Skip to main content

गाय द मोपासा - "The Will"

लेखक शुचि यांनी बुधवार, 27/03/2013 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
गाय द मोपासाच्या "The Will" या उत्कट कथेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी परवाच केला. प्रयत्न फसला. मूळ कथेची कारुण्याची झालर जाऊन त्या कथेला सुमार व विनोदी ठीगळ लावल्यासारखी ती दिसू लागली. स्वतःच्या लेखनसीमा शोधायच्या असतील तर अशा अभिजात लिखाणाचे भाषांतर करण्याचा प्रयत्न जरुर करावा. या थोर लेखकांना विशेषतः लहान कथा लिहीणार्‍या कथाकारांना इवलेसे कथाबीज किती सुंदर व नेमक्या शब्दात फुलवता येते त्याचा "The Wil"" ही कथा वस्तुपाठच आहे. अचूक , प्रभावी शब्दरचना, सुसंगत वाक्य व वातावरणनिर्मीती.

अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या

लेखक साळसकर यांनी बुधवार, 27/03/2013 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची रटरटीत दुपार. कोण निघणार बाहेर त्या उन्हात. एकीकडे सारी दुनिया मस्त आरामात. आमचेच दुकान तेवढे खुले. म्हणून हा अंड्या तेवढा व्यस्त आपल्या कामात. अर्थात, दुकानात दुपारच्या वेळेला फारसे कोणी येण्याची शक्यता नसल्याने आराम हेच एक काम. पण भिंतीला तुंबड्या लाऊन बसेल तर तो अंड्या कसला. हल्ली फावल्या वेळेत माझे काही ना काही खरडवणे चालूच असते. दुकानाच्या दारात काऊंटरवर बसल्या बसल्या कधी मी आकाशातल्या पाखरांकडे बघून एखादी चारोळी रचतो, तर कधी समोरच्या चाळीतले एखादे पाखरू नजरेस पडल्यास त्याच कागदावर शेरोशायरी उतरते. पान भरभरून निबंध मी कधी शाळेतही लिहिला नव्हता.

सगुणा बाग

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 27/03/2013 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा माझ्या “रौप्य महोत्सवाच्या” निमित्ताने कुठे तरी फिरायला जावे अशी मीच टुम काढली.. घरची मंडळी पण भलत्याच उत्साहात चर्चा करू लागली. मी पण तातडीने मि .पा वर माहित असतील नसतील त्या सगळ्यांना व्य.नि करून टाकला आणि वर ही पण तंबी दिली की "सोबत १० महिन्याचा छोटा अबीर आहे तेव्हा त्या हिशोबाने काय ते सुचवा.." ५० राव, मोदक, बॅटमॅन सगळ्यांनी उत्साहानी ठिकाणे सुचवली.शेवटी भरपूर शोधाशोध करून "सगुणा बाग " हे ठिकाण निश्चित केले.खरं तर तिथे ट्रेननेच जायला पाहिजे,नेरळ स्टेशन वरून फक्त १० मिनिटा वर हे ठिकाण आहे. पण मी "अबीर ला झेपेल का? नाही जागा मिळाली तर त्याला घेऊन कुठे बसू?

तो आवाज आजही मला साद घालतो..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 27/03/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
"प्लॅटफॉर्म क्रमांक दो पे आनेवाली लोकल अंधेरी के लिये धीमी लोकल है..." एका महिला निवेदिकेचा गोड आवाज कानावर पडत होता. पण ज्या ट्रेनसाठी ही अनाऊंसमेंट होत होती त्या ट्रेनने मात्र केव्हाच स्टेशन सोडले होते. तीन-तीन भाषांमध्ये अनाऊंसमेंट करायच्या नादात हे असे होत असावे. पण निदान मग शेवटच्या वाक्यात आनेवालीचे जाने’वाली तरी करायचे. असो, कोणाला काय फरक पडतो. तसेही मुंबई लोकलने प्रवास करणार्‍यांमध्ये या बाईच्या आवाजावर विसंबून राहणारे मोजकेच असावे. आवाजावरून आठवले, या आवाजाच्या उगमाचा शोध कधी ना कधी तरी नक्की घ्यायचा होता मला.

अन्नपुर्णा

लेखक शरद यांनी बुधवार, 27/03/2013 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नपुर्णा आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र !

हौसेने उन्हाचा भिमाशंकर होणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 27/03/2013 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रांसाहित हा लेख येथे वाचता येईल. http://sagarshivade07.blogspot.in खांडस मार्गे भीमाशंकर "हौसेने उन्हाचा भीमाशंकर होणे" हि सागर बाबांनी मराठी भाषेला बहाल केलेला वाक्रप्रचार आहे. पू.ल.

फक्त मराठी

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 27/03/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या एका पुढाऱ्याने असे फर्मान काढले कि .महाराष्टात राहीचे असेल तर फक्त मराठीतच बोला ,लिहा ,इंग्रजी,हिंदी, किंवा इतर भाषांचा प्रयोग चालणार नाही ,जो असे करणार नाही त्यास कडक शिक्षा दिली जाईल . फक्त मराठी चे फर्मान निघताच अनेकांचे धाबे दणाणले ,पुष्कर टेलर्स असे नाव लिहिलेली पाटी पुश हा इंग्रजी शब्द असल्याने ढकलकर शिंपी अशी पाटी दिसू लागली ,दिनकर ,दिवसकर झाला ,गोकुळ चे जाकूळ झाले,ऐअरटेल चा फलक वायू गोष्ट असा दिसू लागला ,कोलगेट टूथ पावडर ,कोळसा दरवाजा दंत पूड झाले,एका दुकानदारां कडे एक मुलगा काकाचक्त्या मागू लागला . दुकानदारास काहीच समजले नाही,मुलाने बोट दाखवले तेथे अंकल चिप्स

तो हसत होता

लेखक निमिष ध. यांनी बुधवार, 27/03/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो. आजूबाजूला अगदी तुरळक वावर होता. चुकूनच एखादा माझ्यासारखा वाटसरू दिसत होता. जसा जसा उशीर होत होता तसा माझ्या पावलांचा वेग वाढत होता. मोठ्या स्तंभाला मागे टाकून मी आता परावर्तीत तळ्याच्या काठावर आलो होतो. तळ्यामध्ये एका बाजूने स्तंभाचे तर दुसर्या बाजूने इमारतीचे प्रतिबिंब पडले होते.

युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ५ भाग शेवटचा...........!!

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/03/2013 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१) युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २ युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ३ युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ४ हिमलरने ऑशविट्झला १७ जुलै १९४२ च्या संध्याकाळी भेट दिली. या भेटीदरम्यान त्याने तेथे असलेल्या अधिकार्‍यांना ज्यूवंशसंहार हे आता राईशचे अधिकृत धोरण आहे हे उघडपणे सांगितले.

रंगुनी रंगात मधुर.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 27/03/2013 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंगुनी रंगात मधुर............ दिन रंगांचा आजला कल्लोळ भावनांचा उरी, रुसलीस तू, खुलवींन मी आज उधळूनी रंग तुजवरी !. विरतिल गडद रंगांत ह्या राग रुसव्याच्या खुणा, उरतील मागे पुन्हा प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा ! विविध रंग घेउन सवें पोहोचलो द्वारी तुझ्या, बावरली तू गोड अईसी फुलले गुलाब गालीं तुझ्या ! ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा, स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली,
काव्यरस