Skip to main content

उरली फक्त आठवण ..

लेखक विदेश यांनी शनिवार, 26/01/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो , एकदा मी छानसा - गळुन गेली फूल पाने.. एकटा मी हा असा ! नाचती पक्षी कसे बघुनिया खांद्यावरी.. खेळताना, होइ मजला हर्ष माझ्या अंतरी - फूल फळ हुंगावया जमति जेव्हां पाखरे - हृदय माझे भरुनिया जातसे तेव्हां खरे ! सावली शोधावया पांथस्थ ते येती कुणी - बाहु पसरुन स्वागताला धन्यता वाटे मनीं ! आज काही नाही उरले भोवती माझे इथे - एकटा मी दु:ख माझे सांगतो मजला इथे ! .
काव्यरस

नेहमीचेच यशस्वी कलाकार

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 26/01/2013 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
अ ब क ड अ ब क ड वेगळे विचार वेगळी कृती वेगळी मते अ ला ब पटत नाही तर ब ला क अ क ला अ ड आणि ड ला अ ब नाही नाही अ ला ब क पटत नाही ब ला क पटतो पण क ला ड पटतो हे पटत नाही क ला अ पटत नाही पण अ ला ब पटत नाही हे ड ला अ पटत यापेक्षा जास्त दु:खदायक वाटते नाही नाही थांबा परत सांगतो पहिल्यापासून अ ला...जाऊ द्या ना अ ब क ड ला काहीतरी पटतं काहीतरी पटत नाही एवढं तरी पटल ना तुम्हाला मग पुढे सांगतो अ ब क ड अ एक मुद्दा मांडतो ब सरसावून पुढे येणार तोच य पटकन येवून काहितरी बोलतो य बोलला म्हणून र बोलतो र बोलला म्हणून य गुरगुरतो र च्या बाजूने ल येतो य च्या बाजूने व येतो प आणि फ मधेच येतात पण आपण कोणत्
काव्यरस

क्या बात है इस जादूगरकी ? अर्थात ओ पी नय्यर -एक शापित गंधर्व -२

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/01/2013 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा पूर्वार्ध इथे ओपी नय्यर व निरनिराळी वाधे यांचे अफेअर - ओपीनी कोणकोणती वाद्य प्रामुख्याने वापरली याचा उल्लेख वर आलाच आहे. तंतू वाद्यांचा उपयोग तालवाद्ये म्हणून करणे ही ओपींची खास विशेषता. ओपी व हार्मोनियम- ओपीनी हारमोनियम हे वाद्य ज्या पातळी वर वापरले त्याला तोड नाही. बाबु सिंग हे बिनीचे वादक हारमोनियम हा संयोग हे नय्यर साहेबांच्या ऑर्केस्ट्रातील महत्वाचे बलस्थान आहे.

ऑरेंज क्रोशे स्टोल

लेखक जयवी यांनी शनिवार, 26/01/2013 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नेटवर फार गोड डिझाईन मिळालं....मोह आवरता आला नाही ....केली सुरवात :) हे डिझाईन तुम्हाला कसं करायचं ते इथे बघता येईल. http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html

अन्यथा

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 26/01/2013 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीवना, भेट केव्हातरी अंतरीच्या उमाळ्यापरी आसवांच्या उधाणातही पापण्यांच्या रित्या घागरी भांडणावाचुनी व्हायची भेट माझी-तुझी का खरी? नाव मी भोवर्‍याला दिली, साद देती किनारे जरी जीवघेणा कडाका इथे, सांत्वनाच्या तिथे चादरी ! पाचवीलाच मी पूजिली शब्द झेलायची चाकरी अंत पाहू नको रे सुखा, साथ दे, अन्यथा जा तरी!
काव्यरस

श्री.शरद काळे यांचे अभिनंदन

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 26/01/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मित्र श्री.शरद पांडुरंग काळे यांना पद्मश्री हा बहुमान जाहीर झाला आहे. जैवशास्त्रावरील संशोधन आणि त्याचा उपयोग करून जैवी कच-यापासून (बायोमासमधून) ऊर्जेची निर्मिती या सध्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ते अखंड कार्यरत असतात. अशा अनेक प्रकल्पांच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला आहे. वसुंधरवरील पर्यावरणाची जपणूक या ध्येयाला त्यांनी वाहून घेतलेले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

आताची परीक्षापध्दती - योग्य की अयोग्य?

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 26/01/2013 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारच्या नवीन धोरणांनुसार शिक्षण पध्दतीत्त अमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. सतत नवीन प्रयोग चालू आहेत. परीक्षांचे स्वरूप बदलले आहे.आठ्वीपर्यंत ओपन बूक टेस्ट आणि नववीला एकदम दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम!! सर्वंकश मूल्यमापन करताना, विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे कमी केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मी माझ्या मुलाचे दप्तर उचलू शकत नाही, तो कसे उचलतो देव जाणे. नवीन धोरणानुसार अभ्यासाच्या बरोबरीने उपक्रम, प्रकल्प, ग्रुह्पाठ, वर्गपाठ अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे लिखाण पूर्ण करताना मुलगा कारकुनी तरी उत्तम करील यात शंका नाही. दप्तराचे ओझे उचलून उचलून हमालीची पण सवय झालीच आहे!!

शा. संगीताचा समय आणि समज ...

लेखक तर्री यांनी शुक्रवार, 25/01/2013 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुठचा राग कुठच्या प्रसंगी गावा याचे शास्त्रीय संगीतात काही संकेत आहेत. ते नियम आहेत असे समजू नये. जास्तीत जास्त कोमल स्वरांचे राग संधीकाळी व शुद्ध स्वरांचे राग पूर्ण प्रहरी असे सर्व साधारण विभाजन आहे. जे राग जास्त आर्त आहेत - मारावा , पूरिया ते सायंकाळी व जे प्रसन्न आहेत ते सकाळी - बिभास , भैरव , तोडी अशी त्यांची विभागणी आहे. साधारणपणे भैरव व भैरव थाटातले राग पहाटे गातात. कोमल ऋषभ हा ( जीवघेणा) स्वर हया सर्व रागांचा प्राण आहे. दोनीही मध्यम असणारे राग - यमन , छायानट , बिहाग , केदार , भूप हे रात्रीच्या पहिल्या प्रहारचे मात्तबर राग ( ओपनिंग बेंटस्मन ). म्हणून ते मैफिलीच्या सुरवातीला गातात.

R2T (समाप्त)

लेखक वाह्यात कार्ट यांनी शुक्रवार, 25/01/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
R2T भाग १ बुधला माचीच्या पायथ्याला पोहोचेपर्यंत ऊन बरंच चढलं होतं. पायथ्यापास्न वर जायला एक कातळटप्पा लागतो. तो चांगलाच तापलं होता. तो सर करून एक शिडी लागते. शिडीवरून एकदाची माची गाठली आणि हुश्श केलं. माचीवर एक मामा ताक विकायला बसले होते. इतक्या उन्हात्न बोंबलत आल्यावर ते पांचट ताकपण एक नंबर लागलं. त्या माचीवर तेलाच्या बुधल्याच्या आकाराचा सुळका आहे. त्यामुळे त्याला बुधला माची म्हणतात. सुळक्याच्या मध्यापर्यंत गिर्यारोहणाच्या साहित्याशिवाय चढाई करता येते. मध्यावर सुळक्याला एक चिमणीवजा खाच आहे.