Skip to main content

मूर्ग हैदराबादी

लेखक जयवी यांनी सोमवार, 28/01/2013 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
“आई, मस्त चिकन बनवशील का आज ?” पिल्लाचं आर्जव…… तेही त्याच्या वाढदिवसाला……!! मग ते न बनवून कसं चालणार… !!

मैफिलीतले प्राणी - एक अभ्यास

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 27/01/2013 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे. तुम्हाला मैफिलींना जाण्यासाठी वेळ आणि संधी आहे. पण त्या मैफिलीचा आनंद तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकणार आहात, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, राग, ध्वनिव्यवस्था वगैरे वगैरे. अजून एक महत्त्वाचा घटक त्यात आहे - तुमचा शेजारी. मैफिलीत तुमच्या शेजारी बसणारा इसम. मैफिली ऐकण्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक शेजारी लाभले. म्हणजे काही 'लाभले' आणि काही 'भोगावे लागले'. त्यांच्या जातकुळ्याही लक्षात यायला लागल्या. मैफलप्रेमी मिपाकरांसाठी हे "रेडी रेकनर". १.

नशिबाचे भोग -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/01/2013 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
" फुलू दया ना मला जरा , बघू दया ना जग जरा - तुम्ही सजीव, मीही सजीव कळून घ्या भावना जरा -" एक कळी स्फुंदत होती , वेलीजवळ मी असताना - मन आपले उलगडत होती हितगुज माझ्याशी करताना ! " काही करू शकत नाही जगाविरुद्ध जाता येत नाही - मरणाऱ्याला जगवते जग जगणाऱ्याला मारते जग -" ...केविलवाणे होत म्हणालो , दु:ख जाणूनही कळीचे . खिन्न हसून ती वदली .. " नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! " .
काव्यरस

देहाला चोळुन घेता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 27/01/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
देहाला चोळुन घेता राखेने उदी बनावे धुवून सारी पापे स्वर्गात स्थानही द्यावे घाबर्‍या कोडग्या मनाते दुजे न काही रुचते भस्माच्या पट्टी मागे ते तोंड लपवुनी बसते (कुण्या भाग्यवंताचा) हा तुटता लटका आधार आत्मरुप दिसे भेसुर गलीतगात्र मग होई नरपुंगव तो लाचार, मग तुटती तटतट पाश मनी पडतो स्वच्छ प्रकाश त्या अनंत धेय्या साठी सुरु अंतहीन प्रवास
काव्यरस

मटार करंजी ..एक प्रभातसुख..

लेखक गवि यांनी रविवार, 27/01/2013 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सकाळ आणि समोर ढीगभर पुरवण्यांसहित पडलेले पेपर्स.. अशा वेळेला पोहे, शिरा, उपमा असे हपीसकॅन्टीनी नाश्ते समोर येऊ नयेत असं वाटतं. मटार करंजी किंवा शेप बदलून त्याचेच मटारसामोसे असा खुसखुशीत पदार्थ पेपरमधल्या वैचारिक लेखांसोबत मस्त. आजच हा पदार्थ बनवता बनवता लाईव्ह इथे अपलोडवतोय. यापूर्वीही पेठकरकाका आणि इतर सन्माननीय बल्लवाचार्यांनी या पदार्थाच्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स इथे दिलेल्या आहेत. पण आज पुन्हा एकदा ही ताजी गरमागरम पेशकश. साहित्यः टीप - इथे चित्रात दाखवलेलं साहित्य मोजण्यापूर्वीच्या स्थितीतलं आहे. १.

ड्रॅगनच्या देशात २१ – शांघाईची मुक्तसफर आणि परतीच्या वाटेवर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 27/01/2013 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात : ०१... ०२... ०३...०४... ०५...

‘भीमथडी जत्रा’ - काही प्रश्न

लेखक लई भारी यांनी रविवार, 27/01/2013 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
‘भीमथडी जत्रा’ हा बचत गटांना उभारी देणारा उपक्रम आहे यात शंकाच नाही. राज्याच्या सर्व भागातून आलेल्या बचत गटांचे स्टॉल बघून निश्चित बर वाटलं पण काही प्रश्न मात्र पडले. बचत गटांच्या बरोबरीने मोठ्या व्यावसायिकांना स्टॉल देण्यामागचे प्रयोजन काय? विशेषतः खाद्य जत्रेमध्ये. उदा. वेन्कीज, सुहाना, कुशन चेअर, आईस्क्रीम, मिनरल वॉटर कंपन्या, हुरडा इ. जालना, लातूर, हिंगोली, सोलापूर इ. ठिकाणच्या दुरून आलेल्या बचत गटाच्या प्रतिनिधींकडून चांगला अनुभव मिळाला आणि काही ठिकाणी छापील किमतीपेक्षाही कमी किमतीला उत्पादने मिळत होती. पण बऱ्याच स्टॉल वर अवाजवी किमती होत्या.

भावना दुखावणे: एक दुखणं

लेखक शैलेंद्रसिंह यांनी शनिवार, 26/01/2013 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
भावना दुखावणे हा एक प्रकार आपल्या भारतीय समाजात रुढ झाला आहे. ह्यात लेटेस्ट म्हणजे कमल हासनच्या विश्वरुपम ने मुस्लिम समाजाच्या दुखावल्या आणि त्या चित्रपटावर तामिळनाडु सरकारने बंदी आणली. हा चित्रपट अजुन पाहण्यात आलेला नाही, पण तरीही त्याला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तो चित्रपट रिलीज व्हायला काही हरकत नसावी. भावना दुखावल्याच्या नावाखाली ज्या झुंडशाहीचे प्रदर्शन होतांना दिसते त्याला कंट्रोलमधे आणायलाच हवं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र शासनाने ह्याबद्दल कौतुकास्पदरित्या ठाम भुमिका घेतलेली आपण पाहिली. ’माय नेम इज खान’ रिलीज होऊ दिला.

रिअल हिरोंना इलेक्ट्रोनिक्स मधमे योग्य प्रसिद्धी देतात का?

लेखक मस्त् राम यांनी शनिवार, 26/01/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ २०० रुपयात स्वतःच लग्न करणारा ग्रामीण भागातील सुशिक्षीत तरुण, मुंबई मारेथोन मध्ये यश मिळवणारी एका सामान्य शेतकर्याची मुलगी, प्रतिकूल आर्थिक परस्तीतीत C A होणारी ग्रामीण युवती, विकालान्गांसाठी कार्यरत असणाऱ्या पाचोरा गावातील मुली, या व अश्या अनेक रिअल हिरोंना सकाळ ने लोकांसमोर आणले. परंतु टीवी, नेट सारखी इलेक्ट्रोनिक माध्यमे या लोकांना प्रसिद्धी देउन समाजात एक आशावादी विचार प्रवाह निर्माण करण्यात मागे राहतात.