Skip to main content

अनुत्पादक काम

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 14/01/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी डिसेंबर १९८८ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात).

एरन स्वार्त्झ काळाच्या पडद्या आड?? आत्महत्या??

लेखक कापूसकोन्ड्या यांनी सोमवार, 14/01/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात काय चाललेले आहे? गदिमांच्या भाषेत " पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" हेच खरे. इंटर्नेट वर Really Simply Sindcation किंवा Rish Site Summary (RSS) सारखा एक खुप उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तयार करणारा तरूण काळाआड झाला हे वाचून खुप दु:ख झाले. वास्तविक कुणाचा कोण स्वात्झ्र (ज्याला काळा की गोरा बघितला तर नाहीच पण त्याच्या नावाचा धड उच्चार ही करता नाही), पण आत कुठे तरी कळ येउन गेली.

हेअर पीन क्रोशे स्टोल

लेखक जयवी यांनी सोमवार, 14/01/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा आणखी एक प्रकार क्रोशेचा. आधी हेअर पीन ने शेंगा विणून घेतल्या मग त्या एकमेकांना जोडून शेवटी त्याला बॉर्डर केली.

गोड...काटा रुते कुणाला...!?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 14/01/2013 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss
अत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे..

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/01/2013 08:24 या दिवशी प्रकाशित केले.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

सौदी संस्कृती

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/01/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल माणूस एकमेकापासून दुरावत चालला आहे. आपल्या शेजार्‍यासाठी आपण कितीसे करतो. पण शेकडो मैलवर राहणारी सौदी अरेबियातील काही महान माणसे आपल्या प्रेमाची छाया केवळ आपल्या देशापुरतीच मर्यदित न ठेवता आपल्या प्रेमाची पाखर भारतीयांवरही घालत आहेत. हे कार्य अव्याहतपणे गेली काही वर्षे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इथे सुरू आहे. सौदी अरेबियन लोकांच्या विशाल हृदयामुळे येथल्या अनेक जणांना केवळ प्रेमच नव्हे तर पैसासुद्धा मिळाला आहे. मात्र एवढे सारे करूनही या कामाची जाहीरात होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाते.

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

लेखक बापू मामा यांनी रविवार, 13/01/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥ कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्‍याला ! राखत जावे ॥ पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10 तीळ गुळ घ्या !