Skip to main content

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : कटरा आगमन व पटनीटॉप

लेखक नयना माबदी यांनी बुधवार, 29/07/2026 22:08 या दिवशी प्रकाशित केले.

२३ जानेवारी – गुरुवार – कटरा आगमन

आज पहाटे सुमारे ५:३० वाजता आमची गाडी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली. गाडीतून उतरून सर्व सामानासह आम्ही स्टेशनवर आलो. बाहेर पडताच कडाक्याच्या थंडीची जाणीव झाली. संपूर्ण प्रवास वातानुकूलित डब्यातून झाल्यामुळे बाहेरचे वास्तविक तापमान किती कमी आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, जॅकेट, मफलर आणि टोपी घालून आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो.

कर्वेतले दिवस १: दोन वर्षांची रोमांचक सुरूवात!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 29/07/2026 15:45 या दिवशी प्रकाशित केले.

✪ "कर्वे समाज सेवा संस्था"- Karve "way of life" 

✪ २० वर्षांपूर्वीचा तो जुलैमधला एक दिवस 

✪ अध्ययन, शिक्षण आणि सहजीवनाचं वेगळं पर्व 

✪ हॉस्टेलचे मित्र आणि सोबत शिकणार्‍या व शिकवणार्‍या मैत्रिणी 

✪ फॅकल्टीज, त्यांचा दरारा आणि त्यांची शिकवण 

✪ अनेक प्रकारे पडणारे पैलू 

माझे नाव कुठे कुठे अन् कसे माळले नक्की?

लेखक आगाऊ म्हादया यांनी बुधवार, 29/07/2026 11:03 या दिवशी प्रकाशित केले.

रदिफ,काफिया, गझल ह्यातुनी कशावर भाळले नक्की?
रुपाला की तिच्या घाटाला, मी काय चाळले नक्की?

कविता माझ्या, लेखही माझे, अन अस्फुट काही उरलेले
सारे तुला जर पाठच होते, काय जाळले नक्की?

गोठलेला स्पर्श तिचा तो अजून खांद्यावरती आहे,
ओलावा हा स्वतःच सांगे अश्रू कुणी ढाळले नक्की.

तुझ्या नि माझ्या कथेतले ते 'प्रकरण' सुरेख होते,
सारे लिहूनी कमीच काही, काय गाळले नक्की?

गळ्यातल्या त्या सूत्रामध्ये मंगळ काही दिसले नाही,
माझे नाव कुठे कुठे अन् कसे माळले नक्की? 

काव्यरस

नीट वर बोलू काही

लेखक साहना यांनी बुधवार, 29/07/2026 00:10 या दिवशी प्रकाशित केले.

 

नीट च्या आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. पण ती बाजूला ठेवून नीट परीक्षेत गोंधळ नक्की झाला कसा ? त्याला कसे हाताळावे पाहिजे होते आणि भविष्यांत अशी चूक पुन्हा होऊ नये ह्यासाठी काय करावे ह्यासाठी हा लेख. राजकीय धुळवड इतर धाग्यांवर ठेवावी अशी विनंती.

JEE Mains आणि NEET ह्या दोन्ही परीक्षा NTA च्या अखत्यारीत येतात. दोन्ही परीक्षाची उत्क्रांती वेगळया पद्धतीने झाली आहे. JEE आधी IIT संस्था मॅनेज करत होत्या आणि ह्या परीक्षेला JEE Advanced जी दुसरी परीक्षा होती आणि आज सुद्धा आहे. आज सुद्दा advanced ची जबाबदारी IIT घेतात.

चल कही दूर निकल जाये....( १)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 27/07/2026 14:22 या दिवशी प्रकाशित केले.

हॅट साला. फ्लाईट रूट्स पण कसल्या अडनिडी असतात ना.  तरी बरंय या वेळेला एकच हॉल्ट आहे. डेट्रॉईट ते पॅरिस आणि तेथून थेट मुंबई. गेल्या वेळेला गेलो भारतात  सगळा उलटा द्रविडी प्राणायाम करत...  हेलिफॅक्स ते बोस्टन. तेथे एअरपोर्ट बदलायचे  तेथून  दुबई तेथे नऊ तास वेळ काढत मग मुंबई. प्रवासाचा सगळा चार्मच निघून जातो या असल्या रगाड्यात. 

जेन झी आणि पुढील राजकारणाची दिशा (कि दशा?)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 27/07/2026 10:14 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या केवळ भारतात नाही तर एकुण जगातच जेन-झी हा प्रकार धुमाकुळ घालतोय. श्रीलंका,नेपाळ व बांग्लादेशामध्ये त्यांच्यामुळे सत्तापालट ही झालेला बघितला. 

भारतात पण गेले काही दिवस हीच मंडळी वर्तमान पत्राच्या पहिल्यापानावर होती.सत्तरच्या दशकात जन्मलेल्या मला हा प्रकार अचंबित करणारा होता. त्यामुळे जेन-झी हा शब्द अग्रस्थानी (फोरफ्रंट) वर येण्याची कारणांबद्दल विचार करत होतो. नेट वर गुगल केले असता पुढील माहीती मिळाली.