राजकारण
चालू घडामोडी -श्रीलंका अराजक
Primary tabs
आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे.
राष्ट्रपती गोताभये हे राष्ट्रपतीभवनातून पळून गेले आहेत. जनतेने राष्ट्रपतीभवनात घुसून तेथला ध्वजही उखडून टाकला आहे. तिथे जनतेचा कब्जा झालेला आहे.
जनतेने गॉल मधे चाललेले श्रीलंका ऑस्ट्रेलिया मॅचही स्टेडियम मधे घुसून बंद केली आहे.
श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात शिल्लक नाही , ( चीनच्या कृपेने). त्याना कोणी कर्जही देण्यास तयार नाही.
या गोष्टीचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे.
श्रीलम्केसारखा जवळचा देश अराजकतेचा सामना करतोय. जनता रस्त्यावर उतरलेली आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग आहे.
सनथ जयसूर्या या जनतेचे नेतृत्व करायला पुढे आलेला आहे.
परिस्थिती दर तासातासाला अधीकच वाईट होत चालली आहे
काय घेऊन बसलाय, इथे लोक डोळ्यात तेल घालून वाट बघत बसलेत भारतात पण असा व्हावं म्हणून, kazakisthan च्या धाग्यावर बघा काय मुक्ताफळ उधळलेत ती.
kazakisthan च्या धाग्यावर बघा काय मुक्ताफळ उधळलेत ती.
कृपया लिंक द्यावी
http://misalpav.com/node/49784
लेखिका डॉ. मीना प्रभू. हे वाचनालयात सापडले. आताची परिस्थिती पाहता श्रीलंका वाचणे अगत्याचे झाले.
यांची अगोदरची पर्यटनावरची पुस्तकं मला एवढी आवडली नव्हती. पण प्रकाशन २०१९, करोनाअगोदरचे पर्यटन म्हटल्यावर पाने उलटून पाहिली. (पाने २२०) भरपूर रंगीत सुस्पष्ट चित्रे बघितल्यावर लगेच घेतले. लेखिकेने गाईड घेतला होता संपूर्ण पर्यटनाला त्यामुळेच खूप छान माहिती आहे. अगदी बौद्ध काळाअगोदर बिहारमधून गेलेले आणि आता मूळ सिंहली समजले जाणारे महावंशाचे लोक ते अशोकाच्या काळातले संघमित्रा, मग चोला राजे, पोर्तुगीज, डच,ब्रिटिश, स्वातंत्र्यानंतरची सिंहली तमिळ लढाया असा सर्व इतिहास दिला आहे.
अत्यंत वाचनीय पुस्तक आहेच आणि कोरोनाबंदीने डुबीत गेलेल्या पर्यटनामुळे झालेली परिस्थिती पाहता आपण या देशाला का गेलो नाही अगोदर ही रुखरुख लागली.
फोटो खूप चांगले उत्तम आहेत.
श्रीलंकेप्रमाणे आपल्या शेजार्याची पण स्थिती अजूनच बिघडली आहे.
त्यांच्याकडे रेल्वे चालवण्यासाठी इंधन शिल्लक नाही. सामान्य लोकांना स्वयंपाकाचा गॅस मिळत नाही.
परकीय चलनाबाबत तर काही बोलायलाच नको अशी गत आहे.
पाकिस्तान अस्थिर राहणे भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे कारण मग भारतात येणारे निर्वासित वाढतील.
पाकिस्तान अस्थिर राहणेच भारताच्या दृष्टीने योग्य आहे. पाकिस्तानात स्थिरता आली की थोडा फार पैसाही येईल. तोच पैसा ते भारताविरुद्ध वापरतील. सध्या केंद्रात कणखर सरकार असणे आणि पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थिती मुळेच सीमेवर शांतता टिकूण आहे.
पाकिस्थानात श्रीलंकेसारखीच परिस्थिती केंव्हाही उद्भवेल असे वाटते
आजच समजले की इम्रान खानला एका केस मधे पूर्ण दोषी ठरवले आहे.
नवाझ शरीफ सौदीमधून परत यावेत यासाठी कायदे बदलले आहेत.
पण त्यांचेही काही खरे वाटत नाही.
पाकव्याप्त काश्मीर मधे भारत सध्या तरी अधिकृत पणे काही करेल असे वाटत नाही.
चीनला तेथून जाणार्या सीपेक हायवे ची चिंता आहे. त्यामुळे तेथे उठाव झाला तर चीनच्या मदतीने तो दडपून टाकतील असे वाटतेय.
स्मशानात वाढदिवस साजरा केला
https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/celebrating-birthdays-…
स्मशानात लोक अंत्य विधीसाठी येतात.तिथे वाढदिवस साजरे करणे कितपत योग्य. दुसरा तिथे येणारे अधिकांश व्याधीग्रस्त असतात. अंधविश्वास दूर करायला लहान मुलांना ही तिथे नेणे याचा एकच अर्थ निघतो अनिस मानसिक विकृतीने ग्रस्त संस्था आहे.
मटातील बातमी:
छान. आता रमजानच्या पवित्र महिन्यात कब्रिस्तानात आणि क्रिस्मसच्या रात्री सेमेटरीमधे मुस्लिम आणि इसाई मुलांचे औक्षण करून पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून वाढदिवस साजरा करावा ही अंनिसच्या कार्यकर्त्यांना विनंती. म्हणजे जास्त लोकांच्या मनातील नकारत्मकता बाहेर काढली जाऊन बघता बघता सगळ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल.