Skip to main content

तुर्कस्थानातील अलेवी समुदाय आणि तुर्कस्थानचे बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण

लेखक माहितगार यांनी रविवार, 09/08/2026 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

अलेवी समुदाय आणि त्यांच्या परंपरा (परिचय)


अलेवी हा तुर्कस्थानातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याक समुदाय आहे, जो एकूण लोकसंख्येच्या साधारणपणे १०% ते १५% आहे. अलेवी पंथ हा इस्लामच्या सुफी आणि शिया विचारसरणीचा एक अनोखा मिलाफ आहे. ते प्रेषित मोहम्मद, त्यांचे जावई हजरत अली आणि त्यांच्या वंशजांना (१२ इमाम) अत्यंत पवित्र मानतात. मात्र, त्यांची जीवनपद्धती आणि धार्मिक आचरण पारंपरिक सुन्नी इस्लामपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

पुरस्कारांचा बाजार : सन्मान की प्रसिद्धीचा सौदा?

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 09/08/2026 11:28 या दिवशी प्रकाशित केले.

आजच्या सोशल मीडिया युगात एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे पुरस्कारांची लांबलचक यादी दिसली की त्यांच्याबद्दल आपोआप आदराची भावना निर्माण होते. “राष्ट्रीय पुरस्कार विजेते”, “आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त”, “जागतिक स्तरावरील सन्मान”, “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार”, “राष्ट्रीय क्रीडा शिक्षक पुरस्कार”, “राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार”, “राष्ट्रीय डॉक्टर पुरस्कार”, “ग्लोबल आयकॉन अवॉर्ड”, “इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड” अशी बिरुदे आता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

भारतातील विमा व्यवसाय आणि ग्राहक

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/08/2026 07:02 या दिवशी प्रकाशित केले.

भारतातील विमा उद्योग प्रामाणिक नाही. क्लेम पास होईलच अन किती होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रिमीअम भरूनही पैसे मिळतील की नाही अन किती याची काळजी असते.


माझी सुरुवातीची अठरा वर्षांपासूनचा आरोग्य विमा होता.
कोरोनात त्याच कंपनीचा दुसरा अधिकचा विमा प्रत्येकाचा वेगळा  कोरोना कवच नावाचा घेतला. कुटूंबात कोरोना झाला झाल्यानंतर, दावा टाकला तरी देखील मिळत नव्हता. विमा कंपनीच्या कार्यालयात आकांडतांडव केले तेव्हा काय ते १२ हजार की काय दोन जणांचे मिळाले.

चार चारोळ्या

लेखक माहितगार यांनी शनिवार, 08/08/2026 20:28 या दिवशी प्रकाशित केले.

 जेमिनीसाहाय्य कृत  चार चारोळ्या


 १. आयटी सेल आणि ट्रोल आर्मीसाठी (The IT Cell Special)
 

पक्षाचा अजेंडा चालवून, हा रोज रोज ओरडतो,
विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला, अंधपणे तोडतो.
'तो अंधभक्त' म्हणताना, हा स्वतःची विवेकबुद्धी गहाण ठेवतो,
एका बोटाच्या नादात हा, तिप्पट आंधळा होऊन मिरवतो!


२. पक्षबदलू नेते आणि कार्यकर्त्यांवर (The Party-Hoppers)
 

जाग

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 08/08/2026 16:48 या दिवशी प्रकाशित केले.

उन्हाळ्यातल्या एका दुपारी पळस आणि गुलमोहर भेटतात. गुलमोहराला असंख्य बारीक बारीक पाने तर पळसाला मोठ्ठी तीन तीन पाने. गुलमोहर शीतल लाल रंगाने न्हाऊन निघालेला आणि पळस... आहा.. आग पेटताना निमिषार्धापुरतीच होते तसा तप्त लाल रंग. हालहवाल विचारून झाले की झाडे एकमेकांची गळाभेट घेतात. गुलमोहराच्या इवल्याश्या पानांनी गुदगुल्या होऊन पळसाची मोठी पाने अवखळ हसतात. दुरूनच चंद्रकोर दोन्हीकडच्या लाल छटा एकत्रित पाहत स्वतःचे अंतःकरण तृप्त करत होती. तिथून परावर्तित होणाऱ्या तेजाने क्षणापुरते सूर्याचेही डोळे दिपले. झाडांनी कान टवकारले. धून ओळखीची होती. झाडे वेगळी होऊन आवाजाच्या दिशेकडे डोळे लावून बसली.

काव्यरस

अथांग पाण्याचा ताबा

लेखक निनाद यांनी शनिवार, 08/08/2026 12:32 या दिवशी प्रकाशित केले.

समुद्राच्या अथांग पाण्याचा ताबा जगातील कोणत्याही एका देशाकडे नाही !

'हाय सीज' म्हणजेच आंतरराष्ट्रीय सागराच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्राने एक अत्यंत ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. यालाच 'हाय सीज बायोडायव्हर्सिटी ट्रीटी' किंवा 'BBNJ करार' असं म्हटलं जात असून तो काही प्रमाणात अधिकृतपणे लागू झाला आहे. (अधिक माहिती येथे पहा)

कर्वेतले दिवस ३: परीक्षेच्या पूर्वसंध्येला हॉस्टेलवरची तणावपूर्ण शांतता

लेखक मार्गी यांनी शनिवार, 08/08/2026 08:45 या दिवशी प्रकाशित केले.

✪ अवघड विषय- केस वर्क, रिसर्च मेथडोलॉजी आणि पब्लिक हेल्थ 

✪ इतना अच्छा मौसम है और इन बीमारियों के अलावा... 

✪ असे शिक्षक मिळायला नशीब पाहिजे! 

✪ "हे लक्षात ठेवायचंय!" 

✪ अर्ध्या- कच्च्या गुणांना मिळणारं उत्तेजन 

✪ वस्तीमधलं फिल्ड वर्क, रिपोर्ट लिहीणं आणि फॅकल्टीजसोबतच्या कॉन्फरन्सेस 

✪ परीक्षेच्या आधी नोटस आणि झेरॉक्सला असलेली मागणी! 

पाकिस्तान सौदी तुरकी संरक्षण करार आणि भारत

लेखक रात्रीचे चांदणे यांनी शुक्रवार, 07/08/2026 20:46 या दिवशी प्रकाशित केले.

आज पाकिस्तान, तुर्की आणि सौदी यांच्यात संरक्षण करार झाला. झालेल्या नव्या संरक्षण करारामुळे आशिया आणि मध्यपूर्वेतील सामरिक समीकरणांमध्ये नवीन घडामोडी घडू शकतात. या कराराचा उद्देश संरक्षण सहकार्य, संयुक्त लष्करी सराव, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणे हा आहे. तसेच, या तीनपैकी एका देशावर हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. भविष्यात या कराराचा विस्तार नक्कीच होऊ शकतो.

या करारामुळे भारतासमोर काही नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.