Skip to main content

९० डिग्री साऊथ - ८

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 10/05/2014 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ७ स्कॉटच्या तुकडीची धीम्या गतीने प्रगती चालू होती. बर्फातून स्लेज ओढताना त्यांना अपार कष्ट पडत होते. दिवसाला ११ - १२ मैलांच्या पलीकडे मजल मारणं त्यांना अशक्यं होत होतं. १५ डिसेंबरला त्यांनी ८४ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. पृष्ठभागावरील बर्फाचा थर आता कमी होत होता. मात्रं त्या दिवशी संध्याकाळी कँपच्या नियोजीत जागी पोहोचण्यापूर्वीच पुन्हा बर्फवृष्टीला सुरवात झाली. निरुपायाने त्यांना थांबणं भाग पडलं. स्कॉटने निराशेने आपल्या डायरीत नोंद केली, " बर्फ पडण्यास सुरवात झाल्याने आम्हांला थांबणं भागंच पडलं होतं !

कोर्न पालक राइस

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 10/05/2014 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी तांदुळ २ वाट्या पालक पेस्ट १ वाटी मक्याचे दाणे १ चमचा धनेजिरे पूड २ हिरव्या मिरच्या(आवडीप्रमाणे कमीजास्त) २ लवंगा,३-४ काळे मिरे,१ तुकडा दालचिनी १ तमालपत्र १ चमचा साजूक तूप मीठ चवीप्रमाणे तेल कृती: पालक धुवुन पाण्यात ५-७ मिनिटे उकळवून घ्यावा.या पालकाची हिरवीमिरची घालून पेस्ट करुन घ्यावी. तेल गरम करुन मोहरी,जिरे,हळदीची फोडणी करावी.त्यात लवंगा,मिरे,तमालपत्र घालून परतावे. या फोडणीत धुतलेला तांदुळ घालून परतावा.पालक पेस्ट्,धनेजिरे पूड्,

तुला भेटलो

लेखक उपटसुंभ यांनी शनिवार, 10/05/2014 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’ तुला भेटलो दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका.. रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..

कॅम्पस प्लेसमेंट

लेखक जातवेद यांनी शनिवार, 10/05/2014 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.

सौदी क्षणचित्रे : ०१ : प्रस्तावना आणि कर्मक्षेत्र

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 09/05/2014 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

पंगत

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 09/05/2014 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो . आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.एक तर सगळ्यानाच ते आवडत आणि दुसर महणजे इतके दिवसानंतर आता तस बसल्याशिवाय जेवण पोटभर होत नाही असाच वाटत.कदाचित हे वाटण मानसिक सुध्हा असेल .

जी. ए. नावाची वेदना…

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 09/05/2014 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी) मराठी साहित्याचं वाचन पुर्वीपासून असलं तरी एखाद्या लेखकाने कायमचं पछाडल्याचा अनुभव नेहेमी आला नाही. काही प्रथम आवडले. नंतरही वाचन सुरु राहीलं पण वैचारिकदृष्ट्या काही चालना मिळेल असा भाग त्यात कमी होता. जी.एं. नी मात्र सुरवातीपासूनच डोक्याचा ताबा घेतला, वाचल्याक्षणापासून पछाडलं आणि माझं जी.ए. वेड हे उत्तरोत्तर वाढतंच गेलं. आजदेखिल जी.एं चं पुस्तक हातात घेताना वेगळ्याच विश्वाचे दरवाजे आपण उघडतो आहोत हे जाणवतं.