Skip to main content

९० मिनीटाचा उपवास …

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 17/11/2014 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
ए , " एलिझाबेथ म्हणजे काय रे ?" ते एका राणीचे नाव आहे ! हो, पण अर्थ काय ? एलिझाबेथ म्हणजे, टिकाऊ ! टिकाऊ ? हो , ती खूप वर्ष टिकली ना !! " दगड ! दगड ! दगड ! दगड ! " ekadashee एलिझाबेथ एकादशी या सिनेमातील हा संवाद. अशा अनेक संवादाने, लहान मुलांसहित सर्वांच्या उत्तम अभिनयाने नटलेला, सरळ,सोपा कौटुंबिक सिनेमा " एलिझाबेथ एकादशी" ! एकादशी म्हणले की आठवतात ते वर्षातल्या दोन महत्वाच्या एकादशा .

कधी कधी

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 17/11/2014 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी.
काव्यरस

न वढलेली बिडी अन खाल्लेला मार 3

लेखक Vijay Shankar Mane यांनी सोमवार, 17/11/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
उग डोक्याला ताप हून बसला हुता .तवर माग पाटलाचा पांडूतात्या वाकून बगत म्हणाला काय करताय र ! माझ्या हातातली बिडी बगून मला म्हणाल का र तू खालच्या आळीच्या शंकरचाका !

एकांत

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 17/11/2014 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या विना सांज सखे, जीव ओशाळला गच्च नभी हे चांदणे, अंधार मंद जाहला ll १ ll सोसतो विरह मी, माझ्या श्वासा श्वासातला अंतर श्वासा श्वासातले, एकांत कुंद जाहला ll २ ll चंद्र शोधती तारका, सवे घेउनी अंबराला तुझा पौर्णिमेचा चंद्र, माझा छंद जाहला ll ३ ll कधी नीज लागली, न कळे मुळी मला सहवास विचार तुझा, स्वप्नात धुंद जाहला ll ४ ll जरी असेल स्वप्न, पाहिले असे तुला श्वास हर एक माझा, तुझा गंध जाहला ll ५ ll -सार्थबोध http://www.saarthbodh.com/2014/09/blog-post_85.html

अंधार क्षण भाग ३ - हाजिमे कोंडो (लेख ११)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 17/11/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - हाजिमे कोंडो " मी माणूस होतो पण मग मी सैतान बनलो. परिस्थितीने मला सैतान बनवलं." हाजिमे कोंडो मला म्हणाला. टोकियोमधल्या एका हाॅटेलमध्ये मी त्याची मुलाखत घेत होतो. सैतान म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा येते तिच्याशी हा ८० वर्षांचा वृद्ध माणूस पूर्णपणे विसंगत होता. पण नंतर त्याची सगळी हकीगत ऐकल्यावर मला त्याचं म्हणणं पटलं. हाजिमेने ज्या संघर्षात भाग घेतला त्याविषयी दुर्दैवाने लोकांना फार माहीत नाही. सर्वसामान्यांना दुसरं महायुद्ध म्हटलं की जर्मनीने १९३९ मध्ये पोलंडवर केलेलं आक्रमण हीच त्याची सुरूवात वाटते.

शिक्षण

लेखक शिरीष फडके यांनी सोमवार, 17/11/2014 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण लहानपणी त्यांचा मुलगा काही केल्या शाळेत जायला तयार होईना. तो सतत नकार द्यायचा. अनेक प्रकारे वडिलांनी त्याला समजावलं पण तो काही केल्या ऐकेनाच. त्या मुलाचं म्हणणं होतं शाळेत अनेक तासांत जो माझा अभ्यास होतो तो मी घरी राहून काही वेळेतच करू शकतो. मग मी शाळेत का जाऊ? वडिलांनी मुलाला बरंच समजावलं. एक वेळ ओरडलेदेखील पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग वडिलांनी बराच विचार केला आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. एक प्रकारची जणू काही मुलाला त्याचं म्हणणं पटवून देण्याची संधी ते त्याला देत होते. त्यांनी मुलाला सांगितलं तू काही दिवस घरी बसून अभ्यास कर.

स्वर तुझा

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 17/11/2014 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे बंद करून ऐकत बसतो तुझ्या आवाजातील पहाट ओवी अशाच स्वरात आई म्हणायची माझ्या लहानपणी तुझा आवाज ऐकूनही मला असेच वाटते घेऊन जातो माझ्या बालपणात दिसू लागते ती कोवळी पहाट आणी येत रहातो गंध वाफाळलेल्या चहाचा मी पसरतो आळसावून आणी जातो हरवून तुझ्या स्वरात …. केलीस ग बये माझी सकाळ सुंदर येतोयना तुझा कोवळा आवाज झिरपत झिरपत माझ्या पर्यंत तू पाठविलेल्या व्हाईस मेल मधून जसा कोकिळेचा स्वर येतो दुरून गर्द रानातून माझ्यापर्यंत कधीतरी अलगद..... तसाच तुझा स्वर मी ऐकत बसतो ह्या बर्फाळ एकांतात कधीपण … प्रकाश

अन-आन्स्वर्ड (?)

लेखक ससन्दीप यांनी सोमवार, 17/11/2014 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळचांच अनुभव, चेन्नई एयरपोर्टला सुरुवातीच्या मुख्य गेट जवळ चेक-इन करते वेळी जमीनीवर ५०० रुपयांचे ४-६ नोटांचे एक बंडल सापडले. रांगेमध्ये आमच्या पुढे दोन ते तीन प्रवासी होते (इन्क्लुडिंग एक जेपनीस) त्यामुळे साहजिकच क्षणाचाही विलंब न करता आम्ही (मी आणि माझी पत्नी) त्यांच्या जवळ विचारणा केली. पुढे असलेल्या जेपनीस माणसाने प्रामाणिकपणे ते पैशे त्याचे नाही असे सांगितले. (इथे तो नाही म्हणाला म्हणून नव्हे तर आधी कुठे तरी वाचनात आले होते की ते लोक खूप प्रामाणिक असतात) त्याच्या पुढे असलेल्या प्रवाशांची प्रतिक्रिया पण तशीच काहीतरी होती.

<<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

लेखक जेपी यांनी रविवार, 16/11/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ? लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो. ============================================================================= हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत.