दुबईची काळी बाजू!
काही दिवसापूर्वी मध्यपूर्वेतील कुठल्या तरी देशात वेठबिगार करायला भाग पडलेल्या कामगारावर लेख होता. आज तसाच एक लेख दुबईवर सापडला.
वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारा हा देश खरे तर गरीब कामगारांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेला आहे. ह्या कामगारांना बांगला देश, पाकिस्तान आणि भारत अशा देशातील गरीब लोकांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का दुबईत उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपला देश आणि तिथली गरीबी परवडली अशी त्यांची परवड होते.
अगदी उच्चपदस्थ परदेशी लोकही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते.
मिसळपाव