचा विलक्षण परिणाम होऊ शकतो. ह्याचा उपयोग विघातक शक्तींनी केला तरः जसं लोकांना सरकारच्या ह्या धोरणाविरुद्ध भडकवायचे आणि आंदोलनं करायची, जेणेकरून वेळेत मोठ्याप्रमाणावर शेतीच होणार नाही. किंवा सेंद्रीय खतांच्या किंमती अनैसर्गिकपणे वाढवायच्या, वेळेत पुरवठाच होऊ द्यायचा नाही. यानं बॅक डोर एन्ट्री घेऊन डायरेक्ट धोबीपछाड होऊ शकेल..! अर्थात् ही थिअरी आहे, असेच झाले असेल असे नक्की सांगता येत नाही.

भारताथी अनेक एनजीओज बेकायदेशीर परकीय पैसा बंद केल्यावर फार नाराज आहेत. हा पैसा त्यांना कउठे खर्च करायचा आहे ते मात्र त्यांना सांगायचे नसते, हे खास!

हे सिक्यूरिटी ब्रीच अगदी शक्य आहेत. भारतातही हेच चालत होतं की.

एक महत्त्वाचा मुद्दा यात राहून गेला आहे तो म्हणजे आणिबाणी जाहीर केल्यावर कोणत्याही मोठ्या सत्तेच्या हातातले खेळणे न बनण्यासाठी योग्य ती घटना दुरुस्ती करून घेणे. (भारतात इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर केल्यावर घट्नाच बदलून टाकली आणि भारत अचानक सेक्युलर देश झाला.)

+१ बाडीस. पण अशा परिस्थितीत हात दगडाखाली असल्यानं देखील बर्‍याच गोष्टी मान्य कराव्या लागतात. किंबहुना अशी परिस्थितीच त्यासाठी आणल्या जाते असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. बाकी इंदिरा गांधींनी आणिबाणी स्वतःच्या फायद्या-तोट्याच्या गणितासाठी लादली होती. श्रीलंकेत आणिबाणी लागू करणे हा निरूपाय आहे.

@डँबिसशेठ,

सस्टेनेबल गाव ही भारतासारख्या देशाची खासियत होती. वाढत्या शहरीकरणातुन व त्यानंतरच्या जागतिकीकरणातुन गावातल्या सेल्फ सस्टेनींग ईको सिस्टीम लयाला गेली.

श्री लंकेतील लोकांना पुन्हा आपल्या मुळाकेडे परतावे लागेल. जितक्या लोकांकडे त्यांच्या मुळ गावात जमिनी आहेत त्या कसुन त्यावर जमेल तसे अन्न धान्य पिकवणे सुरु करावे लागेल. गावातील सर्व गावकर्यांना एकत्र आणुन एक सामाजीक बांधिलकी निर्माण करावी लागेल. शहरातुन लोक कमी झाल्याने शहरावरचा ताण कमी होईल. ईंधनाची मागणी कमी होईल. अन्न धान्य पिकवायला लागल्याने त्याची आयात करावी लागणार नाही. गावात रहायला गेल्याने तिथे विजेची पण बचत होईल.

ईतर देशाकडुन मदत घेण्यासाठी देशांतर्गत तज्ञ लोकांची कमिटी बनवुन पैश्याव्यतिरीक्त ईतर सामानांची जसे युरीया, ईंधन, औषधे अशी मदत घ्यावी लागेल व त्या वस्तुचे योग्य वितरण जनतेत करावे लागेल.

हे जरी प्रथम टप्प्यात योग्य असलं तरी केवळ अन्नसुरक्षा झाल्यानं [ हेच खूप मोठं काम आहे हे मान्य! ] देशांतर्गत बाजारपेठेला चालना मिळणार नाही. पण सरकारला श्वास घ्यायला जरा स्पेस मिळेल हे खरे.

कंकाका म्हणतात तसे, मूलभूत गरजांव्यतिरिक्तचे असे व्यापार ज्यातून निर्यात होऊ शकेल, पर्यटन [ कमी खर्चात बर्‍यापैकी शाश्वत उत्पन्न ] .. त्यांना उठाव देणे करावेच लागेल. पण ते कधी करायचे हे प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय ठरवता येत नाही. जसं पर्यटक यायला जरी तयार झाले तरी त्यांना बेसिक सोयी-सुविधा मिळणे गरजेचे राहील, जे सध्या अशक्य आहे.

देशाबाहेरून शक्य तेवढा पैसा उभारल्यावर देखील तो टप्प्याटप्प्यानं बाजारपेठ सुरू करण्यासाठी वापरावा लागेल. प्राथमिक टप्प्यानंतर जेव्हा उद्योग सुरू होतील, त्यानंतर काही वर्षांनी गाडं रुळावर यायला लागेलसं वाटतं.

क्लिंटन

डावा विचारवंत मोड ऑन

सन २००७- ह्युगो चॅवेजने वेनेझ्युएलामध्ये भूतलावरील नंदनवन फुलवले आहे.
सन २०१३ नंतर- चिडीचूप शांतता
सन २०१८- भारतापेक्षा श्रीलंका सगळ्याच दृष्टीने पुढे आहे.

पोपट झाल्यावर दरवेळेस चिडीचूप शांतता ठेवणेही बरं दिसत नाही म्हणून--
सन २०२२- भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने होत आहे.

डावा विचारवंत मोड ऑफ

सुबोध खरे

@क्लिंटन

आपले आवडते, नोबेल विजेते, डाव्यांचे अध्वर्यू,अर्थ तज्ज्ञ श्री अमर्त्य सेन ( योगायोगाने यांच्या बायको चे आडनाव रॉथशिल्ड आहे) यांनी तीन वर्षांपूर्वीच श्रीलंकेची स्तुति करत भारताने त्यांचे अनुकरण करावे असे सुचवले होते.

सध्या ते कुठे असतात?

श्रीलंकेने त्यांना अर्थमंत्री नेमावे अशी नम्र सूचना करत मी खाली बसतो

गामा पैलवान

सुबोध खरे डॉक्टर,

तत्संबंधी एक लेख सापडला : https://www.patrika.com/economy-news/amartya-sen-said-india-second-wors…

तर अमर्त्य सेनांनी २०१८ साली व्यक्त केलेल्या वक्तव्याच्या मते १९९८ साली श्रीलंका उपखंडात पहिल्या क्रमांकावर होता. आज २०२२ चालू आहे. तर सदर घसरण गेल्या केवळ ४ वर्षांतली नसून पूर्ण २ तपांतली असावी. मात्र ही चालू आहे याचा सुगावा नोबेलविजेत्यास लागला नाही हे महदाश्चर्य.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे

अमर्त्य सेन हे विकले गेलेले डावे अर्थतज्ज्ञ आहेत

आणि

त्यांच्या बायकोचे लग्न अगोदरचे नाव योगायोगाने रॉथशिल्ड आहे.

>>> अमर्त्य सेन हे विकले गेलेले डावे अर्थतज्ज्ञ आहेत.

जर ते शेठच्या बाजूने लिहिणारे असते तर त्यांच्या इतका अभ्यासू तज्ज्ञ तिन्हीलोकात नसता.
हो की नै....!

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०

त्यांना अर्थच काय कुठल्याही तज्ज्ञ लोकांची ॲलर्जी आहे. ढग आले की शत्रूच्या रडारला विमाने दिसत नाहीत... हे तर आपल्या लष्कर तज्ज्ञांनासुद्धा माहित नव्हते.

सुबोध खरे

संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन

:)
भाऊ तोचतोचरेकर जो पर्यंत फडणवींसांच्या बाजूने लिहीताहेत तो पर्यंतच ते ऊत्स्फूर्त पत्रकार. ज्या दिवशी भाजपच्या विरूध्द एक शब्द लिहीली त्याच दिवशी ते विकले गेलेले ठरतील. :)
जे विचारवंत भाजप विरोधात लिहीतात ते विकले गेलेल असतात. :)

विजुभाऊ

या धाग्याचा आणि भाउंचा किंवा भाजपचा काय संबन्ध ?

वर जर वाचलं तर क्लिंटन ह्यांच्या कमेंट पासून सर्व सुरू झालंय. जो पर्यंत डावे, पुरोगामी ह्याना पाडूव बोललं जात होतं तो पर्यंत तुम्हाला आक्षेप नव्हता. पण भाजप, तोचतोचरेकर ह्यांच्यावर कमेंट पडल्या नी लगेच तुम्हाला धाग्याचा संबंध आठवला. व्वा विजूभौ, गूड.

सुक्या

ते दर सहा महिण्याला जागतिक मंदी चे भाकीत करणारे जागतिक किर्ती चे अर्थतज्ञ कुठे आहेत कुणा ठाउक? प्रध्यापकी जोरात चालु आहे वाट्टे.
त्यांनी श्रीलंकेला मदत करावी असे मला वाटते ...

सुबोध खरे

रघुरामन राजन यांनी स्वतःला इतके हास्यास्पद करून ठेवले आहे कि आता त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

विजुभौ. तुमचा धागा. यावेच लागले. मैत्री असते की नाही काही.

श्रीलंकेचा भारतावर काय परिणाम होईल पण, भारतात अजून चांगली स्थिती आहे, लोक अजूनही महागाई, पारदर्शक भ्रष्टाचार या विरुद्ध रस्त्यावर उतरलेले नाही. संसदेत मात्र मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला चांगले घेरले आहे. त्याच विषयावरुन ''श्रीलंका अत्यंत गंभीर पेचाला सामोरा जात असून तेथील स्थितीची तुलना भारताशी करणे गैरलागू असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले'' ( संदर्भ मटा)

'देशातील काही घटक भारताची तुलना श्रीलंकेशी करत असल्याने ही सर्वपक्षीय बोलावली होती असे सरकारने म्हटले आहे' असे जे काही घटक असतील त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे सरकारने दुर्लक्ष करुन आपला सरकारचा गाडा हाकत राहावे. सध्या देशात महागाई दररोजच वाढते आहे, त्यात वाढत्या जीएसटीने भर घातली. लोकांचा सरकारवर रोष आहे. मात्र श्रीलंकेसारखे भारतीय जनता उठाव वगैरे करतील असे काही वाटत नाही, त्यामुळे सरकारने निश्चिंत राहावे असे वाटते. आपल्याकडे लोक फक्त वाट्सॅपवर रोष व्यक्त करतात. सरकारने अशा कोणत्याही घटकाला फार गांभीर्याने घेऊ नये.

आर्थिक शिस्त, जबाबदार कारभार आणि फूकटची संस्कृती हे महत्वाचे तीन धडे श्रीलंकेतील स्थितीवरुन घ्यायला हवे असेही एस. जयशंकर म्हणाले. या सरकारची या विधानावर मात्र गम्मत वाटते. आर्थित शिस्त या सरकारला नाही. अर्थव्यवस्थता ढासळत चालली आहे, असे अभ्यासकांचे म्हणने आहे. रुपयाची अवस्था वाईट आहे. तर, तिसरीकडे सरकार मतदारांना लुभावण्यासाठी हे देऊ ते देऊ असे म्हणून जनतेची फसवणूक करीत असते. गप्पा मारणारे सरकार असले तरी जनतेला हे सगळं समजायला अजून वेळ लागेल. जनतेने सरकारला धडा शिकवायची वेळ जेव्हा यायची तेव्हा येतच असते. त्यामुळे सरकारने अशा कोणत्याही घटकाकडे लक्ष न देता. आपल्या 'मन क्या बाता आणि जनतेला थापा' मारण्याचा जो कार्यक्रम आहे, त्यावरच भर द्यावा असे माझे व्यक्तीगत मत आहे. ;)

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे

बिरुटे सर

महागाई झाली महागाई झाली याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा आणि

केवळ तुमच्या लाडक्या अभ्यासकांचे मत पाहून मत प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष अर्थशास्त्र अर्थव्यवस्था वाचून घ्या.

केवळ द्वेषासाठी द्वेष करण्यापेक्षा भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा कितीतरी वेगळी का आहे हे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

रशियाच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे जगभर महागाई झाली आहे (अमेरिका रशिया जर्मनी कॅनडा ब्राझील ब्रिटन येथे झाली) त्या मानाने भारतात तेवढी का झाली नाही हेही जाणून घ्या

डॉलरच्या तुलनेत युरो, येन. युआन,ब्रिटिश पौंड जितके घसरले तितका रुपया का घसरला नाही हे जाणून घ्या.

एवढा अभ्यास झाला कि चर्चा करू

नाहीतर तुमचा चालू द्या

सुरुवातीला काही दुवे देतो आहे तेवढे पाहून घ्या

https://tradingeconomics.com/country-list/inflation-rate

>>>> महागाई झाली महागाई झाली याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा.

तोच तर सामान्य माणसाचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून फळ, भाज्या आणि दुधासह खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय. समोर येत असलेली आकडेवारी ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तसंच सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. एप्रिल महिन्याचा घाऊक महागाईचा निर्देशांक (WPI) 15.08 % राहिला. गेल्या 9 वर्षांतील हा उच्चांक आहे.

-दिलीप बिरुटे

सुक्या

डॉलराचे काय घेउन बसलाय खरे सायेब. काल आमच्या गावात एक फिरंगी बायदेन ला शिव्या घालत होता. मोदी च्या नादाला लागुन बायदेन ने पेट्रोल गॅलनाला साडे सहा डॉलर केले नी म्हागाई वाढवली म्हणुन तो मोदी ला पण शिव्या घालत होता. बरं झालं श्रीलंका मोदी च्या नादाला लागली नाही ... नाहीतर २ वर्षापुर्वीच दिवाळं निघालं असतं.

पार जगात पचका करुन ठेवलाय मोदी ने. घंटा / दिवे / नोटबंदी करुन पार वाट लावली जगाची ..

विजुभाऊ

भारताचा कधीच श्रीलम्का होणार नाही.
भारतात प्रत्यक्ष उत्पादन होते, अन्न धान्य तसेच , वाहने व इतर इंजिनीयरिम्ग उत्पादने निर्यात होतात. त्यामुळे डॉलर तसेच इतर चलने मिळतात.
भारतात रीफायनरीज आहेत, पेट्रोलीयम पदार्थ थेट डॉलर न खर्च करता वस्तु विनीमय करून मिळू शकतात.
श्रीलंका या प्रत्येक बाबतीत शून्यच आहे.