९० डिग्री साऊथ - ४
९० डिग्री साऊथ - ३.
अॅमंडसेनने फ्रिट्झॉफ नॅन्सनलाही तपशीलवार पत्रं लिहून आपल्या योजनेची कल्पना दिली. पेरी आणि कूकने उत्तर धृव पादाक्रांत केल्याच्या आलेल्या बातम्यांमुळे उत्तर धृव गाठण्याच्या मूळ बेताला हादरा बसल्याचं त्याने नमूद केलं. इतक्या तयारीनंतर आता उत्तर धृवाऐवजी दक्षिण धृवाकडे जाण्याविषयी गत्यंतर नसल्याचं त्याने नॅन्सनला कळवलं. मूळ योजनेतील बदलाविषयी दिलगीरी व्यक्त करण्यासही तो विसरला नाही !
अॅमंडसेनच्या या बदललेल्या बेताची माहीती नॉर्वेला पोहोचताच एकच गोंधळ उडाला.
मिसळपाव