Skip to main content

विसरलेल्या सामानाला

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 10/02/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलेल्या सामानाला माझ्या ब्यागेत जागा नव्हती. उण्यापुर्‍या आठवणीनी ब्याग भरलेली होती. अथांग ओझी वाहून ती थकली होती. प्रत्येक प्रवासात नव्याने थकली होती जो भार होता मूक बिचारी सोसत होती. कोंबून; कधी मुस्काट दाबून भार मुक्याने पेलत होती. कुरकुरण्यार्‍या बिजागिर्‍या, तुटके ह्यांडल. घसटलेले कव्हर.... गर्दीतही ओळखता येत होते. सॅमसोनाईटच्या चमको गर्दीत ती एकटीच बापुडवाणी होती जुनी म्हणेल कोणी तरी ना फेकून देईल माळ्यावर आधार होईल. कोणीतरी एक दिवस अंतरंग पाहील जुन्या रद्दीला उजाळा देईल. कष्टाचे दिवस आठवून या सुखाच्या दिवसांचे समाधान अनुभवेल. तसे काही झाले नाही.

एका दिशेचा शोध....(पुस्तक परिचय)

लेखक चाणक्य यांनी रविवार, 10/02/2013 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप वासलेकर यांचे 'एका दिशेचा शोध' म्हणजे प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. भारत उद्याची महासत्ता आहे हा समज असणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव हे पुस्तक करुन देते. पण महत्त्वाची बाब म्हणजे लेखक नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर त्यांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एका सम्रुद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्यासाठी सामान्य नागरीकांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने काय करायला पाहिजे याचे व्यवस्थित विवेचन करतो. सर्वप्रथम संदीप वासलेकरांचा थोडक्यात परिचय करून देतो.

Valentine Day

लेखक NiluMP यांनी रविवार, 10/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते.

मामा ????

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 10/02/2013 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक तुला भेटता जुने दिवस ते आठवले दशकापासून या हृदयाच्या तळभागी जे साठवले तशीच दिसशी सुंदर अजुनी बटा जाहल्या रजत जरी चाल आजही डौलदार ती स्थूल वाटशी जरा तरी आठवते मज तुझे अजुनी मुग्ध बोलणे भर भरुनी क्षणाक्षणाला मोहविणारे गोड हासणे खळखळूनी तेव्हा गेलीस हात सोडूनी डाव प्रितीचा असा मोडूनी मिही रमलो मग संसारी प्रपंच पाठीवर घेऊनी विरहा नंतर तुझ्या सखी गे मन हे नाही पुन्हा भटकले संसाराच्या वेलीवरती आजवरी ते फक्त लटकले काल अचानक समोर दिसलीस सोबत तुझीया कन्या होती प्रतिरूप ती तुझी वाटली तुझ्यासारखी हासत होती विचारता तव कन्येने मग परिचय माझा काका म्हणूनी काका नाही हे तर मामा तुझे बोलणे फार

अद्भुत ( भाग 3 )

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 10/02/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
5 अॅलेक्सच्या संगतीत रोहनचा दिवस छान गेला. दुसर्या दिवशी विपश्यना शिबीर सुरू होणार होते. त्यादिवशी सकाळी अॅलेक्स आणि रोहनने फॉर्म भरून रीतसर प्रवेश घेतला व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपार झाली.शिबिराला सुमारे 150 पुरुष व तितक्याच महिला होत्या. इथले जेवणही रोहनला आवडले. साधेसेच ,पण सात्त्विक आणि पौष्टिक ... त्या रात्री मौनाला सुरुवात झाली .आजपासून दहा दिवस मौन पाळायचे. रात्री खोलीत गप्प बसणे दोघांनाही अवघड जात होते . तरीही मनाचा निश्चय करून ते निद्राधीन झाले. दुसर्यान दिवशी आनापान सती ,तिसर्यात दिवशी ध्यान-त्रिकोण एकत्रीकरण शिकवले गेले.

