मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक
मागील भाग : "मेसोअमेरिका(६) - आस्तेक "
२५ फेब्रुवारी १९७८ ची मध्यरात्र. मेक्सिको सिटी नगरपालिकेच्या वीज कामगारांचं नेहमीप्रमणे खोदकाम चालू होतं.
'झोकालो'(१) च्या आसपास खोदकाम करता करता अचानक २ मीटर खोल अंतरावर सुमारे ८ टन वजनाचा अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला दगड कामगारांना सापडला. त्यानंतर लगोलग मेक्सिको सिटी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं आणि यातूनच आस्तेकांबद्द्लची बरीच माहिती उजेडात आली. हा शोध फक्त मेसोअमेरिकाचं नव्हे तर जागतिक पुरातत्त्वक्षेत्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
मिसळपाव