नख
पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'
लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
आणि कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...
पुन्हा शोधावी का तिला ?
मला भेटून ती निराश झाली तर?
मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही
तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना
दीनवाणा झालेला मी
कुठल
काव्यरस
मिसळपाव
नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती...
गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो...
श्रद्धांजली!