Skip to main content

नामांतर

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 25/01/2013 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
n सर्व मिपाकरांना नमस्कार. सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.

ड्रॅगनच्या देशात २० – बगीच्यांचे गाव सुझू आणि पूर्वेचे व्हेनिस झोउझुआंग

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 25/01/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात : ०१... ०२... ०३... ०४... ०५...

सिद्धोबा

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 25/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो. थोडं आत वळल्यावर - भर दुपारी अचानक एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो. मूळ खोड नसणाऱ्या पारंब्यांच्या वडाखाली मोरांचा एक थवा केकारवत फिरतो इकडेतिकडे. तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी एक नितळ झरा आहे, थंडगार! वेळू आणि आमराई वगैरेही- निळंशार आकाश, स्वच्छ मन, निवलेले डोळे, अक्षय शांती- तोच सिद्धोबा! पण थोडं आत वळावं लागतं - स्वतःच्या. कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो - तिथे रहदारी असते फक्त. .
काव्यरस

अनुनय

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 25/01/2013 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
असतात रंग ढंगहि वेडे झरतात छटा रत रुधिराच्या हृदयात बंदिशी अनोळखी डोळ्यांकाठी रति भावुकशा खल मदन उरी रण रिपुकांचे ओठांवरती नित शब्द मुका काया माया बहु काटेरी ओढाळ मती अस्वस्थ सखा चंद्रास न कळते झिजलेले पाण्यास व्यथा परि आकळते फेसाळ शिरी कल्लोळे जळ एकांत कुंद साहतो कळा सारेच कसे हे अवरोही तळ नितळ सकळ ढवळे गात्री आभाळ दूर दूरच सरके मग श्वास फिरे नत माघारी डोहात बंद अगणित रात्री गंधर्व क्षणांच्या गंध कुपी अस्पर्शधुंद हा ओलावा अनुनय समिधांचा मापारी ........................अज्ञात

अलिबाग . . .

लेखक हुकुमीएक्का यांनी शुक्रवार, 25/01/2013 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारी अचानक मनात आले की कुठेतरी भटकायला जावे . . .लगेच प्लॅन केला. . .राजेसाहेबांना फोन केला आणि ते घरी आहेत याची खात्री केली. . .परंतु जायचे होते अलिबागला! राजेसाहेब सहज येतील अशी खात्री नव्हती. . .म्हणून सरप्राईझ ट्रिप ठरवली. . .राजेसाहेबांना सांगितले की आपल्याला लोणावळ्याच्या पुढे एका स्पॉट ला जायचे आहे. . .राजेसाहेब तयार झाले. पेणला आल्यावर राजेसाहेबांना कल्पना दिली की आपण अलिबागला जावून परत येऊ शकतो. . .राजेसाहेबांनी होकार दर्शवला. मग पेणला नाष्टा करून अलिबागच्या दिशेने रवाना झालो. किनार्‍यावर गेल्यावर फोटो काढणे सुरुच होते. .

देहाला चाळुन घेता

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 24/01/2013 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुजीत फाटकची एक मस्त कविता मागे वाचली होती. त्याच्याशी संपर्क साधता आला नाही. पण पोरगं नक्की कलंदर असणार. किती जणांनी वाचली असेल कल्पना नाही पण तुम्हालाही ती आवडेल म्हणून इथे देतोयः देहाला चाळुन घेता मातीची पखरण व्हावी हा इकडे देह सरावा ती तिकडे मूठ भरावी माझ्यावरच्या शापांचा उ:शाप तुझ्या ना ठाई इतक्या उबदार करांची तू अजून नाहिस बाई माझ्या वंशाच्या गावी रंगाला फुटतो गंध दृष्यांना सुचती कविता गंधाचा होतो स्पर्श माझ्या असल्या वंशाचे कित्येक उमलले कोंभ परि माझ्यारूपी पक्का वंशाचा पहिला अंत (सुजीत फाटक) कविता गंभीर असली तरी दु:खद खासच नाही.

बापाने पोर कशी संभाळायची ?

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 24/01/2013 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
धागा थोडा वादग्रस्त आहे पन माझ्यासारखे सगळेच बाप या भुमिकेतुन गेले असतील. १)पोरग १-२ तास संभाळणे सोप्पे आहे पन त्यानंतर काय ? २)आई जवळ नाही आणी भोकाड पसरले की बाबा हव ते घेउन देतो किंवा पाहिजे ते हट्ट पुरवुन घेणार्‍या अतिहुषार पोट्ट्यांच काय करायच. ३)आई माझ सगळ काम करते,असे केविलवाना चेहरा करुन बाबाला कामाला जुंपतात त्याच काय करावे. ४)इमोशन ब्लॅकमेलिंगच (आई आणी बाळ दोघांकडुन )त्याच काय ?

मृगजळ- एक आभास

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 24/01/2013 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी लहान असताना मृगजळ नावाची कविता बालभारतीच्या पुस्तकात होती. कवीच नाव आणि कवितेच्या ओळी सुद्धा आता आठवत नाही आहेत.हा पण मी तेव्हा प्राथमिक शाळेत असेन तेव्हा कधीतरी होती नेमकी इयत्ता नाही सांगता येत. आमच्या बाईंनी खूप छान शिकवलं होत पण सार काही डोक्यावरून गेल होत. आम्हीच कुठे तरी कमी पडलो कारण त्या वयापर्यंत बाई खूप चांगल्या शिकवायच्या नंतर मात्र हळूहळू शिंग फुटायला लागली.तो भाग तसा वेगळा आहे.

लिंकन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/01/2013 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी हॉलिवूड मधील सर्वात जास्त अ‍ॅकॅडमी अर्थात ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स कुणाला मिळणार याचे उत्तर स्पिलबर्गचा "लिंकन" हा महीना-दिड महीन्यापूर्वी प्रकाशीत झालेला चित्रपट बघताना सहज मिळाले! मध्यंतरी वाचल्याप्रमाणे, डॅनिअल डे लुईस या ब्रिटीश नटास (खाली डावीकडील) स्पिलबर्गने लिंकनचे काम करशील का म्हणून विचारले. त्याने स्पिलबर्गला एक वर्षे थांबण्यास सांगितले. नाराजीने का होईना पण स्पिलबर्ग स्वतःच्या निवडची खात्री असल्याने थांबला. नंतर जो आला तो डॅनिअल डे लुईस नव्हताच....

रंगीत दहशतवाद

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/01/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे.