Skip to main content

माणुसकी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 19/11/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी …. रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला …. कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून" अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं ! मग म्हणायचे आधी माणूस हो …. वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं … पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा दबतच गेली सगळी स्वप्न त्याखाली ….रोज….

गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

लेखक आरोही यांनी बुधवार, 19/11/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम .

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

लेखक स न वि वि यांनी बुधवार, 19/11/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे…. १. अचानक बंद होतो २. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा ३. अचानक mute मोड मधेय जातो ४. फोन घेताना hang होतो. ५. wallpaper वेगवेगळा दिस्तो.

हरियाणाचे संत रामपाल प्रकरण आणि न्यायालयांचा अवमान करणारे चाहत्यांचे सांशंकीत वर्तन

लेखक माहितगार यांनी बुधवार, 19/11/2014 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरियाणा राज्यात (तथाकथीत संत) रामपाल नावाच्या व्यक्तीवर न्यायालयीन अवमाननेचे आणि हत्येचे काही आरोप आहेत. न्यायालयात उपस्थिती टाळण्याचे चाळीसपेक्षा अधीक प्रयत्नांनतर उच्चन्यायालयानी अजामीनपात्र वॉरंट काढून रामपालला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे या रामपाल महाशयांनी चक्क स्वतःचे खासगी सशस्त्र कंमाडो आणि चाहत्यांच्या भरोशावर न्यायालय आणि शासन यंत्रणेलाच खूले आव्हान दिले आहे. न्यायालयासमोर हजर न राहण्याचे त्याचे म्हणणे न्याययंत्रणा भ्रष्ट आहे.

छावणी - १

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 19/11/2014 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
पंजाबच्या पश्चिम प्रांतातील गुजरानवाला शहर. शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठा वाडा होता. हा वाडा होता चौधरी महेंद्रनाथ यांचा. महेंद्रनाथ हे शहरातील प्रतिष्ठीत व्यापार्‍यांपैकी एक होते. समाजात त्यांना मोठा मान होता. धातूच्या भांड्यांचं एक मोठं दुकान त्यांच्या मालकीचं होतं. त्याखेरीज एका मोठ्या धान्यभांडाराचेही ते मालक होते. आपली पत्नी कमला आणि मुलगी सरिता यांच्यासह ते या वाड्यात राहत होते. या दुमजली वाड्यातील वरच्या मजल्यावर चौधरी आणि त्यांचा परिवार राहत होता तर खालच्या मजल्यावरील बिर्‍हाडांत अनेक भाडेकरु होते.

त्यागासारखं ढोंग नाही

लेखक वडापाव यांनी बुधवार, 19/11/2014 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 18/11/2014 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा! शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला. शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;) चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत.

कथा लेखन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 18/11/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.

चांगली कथा कशी लिहावी ?

"आजकाल काही लिहित का नाहीस रे ?" कूठल्यातरी वेगळ्याच विषयावर चर्चा चालु असताना गिरिजाने अचानकच हा प्रश्न विचारला . " आजकाल काही लिहित का नाहीस रे ? आधी काही ना काहीतरी लिहित असायचास ? कशा का होईना वादग्रस्त का होइना गोष्टीबिष्टी लिहायचास ... आता एकदमच बंद केलेलं दिसतय ... लिहिना एखादी चांगली गोष्ट " ह्या संवादावरुन डोक्यात विचार चक्र सुरु झाले . आधी सुचायचे ते जसे च्या तसे लिहुन काढायचो , पण आता ते चांगले होईल का ह्या विचाराने लिहायचे टाळतो .

एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 18/11/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ दिवाळीचे दिवस बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया. ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता. खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला.

दैव ,नशीब कि शाप ? भाग २

लेखक स्वीत स्वाति यांनी मंगळवार, 18/11/2014 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
bhag ek हे कुटुंब ज्या गावात राहते ते गाव छोटे च असून पूर्ण गाव एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी असते. जेव्हा किरण चा अपघात झाला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी खूप लोक धावले . लोंकाचा या कुटुंबावर असणारा जिव्हाळा तेव्हा दिसून आला. अर्थात या कुटुंबातील सर्वजन माणुसकी जपणारी आहेत . ग्रामीण भाग असल्यामुळे बर्याच वेळा वीज गायब असते .