कुठे असतोस मित्रा
कुठे असतोस मित्रा
तुझी भेट होत नाही
तुला भेटल्या शिवाय
झोप नीट येत नाही
उपकारांचे मी तुझ्या
कसे फेडावे रे ॠण
हाच विचार असतो
कैक दिवसांपासून
तुझ्यामुळेच लाभली
माझ्या पत्नीची ती मिठी
फक्त तुलाच पाहून
तिला वाटते रे भिती
दॄढ मैत्रिचा आपल्या
केला तीनेच की घात
कीट-नाशक फवारा
तीने मारला घरात
आता कसली ती मिठी
आणि कसे बिलगणे
औषधाचा तो राहतो
गंध अनेक महिने
मिसळपाव
