जनातलं, मनातलं

आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२

Primary tabs

फास्टेस्ट हाफसेंच्युरी मारत रेकार्ड ब्रेक करणार्‍या आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! ह्या धाग्याचा हा दुसरा भाग ...

मुळ धाग्यात प्रतिसादांची संख्या "५० + " झाल्याने तो वाचण्यास त्रास होत आहे.
सबब नवे लेखन ह्या धाग्यावर करावे ही विनंती. जो असे करणार नाही त्याच्या बैलाला ऑलरेडी हो ऽऽऽऽ

ह्या ही धाग्याची तीच हालत झाल्यास "भाग-३" परस्पर चालु करावा, माझी वाट पाहु नये. आमची वाट पाहणार्‍याच्या बैलाला हो ऽऽऽ

* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन हाताची खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु"च" नयेत ...
३. सर्वांनीच हलकेच घेऊन फक्त आनंद लुटावा, न आवडल्यास तसे स्पष्त सांगावे, अशी जास्त मते आल्यास मी स्वतःच हे लिखाण इथुन उडवुन लावीन ...

मारा मग बोंबा तिच्यायला ...!!!
लेट्स फन कंटिन्युज ...!!!

सहज

१५ मिनटात ५० प्रतिसाद खेचणार्‍या डान्याच्या बैलाला..............

सँडी

धाग्यावर धागे टाकुन मिपाकरंचा गळा आवळणारया लेखकांच्या बैलाला भोऽऽऽऽ

मराठी_माणूस

होळीचा पक्क्का रंग लाउन कायम आमचीच लाल म्हणणार्‍या उणेकरांच्या बैलाला होऽऽऽऽ

कुंदन

स्पेलिंग मिष्टेक ....
पुणेकरांच्या असे वाचावे का?

विजुभाऊ

उणेकर की ठाणेकर ? ;)

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

सँडी

अवजड टोमणे मारुन "ह.घ्या." म्हणनारयाच्या बैलाला भोऽऽऽऽ

विसोबा खेचर

सर्व संस्थळ चालकांच्या बैलाचा घो...!

नादान, स्त्रीलंपट तात्या अभ्यंकराच्या नानाची टांग, आबाचा ढोल अन् त्याच्या बैलाचा घो..! :)

शिमगा चालू द्या...! :)

आपला,
(शिमगाप्रेमी) तात्या.

सचिन बडवे

मिपावर येउन सगळा लेख न वाचता लगेच प्रतिक्रिया देणार्‍याच्या बैलाला हो ऽऽऽऽ

सम्द्याना होळिच्या शुभेच्या !!!

सचिन

अवलिया

हे खास मागणी वरुन

प्रेषक : कुंदन, बुध, 03/11/2009 - 14:09
राम राम नाना....
शिमग्याच्या धाग्यावर आम्हा अनिवासींची आठवण न काढल्याबद्दल तुमचा निषेध !!!!

सर्व अनिवासी भारतीयांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ
वाळवंटातील उंटावरच्या शहाण्यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽ
आणि हो, कुंदनच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

--अवलिया

कुंदनच्या उंटालापण होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
कुंदनच्या मॅनेजरच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

ल्टी किंकुंदनच्या बैलाला हो.... आबाचा ढोल.... नानाची टांग.... ऑबॉबॉबॉबॉ

बिपिन कार्यकर्ते

गणा मास्तर

लेखाचा रतीब घालणार्‍या सामंताच्या बैलाच्या नावानी भोऽऽऽऽऽऽ
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मायला, काकाच्या नावाची राहिलीच की... ही घ्या

काकाच्या नावाने... *&*&$#$&%(*)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया

सहमत :)

--अवलिया

गणा मास्तर

आमच्या गाववाल्याला कंपुबाज म्हणणार्‍यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

कुंदन

उठसुठ मंदिची भीती दाखवणार्‍या नानाच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ

---"आमच्यात पैसे मिळवण्यासाठी भाग्यांकाची वाट बघत नाहित."

मदनबाण

बाप्पाला स्वेटर घातल्यामुळे ज्याच्यां ज्याच्यां पोटात "कळ" येते त्यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

छोटा डॉन

बाप्पांना "स्वेटर" घालुन स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी लोकांना "टोप्या" घालणार्‍यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ

------
( स्वेटरफेम ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

=)) =))

लै भारी हो डानराव. टोपिवाल्यांच्या नावाने ...