क्यू. आर. कोड - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/02/2013 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या ट्रीपला पुण्याहून चेन्नैला परतण्याच्या आदल्या रात्री, इ-तिकीट हॅन्डबॅगच्या खणात ठेवताना मुलाने बघितले आणि "बघू...", असे म्हणून मागितले. त्यावर क्यू.आर. कोड होता. ते बघून, “आयला, कसलं भारी डिझाइन आहे. तिकिटावर कसलं आहे हे डिझाइन?”, असा मला प्रश्न विचारला. मग त्याला उत्तर देण्याऐवजी मी मोबाइल काढला आणि त्याच्यावरचे ‘क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid)’ हे अ‍ॅप चालू केले आणि तो कोड स्कॅन केला. मोबाइलमध्ये डायरेक्ट ब्राउझर चालू होऊन, स्पाईस जेट एयरलाइन्सची वेब साईट चालू झाली आणि माझा 'वेब - चेक इन' केलेला बोर्डिंग पास दिसू लागला.

अद्भुत (भाग 2)

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 10/02/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या भागल्या अवस्थेत रोहन संध्याकाळी सहा वाजता पर्वत-शिखरावर असणार्याल त्या मठात पोचला. गावकर्यााला निरोप देवून घरी पाठवलं आणि रोहन मठाच्या प्रवेशद्वारातून आत गेला . आत जाताच एका छोट्या दहा-बारा वर्षाच्या भिकखूने त्याचे स्वागत केले ... आइये रोहन बाबू ,गुरुजी आपकीही राह देख रहे है .रोहन अवाक झाला. आपला उभ्या आयुष्यात या मठाशी कधी संबंध आलेला नाही,आणि याला माझे नावदेखील कसे काय माहीत?आणि मी इथे येणार हे यांना कासेकाय माहीत? ....तुमको मेरा नाम कैसे पता चला ?....... गुरुजी ने बताया बाबूजी.......... आश्चर्यचकित झालेला रोहन त्या छोट्याबरोबर निमूटपणे चालू लागला.

अद्भुत (भाग 1 )

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 10/02/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत 1 सकाळी सकाळी सिगारेटची पाकीटच्यावर पाकिटे संपवूनदेखील रोहन आज शांत होत नव्हता . तसा तो चेन स्मोकर नव्हता ,पण गेल्या काही दिवसात घडलेल्या विचित्र घटनांनी तो अतिशय विषण्ण अवस्थेत जगत होता . अगदी क्षुल्लकशा कारणावरून बॉसने नोकरीवरून काढले .... त्यामागे ऑफिसमधले गलिच्छ राजकारणच आहे ,हे त्याला काही केल्या प्रियाला पटवून देता येईना ... मग तीही भांडून,रुसून दूर गेली होती . पण तिचा रुसवा काढून मनधरणी करण्याचाही विचार रोहनच्या मनात आला नाही ,कारण आपल्यावर झालेला अन्याय त्याला खोलवर कुठेतरी खात होता.....

घरपण

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 10/02/2013 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
घर चार कुडाच्या भिंती घरपण अमृत रसना नाती आकाश निळे झरणार्‍या चांदण राती ओंजळी भरूनी स्वातीचे मोती स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती आवेग कळांचे लाटेवर देहाच्या रुधिरातिल माया ममता लय ओघवती शरिरापलिकडले गोत सवे सांगाती दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती घरपण पण असते रेष रसिक रसरसती ....................अज्ञात
काव्यरस

सोबत होती तुझी जेथवर

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 10/02/2013 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
सोबत होती तुझी जेथवर कधी एकटा ना पडलो धुंद तुझ्या त्या सहवासातच कसा होईना, पण घडलो सकाळ तुझीया शिवाय माझी होतच नव्हती सुरु तशी दिवसभरातून तुझी भेट मग घडतच होती माझ्याशी तू नसल्यावर जीव व्हायचा उगाच कासाविस माझा परंतु तुझीया भेटी नंतर स्वतःस समजे मी राजा वैद्य भेट ती नित्य व्हायची तुझीया संगे फिरल्याने शुष्क खोकला आणिक थकवा ऊर धुराने भरल्याने परिवाराची मित्रांची मी पथ्करली गे नाराजी कारण तव दुर्गंध सोसण्या होतच नव्हते ते राजी अखेर सोडून दिधले तुजला स्मरणही नाही होत तुझे परतुनी येऊ नको मजकडे हेच मागणे गे माझे [वैधानिक इशारा - धुम्रपान आरोग्यास अपायकारक आहे ]