आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई
आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली
फुले कण्हेरीची ,रास गावर्याची हि पेटू लागली
आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही
फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली
जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध
उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद
आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी
भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी
avi
मिसळपाव
***