जिकडं खोबर, तिकडं चांऽऽगभलं!!!.....२
.तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले, आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच.
तर पुढे
तर झाल काय ? तर तो जो जुलुमान लादलेला पंजा गावात होता, तो तसाच त्या एका घरात देवघर बांधुन पडुन होता. एक जरा ऐसपैस चौथरा बांधुन त्यावर जरा कमान बिमान बांधुन तो पंजा त्या घरात पड्लेला असायचा.
मिसळपाव