Skip to main content

जकार्ताच्या आठवणी : ३ : सुरुवातीचे दिवस

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 14/05/2015 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी जकार्ताच्या आमच्या ऑफिसमध्ये रुजू झालो आणि काम सुरु केले. मी कामाचा तपशील तुम्हाला सांगत बसणार नाही. कारण, तुम्हाला तांत्रिक संज्ञांमध्ये विशेष रस असणार नाही, आणि त्याने काही फरकहि पडणार नाही. आणि काही कमीअधिक फरक सोडले तर सर्व आयटी कंपन्यामधले काम सारखेच असते. मी तुम्हाला मुख्यत्वे इथले लोक, जकार्ताभोवतीची मी पाहिलेली ठिकाणे याबद्दल सांगेन. lift माझ्या कंपनीचे इंडोनेशियामध्ये काही क्लायंट आहेत, आणि म्हणून त्यांनी तेथे एक ऑफिस उघडले आहे.

प्रिय समुद्रा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 14/05/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय समुद्रा, कश्या रे तुझ्या लाटा आंधळ्या पुढची कातळावर फुटलेली दिसतच नाही.. मागून येऊन पुन्हा त्याच कातळावर आदळतात कां?

४. बोल ना रे बाबा काही...( समाप्त )

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/05/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
३. नको येवुस पोरी २. नको बोलु बाबा काही १. हरवली पोर माझी कविता नावाची ! मनोगतः शेवटी बापाच्या जाण्याने दु:खी झालेल्या लेकीचे(कवितेचे) हे काव्य ... समाजातील अश्या असंख्य दयनिय अवस्थेतील मिटल्या पापण्यात स्वप्ने दडलेल्या शेतकरी बापाचे चित्र सहज लिहिले गेले होते.. तुमच्या सर्वांचे आभार. - तुझ्या डोळ्यात बरसुन...

कोल्हापूर कट्टा वृत्तांत

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 14/05/2015 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवार आणि मंगळवार झालेल्या प्रचंड पाउस आणि विजांमुळे हापिसातच २ दिवस वस्तीला होतो . बरेचसे नेटवर्क इक्विपमेंट जळाले होते . त्यामुळे मिपा वर येणं जमलेलं नाही . आणि त्यामुळेच वृत्तांत पोस्ट करण्यास उशीर झाला ---------------------------------------------------------------------------------------- स्थळ : राजारामपुरीतली एक खोली . . वेळ :- १०.५५ तरीही वेळ काळ आपल्यासाठी नाहीतच . . या अविर्भावात नाश्ता करत बसलेला तो . आणि यात मधेच फोन वाजतो " हेल्लो ? मी काशीकर बोलतोय !! " " काशीकर?? समजलं नाही . " "अहो मी ' अकौंटंट ' " "हो हो . बोला . काय म्हणताय?? " " अहो काय म्हणतोय काय .

दुराभिमान की आत्मसन्मान?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 13/05/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
हा विषय बऱ्याच दिवसांपासून मनात घोळतोय याचे कारण म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ गेले बरेच दिवस कोणा ना कोणाबरोबर तरी बोलण्यात येतोच आहे आणि योग्य अशी कारणमीमांसा सापडत नाहीये. याच विषयाला अनुसरून मी एका व्याख्यानाला देखील हजेरी लावली होती परंतु त्या वक्त्यालाही या दोघातला फरक तितकासा उलगडून सांगता नाही आला.कदाचित ह्या एका नाण्याच्या दोन बाजू देखील असतील. आपल्याला आपल्या स्वतःविषयी वाटतो तो अभिमान, दुराभिमान की आत्मसन्मान हे नक्की कसे ठरवावे? याला काही निकष आहेत का? या सगळ्यांची सीमारेषा खूप धुसर आहे आणि ती काही केल्या शब्दात पकडता येत नाहीये.

हम तो तेरे आशिक है...

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/05/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा.

इंदूर - भाग ४ - इंदूर ते पुणे (समाप्त)

लेखक मोदक यांनी बुधवार, 13/05/2015 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी इंदूर - भाग २ - रावेरखेडी इंदूर - भाग ३ - सराफा >>>>>इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले. एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता. आज शक्य झाले तर पुणे गाठायचे असे ठरवले होते.