अदिती
आमच्यात बोंब मारण्यासाठी शिमग्याची वाट पहात नाहीत.

घाटावरचे भट

कंपूबाजांच्या नावाने शिमगा करणार्‍या बिनकंपूवाल्या लोकांच्या बैलालाऽऽऽऽऽऽऽ

भटा.. आरं, बिनकंपूचे आसं नाय म्हनायचं... फलाटवरचे आसं म्हनायचं... आरं फलाटावरच्या लोकांनाबी डब्यात यायचि इच्चा आसते रे... फलाटावर आसतात तंवर बोंबलतात आन यकदा डब्यात घुसले की मंग हेच आतून दरूजा घट दाबून धरत्यात... ;)

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट

बरुबर हाय....डब्यात येईपतुर त्ये 'आमचा सोताचा येकल्याचा कंपू' म्हून चार्टर गाड्या चालवतात, त्ये बी फलाटावरनंच...

अवलिया

काय चाललेय रे कंपिष्टांनो!!!

--अवलिया

छोटा डॉन

अरे कंपिष्टांनो काय चालु आहे ?
दगडं खायचीत का पाध्येंकडुन ?

आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी.

आणि हो, त्या निमीत्ताने ... तुला पाध्येंच्या नावाने मारायची आहे का रे बोंब? अरे मग घाबरतोस काय? आज होळी आहे ना? मार खच्चून... ही घे...

पाध्येंच्या बैलाला...............

;)

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन

आम्हाला "जेवुन आलो" असे सांगुन कल्टी मारणार्‍या व आता पाध्यांचे नाव निघाल्याबरोबर धावत येऊन उष्ट्या हाताने प्रतिसाद टंकणार्‍या बिकांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽ

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

"जेवून येतो" असा निरोप फक्त डॉन्याला देणार्‍या बिकाच्या बैलाला ....

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

टारझन

आम्हाला "जेवुन आलो" असे सांगुन कल्टी मारणार्‍या व आता पाध्यांचे नाव निघाल्याबरोबर धावत येऊन उष्ट्या हाताने प्रतिसाद टंकणार्‍या बिकांच्या बैलाला हो

अबब .. तो शब्द बरोबर आहे ना रे भो ?

छोटा डॉन

वरातीमागुन आपले घोडे नाचवणार्‍या हलकट ब्रिटीश टिंग्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ

------
छोटा डॉन

अवलिया

उगाचच चिडुन खव बंद करणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

--अवलिया

टिंग्याने खव माझ्यामुळेच उघडली असे वाटणार्‍या प्रत्येकाच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

स्वतः 'लष्कर-ए-खरडा' उघडून स्वतःच ताटी बंद करणार्‍या टींग्याच्या बैलाला हो.......

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

घाटावरचे भट

टिंग्यानं खव बंद केल्ती ह्ये ठावं बी नसनार्‍यांच्या बैलान्लाऽऽऽऽऽऽ

अवलिया

=))

--अवलिया

घाटावरचे भट

आपल्या कंपूतली म्येंब्रं धड ठावकी नसनार्‍यांच्या अन तरीपन कंपूबाजीवं कविता करनार्‍यांच्या बैलान्लाऽऽऽऽऽऽऽऽ

शिमग्याच्या दिवशी लांबलचक लेख लिहुन स्वत:च्या बोटांची खाज शमवणार्‍या डान्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ

सँडी

फलाटावरच्या, डब्यातल्या आणि ठेसनाच्या बाहेर असलेल्या सर्वांच्या बैलाला घोऽऽऽऽऽऽऽ

अवलिया

अरे अजुन एक फार फार फार महत्वाची व्यक्ती राहुनच गेली

मिपाचे विश्वकर्मा नीलकांतच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

--अवलिया

मुक्तसुनीत

समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग ,आबाचा खुळखुळा !!!
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग ,आबाचा खुळखुळा !!!
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग ,आबाचा खुळखुळा !!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्‍याच्या बैलाला हो $$$$$$$$$$$$

समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्‍याच्या नानाची टांग

समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्‍याच्या आबाचा खुळखुळा

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

वाहीदा

बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ म्हणजे काय ??
खरच नाही माहीत ... कोणी सांगेल का ?? यासगळ्यां मध्ये बैल कोण आहे ?? अन त्याला हो का म्हणायचे ??
:?
How confusing ! :-(

या सगळ्यांमधे बैल कोणीच नाही... सगळ्यांचा बैल आहे... आणि हो म्हणजे काय माहित नाही... पण सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं... विचारच नाही करायचा, मग कन्फ्यूज नाही होणार...

बिपिन कार्यकर्ते

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

"बैल" हा एक प्राणी आहे.चराचर जगात ह्याच वास्तव्य असते.माझे तिर्थरूप सहसा मला ह्याच नावाने हाक मारतात.
शेतकर्‍याकडे गाडी हाकण्यास तसेच ईतर कामासाठी ह्याचा वापर होतो. ह्या जनावराचे खाद्य खाऊन आणखी एक जनावर भारतात रेल्वे म॑त्री झाल आहे.

हो म्हणजे होय म्हणणे,काहीजण सगळ्याच कामाला हो म्हणतात(positive attitude). हा हो जसा खो-खो खेळ्ताना "खो" उच्चारला जातो तसा "बैलाला हो"म्हणताना वापरायचा असतो.आणी असा (ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ)ला॑बवायचा असतो.

बैलाला हो म्हणजे त्या काळी सर्वाकडे एकतरी बैल असायचा(आजकाल आपणच बैल झालो आहोत,ओझ्याचे) आणी त्यावरुन बहुधा ही शिवी(वर्षभराच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी ) असावी.

सुहास बैलोबा

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

सुक्या

आयला . . सगळे जन येउन गेले की. च्यायला एवढी चढवायला नको होती. माझ्या ह्या बोंबा . .

ऐन होळीच्या दिवशी आमच्या खांद्यावर प्रोजेक्ट चे ओझे देउन हवाईला मजा करायाला गेलेल्या मॅनेजर च्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ

सुक्या (बोंबील)
सध्या आम्ही चंद्रावर आहोत.

मराठमोळा

बैलं थकली आता..
मला एक कळत नाही फक्त बैलच का? गाईंच काय? गाई झोपल्यात वाटतं

मराठमोळा.
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नाच्यापधिष्टति!!

चेतन माने

चांगल्या बोंबा चालू असताना मधेच बैल म्हणजे काय विचारणाऱ्यानच्या बैलाला हो sssssssssss

चेतन माने

मस्त पाककृतीचे फोटू न टाकणाऱ्या आणि टाकणाऱ्यानच्या बैलाला हो ssssssssssss

बॅटमॅन

आभाळातनं पडला चाकू,

कोण बोंबलत नै *&& डाकू!!!!

मिपा, मिपाकर्स अन समस्त मराठी आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!!

बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!

अभ्या..

आभाळातनं पडलं हेलीकॉप्टर,

कोण बोंबलत नै *&& डॉक्टर!!!!

मिपा, मिपाकर्स अन समस्त आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!!

बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!

बॅटमॅन

अस्सल मिरजेची कविता हो ही ;) एकच नंबर!!!!

(होळीला गल्लीत शिव्यांचे इफ-एल्स प्रोग्रॅम रन केलेला) बॅटमॅन.

अभ्या..

बॅट्या अजून एक :)
जिलबी चौकात वाजली तुतारी, न बोंबलणार्‍याची .......................................
पुढचे सार्वजनिक ड्वायलॉग माहीती हायत नव्हं?

अभ्या..

ते ना?
ते म्हण्जे न बॉबलणार्‍याच्या दारासमोर मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह असे आहे. :)
यमक वगैरे जुळवत बसलो तर संपादक लोकं होळीचा टैम संपला म्हणून प्रतिसाद ऊडवतील :(

बॅटमॅन

=)) हा बे, गल्लीवाईज थोडे थोडे बदलतात इतकंच. पण मूळ थीम तीच ;)

मिसळपाव चालू झालं का नाही हे पाहण्यासाठी सारखं पानावर रिफ्रेश मारणार्‍याच्या बैलाला हो....!!
मिपावर काय चालू आहे, वाकू वाकू पाहणार्‍याच्या बैलाला हो.....!!!
२१ बहुउपयोगी संकेतस्थळे - (ई-पुस्तक) असे शिर्षक टाकून धाग्यात कैच न लिहिणार्‍याच्या बैलाला हो....!!!
मिपा मालक,संपादक, सल्लागार, तंत्रज्ञ आणि समस्त मिपाकरांच्या बैलाला हो...

-दिलीप बिरुटे

पैसा

+१००
फक्त धागे भरकटवण्यासाठी मिपावर येणारे आणि मराठी येत असताना मुद्दाम अर्धे इंग्रजी लिहिणारे हुच्चभ्रू हे राहिले की वो!

अभ्या..

पटली नाही की डूआयडी म्हणून बोंबलणार्‍याच्या बैलाला हो SSSSSSSSS

गणामास्तर

डूआयडी म्हणलं की मिरची लागणार्‍यांच्या बैलाला हो SSS

मिपावरच्या समस्त म्हैलांच्या बैलाला हो........
स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती, आधूनिक स्त्री, पारंपरिक स्त्री, अमूक स्त्री आणि धमूक स्त्री, विनाकारण स्त्रीच्या नावानं शंखध्वनी करणार्‍याच्या बैलाला हो....
आम्हाला बै काय लिहावं कै समजतच नै असे म्हणून वाचनमात्र राहणार्‍या स्त्रीयांच्या बैलाला हो...

-दिलीप बिरुटे

शिद

आजच्या दिवशी Project Demo मिटींग ठेवण्यार्‍या क्लाईंट मॅनेजरच्या बैलाला हो....ऽऽऽऽऽऽऽऽऽ

होळी रे होळी...पुरणाची पोळी,
साहेबाच्या xxवर बंदुकीची गोळी.

अद्द्या

उद्याच्या सुट्टी साठी . . बेंगलोर हून परमिशन घ्यायला लावणाऱ्या येड्या म्यानेज्मेंत च्या बैलाला . . . .बो बो बोबो बो बो ब्बोब

अद्द्या

कधीच रंग न खेळणाऱ्या मला . .
मागून गोड हाक मारून एकदम रंग फासणाऱ्या "मुलगी" कलीग च. . . . .

सव्यसाची

सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..! पाण्याचा अपव्यय टाळत रंगीबेरंगी होळी सर्वानी साजरी करुया!

प्यारे१

पाणी न वापरता होळी खेळा म्हणणारांच्या नि नंतर रंग धुवायला काय वापरु यावर उत्तर न देणारांच्या बैलाला...... होहोहोहोहोहोहो

सनातनच्या संस्थळावरच असले विनोद सापडतील अशी अपेक्षा होती, आणि अहो आश्चर्य, पूर्ण झाली. हे घ्या, पूर्ण संदर्भ आणि पूर्ण विनोद. त्या चित्रातही क्रेडीट कोणाच्या नावे तर सौ. योया वाले ... मुक्काम युरोप! हे असले लोकं असल्यावर वेगळी टिंगल कशी करायची?

काही काही परिच्छेद 'एक्स्ट्रॉ' विनोदी आहेत, उदा:
हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्‍न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्‍या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्‍या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्‍न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्‍न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’

शास्त्रीय परिभाषा वापरण्याचा प्रयत्न करून उगाच आपण काहीतरी वैज्ञानिक महत्त्वाचं लिहीतो आहोत असा आव आणणं भारतातलं ओरिगिनल आहे का क्रिएशनिस्ट लोकांकडून, अमेरिकेतूनच ही कल्पना ढापलेली असावी?

आदूबाळ

अजून एक असामान्य लेख.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्तुत लेख हा प्रत्यक्ष ईश्वराने* लिहिलेला आहे. तशी स्वाक्षरी त्याने केलेली आहे.

ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २२.३.२००६, दुपारी ५ ते ५.३०)

*"ओरिजिनल, इमिटेसन नाय"

विकास

लेखाच्या उजव्या बाजूस त्या संस्थळाच्या पहीला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. वास्तवीक हे संस्थळ नक्कीच एकावर्षापेक्षा जास्त काळ चालू आहे.

