Skip to main content

अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता. अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341 घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही. ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे. .................................................................................................................................................... आपली मुंबई लोकल आणि भरगर्दीची वेळ.

वना चे श्लोक

लेखक राजा सोव्नी यांनी गुरुवार, 28/03/2013 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
।। सदा सर्वदा वनी विचरावे ।। ।। वना जोपासण्या सदा सिद्ध व्हावे ।। ।। वना राखण्या संकल्प जीवी ।।।। ।।वना तोडण्या संकल्प सोडूनी द्यावा ।। ।।वनी वृक्ष वल्ली सदा वाढू द्याव्या ।। ।।मनी वृक्ष वल्ली सदा पुज्य व्हाव्या ।। ।।वनी वनचरे सदा वाढू द्यावी ।। ।।मनी वनचरे सदा आदरावी ।। ।।तना जाळण्या वृक्ष तोडू नकोरे ।। ।।तना जाणण्या देह दान करारे ।। ।।वना सारखा मित्र कोणीही नाही ।। ।। वना वाचुनी दुखः ठाई ठ
काव्यरस

डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 28/03/2013 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षाचा पहिला दिवस , माया -बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते मुनिसीपालीटीने शहरातला कचरा उचलून, कचरा घरांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिच्रारे सकाळ पासून कुजक-माजक, नासलेल- सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी , श्रीखंड खायला मिळेल.

रात्रीच्या पावसाने

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 28/03/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा
काव्यरस

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 28/03/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता. एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले.

मिपाची काळी बाजू!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 28/03/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
काही तासांपूर्वी अग्नेयैशान्येतील कुठल्या तरी संस्थळावर संपादकीय लिहिण्यास भाग पडलेल्या निवाशावर लेख होता. आज तसाच एक लेख मिपावर सापडला. वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारे हे संस्थळ खरे तर नवोदित सदस्यांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेले आहे. ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का मिपावर उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपले संस्थळ आणि तिथली कंपुबाजी परवडली अशी त्यांची परवड होते. अगदी उच्चपदस्थ परदेशी सदस्यही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते.

ग्रेस ...

लेखक शतदाप्रेमकरावे यांनी गुरुवार, 28/03/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
तू देउन गेला जाता दु:खाचा निळासा भार स्वप्नांच्या वाटेवर दाटला गडद अंधार हे जगणे अडले येथे तू जेथे सोडली साथ ... चाचपडत शोधतो आहे सुखाचा मोडका हात ! -अनिल बिहाणी. कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

नाटेकर

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 28/03/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले.

अवलिया

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 27/03/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
अवलिया नमस्ते ,मी चंदू खानविलकर अबुधाबी साठी जेट एअरवेज ची फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्ट वर उभा असताना एक चाळीशीचा चष्मेधारी मराठी माणूस जवळ येवून उभा होता. त्याने माझ्या पासपोर्ट वरील नाव पाहून लगेच हस्तांदोलना साठी हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली. तुम्ही Costain साठी जाताय का? तो म्हणाला होय,पण तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय –मी हो, आपण कतार ला भेटलोय आधी , तुमच्या कॅम्पमध्ये तो अन्वर होता ना, त्याच्या रूमवर आलो होतो मी एकदा . तो म्हणाला अच्छा. मग आत्ता कुठे चाललात ? आत्ता मीही Costain लाच चाललोय , आयलंडला.