जनातलं, मनातलं

बाप्पाला स्वेटर

Primary tabs

पुण्यात लाडक्या बाप्पाला स्वेटर घालण्यात आले. कालच ही बातमी टीव्हीवर पाहिली होती. स्वेटर आणि कानटोपी घातलेला गंपती बाप्पा फारच क्युट दिसतोय. :)

भाग्यश्री

बापरे, किती गहजब एवढ्याश्या स्वेटर वरून.. !
पूर्वी उन्हाळ्यात चंदन लावायचे मुर्तीला, तेव्हा असा विरोध कधीच ऐकला नव्हता..! लोकर नक्कीच चंदनापेक्षा स्वस्त असेल..

मला व्यक्तिश: डॉन आणि तशी भुमिका घेणार्‍यांचे सर्व मुद्दे पटले, पण इथे नाहीत.. इथे त्याचा काहीच संबंध नाहीए असं वाटलं...
मुक्तसुनित, चित्रा यांचे प्रतिसाद पटले,आवडले..

(आणि थंडीमधे स्वेटर तर उन्हाळ्यात स्विमिंग सूट, बर्म्युडा का? किंवा सोन्याचा स्वेटर इत्यादी गोष्टी प्रामाणिकपणे बोलायचं तर हास्यास्पद वाटल्या!)

बाप्पा गोड दिसतोय.. गणपतीचे कुठलेही रूप लोभसवाणे वाटतेच..
बाकी चालूदे..
http://bhagyashreee.blogspot.com/

यशोधरा

मुक्तसुनीतजी, मी प्रथम प्रतिसाद गमतीतच लिहिला होता, त्यावर तुमच्या मापाचा स्वेटर विणू का हे लिहायची काही गरज होती असे वाटत नाही - उद्धट आणि उर्मट वाटले, म्हणून पुढचे उत्तर गेले. मघाशी जेह्वा तो प्रतिसाद आला तेहवच तुम्ही टोकायला हवे होतेत, असे वाटते. तुम्हाला व्यनि केलेला आहेच.

बट्टू

मी पण तुम्हाला अगदी गमतीतच म्हटले होते. तुमची मापे काढण्याचा माझा काहीही हेतू नव्हता. माझ्याकडून चूकिचा शब्द गेला असेल तर माफी मगतो पण तुम्ही उगीच माझ्यामागे लागला नसता तर मि तुम्हाला ऊत्तर लिहीलं नसतं आणि मला का टोकायचं, मी नवा आहे म्हणुन? तुमचा प्रतिसाद मला दिलेला चालतो. माझा चालत नाही. मला स्वप्नात वाटलं नव्हतं की आधी कळ काढून तुम्ही वर माझीच तक्रार कराल.

मुक्तसुनीत

मला यशोधरा आणि बट्टु यांचे काही प्रतिसाद उडवावे लागले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

एकलव्य

आमच्या घरी कृष्णबाप्पा स्विमिंग सूट घालतो, छान छान कंफर्टर्स ओढतो आणि टाय घालून सिंड्रेलाच्या डान्सपार्टीलाही जातो. आता स्वेटरपण घालायला लागेल.

- गदाधर एकलव्य

केदार

गणपतीला गुलाबी स्वेटर बघुन कसेसेच वाटले. निदान निळा तरी घालायचा. :) तसा बाप्पा कश्यातही गोड दिसतो पण दुध, तुपाने अभिषेक करने आणी स्वेटर घालने ह्यात फरक आहे.

न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च
एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम
समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति
शुध्दं परमात्मरुपम

निदान ह्याचा तरी विचार व्ह्यायला हवा होता.

न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च
एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम
समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति
शुध्दं परमात्मरुपम

मले काय सूदिक कळले नाय
(प्राकृत) अभिरत

दिपक

बाप्पारे
बरीच चर्चा झालेली दिसते. :)

बाप्पा सर्व मिपांकराना सु़ख आणि समृध्दी दे .

गणपती बाप्पा मोरया

वेताळ

भिकार्‍याना भिक दिली तर भिकार्‍याची संख्या कमी होईल का?त्याच्यात आर्थिक सुधारणा घडुन येईल का? किमान गणपतीला स्वेटर कसा दिसतो हे बघायला येणार्‍या वर्दळीमुळे भिकार्‍यांच्या कमाईत वाढ झाली असावी.
गणपतीबाप्पा मोरया.
वेताळ

पहाटवारा

या गणपति स्वेटर आणी समाजोद्धाराएक सान्गावेसे वाटले.
हैदराबाद जवळ असलेल्या चिल्कुर बालाजि मन्दिरामधे दर शुक्रवारि आणी शनिवारि भक्तानि खादिचे कपडे घालणे मन्दिर विश्वस्तानि जरुरि केले. त्यामागे कारण म्हणजे खादि कामागाराना काम मिळावे हा हेतु. याला म्हणतात भक्तिचा योग्य ऊपयोग.
-पहाटवारा