Skip to main content

रोझ अँपल जॅम -जाम फळाचा जॅम

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 07/07/2026 14:01 या दिवशी प्रकाशित केले.

एक मिनिट हे टोमॅटो नाही...तर आहेत Rose Apple...
खरंतर ही उन्हातळी फळ आहेत. मी ही पाककृती 15-20 दिवसांपूर्वी केलेली आहे😅
नक्की वाचा. व्हिडिओ स्वतंत्रपणे पोस्ट करते.

घराच्या जवळ सापडलेल्या रोज ॲपलपासून बनवलेलं स्वादिष्ट जॅम!🍎✨

उजनी धरणातिल प्राचीन श्रीराम आणि शिवमंदीर

लेखक अनुप कोहळे यांनी मंगळवार, 07/07/2026 10:45 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार,

 

बारामती तालुक्यातील उजनी धरणात गेलेले एक गांव आणि त्यातील १००० व्या शतकातील प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पळसदेव गांव. दर वर्षी उन्हाळ्यात जेंव्हा धरणातील पाणी कमी होते, तेंव्हा हे मंदिर पाण्याच्या बाहेर येते. ते बघायला बरेच पर्यटक आणि हौशी छायाचित्रकार तेथे गर्दी करतात. बऱ्याच दिवसांपासून हे मंदिर बघण्याची आणि त्याचे छायाचित्र घेण्याची इच्छा  माझ्या मनात होती. परंतु काही  केल्या मुहूर्त सापडत नव्हता. 

'पारदर्शक' पावत्या आणि बुडालेला हिशोब!

लेखक अनिशासूत यांनी मंगळवार, 07/07/2026 10:30 या दिवशी प्रकाशित केले.

काही दिवसांपूर्वी 'अशी ही बनवाबनवी' मधल्या त्या ७० रुपयांच्या हिशोबावरून सोशल मीडियावर खूप गप्पा रंगल्या. तेव्हा धनंजय माने अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणाला होता की ७० रुपये वारले! पण आजकालच्या डिजिटल आणि अत्यंत 'संस्कारी' युगात हिशोबाचे आकडे आणि स्वतःच्या फायद्यासाठी बदलली जाणारी श्रद्धेची व्याख्या पाहिली, की जाणवतं की आता फक्त ७० किंवा ३७० रुपये नाही, तर थेट कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा जाहीर लिलाव मांडला गेला आहे. अयोध्या प्रभू रामचंद्रांच्या नावाने जमा झालेल्या दानपेटीतील ज्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे, ते निव्वळ धक्कादायक नसून डोळ्यात अंजन घालणारे आहे.

सहली/ पर्यटन- दिखावा, मनस्ताप कि मन:शांती

लेखक रणजित पारेकर यांनी सोमवार, 06/07/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.

आजकाल सोशल मीडियावर पर्यटनाचे, कौटुंबिक सहलीचे, मित्रांच्या मौजमजेचे फोटो/ व्हिडिओ यांचा भडीमार होत असतांना दिसतो. दैनंदिन धावपळीच्या आयुष्यामुळे येणारा मानसिक ताण सहलीमुळे  दूर होतो. निसर्गाच्या सानिध्यात किंवा नवीन ठिकाणी वेळ घालवल्याने मनाला शांतता लाभते. प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेले  जास्त काळ लक्षात राहते म्हणूनच, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी वेळोवेळी पर्यटन सहलींचे आयोजन केले पाहिजे. नात्यांमधील गोडवा कायम राहण्यासाठी, इतिहासाची उजळणी करण्यासाठी, नवनवीन खाद्यसंस्कृती व परंपरा जाणुन घेण्यासाठी पर्यटन आवश्यक आहे.

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन

लेखक नयना माबदी यांनी रविवार, 05/07/2026 18:01 या दिवशी प्रकाशित केले.

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन 

२२ जानेवारी - बुधवार
सकाळी ८ वाजता गाडी येणार होती. त्यामुळे आम्ही पहाटेच ५:३० वाजता उठलो. सर्वांना फोन करून उठवण्याची जबाबदारी पार पाडली आणि सकाळची लगबग सुरू झाली. कालच बहुतेक सामान आवरून ठेवले असल्याने तयारी पटकन झाली. थंडगार सकाळ, प्रवासाची उत्सुकता आणि आजचा भरगच्च कार्यक्रम यामुळे सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह होता. आम्ही सर्वजण ७:१५ पर्यंत तयार झालो.

"मुखवट्यांच्या मागे हरवलेली माणसं"

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 05/07/2026 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
जगात जगण्यासाठी आपल्याला मुखवटा घालावाच लागतो. हा मुखवटा म्हणजे फसवणूक नाही, तर एक सामाजिक गरज आहे. मुखवटा आत्मसंरक्षणाची कवच-कुंडले आहेत. रंगमंचावर आणि सिनेमात काम करणारे कलाकार तर रोजच वेगवेगळे मुखवटे घालतात—कधी राजा, कधी भिकारी, कधी खलनायक, कधी देवता. पण हे मुखवटे केवळ अभिनयापुरते मर्यादित नाहीत. खऱ्या आयुष्यातही प्रत्येकजण मुखवटे घालून अभिनय करत असतो.

मांजरे येती रॉयल घरा.. 😺

लेखक साहित्ययात्री यांनी गुरुवार, 02/07/2026 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

मांजरे येती रॉयल घरा...🐱

 

असेच एकदा टाईमपास म्हणून ब्रिटिश न्यूज चॅनेल्स पाहत होतो. आपल्या सुनक साहेबांचे भाषण होणार होतं.  10 डाउनिंग दरवाजा उघडला आणि कॅमेराचा एकदम चकचकाट टीव्हीवर पाहायला मिळाला. पण मग नीट बघितलं तर ब्रिटनचे पंतप्रधान नाही,एक गुबगुबीत मांजर बाहेर आले होते. 

10 डाउनिंग स्ट्रीट मध्ये मांजर?? ते पण असे भटके दिसणारे??? 
आपल्याकडे दर दाराआड काठी तय्यार ठेवलेली घरे अजूनही पाहायला मिळतात. वाजले म्याव की हाण काठी!