Skip to main content

इतकेच मला जाताना - विडंबन काव्य

लेखक साहना यांनी शुक्रवार, 07/08/2026 04:54 या दिवशी प्रकाशित केले.

इतकेच मला जाताना शाखेवर  कळले होते-
गोबीने  केली सुटका नेहरुने छळले होते !

 

केलेल्या चुकांचा हिशेब गडे विसरूया,
पाऊल कधी गोबीचे चुकीचे पडले  होते?


तू ऐकवली आता मज तुझीच वेगळी कहाणी..
SIR मधून नाव तुझे मीच वगळले होते !


याचेच रडू आले की जमले न जास्त काही-
मी पोस्ट गोबीच्या स्तुतीचे फॉर्वर्डेड ऍज रिसिव्हड केले होते


मते गोबीला मागायला मी वार्‍यावर वणवण केली-
दार माझे  स्वतःचे आधीच निखळले होते !


शत्रूचे लोक आज पार्टीत सहजी मंत्री होत गेले 
कालचेच लोक आजही सतरंजी उचलत होते !

 

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ - भाग १

लेखक एक_वात्रट यांनी गुरुवार, 06/08/2026 23:20 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. किंबहुना अगदी कालपरवापर्यंत, भारत म्हणजे आग्र्याचा ताजमहाल आणि वाराणसीतले गंगेचे घाट हे समीकरण परदेशी लोकांच्या मनात अगदी पक्के होते. संपूर्ण भारतात अनेक सहली झाल्या असल्या तरी आम्ही अजून उत्तर प्रदेश पाहिला नव्हता. नाही म्हणायला मी उत्तराखंडमध्ये 'फुलों की घाटी' अर्थात 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहायला गेलो असताना येताना आग्र्यात थांबलो होतो आणि ताजमहाल, फतेपुर सिक्री आणि आग्र्यातील इतर सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहिली होती.

मेहफिलीत सुरांच्या, सूर चोरिले मी

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 06/08/2026 21:30 या दिवशी प्रकाशित केले.

मेहफिलीत सुरांच्या, सूर चोरिले मी
येत नव्हते गाता, तरी छेडिले मी
ऎदीत त्या सुरांचा , ठेक्यात घात केला
स्वप्नातल्या कलेचा , गर्भात पात झाला

स्वप्नात देखीले मज , सुरांशी खेळताना
सत्यात झुंजलो मी, सुरांना चोरताना
कंठात माल भरला, तरी ना ताल धरला
मालकंस छेडता , कंठाशी प्राण आला

रदीफ काफिल्याने भलेही धुंद झालो
मेहफिलीत सुरांच्या पुन्हा पुन्हा नहालो
जखम त्या ज्वराची जरी खोल आहे
अजूनही गळ्याला सुरांची ओढ आहे

काव्यरस

रात दाटली दाटली

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 06/08/2026 11:10 या दिवशी प्रकाशित केले.


रात दाटली दाटली 
उरी भावना कल्लोळ 
एका दिव्याचा उजेड 
लिही प्रकाशाची ओळ.

सारा अंधार अंधार 
मनी एक आठवण 
जरा उसवी अंधार 
असं नभात चांदणं.

कोण झुरे अंधारात 
कोण आठवितो कुणा 
काळोखाच्या वाटेवरी 
शोधी पावलांच्या खुणा.

काढी का ही रात अशी 
काळजाला उकरून 
चांदण्यांच्या सोबतीनं 
येई तुझी आठवण. 

काव्यरस

केशर

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 06/08/2026 09:33 या दिवशी प्रकाशित केले.

मावळतीवर / केशर सांडते
तेव्हा झंकारते / आत काही

आत खोलवर / झंकारते तेव्हा
कोंडला पारवा / फडफडे

पारवा तोडतो / स्थळ-काळ पाश
घेतो अवकाश / पंखावर

पंखावर त्याच्या / झुले मुक्तछंद
अनाहत नाद / रोमरोमी

कल्लोळ उठती / रोमरोमी कैसे
केशर हे पिसे / लावतसे

झेपावे पारवा / मावळतीपार
सांडले केशर / काळवंडे

झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली

लेखक गामा पैलवान यांनी गुरुवार, 06/08/2026 01:08 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

झुरळ्या पक्षाने नव्या दिल्लीत जंतरमंतरवर नुकत्याच जुलै अखेरीस केलेल्या आंदोलनाच्या मागील शक्ती कशा प्रकारे काम करतात यांविषयी दोन चलचित्रे पाहण्यात आली. म्हंटलं की यावर एक स्वतंत्र लेखंच लिहायला हवा. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असलं तरी त्यांत इतर अवांछित शक्ती घुसल्या आहेत. हे वेगळे सांगणे नलगे. मात्र या शक्ती नेमक्या कशा काम करतात यावर स्वाती तोरसेकरांनी बराच प्रकाशझोत टाकला आहे. त्यात माझी अधिकची माहिती मिळवून लेख लिहिला आहे. तर मुद्द्यांकडे वळूया.