असामान्य लेखाचा दुवा देणार्‍या आदुबाळाचा आणि स्वर्गलोकाच्या रंगपंचमीच्या बैलाला हो.... =))
हसुन हसुन मरतंय सकाळी सकाळी आज.

-दिलीप बिरुटे

विकास

मला वाटले होते की हा केव्ळ चेपूवरील विनोद होता! आता नुसते बोंबा मागण्यामागील शास्त्रच समजले नाही तर वाले यांच्या सौभाग्यवतींचे नाव योया आहे हे देखील समजले!

पैसा

मी गेली ३ वर्षे हा उच्च कोटीचा आध्यात्मिक आनंद अनुभवत आहे. बसमधे रोज भेटणार्‍या एका मैत्रिणीने दै. सनातन प्रभात ची वर्गणी वसूल केली तेव्हापासून ते साप्ताहिक आमच्याकडे येते. सगळे अंक वाचू शकले नाही पण अशा प्रकारच्या "अनुभवांनी" भरलेला मजकूर भरपूर असतो.

* योग्य पद्धतीने' बोंब मारायचे चित्र डकवून मरायची वेळ आणनार्‍या श्री विकासरावांच्या बैलाला हो.
* आमचं नाव घेतल्याशिवाय ज्यांच्या लेखनीला धार चढतच नाही आणि मिपाशिवाय करमत नसूनही जालोजाल भटकणार्‍या आमच्या परंप्रिय जालमित्र रावसाहेबांच्या बैलाला हो....
* वसाड गावचं वाटोळ करणार्‍यांच्या बैलाला हो....
* लेखन सन्यास घेतलेल्या घाटपांडे काकांच्या बैलाला हो.....
* सहजराव-सर्किट-केशवसुमार-जिंदादिल गुंडोपंताच्या बैलाला हो...
* बेसनलाडू, धम्मकलाडू-तेलपाडू यांच्या बैलाला हो....
* गुजरातचं सिंगापूर करुन दाखवीन असा विडा उचलणार्‍या परिकथेतील राजकुमाराच्या बैलाला हो....

च्यामारी अजून कोण राह्यलं.

-दिलीप बिरुटे

विकास

च्यामारी अजून कोण राह्यलं.

प्रा डॉ? ;)

मारा की बोंब. पण, बोंब मारतांना चैतन्याचा प्रवाह, नादाचे वलय, शक्तीचे कण, ध्वनीचे तरंग, आणि कशाकशाचे जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण झाले पाहिजे, इतकं किमान बोंबेत अपेक्षित आहे. :)

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा

म्हणजे बोंबलणार्‍याची आध्यात्मिक बैठक पक्की हवी!

एऽऽ...कोण है रे तिकडे? आमच्या नान्याला सांगावा धाडा रे लवकर! त्याला म्हणावं, प्राडाँना औंदाच्या होळीला बोंबेत अस्सल आध्यात्मिक इफेक्ट पायजे. असशील तसा निघून ये... पोरंसोरं कवाची होळीची पार शेकोटी करुन बसल्यात!
काय एक जरा मर्दावानी दण्णका हुन जावद्या तिच्यायला!!!!

नाना चेंगट

प्राध्यापकांना राहिलेली थकबाकी दिली की फोर्टीप्लस पेक्षा जास्त ताकदीचा आध्यात्मिक अनुभव येईल.

कोण आहे रे तिकडे च्यामारी शिमग्याच्या निमित्ताने देऊन टाका बरं थकबाकी :)

प्रा डॉ कसे आहात? पेपर किती झाले तपासून? ;)

जखमेवर मीठ चोळणा-या नाना चेंगट आणि कुंदनच्या बैलाला हो..SSS
रात्रंदिवस काबाडकष्ट करायला लावणा-या कुंदनच्या म्यानेजरच्या बैलाला हो...SSS

छोटा डॉनच्या धाग्यात आम्ही एवढी भर घातली साधं कौतुक तर सोडा ढुंकुनही न पाहणार्‍या चोता डॉनच्या बैलाला हो...SSS

-दिलीप बिरुटे

तुम्हा स र्वा च्या बैलाला हो,..,.असो, पीचकारी ने होळी खेळ्ळा त ?