घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना
नाही जमेस काही आयुष्य मोजताना
भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या
काळीज सागराचे घेऊन हिंडताना
ना घातली हवा तू राखेस एकदाही
सारी हयात गेली अंगार शोधताना
आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी
आवाज होत नाही स्वप्नात बोलताना
होतो बर्याचदा मी माझाच हाडवैरी
बेभान अक्षरांचे आसूड ओढताना
- उपटसुंभ
काव्यरस
आज नेताजी सुभाष जयंती
भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.'लेह' वारी, भाग ५
'लेह' वारी, भाग १
'लेह' वारी, भाग २
'लेह' वारी, भाग ३
'लेह' वारी, भाग ४
हा भाग टाकायला थोडा उशीर झाला... त्या बद्द्ल क्षमा असावी.....
असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो.
सकाळी लवकर ५.३० लाच उठलो.
स्टफ्ड मेथी टिक्कि
साहित्यः
१. उकडुन / मॅश केलेले बटाटे - २ मध्यम
२. हिरव्या मिरच्या - २
३. बारिक चीरलेली मेथि - १ वाटि
४. पेरभर आलं
५. मुठभर कोथिंबीर
६. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे आवश्य्कतेनुसार
७. चवीनुसार मीठ
८. तेल - शॅलो फ्राय करण्यासाठि
स्टफिंगसाठि:
१. मक्याचे दाणे - १/२ वाटि (उकडुन भरडसर वाटणे)
२. किसलेले चीज - १/२ वाटि (आपापल्या आवडिप्रमाणे; मी चेडार चीज वापरलय)
३. चवीनुसार मीठ (चीज मधे कितपत आहे त्या प्रमाणात)
४.एगलेस होलव्हीट पॅनकेक
नवीन वर्षातला नवीन प्रयत्न आहे, अंड युक्त पदार्थांचे अंड रहित पर्याय/ पाक्रु शोधून काढायच्या. ही पॅनकेक ची कृती मला, सई खांडेकर - माझी ब्लॉगर मैत्रीण, हिच्या ब्लोग वर सापडली.
सामग्री:
१ कप गव्हाचे पीठ
१ कप रवा
३/४ कप साखर
१ चमचा खायचा सोडा
१ चिमुट मीठ
२ कप दूध
१ मोठा चमचा तूप
कृती:
- सर्व सामग्री एकत्र करा.जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे -
'कन्या परक्याचे धन ' मानून
घडवलं व्यक्तिमत्व छान
सासरी करताना वाटे
सार्थ अभिमान
-----------------------------------------------
आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !!
अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल.
इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता.
तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
माझ्या कुतुहलाची दीनगाथा!
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो...
भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया!
(लेख इतरत्र पुर्व-प्रकाशित)
या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती.
मिसळपाव

