जनातलं, मनातलं

आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२

Primary tabs

फास्टेस्ट हाफसेंच्युरी मारत रेकार्ड ब्रेक करणार्‍या आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! ह्या धाग्याचा हा दुसरा भाग ...

मुळ धाग्यात प्रतिसादांची संख्या "५० + " झाल्याने तो वाचण्यास त्रास होत आहे.
सबब नवे लेखन ह्या धाग्यावर करावे ही विनंती. जो असे करणार नाही त्याच्या बैलाला ऑलरेडी हो ऽऽऽऽ

ह्या ही धाग्याची तीच हालत झाल्यास "भाग-३" परस्पर चालु करावा, माझी वाट पाहु नये. आमची वाट पाहणार्‍याच्या बैलाला हो ऽऽऽ

* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन हाताची खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु"च" नयेत ...
३. सर्वांनीच हलकेच घेऊन फक्त आनंद लुटावा, न आवडल्यास तसे स्पष्त सांगावे, अशी जास्त मते आल्यास मी स्वतःच हे लिखाण इथुन उडवुन लावीन ...

मारा मग बोंबा तिच्यायला ...!!!
लेट्स फन कंटिन्युज ...!!!

अभ्या..

मिपावर चांगल्या चांगल्या कविता टाकून मानसिक छळ करणार्‍या मिकाच्या बैलाला हो SSSSSS
घरात दारु आणि चावडीत चहा पिणार्‍या सोत्रीनाच्या बैलाला हो SSSSSS

जेपी

अजुन ट्रॉय सिरीज पुर्ण न करणार्या बॅटमॅनच्या बैलाsssलाssss..हो..sss,
सगळ इस्कटुन सांगव लागणार्या टकाच्या नानानी टांsssगsss...,
समस्त कंपुबाजांच्या आबाचा ढोssssलsss..... =))