Skip to main content

अक्षर

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 11/01/2013 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते. आजूबाजूला सगळी अनोळखी गर्दी असतानाही चालत होते. सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता! पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती. इतकंच. आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं. त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत. आह..!

जुन्या काळातील गोष्ट

लेखक अनिल तापकीर यांनी शुक्रवार, 11/01/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
साऱ्यांची घरट्यात परतण्याची वेळ ,म्हणजे शेतकऱ्यांची शेतातून, गुरांची रानातून ,पक्षांची आकाशातून, मुलांची शाळेतून आदी,तर अश्या सांजवेळी आम्ही सारी पोरं सुताराच्या ओट्यावर जमायचो आणि तिथे चार पाच म्हातारे बसलेले असायचे.म्हणजे पत्ते कुटीत बसायचे आम्ही पोरं तिथं गेलो कि ते आम्हाला जागा करून द्यायचे.

आता तरी मानवा सावध होशील का ?

लेखक शिवप्रसाद यांनी गुरुवार, 10/01/2013 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी मानवा सावध होशील का? मानवतेच्या धर्माला जागशील का? चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले । त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले । ईश्वराने मग ध्यान लाविले । मानव रूप आकारासी आले । तुझ्या रूप-गुणांसी भुललास का? आता तरी मानवा सावध होशील का? विश्वामध्ये सर्व जीव अज्ञानी । म्हणुनी तुजला केले बुद्धीमानी । परी चाले तुझीच मनमानी । तुझ्या निर्मात्यास तूच न मानी । जन्मदात्यास तरी तू मानशील का? आता तरी मानवा सावध होशील का?

प्रांतिक किंवा भाषीय वाद

लेखक पंकज रुगे यांनी गुरुवार, 10/01/2013 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारींना होतोय बिहारचा भास सरदारांनी घेतलाय पंजाबचा ध्यास मराठ्यांनी धरलीय महाराष्ट्राची कास कोंडतोय यात एका भारतीयाचा श्वास ... आजोबांनी लढली स्वातंत्र्याची लढाई बाबांनी लढली धर्माची लढाई आपण लढतोय प्रांताची लढाई मुले लढतील त्यांच्या भागाची लढाई... शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना महागाईचा फुगा आटोक्यात येईना अन्यायाविरुद्ध कोणी संघर्षही करेना प्रांताच्या नावाखाली एकमेकांचा जीव काही सोडेना... दहशतीचा काळ काही केल्या थांबेना सीमाही आता सुरक्षित वाटेना विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडेना तरीसुद्धा आपण प्रांत काही सोडेना... सगळ आता कळतया पण मन मात्र वळेना विचार आपला बदलतोया पण कृत

डीझेल दरवाढ्,महागाई ई. संबंधी चाललेल्या विविध ३ चर्चा- तुमचं मत अपेक्षित ..

लेखक १००मित्र यांनी गुरुवार, 10/01/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ९-१५ – ग्रुप क्र. १ “हल्ली कोण पण गाड्या घेतं राव” “अरे, जागा विकून पैसे आलेले असतात ना !” “बरोबर आहे १ रू चे १ कोटी मिळाल्यावर काय व्हायचं” “पण सगळे दारू, किंवा पनवेल ला जातात हे पैसे , माहितिये ?” “हं.. इनव्हेस्ट्मेंट्चं नॉलेजच नसतं यार ह्यांना” “जागाच विकतात फटाफ़ट, सोनं का नाही घेत कुणास ठाऊक” “त्यांचं ठीक आहे रे, पण आपल्यासारख्यांनी काय करायचं ?” ——————————————————————– १०-१५ जिम :- ग्रुप क्र. २ :- “काय बरेच दिवसांनी … “जरा कामात होतो… “चांगलं आहे, म्हणजे कामं पाहिजेतच हो “!” “नाहीतर हल्ली अवघडच आहे ना! “५०,००० रू सुद्धा पुरायचे नाहीत. “हो , हो. “घरचा खर्च, इ.एम.आय.

राज ठाकरेंचं मौन?

लेखक अविकुमार यांनी गुरुवार, 10/01/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत. मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला. १. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे) २. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय) ३.

दुर्गम दुर्ग - देवगिरी!!

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 10/01/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
"दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच." महाराजांनी आपली राजधानी रायगडावर हलवण्याआधी सभासदाने रायगडाची आणी दौलताबादेच्या किल्ल्याची केलेली तुलना!! औरंगाबाद दौर्‍याच्या आधीच्या दोन दिवसात आम्ही अजिंठा आणि वेरूळ केल्यानंतर तिसरा आणि शेवटचा दिवस आम्ही देवगिरी या अद्भुत दुर्गासाठी राखून ठेवला होता. मग ठरवल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता औरंगाबाद सोडलं आणि अर्ध्या-पाऊण तासात देवगिरीच्या पायथ्याला पोहचलो. औरंगाबादपासून वेरूळला जाणार्या रस्त्यावर साधारण १०-१५ किमी गेलं कि डाव्या बाजुला शंखासारख्या आकाराचा देवगिरीचा डोंगर दिसतो.

पुन्हा एकदा पाकिस्तान

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 09/01/2013 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते. कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे?