मि पा सदस्यांचे मत हवे आहे
हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी.
खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले.
मिसळपाव
पु पुस्तकाचा आणि पुण्याचा माझ्या मते एकच. मराठी पुस्तकांची जास्तीत जास्त प्रकाशने पुण्यात आहेत.
पुण्याचा आणि पुस्तकांचा प्रथम परिचय करून दिला एका पुस्तक वेल्हाळाने. तसे तर वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचून काढायची हौस फार. शालेय पर्वात आसपासच्या सगळ्या लायब्रऱ्या घासून पुसून वाचलेल्या. अगदी चांदोबापासून ते सुशि, बाबा कदम पर्यंत. कॉलेजात गेल्यावर जरा दर्जेदार वाचनाची ओढ निर्माण झाली. पु.ल., गोनीदा, ना.सं.