Skip to main content

बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/05/2014 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई.

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 02/05/2014 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

आय टी ट्रेनिंग प्रोग्राम- माहिती हवी

लेखक arunjoshi123 यांनी गुरुवार, 01/05/2014 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे आय टी क्षेत्रातल्या प्रोजेक्टचे नवे लचांड अंगावर येऊन पडले आहे. माझ्या कामाचे स्वरुप पाहता मला काही प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्सेस करायचे आहेत. म्हणजे ते १-२-३ दिवसावाले, सहसा हॉटेलात, इ होणारे, सर्टीफिकेटपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व असणारे नि बर्‍यापैकी मिड लेवल किंवा अ‍ॅडवान्स. येत्या वर्षात मला किमान ५-७ कोर्सेस करावे लागतील असे वाटते. त्यांचे स्वरुप/कंटेट कसे असेल याचा माझा अंदाज मी खाली देत आहे. मी असे कोर्सेस नेटवर शोधले, पण मिळाले नाहीत. म्हणून ते कोणी घडवून आणणार्‍या कंपन्या इ माहित असतील तर सांगा.

९० डिग्री साऊथ - २

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 01/05/2014 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - १ १८२३ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स वॅडेलने दक्षिणेच्या सागरात प्रवेश केला. २० फ्रेब्रुवारी १८२३ रोजी वॅडेलने आपल्या जेन या जहाजातून ७४'१५'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं ! अंटार्क्टीकाच्या या सागराला अर्थातच नाव पडलं ते म्हणजे वॅडेल समुद्र ! WeddelSea १८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला.

हाणा! मारा!! ठेचा!!!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 01/05/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी. कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां? तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे.

विद्या कॉमर्स लायब्ररी

लेखक माहितगार यांनी बुधवार, 30/04/2014 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात विद्या कॉमर्स लायब्ररीचा चुकीने उल्लेख महाराष्ट्र लॉ हाऊस असा झाला होता, आदुबाळ यांनी प्रतिसादातून लक्षात आणून दिल्या नंतरर शीर्षक बदलले आहे, अजून पाच मिनीटे, घडाळ्याचे काटे रात्रीच्या १२ वर जातील पुढच्या २४ तासांना भारतात १ मे म्हणतील, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन. आठवणींनी मला जवळपास २० वर्षे मागे नेलं पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर (मला वाटते केळकर रस्ता) एक एस.एन.डि.टी नावाची मुलींची शाळा आहे त्या शाळेच्या थोडसं डायगोनली आपोझीट एक कायद्याच्या पुस्तकांच वाचनालय होत. नाव आता नेमक आठवत नाही पण बहुधा महाराष्ट्र लॉ हाऊस असाव.

कलगीतुरा - पूर्वार्ध २

लेखक बबन ताम्बे यांनी बुधवार, 30/04/2014 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा - पूर्वार्ध कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले. मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला.

युरोप ,आंबे आणि आम्ही

लेखक रमेश भिडे यांनी बुधवार, 30/04/2014 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय मध्यमवर्गीय आणि गरीब यांचं 'आरोग्य' या विषयी आमचं सरकार किती उदासीन आहे हे 'युरोपने आंबा नाकारला' या प्रकारावरून दिसून येते. युरोपवर अश्याप्रकारे आंबा नाकारला म्हणून भारतातून कितीही आरोप झाले तरी त्यांच्या 'जनतेचे आरोग्य' या कडक धोरणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक काय ती फळमाशी त्या कुठल्या आंब्यात आढळली तर इतका कडक निर्णय. ... आणि आम्ही मात्र तेच रोगट आंबे / भाज्या मोठ्या चवीने आणि महाग किमतीत खायच्या. ... आम्ही या धोरणाच्या किती तरी कोस दूर आहोत. कदाचित अश्याप्रकारचं धोरण आमचं सरकार राबवेल अशी सुतराम शक्यता सध्यातरी नाही. घोटाळे, बलात्कार, लफडी, भ्रष्टाचार, चिखलफेक, निवडणुका ई.

बागलाण भटकंती - भाग १

लेखक सह्यमित्र यांनी बुधवार, 30/04/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत.