Skip to main content

कोबी पराठा.

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 16/01/2013 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
लहाणपणी "कोबी" अन त्याची भाजी हे एक माझ्या नाकासाठी छळवादी प्रकार होते. का कुणास ठाउक पण कोबी काही माझी लहाणपणाच्या आठवणीतली,"रम्य, चविष्ट,तों.पा.सु." भाजी नाही. मग वयाने मोठ व्हाव लागल, अन पानात पडेल ते मुकाट खाण हे रितीला धरुन मान्य कराव लागल. तरीही, कोबी असला की मी दही-साखर, तिळकुट, तोंडी लावणे, यावर जास्त भर देत शक्यतो कोबी शेवटपर्यंत राखुन ठेवत असे. मग झाल लग्न; अन रोजच्या," आज काय करायच?" या प्रश्नाबरोबर टिफीन फ्रेंडली भाजी म्हणुन मला या"गड्ड्याला" शरण जावं लागल.

रक्तामधील घटकांचे आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 15/01/2013 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते.

कांती शाह नावाच कल्ट

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 15/01/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.

मी नव्याने कोवळा झालो...

लेखक धन्या यांनी सोमवार, 14/01/2013 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच.
काव्यरस

मनातलं जनात आणलंय

लेखक तळेकर यांनी सोमवार, 14/01/2013 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता "महामानव" आयुष्यभर त्याने संत साहित्याचा अभ्यास केला. प्रचार केला. खास करून व्यभिचार आणि भ्रष्ट आचाराला वीरोध केला. व्यभिचारींची "मदत" घेण्यास नकार दिला. त्यांच्या आचरणाने शिकवणीने आम्ही सारे भारुन गेलो.

अलिबागचा " सूर्यास्त "

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 14/01/2013 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस. काय बी टेंनशन न घेण्याचा दिवस. टी व्ही वरचा काहीतरी कार्यक्रम पहात कोचावर लोळत पडलो होतो. दुपारी पावणेदोनचा सुमार. दारावरची बेल वाजली. एक मिपाकर " हुकमी एक्का" दारात हजर. "लवकर तयार व्हा काका ! आपल्याला लोण्यावळ्याचा पुढे एक स्पॉट वर जायचेय ! येता काय ? " म्या काय बोलणार ?

नि:शब्द .... मी !

लेखक विदेश यांनी सोमवार, 14/01/2013 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला भेटल्यावर मी एकही शब्द बोललो नाही ! अगदी स्वाभाविक आहे तुझा नंतरचा रुसवा फुगवा ; सांगू का खरेच सखे , तुला पाहताक्षणीच - नुसतेच पहावेसे वाटत राहिले...शब्दांनाही ! . . .

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/01/2013 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.