Skip to main content

असता तुझी कृपा ।

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2013 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
असता तुझी कृपा । असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला । देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।धृ।। घरटे कसे रचावे हे ज्ञान पांखरांना । माते उरी दुधाचा तू निर्मिलास पान्हा ।। शय्या कधी फुलांची काटे कधी उशाला ।।१।। प्रपंची अडचणी येती, मती मूढ होई दाटे अंधार जीवनी, मन निराश होई होतोस दीप तू ,सापडे वाट आंधळ्याला असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला । देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।२।। धिक्कारती सोयरे दाखवी पाठ सारे हिणविति मज, फुकाचे सल्ले देत सारे होऊन मित्र माझा, देतशी धीर मजला असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला । देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।३।। कृपेचा सागर तू.

आठवणीतले ग्रीस - भाग २

लेखक nishant यांनी मंगळवार, 05/02/2013 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतले ग्रीस - भाग १ दिवस पहिला: दक्षिण पुर्व युरोपमधे स्थित, आधुनिक ऑलिम्पिक्सचा जनक, Aristotel, Plato, Alexander अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी गाजवलेला देश. एकि कडे पुर्वेला “Agean “, पश्चिमेला “Ionian” तर दक्षिणेला भुमध्य समुद्र (Mediterranean sea). उत्तरेला अल्बेनिया, Republic of Macidonia आणि बल्गेरिया तर उत्तर-पुर्व दिशेला तुर्की हा देश.या देशाने जगाला अनेक गोष्टी दिल्या. लोकशाहीची पाळेमुळे इथे हजारो वर्षांपुर्वी रोवली गेली. तसेच गणित व साहित्याची सुरवातही इथुनच झाली.

बेरीज

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 04/02/2013 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी भेटुनी जाते त्सुनामीसारखी मिरवतो आयुष्यभर ती झीज मी आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी ठरवले आहेस तू उत्तर तुझे, की चुकीची मांडतो बेरीज मी? -- उपटसुंभ
काव्यरस

प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 04/02/2013 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे drsanjayhonkalse@gmail.com भारत भूमीत क्वचितच असं कुणी असेल कि ज्याने कुभ मेळ्य़ा बद्दल ऐकल नसेल.साऱ्या जगात कुंभ मेळा एक आश्चर्य जनक उत्सव आहे, ज्यात भारतीय समाज,संस्कृती,धर्म ,वैविध्य संपूर्णपणे समन्वित असत,अस मानल जात. या व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे.

फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 04/02/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या फुलांच्या रांगोळ्या... http://www.misalpav.com/node/19262 http://www.misalpav.com/node/20308 http://www.misalpav.com/node/21612 खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे.

पोळी की चपाती

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 04/02/2013 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
पोळी की चपाती ??/ नेमके काय म्हणावे??? पोळी की चपाती?/ एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते. दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते.. नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ... बहुमत चपातीच्या बाजूने.... पोळपाटावर बनतात त्या पोळ्या... चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे.. चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच.

जात जातच नाही ... काय करू??

लेखक दीपकशेठ यांनी सोमवार, 04/02/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना...

सिटीबसमधले नाट्य

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 04/02/2013 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिटीबसमधले नाट्य प्रवासी: आपलं हे एक द्या हो. कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय? प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक सर्पोद्यान द्या. कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं? प्रवासी: नाही हो. हे आपलं.. कंडक्टर: मग काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं? प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये. कंडक्टर: मग तेथे नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी. (कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. प्रवासीही त्यात सहभागी होतो.) प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो.

शाळा - दहावी.

लेखक तर्री यांनी रविवार, 03/02/2013 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
10th ची exam declare झाली. आयुष्यातला beautiful period खल्लास. Fundoo मजा केली शाळेत. बंटीची बॉडी उतरली, तरी बरे बंटीने ९ वीत सिगारेट सोडली. मला पण जाम कंटाळा येतो आजकाल सिगरेटचा. पमी कधी कधी कंपनी देते, पण ली भित्री आहे, चोरून चोरून ओढते. पमी पहिली टायगरची compass होती. त्यानेच तिला सिगरेट ओढायला लावले. साला तिला घेवून सिनेमेक्स ला morning show जायचा. टायगर च्या बापूची transfer झाली , कोण म्हणतो uncle ला हाकलले. तो साला पाहिजे होता १० वीत. टायगरला रोबर्टपण घाबरायचा. Science period ला रोज पमी ला घेवून बसायचा बाजूला. कधी कायपण बोलला नाय रोबर्ट त्याला. तशी पमी सहावीतच upgrade झाली होती.