Skip to main content

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 23/07/2026 06:56 या दिवशी प्रकाशित केले.

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर  लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने  केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु  केले  आहे.

लाठीहल्ल्याच्या संदर्भात माझा एकच मुद्दा आहे.

लेखक सुमितस्वरुप यांनी बुधवार, 22/07/2026 19:36 या दिवशी प्रकाशित केले.


---

**लाठीहल्ल्याच्या संदर्भात माझा एकच मुद्दा आहे.**

पोलीसांकडून झालेला लाठीहल्ला कुणालाही आनंद देणारी गोष्ट नाही. अनावश्यक किंवा अमानुष बळाचा वापर योग्य ठरू शकत नाही. मात्र, **घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.**

हा प्रकार **जंतर-मंतरवरील शांत आंदोलनात झाला नव्हता.**
घटना संसद परिसरातील **बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न** झाल्यानंतर घडली. संसद परिसर हा देशातील अतिसंवेदनशील आणि उच्च सुरक्षा असलेला भाग आहे. अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणांना कोणताही धोका वाटल्यास, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना कारवाई करावीच लागते.

पापा हिन्दि कविता

लेखक तृप्ति २३ यांनी मंगळवार, 21/07/2026 23:26 या दिवशी प्रकाशित केले.

पापा जो दिल की बात कभी कहते नहीं है
पापा जो मुश्किलों में भी कभी हारते नहीं है

पापा जो कभी किसी चीज के लिए ना कहते नहीं है
पापा कितने भी परेशान क्यों ना हो दिखाते नहीं है

यह तो पापा ही होते हैं जो खुद के लिए कभी जीते ही  नहीं है
यह तो पापा ही कर सकते हैं जो अपने घर को खुशियां दिए बिना कभी सोते नहीं हैं।

 

https://truptiskavita.com/papa-par-bhavuk-kavita/

धर्म, देश आणि सोयीची व्याख्या!

लेखक अनिशासूत यांनी रविवार, 19/07/2026 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

​आज सोशल मीडिया स्क्रोल करताना एका व्हिडिओवर काही कमेंट्स वाचल्या आणि डोके भणभणून गेले. देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्काच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या मागण्यांना थेट 'देशविरोधी' किंवा 'धर्मविरोधी' ठरवण्याचा एक नवा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. अशाच एका कमेंटमध्ये कुणीतरी लिहिले होते, "हा आमच्या देश आणि धर्माच्या विरोधात जाणारा आहे, त्यामुळे आमचा अजिबात पाठिंबा नाही." ​हे वाचून मला पडलेला प्रश्न अगदी साधा आहे, भावांनो, तुमचा 'धर्म' आणि 'देश' म्हणजे नेमकं काय रे? ​हा प्रश्न पडण्यामागे माझी एक जुनी आठवण आहे.

पॉश अँड चिक आणि मी

लेखक amitrkale यांनी शनिवार, 18/07/2026 22:09 या दिवशी प्रकाशित केले.

हेअर कटिंग सलून मध्ये जाऊन केस कापून येणे हे माझे अत्यंत आवडते काम आहे. एखाद्या रविवारी निवांत उठून सावकाश अप्पाच्या "स्टाईल हेअर कटिंग सलून" मध्ये जाऊन बसावे. टीव्ही वर लावलेली निर्थथक गाणी पाहावी किंवा व्हाट्सअँप वर ज्ञानवर्धक माहिती वाचावी. आपला नंबर आला की आपले डोके अप्पाच्या हाती देऊन टाईमपास गप्पा माराव्या आणि हेड मसाज घेऊन डुलत डुलत घरी यावे हा माझा आवडता उद्योग आहे. 

आषाढस्य प्रथम दिवसे ... महाकवी कालिदास दिवस

लेखक साहना यांनी शुक्रवार, 17/07/2026 13:56 या दिवशी प्रकाशित केले.

 

महाकवी कालिदास ह्यांची जयंती हल्लीच झाली ( आषाढ कृष्ण प्रतिपदा) त्या निमित्ताने काही हलके फुलके.

भारतीय समाजाने मागील काही हजार वर्षांत जे काही कमावले आहे त्यांत भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृत भाषा (आणि त्यातील साहित्य/रचना) इत्यादी द्वितीय क्रमांकावर आहेत. प्रथम क्रमांकावर वेदांत. भारताची सद्य अधोगती पाहता ह्या गोष्टी ह्याच समाजातून निर्माण झाल्या आहेत का असा निराशात्मक विचार मनात येतो पण त्याच वेळी ज्या हिरीरीने आणि वृत्तीने ह्याच समाजाने वेदांत, संस्कृत आणि शास्त्रीय संगीत जिवंत आणि काही अर्थाने वाढीस सुद्धा लावले आहे त्यातून एक सकारात्मक आशा सुद्धा वाटते.